आपल्या आजूबाजूला असणारे आजी-आजोबा हे लहान मुलांपेक्षा वेगळे आहेत का? दोघांमध्ये किती साधम्र्य
अतिस्थूलता किंवा कृशता दोन्ही आरोग्यासाठी हानिकारकच. दोन्ही परिस्थितीमध्ये अशक्तपणा असतोच, कारण कॅलरीज आणि प्रथिनांची कमतरता. कॅलरीजची आवश्यकता वयाप्रमाणे कमी होते, कारण चयापचय क्रिया मंदावलेली असते आणि शारीरिक हालचाल कमी झालेली असते. पण जेवढा आहार असेल तेवढा प्रथिनयुक्त आणि जीवनसत्त्वाने परिपूर्ण असेल तर अशक्तपणा जाणवणार नाही. गुडघेदुखी किंवा मधुमेह-हृदयरोग वगरे आजारांसाठी डॉक्टर्स वजन कमी करायला सांगतात पण कमी झालेला आहार अजून कमी करणे आणि रोज एक एक तास चालणे शक्य नाही तर काय करायचे? कॅ लरीजचे संतुलन आणि मितआहार पण जीवनसत्त्व, प्रथिनयुक्त आहार आणि शरीर साथ देईल त्याप्रमाणे शरीराची हालचाल हा त्यावर उपाय!
कृश व्यक्तींसाठी- सुका मेवा, गाईचे दूध, तूप, ज्वारी-बाजरीसारखे धान्य, फळांचे रस, बटाटे, मका, रताळी, मटार यांसारख्या स्टार्चयुक्त भाज्या, षड्रसयुक्त आहार – कारण जीभ आणि नाक या दोन्ही अवयवांची संवेदना कमी झालेली असते. कृश व्यक्तींसाठी- सुका मेवा, गाईचे दूध, तूप, ज्वारी-बाजरीसारखे धान्य, फळांचे रस, बटाटे, मका, रताळी, मटार यांसारख्या स्टार्चयुक्त भाज्या. लठ्ठ व्यक्तींसाठी : किसलेल्या कोिशबिरी, भाज्यांचे सुप्स, काटवणी, लाह्या, उकड, कमी तूप-तेलाचे पदार्थ, फुलके, पातळ आमटी, ताक वगरे पदार्थ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा