डॉ. आशुतोष जावडेकर

‘‘शेक्सपियर बालपणापासून जिथे वावरला त्या जागेत मी उभा होतो; त्याच्या भव्य चित्रासमोर. चित्रापुढे उभं राहून फोटो काढून घ्यावा म्हणून तयार झालो खरा, पण नकळत झुकून वाकलोच प्रतिमेपुढे आणि फोटोबिटो विसरून एकदम हुंदकाच आला! या शेक्सपियर माऊलीनं मला जगणं म्हणजे काय हे दाखवलं आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं जगण्यापलीकडे काय अद्भुत आहे ते दाखवलं. अजून त्यांचं दाखवणं संपलेलं नाही..’’

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…

माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमात झालं आणि तेव्हा तरी आमच्या अभ्यासक्रमात शेक्सपियरचं नाटक वगैरे नव्हतं. पुढे मी शास्त्र शाखेत असल्यामुळे तेव्हाही नाही; पण अगदी नुकता डॉक्टर झालेला असताना ग. प्र . प्रधान सरांचं शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ या राजकीय नाटकाचं रसाळ आणि अभ्यासू निरूपण फग्र्युसन कॉलेजच्या अँफीथिएटरमध्ये ऐकायला मिळालं. तडक दोघांचा फॅन झालो आणि नंतर ब्रिटिश लायब्ररी गाठून मी साहेबांची नाटकं वाचायला सुरुवात केली. ती जुनी इंग्रजी, ती पल्लेदार वाक्यं.. लगेच लक्षात आलं, की हातात पेन्सिल घेऊन अभ्यास करत वाचायची ही पुस्तकं आहेत!

त्यात पहिलंच शेक्सपियरचं नाटक मी वाचलं ते सहसा कुणी पटकन वाचत नाही असं ‘टायटस अँड्रोनिकस’; पण मग साहेब मानगुटीवर बसलेच माझ्या! पुढे मी ‘एम.ए. इंग्रजी’ पहिल्या क्रमांकासह (तेव्हाच्या) पुणे विद्यापीठातून केलं आणि एम.ए.च्या वर्गाना शिकवलं तेव्हा तर शेक्सपियर दहा दिशांनी सतत भेटत राहिला. मित्र झाला, स्नेही झाला, वाटाडय़ा झाला, गुरू झाला! अनेक वर्षांनी आई-बाबा आणि पत्नी-लेकीसह इंग्लंडला जाण्याचा योग आला आणि आम्ही शेक्सपियर साहेबांच्या स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन या गावी धडकलो, तेव्हा बाजूनं गार वारे येत असताना, हुडहुडी भरवणारी थंडी असताना मन मात्र एकदम शेकोटीशेजारी ऊब खात बसावं तसं झालेलं. हॉटेलच्या सुंदर टय़ुडर सजावटीच्या लॉबीत बसलेलो असताना, हातातल्या ‘किंडल’वरती शेक्सपियरची नाटकं स्क्रोल करत असताना कधी एकदा त्याच्या घरी जाईन असं झालेलं. छोटय़ा टुमदार गावातून आम्ही चालत निघालो. आई-बाबा (प्रकाश आणि प्राची जावडेकर) इथे येऊन गेलेले आधी, त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होतं गर्दी अजिबात नसल्याचं. ते आले होते तेव्हा रस्त्यावर हौशी कलाकार नाटकातले तुकडे अभिनित करीत होते, सगळीकडे गर्दी होती, चैतन्य होतं. आता रस्ते निवांत होते. तुरळक पर्यटक होते. चिनी पर्यटक येत नसल्यानं आमची इथली पर्यटन अर्थव्यवस्था ढासळली आहे, असं हॉटेलमधला स्टाफ नुकताच म्हणाला होता; पण मला उलट मस्त वाटलं. असेच निवांत रस्ते असताना शेक्सपियर इथे फिरत असेल. विली म्हणायचे त्याला तेव्हा. गावातल्या पोरांबरोबर याच चॅपल लेनमधून चर्च आणि शाळेला विली मस्करी करत चालत असेल. खालच्या मातीत तो कितीही एकरूप झाला तरी वरचं हे आता आहे तसं किरमिजी रंगाचं आकाश त्याला वेगळंच काही तरी तेव्हाही, त्या वयातही खुणावत असेल. पलीकडे अव्हॉन नदी आहे. ती अजून बघायची आहे. तिथे तर तो जात असेलच. त्याची पत्नी त्याला तिथेच भेटली असावी! अठराव्या वर्षी लग्न करून बसलेला हा पोट्टय़ा. तेव्हाच्या काळाच्या आणि समाजाच्या संदर्भातदेखील ते लवकर झालेलंच लग्न होतं. तीन मुलं पुढे त्यांना झाली. एक मुलगी आणि एक खेप जुळय़ांची. तेव्हा शेक्सपियर लंडन- स्ट्रॅटफर्ड अशा फेऱ्या करत होता. लंडनमध्ये हळूहळू तो तत्कालीन सेलिब्रिटी बनत होता. ‘शेक्सपियर इन लव्ह’ चित्रपट अगदी प्रमाण मानला नाही, तरी शेक्सपियरनं प्रेमाचे दहा अनुभव घेतले असावेत लंडनमध्ये. तोवर इकडे त्याची पत्नी सासू-सासऱ्यांसह तब्बल पंधरा वर्ष एकत्र राहात होती. अशात जुळय़ांमधला हॅम्नेट हा मुलगा वयाच्या अकराव्या वर्षीच मरण पावला. पुत्रशोक आणि महान व्यक्तिमत्त्वं यांचा काय सांधा आहे कळत नाही. हे सगळं मनात असताना समोर त्याचं घर आलं. छोटं, सुबक, नीटस. शेजारी नव्यानं बांधलेलं, पण जुन्या धाटणीचं म्युझियम. घरचे लोक जरा बाहेर रेंगाळले आणि मी आत प्रवेश केला एकटय़ानं. एक-दोन फोटो पाहिल्यावर समोर एक शेक्सपियरचं भव्य, देखणं चित्र आलं. मी उभा राहिलो आणि शांतच झालो. आयुष्याच्या अनेक कठीण प्रसंगी या माणसाचे थोर शब्द मला प्रचंड धीर देऊन गेले, मला नवी समज देऊन गेले. कधी हसवून, कधी रडवून या माझ्या गुरूनं मला थोडं शहाणं केलं. या शेक्सपियर माऊलीनं मला जगणं म्हणजे काय हे दाखवलं आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं जगण्यापलीकडे काय अद्भुत आहे ते दाखवलं. अजून त्यांचं दाखवणं संपलेलं नाहीच. आपण पेलेल ते घेत राहायचं..

