मी आई होण्यापूर्वी काय काय करू शकत होते अन् कुठला कुठला अनुभव घेतला नव्हता हे सांगणारं एका तरुणीचं हे मनोगत
 मी आई होण्यापूर्वी नेहमीच गरमागरम जेवत होते, स्वच्छ, इस्त्रीचे कपडे घालत होते आणि फोनवर तासन् तास गप्पा मारत असे.
 आई होण्यापूर्वी मी कितीही वेळ झोपून राहू शकत होते. झोपायला किती उशीर होतोय याची मी कधी चिंता करत नव्हते.
 मी आई होण्यापूर्वी माझ्या शरीरावर, माझ्या मनावर माझा पूर्ण ताबा होता. मी शांतपणे झोपू शकायची.
 मी आई होण्यापूर्वी केवळ बाळाला खाली ठेवणे शक्य नाही म्हणून तासन् तास त्याला धरून उभी राहिले नव्हते. बाळाची जखम भरून काढता येत नाही म्हणून माझं ह्रदय कधीच इतकं विदीर्ण झालं नव्हतं.
 मी आई होण्यापूर्वी डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावं म्हणून रडणाऱ्या मुलाला कधीही घट्ट पकडून ठेवलं नव्हतं. मी कधीही त्या रडणाऱ्या डोळ्यांकडे बघत स्वत: रडले नव्हते. मी कधीही झोपलेल्या बाळाकडे एकटक बघत रात्रभर जागले नव्हते.
मी आई होण्यापूर्वी मला कधीही कल्पना नव्हती की एक एवढूसं छोटं बाळ माझ्या आयुष्याचा एक इतका मोठा हिस्सा होईल की माझं आयुष्य माझं राहणारच नाही!
 मी आई होण्यापूर्वी मला हे माहीतच नव्हतं की कुणावर तरी मी इतकं प्रेम करू शकते. मला कधीही माहीत नव्हतं आई होणं मला इतकं आवडेल.
 मी आई होण्यापूर्वी मला हे माहीतच नव्हतं की माझ्या शरीराबाहेरही माझं ह्रदय आहे. मला हे माहीतच नव्हतं की मी एका छोटय़ाची भूक जाणून घेऊ शकते. एका छोटय़ाशा माझ्याच प्रतिमेचा श्वास मला लांबूनही जाणवू शकेल.
 मी आई होण्यापूर्वी मला हे माहीतच नव्हतं की मी अध्र्या रात्री दर दहा मिनिटांनी उठून सगळं काही ठीक आहे ना याची खात्री करत राहीन. मला हे माहीत नव्हतं की आई असण्याने मिळणारा आनंद, त्यातल्या यातना, दु:खं, अंचबित होणं, आश्चर्यचकित होणं, समाधानी होणं सगळ्या या भावना म्हणजे काय असतात.
मला हे माहीत नव्हतं की इतकं सगळं मी अनुभवू शकते.. फक्त एका आई असण्याने!   

Story img Loader