सुकेशा सातवळेकर

जनुक आरेखनावरून व्यक्तीच्या शरीरांतर्गत क्रियांमध्ये होऊ शकणारे अपायकारक बदल समजू शकतात. व्यक्तीला होऊ शकणारे काही विकार जसे मधुमेह, हृदयरोग किंवा काही प्रकारचे कर्करोग; यांची शक्यता कळून येते. व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती, डिटॉक्स प्रक्रिया कशी आहे, हाडांचे आरोग्य कसे आहे हे समजून येते. त्यानुसार व्यक्तीचा आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल सुचवले जातात.

pediatricians observation in diseases in children
धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Inequality, injustice violence, fear, fearless,
‘भय’भूती: भयशून्य चित्त जेथे
loksatta readers feedback
लोकमानस: रोजगारविरहित वाढ हे प्रमुख आव्हान!
Health Special, aggression in society, aggression,
Health Special : समाजमनातील आक्रमकता कुठून येते?
After 30 years shash rajyog and budhaditya rajyog created on diwali
आता नुसता पैसा! तब्बल ३० वर्षानंतर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार ‘हा’ राजयोग; तीन राशींना मिळणार धन-संपत्ती आणि भौतिक सुख
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…

गेल्या १०० वर्षांच्या कालखंडातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीत घडलेली एक अभूतपूर्व, क्रांतिकारी घटना कुठली, असं जर विचारलं तर; विज्ञानाचे अभ्यासक नक्कीच सांगतील की ‘२००३ मध्ये विकसित होऊन सादर झालेलं, जनुकीय संरचनेची मांडणी करण्याचं शास्त्र!’ या शास्त्रामुळे, शरीरस्वास्थ्य आणि विकार यांच्या मुळाशी खोलवर जाऊन म्हणजेच पेशींच्या पातळीवरील जनुक संरचनेचा अभ्यास सुरू झाला. त्यामुळे काही विकारांची, आजारांची लक्षणं दिसायच्या बराच काळ आधी, विकार होण्याची शक्यता अचूक वर्तवणं शक्य झालं; तसंच रोगनिदानाविषयी आणि रोगांच्या कमी-जास्त होणाऱ्या तीव्रतेविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली. परिणामी, शारीरिक आजारांची लक्षणं दिसल्यावर औषधोपचार करण्याऐवजी; आजार होण्याआधीच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणं शक्य झालं.

आपल्या प्राचीन आयुर्वेदात सुश्रुताने जनुकीय संरचनेचा अभ्यास मांडला होता. तो आताच्या, आधुनिक काळात अधिक विस्तृतपणे, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगळ्या भाषेत, अधिक प्रगतपणे ‘नुट्रीजिनॉमिक्स’च्या माध्यमातून मांडला जातोय. ‘नुट्रीजिनॉमिक्स’ हे एक प्रगत शास्त्र आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत जनुकीय संरचनेचा अभ्यास केला जातो. व्यक्तीचा आहार, व्यायाम, जीवनशैली यांना जनुकांकडून दिला जाणारा प्रतिसाद, त्यांचा परस्परसंबंध, एकमेकांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करून वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.

वातावरणातील विविध घटकांच्या प्रभावामुळे जनुकांची अभिव्यक्ती सकारात्मक किंवा नकारात्मक होऊ शकते. आपली जीवनशैली, आपली खाण्यापिण्याची पद्धत, आपल्या आजूबाजूचं वातावरण या सगळ्यांचा परिणाम; आपली शारीरिक ठेवण, आपली आजाराची प्रवृत्ती, रोगप्रतिकारशक्ती, मानसिक तणाव यांवर होत असतो. तसंच आपल्या पोटातील उपयुक्त, चांगले सूक्ष्म जीवाणू (गट मायक्रो फ्लोरा) कार्यान्वित होण्यासाठीही आपली शारीरिक प्रकृती म्हणजेच जनुकीय संरचना कारणीभूत असते. म्हणूनच प्रत्येकाची शरीरप्रकृती जाणून घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे आहार ठरवणे ही आजच्या काळाची गरज आहे. तसंच व्यायामाचं स्वरूप आणि जीवनशैलीतील बदलही व्यक्तीनुरूप ठरवणं आवश्यक आहे. ‘नुट्रीजिनॉमिक्स’मध्ये जनुकशास्त्र आणि पोषणशास्त्र यांचा परस्परसंबंध आणि एकमेकांवर होणारा खोलवर परिणाम तपासला जातो. स्थूलत्व, मधुमेह, हृदयविकार यांसारखे आहार आणि जीवनशैलीशी निगडित विकार टाळण्यासाठी आणि लांबवण्यासाठी तसेच आधीच असलेले विकार आटोक्यात ठेवण्यासाठी या शास्त्राचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो.

