स्नेहल बाकरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इयत्ता पाचवीत प्रवेश केल्यानंतर आमच्या शाळेच्या नियमाप्रमाणे पाचवी ते दहावीच्या मुलामुलींसाठी असणाऱ्या स्वतंत्र शाळेच्या इमारतीत आम्ही पुढील शिक्षण घेऊ लागलो. भव्य परिसर पाहून सुरुवातीला मला थोडं दडपण आलं होतं. त्यात भर म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी संस्कृत आणि काहींनी हिंदूी विषय घेतल्यानं त्यांची तुकडीही बदलली होती. पहिल्या दिवशी सुरुवातीचे दोन-तीन तास गेल्यावर वर्गात भूगोल शिकवणाऱ्या शैला प्रभावळे मॅडम आल्या. त्यांचा प्रसन्न, हसरा चेहरा पाहून माझं आधीचं सगळं दडपण दूर झालं. सर्व विद्यार्थिनींची त्यांनी अगदी खेळीमळीत ओळख करून घेतली.
प्रभावळे मॅडम वर्गावर अगदी वेळेवर हजर राहायच्या. चुकूनही कधी त्यांना उशीर झाला नाही. सुरुवातीला मला भूगोल विषय विशेष आवडायचा नाही. परंतु त्यांनी वेगळय़ाच पद्धतीनं तो शिकवायला सुरुवात केल्यानं त्यात माझी रुची वाढू लागली. वर्गात येताना नेहमीच त्यांच्याकडे पुस्तकाबरोबर वेगवेगळे नकाशे असत. प्रत्येक प्रदेशाबद्दल त्या सखोल माहिती द्यायच्या. सर्व अभ्यासक्रम गोष्टीरूपात शिकवल्यामुळे विद्यार्थिनींकडून त्याचं लगेच रसग्रहण व्हायचं.
शाळेच्या सहलीच्या नियोजनची जबाबदारी बऱ्याचदा त्यांच्याकडे असायची. सहलीचं ठिकाण निवडताना त्या आमचं मतही विचारात घ्यायच्या. आधी त्या स्वत: नियोजित ठिकाणाचा संपूर्ण अभ्यास करत आणि मगच आम्हाला तिथे घेऊन जात असत. बसमध्ये आमच्याबरोबर आमची मैत्रीण असल्याप्रमाणे मिसळून जात. त्याच वेळी आम्हाला नियोजित ठिकाणची अतिरिक्त माहिती- म्हणजे तिथल्या लोकांचं राहणीमान, खाद्यसंस्कृती, भाषा, हवामान, शेती याबद्दल गमतीजमतीच्या स्वरूपात माहिती सांगत. त्यामुळे प्रभावळे मॅडम सहलीच्या ज्या बसमध्ये असायच्या त्या विद्यार्थिनींना ती पर्वणीच वाटे.
एकदा आमची सहल जेजुरीला गेली होती. आमचा अल्पोपाहार चालू असताना मॅडम तिथल्या एका वाघ्याशी बोलताना दिसल्या. काय बोलताहेत ते आम्हाला समजलं नाही. परंतु नंतर एका नामांकित वर्तमानपत्रात त्यांचा ‘जेजुरीचा वाघ्या दु:खी’ असा लेख वाचायला मिळाला. आम्हाला त्यांच्यातल्या लेखिकेची नव्यानं ओळख पटली.
अनेक वेगवेगळे उपक्रम त्या राबवत. एकदा मुलींची गटांमध्ये वर्गवारी करून प्रत्येक गटाला भारतातील एकेक राज्य वाटून दिलं आणि त्याबद्दल माहिती गोळा करायला सांगितली. त्या वेळी ‘गूगल’बाबाची मदत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांचा आधार घ्यावा लागायचा. ही माहिती गोळा करताना मॅडमनीसुद्धा खूप मदत केली. नंतर त्यांनी आम्ही मिळवलेल्या माहितीचं एकत्रित संकलन करून त्याचं पुस्तक करून ते शाळेला भेट दिलं.
भूगोलाबरोबर मराठी भाषेवरदेखील त्यांचं प्रभुत्व. महाराष्ट्रात प्रत्येक दहा मैलांवर भाषेचा उच्चार बदलतो म्हणतात. मॅडम आम्हाला वेळोवेळी त्या-त्या प्रदेशानुसार तिथलं भाषासौंदर्य खुलवून सांगायच्या. त्यामुळे माझ्या मनात मातृभाषेबद्दल एक वेगळाच अभिमान निर्माण झाला.
