गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते.
गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नतिक दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता; श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान, तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते.
गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. आपल्या राष्ट्र पित्यांपासून ते एॅल्डस हक्स्ली ते अलबर्ट आइनस्टाइन यांनाही गीतेने भारावून टाकले आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, ‘जेव्हा शंकांचे काहूर माजते, जेव्हा समोर फक्त नराश्यच दिसते, आणि दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दृष्टीस पडत नाही, तेव्हा मी वळतो भगवद्गीतेकडे, आणि एक असा श्लोक शोधतो ज्याचा मला आधार वाटतो, आणि अतीव शोकातही माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलू लागते. जे रोज गीतेबरोबर ध्यान करतात त्यांना रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो.’
आइनस्टाइन काय म्हणतो पहा, ‘मी जेव्हा भगवदगीता वाचतो आणि विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो तेव्हा बाकी सगळे अगदी निर्थक भासते.’
एॅल्डस हक्स्ली म्हणतात, ‘गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात सरळ आणि सुलभ सारांश आहे. म्हणूनच फक्त भारतीयांसाठीच नाही तर पूर्ण मानवजातीसाठीच अमूल्य ठेवा आहे. गीता ही बहुतेक शाश्वत तत्त्वज्ञानाचा सर्वात पद्धतशीर आध्यात्मिक सारांश आहे.’
सगळ्याच दृष्टीने गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते. आपल्या शिकवणीतून गीता आपल्याला मनावर पूर्ण ताबा मिळवायचा मार्ग दाखवते. ती तुम्हाला एका अत्युच्च उंचीवर नेते. तुम्हाला मनशांती आणि स्थर्य देते. पूर्वीपेक्षा अधिक, आणि जगभरातील लोक याच मनशांतीच्या शोधात आहेत. सततच्या तणावपूर्ण वातावरणात संयमाचे महत्त्व आता लोकांच्या ध्यानात येऊ लागली आहे.
गीतेची सर्वाधिक मोलाची शिकवण म्हणजे, आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे. एक प्रकारे हीच शिकवण आपल्याला आपल्या कार्याप्रती निस्वार्थी बनवते, आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण करायचा विचार देते, आणि जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगायला शिकवते.
निस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे, असे गीता सांगते. कारण जेव्हा मनुष्य या पातळीपर्यंत पोहोचतो तेव्हा अहंम विलोप पावतो. जीवन हे कोणत्याही प्रकारचे यश मिळवण्याचा लढा नाही. तुम्ही उच्च पातळीवर पोहोचता आणि अंतिमत आत्मा ब्रह्माशी एकरूप होतो- िपडापासून ब्रह्मांडाकडे.
गीता तुम्हाला अत्युच्च उंचीवर पोहोचवू शकते. भावनांच्या कोलाहलाला शमवण्याचे सामथ्र्य गीतेत आहे. मनातील काहूर शांत करण्याची आणि तुम्हाला निस्सीम मनशांती देण्याची शक्ती गीतेत आहे. कठीण परिस्थितीतही जीवनाला धर्याने सामोरे जाण्यासाठीचा समतोल गीता तुम्हाला देते.
बऱ्याच वेळा आपल्या पाहण्यात येते की लोक अगदी क्षुल्लक कारणामुळे क्रोधीत होतात. अशा वेळेस सहिष्णुतेपेक्षा आक्रमकतेची भावना बळावते आणि समस्या अधिक वाढते. स्वतच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती वाटत असते. आणि या सगळ्या प्रकारात नकारात्मकता निर्माण होते. गीता आपल्याला हीच नकारात्मकता नाकारायला शिकवते, आपल्या मनुष्य बांधवांबद्दल कोणतेही अप्रिय, अनुचित भावना नाकारायला शिकवते. निराशेतून उत्पन्न होणाऱ्या भावना या अतृप्त इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि बहुतेक वेळा नात्यांमधून निर्माण होतात- ज्या सगळ्याचे मूळ असते अपेक्षा. वैफल्यातून निर्माण होणारा क्रोध हाच या सगळ्यातून निर्माण होणारा असतो. क्रोध मनुष्याला सर्वतोपरी अंध करतो. दुसऱ्या बाजूला संयम हेच दृढ मानसिक शक्तीचे प्रतििबब असते.
गीता सांगते, क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते. स्मरण शक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते. आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो. पण एक संयमी आत्मा, जो या सगळ्याच्यात वावरत असतो आपुलकी किंवा घृणा या दोन्हीपासून अलिप्त, त्यालाच चिरंतन शांती प्राप्त होते. (गीता, श्लोक ६३).
यावर स्वामी चिन्मयानंद (चिन्मय मिशन) सांगतात, एका संभ्रमी मतीमुळे चांगले-वाईट यातला फरक ओळखण्याची क्षमता गमावली जाते, ज्यालाच सोप्या भाषेत सद्सदविवेकबुद्धी म्हणतात. जी बहुतेक वेळा आपल्यात एक परिमाण तयार करते आणि मनाला सावध करते. ती कायम टिकायला हवी.
स्वामी स्वरूपानंद यांनी किलगडाची उपमा देऊन अतिशय सुंदररीत्या समजावले आहे की जसे किलगड पिकल्यावर वेल वाळतो व त्या रसयुक्त फळाला बंधनातून मुक्त करतो. त्याप्रमाणेच ज्ञानी हे जाणतात की शरीर हे फक्त बाहेरील कवच आहे, मनासाठी बांधलेलं घर आहे. आणि जेव्हा आत्मा शारीरिक आणि मानसिक मोहपाशातून मुक्त होतो तेव्हाच तो सृष्टीकर्त्यांशी एकरूप होतो. आणि त्यानंतरच पुनर्जन्माचे चक्र संपुष्टात येते.
सत्तेची, प्रसिद्धीची, ऐश्वर्याची नशा मनुष्याला एकप्रकारच्या भोवऱ्यात अडकवतात. या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो. ते तुम्हाला फुलवू शकते. तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते. म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते. पण तरीही मनावर पूर्णत स्वामित्व मिळवणे, कठीण वाटत आहे ना? हो. पण हे नक्की करता येते. सर्व काही आपल्या मनात असते.
गीता
गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
नक्की वाचा
First published on: 29-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagavad gita