कोणत्याही वृत्तपत्रातील बातम्या किंवा लेखांप्रमाणेच वाचकांच्या आवडीचं आणखी एक ठिकाण म्हणजे शब्दकोडी. आपल्या बुद्धीला चालना देत शब्दांच्या महासागरातून अचूक शब्द शोधणं हे जितकं आव्हानात्मक असतं तितकंच ते रंजकही असतं. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच शब्दकोडी खुणावत असतात. आपल्या मेंदूतील तिजोरीत दडलेल्या मराठी शब्दांना उकरून काढणारी किंवा नवनवीन मराठी शब्दांशी ओळख करून देणारी शब्दकोडय़ांची ओढ अजूनही कायम आहे. अशा भाषाप्रेमींसाठी स्मार्टफोनवर शब्दकोडी सोडवण्याची पर्वणी देणारे काही अॅप्स अॅण्ड्रॉइडवर उपलब्ध आहेत. मराठी वर्ड पझल (Marathi Word Puzzle), शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड (Shabdakodi Marathi Crosswords) हे दोन अॅप्स तुमची शब्दकोडय़ांची हौस भागवू शकतात. यापैकी ‘मराठी वर्ड पझल’ या अॅपमध्ये विखुरलेले अक्षरांचे तुकडे नीट जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचे आव्हान असते. अशा प्रकारे या अॅपमध्ये ३०० ‘लेव्हल्स’ असतात. ‘शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड’ हे अॅप आपले नेहमीच्या चौकोनी शब्दकोडय़ासारखे आहे. उभ्या-आडव्या शब्दांची जुळणी करून हे कोडे सोडवावे लागते. हे दोन्हीही अॅप अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. मात्र, ही कोडी सोडवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर ‘गुगल इनपुट टूल्स’ हे अॅप किंवा मराठीचा ‘सपोर्ट’ असणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा