उत्पल व. बा.

लैंगिकता या शब्दाचा अर्थ आपण सहसा शारीरिक आकर्षण, शरीरसंबंध याच्याशी जोडतो. पण कुठल्याही भावनेसारखाच लैंगिकतेचाही ‘स्पेक्ट्रम’ असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्त्री व पुरुषांमध्ये जे ताण अस्तित्वात असतात त्यात जैविक ताणही आहेत हे जर आपण समजून घेतलं तर या संबंधांचं व्यवस्थापन सोपं होईल. स्त्री-पुरुषांमध्ये प्रेम, लैंगिक आकर्षण हे आयाम जैविक ताण निर्माण करतात म्हणून त्यावर विचार करणं आवश्यक वाटतं.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी

मागील लेखात आपण जातवास्तवाच्या आव्हानांविषयी बोललो होतो. विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे, असं आपण म्हटलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पुस्तकाचा आपण आधार घेतला होता त्या ‘अनाहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात आंतरजातीय विवाह हा जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक मार्ग आहे असं त्यांनी नोंदवलेलं आहे. परंतु जात ही एक संकल्पना आहे, मनोवस्था आहे आणि त्यामुळे एखादा भौतिक अडथळा आपण दूर करतो तशी ती दूर होणार नाही- त्यासाठी संकल्पनात्मक बदलच करावा लागेल असं ते पुढे लिहितात. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लेखाच्या शेवटी आपणही ‘जात-धर्माने येणारा कमकुवतपणा नाकारणारं मन हवं आहे’ असं म्हटलं होतं.

‘मनात बदल करणे’ हा लिहायला-बोलायला सोपा, पण प्रत्यक्षात महाकठीण, त्रासदायक मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा जुन्या-नव्याचा संघर्ष होतो, काहीतरी नवीन पुढे येऊन उभं ठाकतं तेव्हा स्वीकृती आणि अस्वीकृतीच्या रस्सीखेचीत मन दमून जात असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात नवं काही मांडणाऱ्यांनी हे लक्षात घेऊन आपलं म्हणणं शांतपणे मांडत राहणं श्रेयस्कर असतं. अभिव्यक्ती कधी कधी तिखट व्हायला हरकत नसते – कारण तिरकस, तिखट मांडणीसुद्धा परिणामकारक ठरू शकते. फक्त मुद्दा माणसांशी जोडून घेण्याचा असतो. आपला उद्देश जर बदल घडवणं हा असेल तर ती लांब पल्ल्याची लढाई आहे हे विसरून चालत नाही. आपले व्यूह त्या अनुषंगाने आखावे लागतात.

विवाहसंस्था हा जातीव्यवस्थेशी घट्ट जोडलेला मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर आणि कदाचित त्याच्याही आधी तो स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला मुद्दा आहे. स्त्री-पुरुष संबंध हा जातीप्रमाणेच इतरही अनेक सामाजिक रचितांचा पाया असतो. यातला एक मुख्य भाग अर्थातच माणसाची प्रजाती वाढवणे हा आहे. म्हणूनच स्त्री-पुरुष संबंधांचं नियमन आपल्या सामाजिक व्यवहारांच्या नियमनातील एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. या लेखात आपण या विषयावरील चर्चेला सुरुवात करू.

व्यक्तींमधील नातेसंबंध हा एक रोचक, रंजक असा विषय आहे. त्याबरोबरच तो एक तणावपूर्ण विषयही आहे. सामाजिक-आर्थिक रचितांमुळे आणि मानवी उर्मीमुळे नातेसंबंधांमध्ये ताण येतातच. आजच्या कुटुंबाच्या, सामाजिक संबंधांच्या स्वरूपात जे ताण आहेत ते या संबंधांना सुरुवात झाली तेव्हापासूनचे ताण आहेत. त्यामुळे नातेसंबंधांविषयी बोलताना एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की या विशिष्ट बाबतीत मानवी मेंदू काही हजार वर्षांपूर्वीच्या मानवी मेंदूसारखाच आहे. आपण तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगती केली असली तरी ज्या भावभावनांचे आपण काही हजार वर्षांपूर्वी गुलाम होतो त्याचे गुलाम आपण अजूनही आहोत. तो एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. टोळी समाजापासून आजवर आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या, आपल्या वर्तनाला आकार देणाऱ्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे लैंगिकता आणि राजकारण. मानवी भावनांचा, इच्छा-आकांक्षांचा ‘स्पेक्ट्रम’ खूप मोठा आहे, त्यात अनेक छटा आहेत आणि या दोन गोष्टी त्यातील अनेकांवर आपलं वर्चस्व गाजवतात.