जनुकीय संरचनेचं आरेखन (जेनेटिक मॅपिंग) : या आरेखनासाठी नमुना म्हणून व्यक्तीचं रक्त किंवा बकल स्वॉब घेतला जातो. म्हणजेच गालाच्या आतल्या भागातील त्वचेवर ब्रशसारखा कॉटन स्वॉब हळुवार घासून नमुना घेतला जातो. या स्वॉबवर आपल्या शरीरातील हजारएक पेशी मिळतात. जीनोम लॅबमध्ये या पेशींवरती वैशिष्टय़पूर्ण प्रक्रिया करून; त्यांच्या सहाय्याने जनुकं मिळवली जातात. व्यक्तीची जनुकीय संरचना समजून घेतली जाते. आपलं शरीर काही कोटी पेशींपासून बनलेलं असतं. प्रत्येक पेशीमध्ये डी.एन.ए. असतात. डी.एन.ए. म्हणजे शरीरबांधणी आणि शरीरांतर्गत क्रियांची ब्लू प्रिंटच असते. डी.एन.ए.मध्ये जीन्स म्हणजेच जनुकं असतात. प्रत्येक व्यक्तीत जनुकांची वैशिष्टय़पूर्ण संरचना असते. व्यक्तीनुरूप या संरचनेमध्ये प्रचंड विविधता असते. या वैविध्यामुळेच प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय ठरते. आरोग्यावर परिणाम करणारी काहीच जनुकं व्यक्तिगत आवश्यकतेनुसार, जनुक आरेखनाद्वारे तपासली जातात. त्या जनुकांची, त्यांच्या संरचनेची, त्यांच्यात झालेल्या चांगल्या किंवा अपायकारक बदलांची समग्र माहिती घेतली जाते. त्यांचं पृथक्करण केलं जातं. हे काम; संशोधक शास्त्रज्ञ आणि बायो टेक्नॉलॉजिस्टची टीम करते.

जागतिक आधार : जगभरात गेली अनेक वर्ष जनुकशास्त्रावर संशोधन सुरू आहे. जिनॉमिक्स, आहारशास्त्र आणि आरोग्य या विषयांवर संशोधन केलेल्या नामांकित आणि जगन्मान्य शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात महत्त्वाच्या शारीरिक क्रियांशी आणि विकारांशी संबंधित जनुकं, शोधून काढली आहेत. आहारातील कुठल्या घटकांचा परिणाम किंवा जीवनशैलीतील कुठल्या बदलांचा परिणाम किंवा कोणत्या आणि किती प्रमाणातील व्यायामाचा परिणाम; या जनुकांशी संबंधित आहे हे जागतिक पातळीवरील मान्यता पावलेल्या संशोधनानुसार ठरवलं गेलं आहे. ‘नुट्रीजिनॉमिक्स’चं काम याच आधारावर चालतं.

काही वर्षांपूर्वी फक्त एखाद्याच जनुकावर होणारा वातावरणातील एखाद्याच घटकाचा (उदा. आहार किंवा व्यायाम) परिणाम समजून घेण्यासाठी हे शास्त्र वापरलं जात होतं. पण सध्या ‘नुट्रीजिनॉमिक्स’चा वापर करून, एकापेक्षा जास्त गुंतागुंतीच्या घटकांमुळे होणाऱ्या विकारांचा धोका आधीच ओळखून, ते विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे एक मोठं आव्हान यशस्वीपणे पेललं गेलंय.

