डॉ. राजन भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालक आणि मुलांमध्ये संवाद असेल तर नात्यात सामंजस्य असतं, असं म्हणतात. मात्र सध्या त्याचीच वानवा जास्त दिसते आहे. विशेषत: लैंगिक विषयाबाबतीत. मुलं आणि पालक यांच्यात ही दरी का आहे, सुजाण पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि ‘परिणामांचं तारतम्य’ समजून घेऊन पालक मुलांशी कसा संवाद साधू शकतील हे सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.
मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘हार्ट टु हार्ट कौन्सिलिंग सेंटर’चे संस्थापक डॉ. राजन भोसले ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ असून, गेली ३२ र्वष ते मुंबईत प्रॅक्टिस करीत आहेत. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयात लैंगिक चिकित्सा विभागाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून ते काम पाहतात. डॉ. भोसले यांनी ‘सेक्स एज्युकेशन’ या विषयावर सात पुस्तकं लिहिली असून १२०० लेख व स्तंभ प्रकाशित झाले आहेत. ‘इंडिया टुडे’मधील सर्वेक्षणात भारतातले सवरेत्कृष्ट लैंगिक तज्ज्ञ म्हणून त्यांची गणना करण्यात आली आहे.
बदलत्या काळाबरोबर विचार, सवयी, मूल्य, आदर्श, ध्येय, अशा अनेक गोष्टी बदलत जात असतात.. यांत काहीच नवीन नाही. काळ बदलत चाललाय, दोन पिढय़ांमधली तफावत वाढत चालली आहे, हा त्रागा पिढय़ान्पिढय़ा आपण ऐकत आलो आहोत. कालपरत्वे होणारे बदल हे किती मान्य-अमान्य व किती सह्य़-असह्य़ असतील यांवर आपलं कधीच नियंत्रण नसतं. जुन्यात जुन्या लिखाणात हा ‘नवीन’ भासणारा बदल मनुष्य जात पाहत आली आहे. प्रत्येक पिढीबरोबर पुन:पुन्हा उचंबळून येणारा हा त्रागा आज पुन्हा लक्षवेधी डोकं वर काढू लागला आहे व त्यांचं स्वरूप यापूर्वी कधीही पाहिलं किंवा अनुभवलं नव्हतं इतकं वेगळं व कल्पनातीत आहे.
गेल्या दशकात संगणकापासून लॅपटॉप, टॅब्लेट्स व आता स्मार्टफोनपर्यंत झपाटय़ाने होत गेलेली स्थित्यंतरं आपण सर्व जण पाहत आलो आहोत. त्या माग्रे विविध आणि अगदी कुठल्याही विषयावरची खरी-खोटी, योग्य-अयोग्य, मान्य-अमान्य अशी सर्व माहिती आज सहज आणि तात्काळ उपलब्ध होऊ लागली आहे. जे अगदी धनिक आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींनाही प्राप्त होऊ शकत नव्हतं ते आज शाळकरी मुलं आणि घरकाम करणाऱ्या अशिक्षितांनाही सहज उपलब्ध झालं आहे. यांचे परिणाम चांगले व वाईट, घातक व विधायक असे दोन्ही होऊ शकतात याची कल्पना आपल्या सर्वाना आहे.
अवघ्या दशकापूर्वीपर्यंत पालकांना मुलांशी संबंधित एखाद्या विषयावर निर्णय घेताना फारसा गोंधळ वा संभ्रम नसे. योग्य-अयोग्य यांच्या व्याख्या व त्यांची परिमाणे सरळ, सोपी आणि सर्वमान्य होती. त्यावर फारसं दुमत होत नसे. पण स्मार्टफोनचं आगमन झाल्यानंतर, त्याचा नेमका काय व किती परिणाम मुलांवर आणि आपल्यावर होतोय व तो परिणाम साधक आहे की बाधक हे ठरवणं आज अति सुज्ञ अशा पालकांनाही अवघड वाटू लागलं आहे.
ज्या गोष्टींचा मागमूस अगदी मेडिकल कॉलेजमध्ये असतानाही आम्हाला नव्हता आणि ज्या गोष्टींचा उल्लेख करणं अगदी स्वत:ला प्रगत समजणाऱ्या लोकांनाही कठीण जात असे, अशा अनेक गोष्टी आज उघडपणे व र्निबधपणे चíचल्या जाताना आपण चहूबाजूंना पाहतो. उदाहरणार्थ – पॉर्नोग्राफी व त्याचे अनेक प्रकार, टिंडर व तत्सम अॅप्सच्या माध्यमातून कॅजुअल डेटिंगसाठी सहजपणे साथीदार शोधून आपली ती गरज भागवणं, घरबसल्या लैंगिक प्रयोग करता येऊ शकतील असे अनेक अॅप बेस्ड पर्याय, ‘अॅडल्ट इंडस्ट्री’मधून आलेल्या सनी लेओनीचं स्वागत व स्वीकार, समिलगी संबंध व त्याचे प्रकार व प्रचार, कसल्याही बांधिलकीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्याची सहज तयारी असलेली तरुण पिढी – या व अशा तमाम गोष्टी व त्याची योग्य-अयोग्यता अगदी सुज्ञ, उच्चशिक्षित व अनुभवी लोकांनाही ठरवणं अवघड जातंय हे एक डॉक्टर आणि समुपदेशक म्हणून या काळात मला वारंवार पाहायला मिळू लागलं आहे.
