कुठलंही वर्तमानपत्र, मासिक वा दूरदर्शन वाहिनी असो, त्यांचा एखादा तरी कोपरा पाककलेसंबंधीच्या मजकुराने व्यापलेला असतो. जागतिकीकरणामुळे आज देशातल्या विविध प्रांतांतले, विविध देशांतले, नाना चवीचे पदार्थ आपल्या ओळखीचे होत आहेत, त्यांच्या पाककृती आपण आपल्याशा करीत आहोत. हा जमाना फास्ट फूडचा असला तरीही आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या गृहिणी रोजच्या आहारातल्या अन्नघटकांचा, पौष्टिकतेचा विचार करताना दिसतात. त्यासाठी नाचणी, पालक, खजूर, मोडाची कडधान्ये, गाजर याबरोबरच ओट्स, टोफू, ब्रोकोली, मशरुम्स यांचाही वापर करताना दिसतात. तरीही मोड आलेले मूग, टोफू, ओटस वगैरे एकत्र करायचे, त्यात मसाले घालून त्याचे कटलेट करून तळायचे आणि पौष्टिक म्हणून मुलांच्या डब्यात द्यायचे असं नक्कीच व्हायला नको. म्हणूनच बाजारात उपलब्ध असलेल्या ओळखीच्या तसंच थोडय़ाशा अनोळखी भाज्या, फळं, धान्य इत्यादींचे गुणधर्म आणि त्यांच्या काही आगळ्यावेगळ्या पाककृती देणारं हे सदर आम्ही सुरू करीत आहोत. वाचक गृहिणी त्याचं स्वागत करतील अशी आशा आहे.
टोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधाचं पनीर, अतिशय पौष्टिक, भरपूर प्रोटिन असलेला पदार्थ, चव फारशी नाही, पण वाईट वाससुद्धा नाही. पनीरच्या ऐवजी टोफू वापरता येतं.
टोफूत असलेली सोया प्रथिनं, कॅल्शियम, लोह शरीराला पोषक ठरतात. वाईट कोलोस्टेरॉल कमी करून चांगलं वाढवण्याचा गुणधर्म टोफूत आहे. शिवाय ते अॅन्टीऑक्सिडन्ट आहे. टोफू नेहमी पाण्यात ठेवलेलंच मिळतं, पाणी काढून टाकून ते वापरायचं. थाई करी, सूप, अंडं न घालता केलेले केक, पुडिंग्ज्, चीजकेक यात टोफूचा वापर होतो.
टोफू
कुठलंही वर्तमानपत्र, मासिक वा दूरदर्शन वाहिनी असो, त्यांचा एखादा तरी कोपरा पाककलेसंबंधीच्या मजकुराने व्यापलेला असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-01-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about indian food culture