केहुनि नमन
वर्तमानाप्रती जागरूक होत आज पुढची साधना करू या. ‘केहुनि नमन’ या कृतीद्वारा आपण कोपरे वाकवून घेऊयात. प्रारंभिक बठक स्थिती घ्या. सुखावह स्थितीत पाठकणा समस्थितीत असू द्या. हात जमिनीला समांतर शरीराशी काटकोनात पुढे घ्या. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला वर असतील. हात कोपरांतून वाकवून बोटांनी खांद्याला स्पर्श करा. असे १० वेळा करा. दोन्ही हात शरीराच्या बाजूने लांब करून पुन्हा ही कृती करा. हात सरळ करताना श्वास घ्या. हात वाकविताना श्वास सोडा. हाताची बोटे, कोपर, व खांदा एका सरळ रेषेत आहेत का यावर सजगता ठेवा.खा आनंदाने : कंपवातावर वेळीच नियंत्रण
वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ
१. संतुलित आहार घेणे. पाणी भरपूर प्यावे.
२. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे ब्रेड / पाव / अतिरिक्त चरबीयुक्त पदार्थ यांचे सेवन टाळावे.
३. साखर, चरबी, मीठ यांचा वापर मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.
४. डोपामिनचे प्रमाण राखण्यासाठी पुढील पदार्थ मदत करतात – बदाम (भिजवलेले), केळी, चवळी, श्रावणघेवडा, सोयाबीन, दूध आणि दुधाचे पदार्थ.
५. विटामिन अ, क, आणि ई चे सेवन करणे. उदा. गाजर, बीट, भोपळा, रताळ, आवळा, पेरू, संत्र, मोसंबी, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया वगरे
६. चहा – कॉफीचे अतिरिक्त सेवन टाळावे.
७. प्रत्येक अन्न विभागातून विविध प्रकारचे अन्न खा. म्हणजेच धान्य फक्त तांदूळ-गव्हापुरते मर्यादित न ठेवता जव, नाचणी, ज्वारी, कुळीथ, बाजरी, राजगिरा वगरे धान्यांचासुद्धा विचार करा.
८. व्यायाम आणि अन्न यांचे योग्य संतुलन राखून आपले वजन आटोक्यात ठेवा.
विचारपूर्वक केलेले आहारनियोजन आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.
* आहाराचे नियम प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे बदलू शकतात. आहारतज्ज्ञांचा सल्लाही घ्या. संगणकाशी मत्री : स्काईप कसे वापरावे
१. प्रथम अॅड्रेसबारमध्ये जाऊन http://www.skype.com असे टाईप करा.
२. आता आपल्यासमोर असलेल्या पर्यायापकी download चा पर्याय निवडा आणि आपण ज्या साधनात स्काईप वापरणार आहात (उदा. फोन, टॅब, टिव्ही, लॅपटॉप..)
३. आता वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात असलेल्या sign in या पर्यायावर क्लिक करा. आपल्यासमोर sign in आणि create an account असे दोन पर्याय ओपन होतील. त्यापकी create an account हा पर्याय निवडून आपले युजरनेम तयार करा.
४. तयार झालेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून आपण स्काईप वापरू शकता. कसं ते यापूर्वी सांगितले आहे.
५. आता कितीही वेळ आपण आपल्या परदेशी असलेल्या आप्तांसोबत अत्यल्प दरात मनसोक्त गप्पा मारू शकता.
६. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला स्काइपवरून गप्पा मारायचा असतील, त्या व्यक्तीच्या ‘स्काइप आयडी’वर विनंती (friend request) पाठवावी.
७. आपल्या संपर्क यादीतील contact list) जी व्यक्ती स्काइपवर गप्पा मारण्यासाठी उपलब्ध असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे हिरवे चिन्ह दिसेल.
८. व्यक्तीच्या नावावर किंवा फोटोवर क्लिक केल्यानंतर type a message here लिहिलेल्या ठिकाणी आपला संदेश लिहा.
९. Type a message here चा अगदी खाली एका बाजूला कॅमेराचे व फोनचे चिन्ह दिसेल. जर व्हिडीओ कॉलिंग करायचे असेल तर कॅमेराच्या चिन्हावर क्लिक करा आणि जर ऑडीओ कॉलिंग करायचे असेल तर फोनच्या चिन्हावर क्लिक करा.
काय मग आजी आजोबा, मुलांच्या नातवंडाच्या डोळ्यात डोळे घालून गप्पा मारणार की नाही! ( संकलन- गीतांजली राणे)आनंदाची निवृत्ती : धार्मिक पर्यटनाचा आनंद
नारायण (नाना) चव्हाण, कळवा
उत्तम व्यवस्थेची, विश्वासाची, आपुलकीची, प्रेमाची, कौटुंबिक सहवासाची उत्तर भारत, दक्षिण भारत, राजस्थान, केरळ, गुजरात आदी ठिकाणाची सृष्टिसौंदर्याने नटलेली, तसेच काशी, गया, प्रयाग, अयोध्या, रामेश्वर, सोमनाथ आदी धार्मिक स्थळांची टूर आयोजित करू लागलो. त्याला सर्व स्तरांतील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला व पुढील टूरची चौकशी करू लागले. आपण लोकांच्या सतत संपर्कात येण्यासाठी मी कळवा शहरात आईच्या नावाने छोटेसे ‘भागीरथी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे ऑफिस काढले.
माझे वय सध्या पंचाहत्तर चालू आहे. या वयात माझ्या स्वभावामुळे हॉटेल मालक, बस सव्र्हिसवाले, रिक्षावाले, गंगेच्या ठिकाणचे बोटवाले, धार्मिक स्थळांवरील विधी करणारे पंडित यांच्याशी चांगले संबंध झाले आहेत. त्यांच्याकडून मला चांगले सहकार्य व सेवा मिळत आहे. या सहल दर्शन दरम्यान माझा काही परदेशी लोकांशीही संपर्क येऊन त्यांचे पत्रव्यवहार चालू आहेत. तसेच इतर काही लोकांना आणि टूर्सवाल्यांना माझे मार्गदर्शन होत आहे. स्वतंत्र कुटुंबासहित टूर्स घेऊन जाणाऱ्यांना त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांच्या आवडीच्या स्थळाची पूर्ण व्यवस्था अगदी विनामूल्य करून देत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा एक ज्येष्ठ सदस्य समजून लोक मला ‘नाना’ या नावाने ओळखतात. माझ्या पत्नीचे वय सत्तर असून सर्व मुलींची लग्ने झाल्यामुळे आम्ही दोघेच घरी असतो. मी टूरवर असताना ती घर सांभाळते. तिची साथ व सहकार्य मिळत असल्यानेच मी अजूनही टूर नेत आहे व आम्ही दोघे आनंदाने निवृत्ती जीवन जगत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा