|| डॉ. किशोर अतनूरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिझेरियनच्या बाबतीत लोकांचा गैरसमज फारच टोकाला पोचलेला आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. सिझेरियन झालं म्हटलं की, बाकी काही असो; पण बहुतेकांची पहिली प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते. सिझेरियन म्हटलं की अनावश्यकच, हे मत लोकांच्या डोक्यात खोलवर रुजलेलं आहे. खासगी क्षेत्रात सिझेरियन प्रसूती केल्यानंतर डॉक्टरांना खूप जास्त पैसे मिळतात म्हणून, अनावश्यक सिझेरियन होतात. या संदर्भातील सध्याचं वास्तव, समाजासमोर येणं गरजेचं आहे असं वाटतं.

नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियन केल्यानंतर आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणून आपण मुद्दाम सिझेरियन करतो हा समज लोकांच्या मनातून काढून टाकावयाचा असेल तर काही डॉक्टर्सनी बिलाच्या बाबतीत एक वेगळी सूचना केली. रुग्ण बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, नातेवाईकांनी एक ठरावीक रक्कम जमा करायची. बाळंतपण नॉर्मल होवो अथवा सिझेरियन होवो, बिल सारखंच. महाराष्ट्रात काही डॉक्टर्सनी हा प्रयोग करूनदेखील पाहिला, पण हा काही या समस्येवर रामबाण उपाय आहे, असं वाटत नाही. ही ‘ठरावीक’ रक्कम किती असावी हे कुणी ठरवायचं? डॉक्टर्सनीच ना? पुन्हा शंकेला जागा!

कोणत्या रुग्णाचं बाळंतपण नॉर्मल होईल आणि कोणत्या रुग्णाला सिझेरियन लागेल, याचा डॉक्टरला अंदाज असतो, पण होईपर्यंत खात्री नसते. अमुक एका रुग्णाची डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाईल याची जवळपास खात्री असताना, अचानकपणे काही महत्त्वाच्या कारणांसाठी सिझेरियनची वेळ येते. अशा प्रसंगी रुग्ण आणि नातेवाईकांना ‘नॉर्मल होऊन जाईल’ या मन:स्थितीतून बाहेर काढून सिझेरियन करणं आवश्यक आहे, हे त्यांना समजावून सांगून, सिझेरियनसाठी त्यांची संमती घेण्याच्या प्रक्रियेत, काही जण डॉक्टरवर मनापासून विश्वास ठेवून लगेच संमती देतात तर काही जण चर्चा करतात आणि मग थोडय़ा नाराज मनाने संमती देतात. फार थोडे जण अजिबातच तयार होत नाहीत, सर्व परिस्थितीची जाणीव देऊनदेखील, नॉर्मलच करा, असा आग्रह धरतात, डॉक्टरच्या प्रामाणिकपणावर उघडपणे शंका घेतात. ‘सीझरचं बिल घ्या पण डिलीव्हरी नॉर्मल करा’ असं क्लेशदायक वक्तव्य करतात. दरम्यान बाळंतपणाच्या संदर्भातली परिस्थिती बिघडत जाते आणि प्रचंड नाखुशीने संमती दिली जाते. अतिशय अल्प प्रमाणात का होईना, असं घडलं आहे की, एखाद्या स्त्रीचं सिझेरियन करावं लागेल, असा डॉक्टरांनी निर्णय दिल्यानंतर, नातेवाईकांनी संमती न देता त्या रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर तिथे तिची नॉर्मल डिलिव्हरी होते. अशा प्रसंगी, पहिल्या डॉक्टरबद्दल, पैशांसाठी सिझेरियन करण्याचा निर्णय दिला असा समज होणं स्वाभाविक आहे. अशा घटनांची चर्चा भरपूर होते आणि डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होतात. असे डॉक्टरांना तोंडघशी पाडणारे प्रसंग घडतात. याचा अर्थ पहिला सिझेरियन करावं लागेल असं सांगणारा डॉक्टर दुर्जन आणि नंतरचा डॉक्टर सज्जन असा होत नसतो, कारण त्या दुसऱ्या डॉक्टरवरदेखील अशी वेळ येऊ शकते किंवा येऊन गेलेली असते हे लोकांना माहिती नसतं. पहिल्या डॉक्टरनेदेखील सर्व गोष्टींचा विचार करूनच सिझेरियनचा निर्णय घेतलेला असतो, पण ती परिस्थिती बदलण्याची किमया निसर्ग करू शकतो.

बाळंतपणाच्या केसेसमध्ये आजकालच्या ‘एक किंवा दोन पुरेत’च्या दुनियेत, रुग्णाला, नातेवाईकांना आणि डॉक्टर्सना, यापैकी कुणालाच ‘रिस्क’ घ्यायची नाही, हा कळीचा मुद्दा आहे. ‘तशी परिस्थिती असेल तर डॉक्टर रिस्क घेऊ नका, आम्हाला आई आणि बाळ दोन्ही सुखरूप पाहिजेत, आवश्यकता असल्यास तुम्ही सिझेरियनचा निर्णय घेऊ शकता’ असं स्वत:हून सुचवणारे लोकही आम्हाला भेटले. वैद्यकीय व्यवसायाचा ग्राहक सुरक्षा कायदाअंतर्गत समावेश झाल्यापासून एकंदरीतच डॉक्टर मंडळी कोणताच धोका पत्करायला तयार नाहीत. अन्य कोणत्याही शाखेपेक्षा याचा एका अर्थाने विपरीत परिणाम प्रसूतीशास्त्राशी संबंधित केसेसच्या बाबतीत अधिक जाणवतो. किंबहुना सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढण्यासाठी या कायद्याने कळत नकळत हातभार लावला आहे. सिझेरियन केलं तर का केलं, नाही केलं तर का नाही केलं असं सन्माननीय न्यायालय डॉक्टरला विचारू शकते.

राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना, काही खासगी कंपनीत काम करणाऱ्यांना सिझेरियन झाल्यानंतर, होणाऱ्या खर्चाची भरपाई शासनाकडून वा खासगी कंपनीकडून मिळण्याची तरतूद असते. आयटी सेक्टरमधे काम करणाऱ्या इंजिनीअर्सना तर भरपूर अशा आर्थिक सुविधा मिळत असतात. ज्यांना अशी सोय नसते असा वर्गदेखील समाजात संख्येने भरपूर आहे. त्यापैकी काहीजण आरोग्य विमा काढण्याची समजदारी दाखवतात. कोणत्या तरी प्रकारे मेडिकल बिल परत मिळण्याच्या सोयीचा प्रभावदेखील सिझेरियनचं वाढणाऱ्या प्रमाणावर होत आहे. मॅटर्निटी होमचं बिल कितीही जरी झालं तरी आपल्याला ते परत मिळण्याची तरतूद आहे याचं ‘फिलिंग’ वेगळंच असतं. सांगून विश्वास बसणार नाही अशी घटना हॉस्पिटलच्या बिलाच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी घडली. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एका संगणक अभियंत्याच्या पत्नीचं सिझेरियन एका हॉस्पिटलमध्ये झालं. त्यांनी विचारलं, ‘‘मॅडम, हॉस्पिटलचं बिल किती झालं?’’ मॅडम म्हणाल्या, २२ हजार रुपये.’’ त्यावर तो अभियंता म्हणाला, ‘‘मला कंपनीकडून एका सिझेरियनच्या बिलापोटी ७५ हजार रुपये मिळण्याची तरतूद आहे तेव्हा तुम्ही मला ७०-७५ हजारापर्यंतचं बिल बनवून द्या.’’ आपल्याला कंपनीकडून बिलाचे पैसे परत मिळण्याची व्यवस्था आहे, ठीक आहे. त्याचा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा, पण त्यातून सुमारे ५० हजार रुपये कमाई करण्याचा मनसुबा ठेवणे योग्य नाही. विमा कंपनीने अथवा अन्य माध्यमातून मेडिकल बिल परत मिळण्याच्या सोयीमुळे, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधून रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याच्या क्षणाला प्रश्न विचारला जातो- ‘आर यू इन्सुअर्ड?’ त्यांनी विमा काढला असल्यास त्या रुग्णाकडे पाहण्याचा डॉक्टरचा दृष्टिकोन वेगळा असणेदेखील योग्य नाही.

सिझेरियन करून जास्त पैसे मिळवणे हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे, तितकाच सिझेरियन केल्याने डॉक्टर आणि नातेवाईकांच्या वेळेचं नियोजन व्यवस्थित होतं आणि अपत्यजन्माशी संबंधित अनिश्चितता संपते हे मुद्देदेखील महत्त्वाचे आहेत. कधीकधी पैसे हा मुद्दा नंतर नमूद केलेल्या दोन मुद्दय़ाच्या तुलनेत गौण ठरतो ही वस्तुस्थिती आहे.

खासगी क्षेत्रात सिझेरियनचं प्रमाण कमी व्हावं यासाठी, कोणत्याच एका डॉक्टरवर वर्षांनुवर्षे दिवसरात्र काम करण्याचा ताण येऊन-कुठे इतका वेळ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तासन्तास वाट पाहण्यापेक्षा, विशेषत: रात्री बेरात्री, अप्रशिक्षित बेभरवशाच्या स्टाफसोबत रिस्क घेण्यापेक्षा, चला सिझेरियन करून मोकळं होऊ, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एकापेक्षा जास्त डॉक्टरने सोबत येऊन मॅटर्निटी होम चालवल्यास, कामाची विभागणी होऊ शकते, एखाद्या रुग्णाचं सिझेरियन करावं का की अजून वाट पाहावी या संदर्भात ‘रेडिमेड सेकंड ओपिनियन’ मिळू शकतं, वगैरे रुग्ण आणि डॉक्टरच्या हिताच्या गोष्टी घडू शकतात. पण त्यामध्येही कायदेशीर जबाबदारी कुणाची, होणाऱ्या आर्थिक प्राप्तीची विभागणी, मला अमुक एक डॉक्टरांकडूनच बाळंतपण करून घ्यायचं आहे. कारण माझा त्यांच्यावरच विश्वास आहे, अन्य कुणावर नाही अशा मानसिकतेचे रुग्ण अशा अडचणी आहेत.

आपल्या देशात शासकीय आणि खासगी स्तरावर ज्या प्रतीच्या आरोग्यसेवा दिल्या जातात त्यात असलेली असमानता, समाजाचा डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस साशंक होत जाणे, अनियंत्रित खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या काही अनैतिक प्रथा या चार ढोबळ कारणांनी सिझेरियनसारखं वरदान आज बदनाम आहे.

atnurkarkishore@gmail.com