स्मार्टफोनमुळे अवघं जग आपल्या तळहातावर येऊन विसावलं आहे. पण अॅप्सचं विश्व अफाट आहे. त्यातून आपल्याला काय हवंय, हे शोधणं म्हणजे तांदळातून खडे निवडण्यासारखं आहे. अनेकदा तर आपण एखाद्या कारणासाठी अॅप्स शोधतो आणि त्याऐवजी दुसरंच अॅप्स डाऊनलोड करून घेतो. याचं कारण नाम आणि काम साधम्र्य असलेले हजारो अॅप्स. यातले सगळेच अॅप्स उपयुक्त असतात असं नाही. काही केवळ वापरकर्त्यांची दिशाभूल करून स्वत:चा आर्थिक हेतू साध्य करून घेणारे असतात. तर काही अॅप्स वापरकर्त्यांची माहिती चोरण्याचं काम करतात. त्यामुळे अॅप्स निवडताना आणि ते आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी या सदराच्या माध्यमातून उपयुक्त अॅप्सची माहिती दिली जाणार आहे.
स्त्रीचं जग विस्तारत आहे. तिच्या या व्यापक आणि व्यग्र आयुष्याला काही वेळा शिस्त लावणारे तर कधी तिचं काम अधिक सोपं करणारे हे अॅप्स असतील तसंच घरगुती उपयोगाचे, गृहिणींनाही उपयोगी पडतील असे अॅप्सही यातून मिळतील. पुस्तकांपासून फिटनेस टिप्स देणाऱ्या अॅप्सपर्यंत आणि पाककृतींपासून आरोग्याचा मंत्र देणाऱ्या अॅप्सपर्यंत अनेक विषयांच्या निवडक अॅप्सची माहिती या सदरातून देण्यात येणार आहे. मात्र, ते करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अॅप्स’ निवडताना..
* ‘अँड्राइड’फोनमध्ये ‘गुगल प्ले’, ‘अॅपल’च्या आयफोनवर ‘अॅप स्टोअर’मधून तर विंडोज फोनवर ‘विंडोज फोन स्टोअर’ या अॅपवरून इतर अॅप्स शोधून डाऊनलोड करून इन्स्टॉल करता येतात.
* मोठमोठय़ा आकाराचे (साइज) अॅप केवळ ‘वायफाय’ इंटरनेट कनेक्शमध्येच डाऊनलोड करा. यामुळे तुमच्या मोबाइलमधील ‘इंटरनेट डाटा’ जास्त खर्च होणार नाही.
* कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. ही माहिती प्रत्येक अॅपच्या मुखपृष्ठावर दिलेली असते. त्यासोबतच त्या अॅपविषयी वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळतात.
* काही अॅप्स ‘पेड’ असतात. ते इन्स्टॉल करण्यासाठी खरेदी करावे लागतात. याशिवाय काही मोफत अॅपच्या ‘इन्स्टॉल’ बटणाखाली ‘इन अॅप पर्चेसेस’ असे बारीक अक्षरात लिहिलेले असते. याचा अर्थ हा अॅप मोफत असला तरी त्यातील काही सुविधा वापरकर्त्यांला स्वतंत्रपणे खरेदी कराव्या लागतात.
* इन्स्टॉल केलेले अॅप न आवडल्यास ते  स्मार्टफोनमधून हटवण्याची सुविधाही असते. त्याचा वापर तुम्ही करू शकता. तेव्हा प्रवेश करू या ‘अॅप्स’च्या विश्वात.

असिफ बागवान
 asif.bagwan@expressindia.com