शेजारी एक युरोपियन जोडपं होतं. त्यांच्या हातात फोन दिला आणि माझा एक फोटो काढायची विनंती केली. पोज म्हणून नव्हे, पण नकळत झुकून वाकलोच प्रतिमेपुढे. आतून उन्मळून यायला झालं. डोळे पाणावले. एकदम हुंदका आला अन् तसाच मान खाली घालून उभा राहिलो. त्या अत्यंत सुजन असलेल्या युरोपिय जोडप्यानं जवळ येत मला छान मिठीत घेतलं आणि मग हसत आमचा दौरा सुरू झाला घराचा. टय़ुडरकालीन एक वस्त्र पांघरून आम्ही हसत फोटो काढेपर्यंत माझे वडील मागून आले. आम्ही दोघं शांतपणे चालत म्युझियमबाहेर पडून घराच्या मागच्या बागेत गेलो. सुंदर सूर्यप्रकाश होता. छान निरभ्र आकाश होतं. बगीचा देखणा होता आणि मी आणि वडील त्या घराकडे आता मागच्या बाजूनं बघत होतो. तोवर माझी लेक आली. फोटो काढले गेले. आम्ही घराकडे वळलो. एकदम आठवलं, शेक्सपियरचे वडील हे त्या गावातलं मोठं प्रस्थ होतं. चांगला उद्योग होता त्यांचा. लेदरच्या वासानं हे घर तेव्हा भरलेलं असे, असं आता घरातल्या खोलीत गेल्यावर मार्गदर्शिका सांगत होती. ते घर लहान होतं, घरात वर्दळ पुष्कळ होती, कारखाना तिथेच होता वडिलांचा आणि वरच्या मजल्यावर आम्ही जिथे पोहोचलो तिथेच या शेक्सपियर बाळाचा जन्म झाला होता. पुढे लग्न झाल्यावर वडिलांनी घराचा एक हिस्सा नवपरिणीत दाम्पत्याला वेगळा काढून दिलेला होता. वडील त्या गावचे मेयर झाले. महापौराचा मुलगा असलेल्या शेक्सपियरनं राजकारण जवळून पाहिलं असणार. उगाच त्याच्या नाटकात ते आलेलं नाही जिवंतपणे; पण नंतर वडिलांना लोकरीवर आयात भरली नाही म्हणून जबर दंड झाला आणि पुढे दारिद्रय़ नाही, पण उतरती कळा या घराला लागली; पण तोवर लेक नाव काढू लागला होता लंडनमध्ये आणि पुढे तर त्यानं याच गावात आणखी मोठं घर घेतलं; पण मला वाटतं त्या ‘न्यू प्लेस’पेक्षा याच घरात त्याचा जीव अधिक रेंगाळला असावा. इथेच तो जन्माला आला होता आणि याच मातीत त्याची मुळं अखेपर्यंत राहिली असावीत. सगळं मनात साठवत त्याचं घर शांतपणे बघितलं आम्ही.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून पुन्हा एकटा घराच्या रस्त्यावर मी भटकलो. ‘बुक ब्रो’ या माझ्या यूटय़ूब मालिकेसाठी व्हिडीओ घेतले. (इंग्रजी आणि मराठीतले ते एपिसोड अवश्य बघा!) तेव्हा तर जवळजवळ एकटाच होतो इथे. शेक्सपियरच्या नाटकात ’- मूर्ख विनोदी विदूषक हे महत्त्वाचं पात्र असतं. पुढे चालत गेलो आणि ‘अॅनझ यू लाइक इट’ या नाटकातला टचस्टोन या पात्राचा हा पुतळा बघितला. खाली कोरलेलं वाक्य- O Noble Fool, O Worthy Fool!’ किती विलक्षण वाक्य.. पुढे गावात सहकुटुंब भटकताना, सुंदर कॅफेमध्ये उत्तम कॉफी पिताना शेक्सपियरच्या त्या नाटकातल्या विनोदामागचं गंभीर अस्तर जाणवत राहिलं. ‘जग ही रंगभूमी आहे’ हे प्रख्यात वाक्य त्याच नाटकातलं. चालत चालत आम्ही अव्हॉन नदीकिनारी आलो. शेक्सपियरनं त्या उताऱ्यात वर्णिलेले जगण्याचे सातही टप्पे समोर होते- गोंडस टोपडय़ातली बाळं ते अतिवृद्ध- त्यात अधलेमधले आम्ही घरचे पाच जण आणि समोर ही विलायती पंचगंगा! निळसर सुंदर रंग पाण्याला होता. काठाला हिरवंकंच गवत आणि आम्ही सगळे आपल्या आपल्या गतीनं चालत होतो. बदकं काठावर येऊन माझ्या पत्नीशी, मानसीशी खेळत बसलेली.

लेक,आरोही फोटो काढत होती. मी ओणवून तीर्थ घ्यावं तसं त्या नदीचं पाणी हातात घेतलं! एकदम मला वाटलं, की आकळलाच मला माझा महागुरू शेक्सपियर! जणू मला शांत होण्याची, निरीक्षण करण्याची आणि तरी नदीसारखं प्रवाही राहण्याची शिकवण देत होता.समोरच्या काठावर तो देखणा ‘दी बार्ड’ शेक्सपियर उभा होता आणि इकडे जगातलं सगळं सगळं नाटय़ मला खुणावत, चेतवत, उजळवत उभं होतं!

ashudentist@gmail.com

Story img Loader