निवृत्तीचा मला भावलेला अर्थ म्हणजे निरामय वृत्ती. तब्येतीला साथ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुढे काय करायचं या प्रश्नाने पहिल्या दिवशीदेखील सतावलं नाही. आतापर्यंत दुर्लक्षित गोष्टींवर भर द्यायचा हे मनात पक्कं होतं. पतीशी सुसंवाद, विचारांची देवाणघेवाण, मुलींशी गप्पागोष्टी, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी अगोदर सांभाळत होते तरी त्यात माझे तत्त्वज्ञान ओतत असे. सासू-सासरे नव्हते,पण आई-वडिलांना वेळ देऊ लागले. परमात्म्याने आमची जोडी छान बनवलीय. पतीला हिंडणं-फिरणं, चित्रपट पाहणं यांची आवड नाही आणि मला झेपत नाही, त्यामुळे घरात आपोआप शांतता असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरच्या आघाडीवर आनंद-समाधान झळकू लागल्यावर निश्चिंत मनाने समाजातील माझ्या आवडत्या गोष्टींकडे वळले. बुद्धी आणि विचारांना चालना मिळेल अशा गोष्टी मला आवडतात. त्याचबरोबर माणसं जोडायला आवडतात. संपदा वागळे, विदुला ठुसे या आमच्या मैत्रिणींनी स्थापन केलेल्या ‘आचार्य अत्रे कट्टा’ (ठाणे) येथे सक्रिय भाग घेऊ लागले. आज मी त्याची सचिव आहे. कट्टय़ामुळेच लिहायला-बोलायला प्रोत्साहन मिळालं आणि माणसं, ज्ञान आणि आनंद यांनी जीवन फुलतंय. कट्टय़ाच्याच धर्तीवर असलेलं आमचं ‘स्टेट बँक पेन्शनर्स कल्चरल मंडळ’ आहे. मंडळ २५ वर्ष जुनं आहे. गेली पाच वर्ष तेथे मी कार्यकारी मंडळात आहे. कार्यक्रम ठरवण्यापासून ते पार पडेपर्यंत सर्व जबाबदारी सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडते, तेव्हा खूप समाधान मिळतं.

माणसांचा परिघ वाढत होता, पण आंतरिक समाधान मिळत नव्हतं. संवेदनशील सामाजिक संस्थेशी संलग्न व्हावंसं मनापासून वाटू लागलं. ‘विद्यादान साहाय्यक मंडळ’ ही ठाण्यातील समाजोपयोगी संस्था. आर्थिक दुर्बलतेने गांजलेल्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी झटत असते. आज महाराष्ट्र संस्थेच्या पाच शाखा आहेत. एका मुलाचं पालकत्व मी घेतलंय, शिवाय इतर उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा प्रयत्न करत असते.

मानवतेची अत्युच्च सीमा असलेली ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या संपर्कात आले. डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे यांनी १९९८ मध्ये स्थापन केली. रस्त्यावरच्या बेघर, मनोरुग्ण स्त्रियांचं हक्काचं घर. तेथे ६०० स्त्रियांना निवारा मिळू शकेल, असा प्रकल्प उभारला जातोय. त्यासाठी २५ कोटी खर्च आहे. तेथील ध्यान मंदिराचा खर्च २५ लाख आहे. हा खर्च संपदा वागळे आणि मी मिळून जमवण्याचा संकल्प केलाय. आजपावेतो समाजातील दानशूर व्यक्तींमुळे २१ लाख रुपये जमले आहेत. अर्थात त्यानंतरही आम्ही ‘माऊली’च्या संपर्कात राहूच. सुलभा वर्दे यांचा ध्यास-श्वास असलेल्या सायन हॉस्पिटलच्या बराकीत वसलेलं ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’. १९९१ मध्ये संस्था स्थापन झाली. या संस्थेशी मी जोडली गेले ते वेगळ्याच कारणाने. सुलभाताईंना त्यांच्याकडील पॅराप्लेजिक रुग्णांच्या यशोगाथा लिहाव्या असं वाटत असल्याने ‘सुलभा तू लिही’ असा प्रेमळ आग्रह त्यांनी धरला आणि मी हो म्हटलं. पुस्तकाच्या निमित्ताने मला तेथील रुग्ण, सोशल वर्कर्स, वर्कशॉपमधील आणि ऑफिसमधील काम करणारे पॅराप्लेजिक यांचं जीवन जवळून पाहता आलं. नकळत मी त्यांच्या व्यथांमध्ये समरस झाले. लिखाण, वाचन याची मला प्रथमपासूनच आवड आहे. साठीनंतर निवांत वेळ मिळाल्यावर मी ‘स्वान्त सुखाय’ लिहीत गेले. माझ्या आवडीचं समृद्ध जीवन मी सध्या अनुभवते आहे. या सर्व संस्थांमुळे अनेक चांगली-ध्येयवादी माणसं मी जवळून पाहतेय. ती सर्वच झोकून देऊन काम करताहेत, त्यातला खारीचा वाटा मी उचलत असल्याने वेळ सत्कारणी जातोय यातच समाधानी आहे. या आनंदाचं, समाधानाचं बीज प्रत्येकातच असतं. परमेश्वराने मला संधी दिली, ती पती विलास आरोसकरांसारखा जीवनसाथी देऊन.

कोणत्याही प्रकारची मदत ते अगदी आनंदाने मनापासून करतात. कुरिअरपासून ते डोनेशन्स बँकेत भरण्यापर्यंत. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांची साथ आहेच. माझी ही पाऊलवाट अशीच सुरू राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सुलभा आरोसकर

‘लाइफ इज फेस्टिवल’

हा लेख लिहिण्याअगोदर माझा परिचय आवश्यक आहे. मी ६७ वर्षांची तरुण आजी होय. तरुण शब्द जरा वेगळा वाटतो, पण ते तसंच आहे. इतरांपेक्षा माझं आयुष्य जरा वेगळं आहे. गत आयुष्याचा आढावा घेतल्यास जाणवतं की बालपणी आणि तारुण्यात कधी मोकळेपणा मिळालाच नाही. आई-बाबा आणि अभ्यासाचं सतत दडपण. मधल्या काळात नवरा सतत टूरवर असल्यामुळे एकटेपण, जबाबदारी, पाठबळाची वानवा अनेक आजार आणि घरच्यांचे टोमणे, या कारणांमुळे उच्चशिक्षित असून नोकरी करणं जमलंच नाही. इच्छा अपूर्ण असल्यानं त्याची अखेर नैराश्येत होते. सुदैवानं चांगले डॉक्टर लाभले अन् जीवनाला जणू संजीवनी मिळाली. माझा दृष्टिकोन सकारात्मक झाला. सध्या मी वाचन, चिंतन, उपासना वगैरे कामात गुंतले आहे. काही प्रमाणात माझे पतीही याला कारणीभूत आहेत. माझा नवरा वयाच्या ७१ व्या वर्षीही जणू उत्साहाचा खळखळणारा मूर्तिमंत झरा आहे. ते एका कंपनीचे संचालक आहे.

साठीनंतरचा सुवर्णकाळ असतो. जे आजवर केलं नाही ते करायचा अट्टहास हवा जरी तन साथ देत नाही पण मन तरुण असलं तर जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो. हे माझ्या बाबतीत शंभर टक्के खरं आहे. मागल्या वर्षी मी अमेरिकेची वारी केली, तन-मन तृप्त झाले. शरीर औषधानं बरं ही होईल पण मनाचं काय? म्हणून सतत काही तरी करत राहाते. शरीर सुदृढ राहण्यासाठी योग्य व्यायामाला पर्याय नाही. जमेल, झेपेल तेवढा व्यायाम, चालणं, चेहरा प्रसन्न ठेवणं, कमीत कमी तक्रार आणि नवीन पिढीशी जुळवून घेत राहणं. थोडक्यात, आयुष्य भरभरून आणि सकसपणे जगतेय. शेवटी काय लाइफ इज फेस्टिवल, एन्जॉय इट. असं कुणी उगीच नाही म्हटलं. हेच म्हातारपण किंवा वाढत्या वयाचं गुपित आहे.

– अंजली अरविंद शेवडे, कल्याण (प)

‘ रिटर्न गिफ्ट’

मृत्यू केव्हा येईल, कसा येईल हे कल्पनेपलीकडचे आहे.  मरण टाळता येत नाही पण लांबवता येते. यामुळंच माणसं उत्साहाने, उमेदीने दुसऱ्या दिवसाची स्वप्नं रंगवीत सर्व व्यवहार पार पाडीत असतात.

माझ्या घरातल्या भिंतीवरील आरशामागे एक बोधवाक्य आहे. ‘Your talent is God’s gift to you, what you do with it, is your gift to god.’  माणूस जन्माला येतानाच गुणावगुण घेऊन येतो. निर्मिकाची (परमेश्वर) ती आपल्यासाठीची भेट असते. त्यावरील संस्कार माणसाला वाल्या अगर वाल्मीकी बनवतो. नुकतेच दिवंगत झालेले स्टीफन हॉकिंग यांच्या शरीराचा एक एक अवयव निकामी होत गेला. आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे ओळखून त्यांनी नियतीवर मात केली. अपंग हे म्हणायला सोपं असलं तरी अपंगत्वावर खरं औषध आणि निर्मिकाला रिटर्न गिफ्ट देण्याला हाच विचार कामी येतो. रिटर्न गिफ्ट प्रत्येक व्यक्तीचं अलिखित कर्तव्य आहे.

मी मुंबई महानगरपालिकेमध्ये ३८ वर्ष सेवा बजावून निवृत्त झालो. नंतर सात-आठ वर्ष विशेष कार्य अधिकारी (ओ.एस.डी.) या पदावर वैद्यकीय संस्थांमध्ये काम केलं. २००७ मध्ये नोकरीतील अनुभवांवर आधारित ‘पाऊले चालती वाट’ हे पुस्तक वयाच्या ७५ व्या वर्षी प्रकाशित केलं. (आज माझं वय ८८ आहे.) अनेक सामाजिक कार्यामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता भरभरून काम केलं. आयुष्याची ८८ वर्ष पुरी करत असताना मी वैधानिक जबाबदाऱ्यांतून मुक्त आहे. पूर्वीसारखी मेहनत करण्याला शरीराचे अवयव साथ देत नाहीत तरी सफाई कामापासून घरातील दैनंदिन कामं मीच आवडीने करतो. दोन कन्यांच्या आटोपशीर, संसाराला वेळोवेळी शक्य ते आर्थिक आणि इतर साहाय्य केलं आणि करणं माझी जबाबदारीच मानतो.

सात्त्विक आनंद मिळण्यासाठी आसपास ‘प्रतिष्ठित याचक’ संस्था आवाहन करत असतात. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देणं म्हणजे देवाला रिटर्न गिफ्ट. (याचक शब्द नाइलाजास्तव) गणपतीच्या दहा दिवसांत प्रति दिन एका स्वयंसेवी संस्थेची विश्वासार्ह माहिती ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत लोकसत्ता प्रकाशित करतो. या संस्थांना साहाय्य करणं वाढत्या वयात आपल्याला शक्य आहे, ते मी नियमित करत आहे. देण्याचा आनंद मी उपभोगत आहे.

वि. शं. गोखले, पनवेल</strong>

बदलवलेलं आयुष्य

आयुष्य हे अनाकलनीय आहे. या संकल्पनेवर माझा आता विश्वास बसू लागलाय किंवा अचानक मिळालेल्या धक्क्यातून जीवन पार बदलून जातं, हेही लक्षात आलंय. खरं तर मी एक गृहिणी. घरसंसार, मुले, नवरा यांच्यात गुंतलेली. इतकी की बाहय़ जगही असतं हे विसरूनच गेलेली. माझी आई तर नेहमी मला म्हणे की, ‘अगं देवाने बुद्धी दिलीय ती वापर! फक्त चूल, मूल, नवरा यातच गुंतू नको. जरा दुसरं काही तरी करून बघ!’ तिची तळमळ मला समजे – कारण ती फारच हरहुन्नरी होती.

माझ्या पतीने जरा आधीच निवृत्ती घेतली, तशी मोठी होऊन नोकरीला लागलेली मुले अगदी पाठीच लागली की जरा कुठे तरी जाऊन मजा करून या! म्हणून शेवटी थायलंडला असलेल्या भाचीकडे – रसिकाकडे गेलो. अन् तिच्याबरोबर भटकायला सुरुवात केली. मजा करता करता आठ दिवस कसे गेले ते कळलेदेखील नाही. पण तिथेच यांना अचानक जोराचा हृदयविकाराचा झटका आला. मग पुढची धावपळ! अकस्मात झालेल्या या आघातामुळे मी इतकी सुन्न झाले होते की रडूसुद्धा येईना. मलाही ‘धक्का’ मिळालाच पण पेसमेकरच्या रूपाने जीवनदान मिळाले.

आयुष्याचे अचानक नवीन पर्व चालू झालं. साधारण वर्षभराने मी भानावर आले. मुलं माझ्यासाठी इतकं करतात तर त्यांना वाईट वाटू नये म्हणून तरी आपण उमेद दाखवायला हवी, असे हळूहळू जाणवू लागले. बरीचशी माणसात आले. अन् मग एक दिवस मुलीनं, सोनालीने सांगितलं, ‘‘आई! मला चांगली संधी मिळतीये म्हणून मी गुरगावला (हरयाणा) जायचं ठरविलं आहे, जाऊ ना? ’’ ती गुरगावला आली, पण शेवटी आईचं मन. तिची एकटीची धावपळ होईल म्हणून हळूहळू आधी पंधरा दिवस, मग महिना अशी गुरगावला येऊन राहू लागले. ती ऑफिसला गेल्यावर काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला.

अन् एका अनामिक क्षणी अचानक सुटला! कुठल्या तरी स्फूर्तीने वही आणि पेन घेऊन एक गोष्ट लिहिली. एका मासिकाला पाठवून दिली, ती चक्क प्रसिद्ध झाली. खरं तर तो माझ्यासाठी धक्काच होता. पण त्या धक्क्यातून पुढे आजतागायत लिहीत राहिले. आईची खूप आठवण आली. मी लिहायला लागलेलं बघून ती खूश झाली असती. मी जगण्याची संकल्पना बदलून टाकली. जास्तीत जास्त सकारात्मक जगायचं ठरवलं. जोडीदार कधीही गेला तरी ‘एकटेपण’ हे येणारच. पण त्यातून मार्ग वेळीच काढला, एखादा छंद जोपासला तर जीवन सुकर होतं, असा माझा अनुभव आहे.

आता गुरगावला मी चांगली रुळले. आजूबाजूला थोडय़ाफार ओळखी झाल्यात त्यांना महाराष्ट्रीय चालीरीती, पदार्थाची माहिती देते आणि त्यांच्याकडचे वेगळे असेल ते शिकून घेण्याचा प्रयत्न करते. मनातले बरेच गैरसमज दूर झाले. फक्त गंमत म्हणजे मनाने जन्माने पक्की मुंबईकर असल्याने इकडच्या कुणालाही ‘बॉम्बे’ म्हणू देत नाही. मुंबई म्हणा असा आग्रह करते अन् मग त्या मैत्रिणीही हसत ‘मुंबई’ म्हणतात. अन् मला मुंबईवाली म्हणतात. इतके आता मी स्वत:ला बदलवून टाकलंय. त्यामुळे मुलंपण खूश आहेत.

– ज्योती सुरेश आठल्ये, गुरगाव (हरयाणा)