गुरुपौर्णिमा अथवा शिक्षक दिनालाही मॅडमनी विद्यार्थ्यांकडून कुठली भेट स्वीकारली नाही. उलट त्या स्वत: विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी पुस्तकं शालेय ग्रंथालयाला भेट म्हणून देत असत.
एकदा शाळेत २६ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा होती. मीही त्यात भाग घेतला होता, परंतु भाषणापूर्वी समोरची गर्दी पाहून माझे हातपाय लटपटू लागले. मॅडमनी मला जवळ बोलावलं, माझ्या भाषणातले ठरावीक मुद्दे ठळक करून केवळ त्या आधारे स्पष्टीकरण द्यायला सांगितलं. ‘तुला हे नक्कीच जमेल’ असा विश्वासही दिला. बघता बघता टाळय़ांच्या गजरात मी भाषण केलं. क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टींवर त्या अगदी सोप्या प्रकारे तोडगा काढत. नववी-दहावीत असताना त्या आम्हाला वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या. त्या शिकवत असणाऱ्या विषयाबरोबरच इतर विषयांतही एखाद्या विद्यार्थिनीला अडचण येत असल्यास त्या स्वत: इतर शिक्षकांशी सल्लामसलत करून तिला त्या विषयाचं आकलन कसं अधिक चांगल्या प्रकारे करून देता येईल यासाठी प्रयत्न करत.
किशोरावस्था एक संक्रमणावस्था असते असं म्हणतात. एकीकडे शारीरिक व मानसिक बदल होत असतानाच कळत-नकळत घरच्यांकडून, शिक्षकांकडून अभ्यासाविषयीच्या सक्तीला सामोरं जावं लागत असतं. अशा वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबर मानसिक आधाराची गरज असते. आपल्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे मानसिक कोंडी होऊ नये यासाठी त्या प्रयत्न करत. आम्ही दहावीत असताना त्या दर पंधरा दिवसांतून अर्धा तास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवायच्या. या वेळेत त्या आमच्याशी अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांवर गप्पा मारायच्या. ज्या विद्यार्थ्यांना काही वैयक्तिक समस्या भेडसावत असतील त्यांच्याशी एकांतात चर्चा करून त्या सोडवायचा प्रयत्न करायच्या. वेळप्रसंगी अशा विद्यार्थिनींच्या पालकांना आणि मैत्रिणींनादेखील चर्चेत सहभागी करून घेत. ‘प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, फक्त ते शोधता आलं पाहिजे’ हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं.
दहावीत असताना माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांचं अचानक निधन झालं. तिला मानसिक धक्काच बसला होता. खालावलेली आर्थिक परिस्थिती, आईचं आजारपण, घरगुती छोटय़ामोठय़ा जबाबदाऱ्या, अशा अनेक संकटांचा तिला एकत्रितपणे सामना करावा लागत होता. त्या वेळी बाईंनी तिला आर्थिक मदत तर केलीच, शिवाय त्या रोज तिच्यासाठी स्वत:च्या घरून जेवणाचा डबा आणत. रोज शाळा सुटल्यानंतर पंधरा मिनिटं तरी तिच्याशी आपुलकीनं संवाद साधून तिला मानसिक आधार देत.
त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कोणत्याही शिक्षेचा वापर करावा लागला नाही. त्यांनी आपल्या ‘प्रभावळी’नं माझ्याबरोबर इतर विद्यार्थ्यांमध्येही वक्तशीरपणा, नियोजन, आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द, भाषाप्रेम, इतरांविषयी सेवाभाव अशी अनेक जीवनोपयोगी मूल्यं रुजवली. विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळून टाकलं.
माझी दहावी झाली त्याच वर्षी त्याही शाळेतून निवृत्त झाल्या. नंतर त्यांचा नि माझा संपर्क तुटूनच गेला. अनेक वर्षांनी कुटुंबीयांसमवेत राजस्थानला गेले असताना एका प्रेक्षणीय स्थळी अचानकपणे मॅडम मला भेटल्या. हरवलेली मौल्यवान वस्तू भेटल्यावर आनंदानं ऊर भरून येतो, तशी काही क्षण माझी अवस्था झाली होती!
त्यांच्या संपर्कात येण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी परमेश्वराची सदैव ऋणी आहे.
bakresnehal@gmail.com