‘नुट्रीजिनॉमिक्स’ मार्गदर्शनाची प्रक्रिया कशी होते?: जनुक आरेखनावरून व्यक्तीच्या शरीरांतर्गत क्रियांमध्ये होऊ शकणारे अपायकारक बदल समजू शकतात. व्यक्तीला होऊ शकणारे काही विकार जसे मधुमेह, हृदयरोग किंवा काही प्रकारचे कर्करोग यांची शक्यता कळून येते. व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती, डिटॉक्स प्रक्रिया कशी आहे, हाडांचे आरोग्य कसे आहे हे समजून येते. त्यानुसार व्यक्तीचा आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल सुचवले जातात. त्यासाठी जनुक आरेखनातील अगदी सूक्ष्म गोष्टींचाही खोलवर विचार करून मास्टर डाएट चार्ट बनवला जातो. त्यानंतर खास प्रशिक्षित ‘नुट्रीजिनॉमिक्स’ मार्गदर्शक, आहारतज्ज्ञ हे लोक मार्गदर्शन करतात. त्यामध्ये आहारातील कोणते अन्नघटक, कोणते सूक्ष्म अन्नघटक वाढवले पाहिजेत; कोणते कमी केले पाहिजेत, कोणते टाळले पाहिजेत हे सांगितले जाते. काही अतिरिक्त सप्लीमेंटसची आवश्यकता असल्यास सांगितले जाते. वैयक्तिक आहार तक्ता बनवून मार्गदर्शन केले जाते.

‘नुट्रीजिनॉमिक्स’ मार्गदर्शन का? केव्हा ? : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणूनच आहार मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीच्या तब्येतीचा वेगवेगळा अनुभव येतो. काही व्यक्तींचं शरीर आहारातील बदलांना अपेक्षित प्रतिसाद देतं, तर काहींचा योग्य प्रमाणातील प्रतिसाद व्यायामाने मिळतो. आहारातील स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅटसचा वैशिष्टय़पूर्ण प्रकार किंवा त्यांचं ठरावीक प्रमाण हे काही जणांसाठी म्हणजेच त्यांच्या जनुकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काब्र्जचं चयापचय कमी जास्ती प्रमाणात होतं. तसंच आहारातील फॅट्स किती प्रमाणात शोषले जातील हेही व्यक्तीच्या जनुकानुसार ठरतं.

म्हणूनच वजन, उंची, वय, हालचालींचं प्रमाण, व्यायाम सगळं एक सारख्याच प्रमाणात असणाऱ्या दोन व्यक्तींना एक सारख्याच प्रमाणात काब्र्ज आणि फॅट्स देऊनही त्यांचं शरीर वेगवेगळा प्रतिसाद देतं. दोन एकसारख्या व्यक्तींना एकाच प्रकारचा व्यायाम किंवा एकाच प्रकारचे जीवनशैलीतले बदल उपयुक्त ठरत नाहीत.

मधुमेहींवर उपचार करतानाही असा अनुभव येतो. काहींचा मधुमेह फक्त आहारातील बदलांमुळे आटोक्यात येतो. काहींना व्यायामाची जोड द्यावीच लागते. काहींना पथ्यपाणी आणि व्यायाम करूनही औषधं घ्यावी लागतात. काहींना औषधाबरोबरच इन्शुलीनही घ्यावं लागतं. काहींचा मधुमेह हे सगळे प्रयत्न करूनही आटोक्यात राहू शकत नाही. अशांसाठी ‘नुट्रीजिनॉमिक्स’ हे एक वरदानच आहे. त्यांच्या जनुकीय संरचनेचं आरेखन करून त्यानुसार पथ्यपाणी, व्यायाम आणि जीवनशैलीतले सूक्ष्म व महत्त्वाचे बदल सुचवले जातात. या मार्गदर्शनानुसार बदल केल्यास, मधुमेह तर आटोक्यात राहतोच आणि मधुमेहामुळे होणारे गुंतागुंतीचे विकार टाळता किंवा लांबवता येतात. खरंतर मधुमेहाचं निदान होण्याआधीच जनुकीय आरेखन करून घेऊन त्यानुसार बदल करायला हवेत.

‘नुट्रीजिनॉमिक्स’बद्दल आणखी बरंच काही पुढील (८ जूनच्या) लेखात.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com