स्त्री आणि पुरुषांमधील नातेसंबंध ही नातेसंबंधांची विशेष जातकुळी आहे. त्यातही छटा आहेतच. म्हणजे स्त्री-पुरुषांमधलं आदिम आकर्षण व प्रेम-ज्याचा पाया लैंगिकता आहे – ही एक मुख्य छटा. त्यानंतर कुटुंब संस्थेच्या विकासानंतर आई-मुलगा, बहीण-भाऊ, वडील-मुलगी या प्रेमाच्या इतर छटा येतात. निव्वळ लैंगिक आकर्षणाच्या वर भावनांचे स्तर चढत जाऊन स्त्री-पुरुषांमध्ये जे रोमँटिक नातं तयार होतं त्या नात्याचे बहुविध आयाम स्त्री-पुरुषांमधील नात्याला कायम आंदोलित करत आले आहेत. युव्हाल हरारी या अभ्यासकाचं ‘सेपियन्स’ हे सध्या गाजत असलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात त्याने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. होमो सेपियन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाच्या प्रजातीने पृथ्वीवर आपलं बस्तान बसवलं त्यात त्याच्या ‘कल्पित वास्तव’ (Imagined Reality) रचण्याच्या क्षमतेचा मोठा वाटा होता. हे कल्पित वास्तव म्हणजे काय? तर काल्पनिक कथानक रचणं आणि ते लोकांना पटवून देणं. होमो सेपियन्सनी जे समूहजीवन उभारलं आणि आजचे होमो सेपियन्स-म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे-ज्या गुंतागुंतीच्या समूहजीवनात जगतो आहोत त्याचा आरंभ कल्पित वास्तवामुळे झाला असं युव्हाल हरारी लिहितो. देव, धर्म, मानवाधिकार, ईश्वर, समता व बंधुतेसारखी मानवी मूल्यं ही कल्पित वास्तवाची उदाहरणं आहेत. अनेकजणांनी या कल्पित वास्तवावर श्रद्धा ठेवली आणि त्यातून समाजरचना आकारास येत गेली. हे अधिक तपशिलात समजून येण्यासाठी ‘सेपियन्स’ वाचणं इष्ट होईल. पण मला स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा विचार करताना या ‘कल्पित वास्तवा’ची आठवण झाली. कारण या विषयाचा विचार करत असताना एक प्रश्न पडतो तो असा की स्त्री-पुरुष संबंधांचं ‘मूळ सत्य’, ‘खरं वास्तव’ काय आहे?

हा प्रश्न कदाचित काहींना अप्रस्तुत वाटेल, विषयाचा कीस पाडायच्या उद्देशाने विचारल्यासारखा वाटू शकेल. पण स्त्री-पुरुषांमधील रोमँटिक नात्याविषयी, इंटिमेट रिलेशनविषयी बोलताना हा प्रश्न विचारणं तत्त्वत: महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर ‘लैंगिकता’ हे आहे. पण लैंगिकता म्हणजे तरी नक्की काय? म्हणजे एखाद्या स्त्रीकडे/पुरुषाकडे पाहून एखाद्या पुरुषामध्ये/स्त्रीमध्ये कामभावना जागी होऊन शरीरसंबंधांची इच्छा निर्माण होणं ही लैंगिकता की आवडलेल्या स्त्री/पुरुषाला ओझरता स्पर्श केल्याने मनात निर्माण होणारं समाधान/बेचैनी म्हणजे लैंगिकता? आणि जर केवळ अव्यक्त आकर्षण असेल तर तीही लैंगिकता का? सेक्शुअल आणि असेक्शुअल यामधल्या फरकाची रेघ कशी आखायची? लैंगिकता या शब्दाचा अर्थ आपण सहसा शारीरिक आकर्षण, शरीरसंबंध याच्याशी जोडतो. पण कुठल्याही भावनेसारखाच लैंगिकतेचाही ‘स्पेक्ट्रम’ असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्त्री व पुरुषामध्ये जे ताण अस्तित्वात असतात त्यात जैविक ताणही आहेत हे जर आपण समजून घेतलं तर या संबंधांचं व्यवस्थापन सोपं होईल. स्त्री व पुरुषाच्या विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी जाणं सोपं होईल. ‘लिंगभाव’ हा शब्द या संदर्भात समर्पक आहे, कारण तो लिंगविशिष्ट जाणिवेशी जोडलेला आहे.

मानवी इतिहासाच्या वाटचालीत आपण जी मूल्यं रुजवली ती युव्हाल हरारी म्हणतो तशी कल्पित वास्तवं असली तरी ती अस्तित्वाच्या लढाईत उपयुक्त ठरली आणि पुढे समूह जीवनासाठीदेखील उपयुक्त ठरली, व्यक्तीच्या स्वतंत्र व आनंदी जगण्यासाठी उपकारक ठरली. त्यामुळे तिथे काहीच दुमत नाही, परंतु जैविक प्रेरणा आपल्यावर अजूनही ‘हावी’ होऊ शकतात हे लक्षात न घेता मूल्यव्यवस्थेच्याच आधारे स्त्री-पुरुषांच्या वर्तनाचा उलगडा करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जैविक प्रेरणांचा उल्लेख अशासाठी कारण आपण इथे स्त्री-पुरुषांमधील जैविक ताणाचा विचार करतो आहोत. स्त्री- पुरुष संबंधांना मित्रत्व, ममत्व, सहानुभूती हे आयाम अर्थात आहेतच आणि ते नि:संशयपणे ‘प्रगल्भ आयाम’ आहेत. परंतु स्त्री-पुरुषांमध्ये प्रेम, लैंगिक आकर्षण हे आयाम जैविक ताण निर्माण करतात म्हणून त्यावर विचार करणं आवश्यक वाटतं. कालानुरूप हे आयाम बदलतात हेही खरं आहे. म्हणजे पन्नासच्या दशकातील प्रेमभावना आणि आजची प्रेमभावना यात मूलभूत साम्य असलं तरी प्रकटीकरणात, प्रेमभावनेशी ‘डील’ करायच्या पद्धतीत आज फरक पडला आहे. लैंगिकता आपलं अस्तित्व स्पष्टपणे ठसवू पाहते आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील लेखात प्रेम, लैंगिकता यावर अधिक तपशिलात बोलू आणि त्याआधारे स्त्री-पुरुष संबंधांचं नवीन आकलन होऊ शकेल का ते तपासून पाहू.

n utpalvb@gmail.com

n chaturang@expressindia.com

Story img Loader