‘मुलांना शाळांमधूनच नव्हे तर शाळेत जाण्याच्या वयाच्या आधीपासून लैंगिक शिक्षण दिलं जावं,’ हा आलाप मी स्वत: तीस र्वष आळवतोय, पण त्यांचं स्वरूप आज ज्या वेगात पालटत चाललंय त्याच्याशी बरोबरी करणं म्हणजे एक न संपणारी अशी शर्यतच आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काल केलेलं ‘प्रगत’ वक्तव्य आज अगदी ‘प्राथमिक’ क्वचित ‘बाळबोध’ वाटावं इतका हा बदल झपाटय़ाने होऊ लागला आहे. या विषयाचा यथाशक्ती पाठपुरावा करावा या उद्देशानेच या विषयावर पुन्हा एकदा विचारमंथन करण्याचा प्रयत्न मी माझ्या या सदरातून करणार आहे.
काही ‘सत्य’ ही कालातीत असतात. अगदी पुरातन लिखाणांमधे लिहिलेली असूनही ती कालबाह्य़ होत नाहीत. अशी सर्वकाळ दृढ (unaffected) राहिलेली काही मूल्यं आणि काही जाणिवा, ज्या आपल्या संस्कृतीशी निगडित आहेत त्यांचं भान मी माझ्या लिखाणांमध्ये आवर्जून ठेवणार आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या संस्कृतीने जपलेले अनेक संकेत आणि संदेश पायदळी तुडवण्याचं काम काही महाभाग करतात. अशी चूक आपल्याकडून घडू नये याची जाणीव मी माझ्या लेखनात सतत ठेवणार आहे.
‘पालक आणि मुलं यांच्या नात्यातलं गमक हे एकमेकांचा बेशर्त स्वीकार करणं यांत लपलेलं आहे,’ असा संदेश विचारवंत कवी खलिल जिब्रान यांनी दिला आहे. ‘प्राप्ते तु षोडशे वष्रे पुत्रं मित्रवदाचरेत्’ – चाणक्यनीतीतलं हे आपल्याकडचे सुभाषित तर प्राचीन आहे. पालकत्वाबाबतचे हे विचार किती प्रांजळपणे पालक स्वीकारत असत, हे एक समुपदेशक म्हणून मी गेली तीस र्वष जवळून पाहत आलो आहे. पण या विचारांची पूर्तता करताना आजच्या पालकांची मात्र दमछाक होताना मला दिसते. जितक्या वेगाने व आवेगाने मुलं बदलतात व ज्या गोष्टींमुळे ती बदलतात याचं वेळापत्रक जुळवताना पालकांची आज त्रेधातिरपीट उडताना दिसते.
पालकांचं स्वत:चं करिअर, आपापसातल्या नात्याचं संतुलन, आíथक समीकरणं जुळवताना येणारी आव्हानं, या सर्वातून पालकत्वासाठी मिळणारा अल्प वेळ – ही एक नवीन सामाजिक समस्याच समोर येऊ लागली आहे. या समस्येशी झुंजताना कुठे तरी मार्गदर्शक ठरावे असे काही नवीन विचार, मार्ग आणि पर्याय यांची चर्चा मी माझ्या लेखनात करणार आहे.
एरवीसुद्धा ‘सुजाण पालकत्व’ हा एक विषय म्हणून प्रौढ शिक्षणात अंतर्भूत केला जावा असा विचार अनेक विचारवंतांनी यापूर्वी मांडला आहे. मलाही तो अगदी मान्य आहे. असं करत असताना पालकांना सुजाण करण्यासाठी कोणते धडे दिले जावेत याची जुळवाजुळवही काही पुस्तकांमध्ये केली गेली आहे. पण काल लिहिलेले धडे आज निरुपयोगी होतील असा वेगवान बदल मुलांच्या जडणघडणीत होताना आपल्याला दिसतो आहे. एक प्रगत व प्रौढ समाज घडवायचा असेल तर कुठल्याही विषयाचं वावडं न बाळगता त्याची तर्कबद्ध व खुली चर्चा होणं गरजेचं असतं. त्याच उपक्रमाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न हे सदर करेल.
वाढीच्या वयात मुलं ‘नॉलेज’ व अनुभवांची भुकेली असतात. त्याच वेळी त्यांच्यात consequential thinking म्हणजे ‘परिणामांचं तारतम्य’ मात्र अजून विकसित झालेलं नसतं. अशा अवस्थेत मिळणाऱ्या ‘नॉलेज’ व अनुभवांची प्रासंगिक शहानिशा करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. इथेच चूक होते. इंटरनेटमुळे नॉलेज मिळवण्याचे असंख्य मार्ग मुलांना आज उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी यापुढे पालक कधीच पुरे पडू शकणार नाहीत. पण ‘परिणामांचं तारतम्य’ शिकवण्याचं काम मात्र पालक नक्कीच करू शकतील. हे ‘परिणामांचं तारतम्य’ त्यांच्यात त्वरेने विकसित व्हावं या दिशेने पालक व समाज यांनी कार्यरत होणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे याची चर्चा या सदरात पुढे केली जाईल.
वर व्यक्त केलेल्या विचारांशी संबंधित जर काही प्रश्न वाचकांच्या मनांत असतील तर ते माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवावे. त्यांची उकल आगामी लेखांमधून करण्याचा प्रयत्न मी अवश्य करेन.
rajanbhonsle@gmail.com
chaturang@expressindia.com