भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये नित्यनेमाने वाढ होत आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून होणाऱ्या शारीरिक छळापासून प्रवासादरम्यान अनोळखी पुरुषांकडून केली जाणारी छेडछाड आणि कार्यालयातील शोषणापर्यंतच्या अनेक घटनांना स्त्रियांना कधी ना कधी सामोरे जावे लागते. अशा घटना रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणांकडून गेल्या काही वर्षांत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे ‘एफआयआर’ हे अॅप अशाच उपाययोजनेचा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील विविध पोलीस आयुक्तालयांनी हे अॅप कार्यान्वित केले आहे. केवळ स्त्रियाच नव्हे तर कोणत्याही नागरिकाला संकटसमयी पोलिसांशी थेट संपर्क साधता यावा, अशी या अॅपची व्यवस्था आहे. हे अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्यात आपले नाव, पत्ता व अन्य माहिती नोंदवावी लागते. त्यानंतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्यांने अॅपवरील ‘हेल्प’ बटण दाबताच पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत त्याची सूचना मिळते. मोबाइलच्या ‘जीपीएस’ प्रणालीच्या आधारे पीडित वा संकटग्रस्त व्यक्ती कुठे आहे, हे पोलिसांना नकाशावरून कळते आणि तात्काळ मदत पोहोचवली जाते. या अॅपमुळे पोलीस खऱ्या अर्थाने नागरिकांशी जोडले गेले आहेत. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
येत्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही या दोन्ही अॅपचा वापर आवर्जून करावा. वेळोअवेळी घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या स्त्रियांसाठी हे दोन्हीही अॅप नक्कीच फायदेकारक सिद्ध होतील यात शंका नाही. त्यामुळे करा लगेच डाऊनलोड..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा