कुणालाही मी जर हा प्रश्न विचारला की, दैनंदिन जीवनात श्वास घेताना नाकाने घेणे चांगले का तोंडाने? तर मला खात्री आहे की, जवळजवळ १०० टक्के लोक ‘नाकानेच’ असे उत्तर देतील. पण ते उत्तर वैद्यकीयदृष्टय़ा तसेच नसर्गिकदृष्टय़ा बरोबर नाही. मी विचारलेल्या प्रश्नाचे खरे उत्तर असे आहे की, ‘‘शांतीच्या समयी नाकाने श्वास पण बोलताना, गाताना मात्र तोंडानेच श्वास घेतला जातो.’’
  प्रत्येक व्यक्ती २० तास शांत असते त्या वेळेस त्याने नाकानेच श्वास घेतला पाहिजे. पण दिवसभरात तीन ते चार तास व्यक्ती बोलते अथवा गाते. अथवा ज्यांचा आवाज वा वाणी हे व्यवसायाचे प्रमुख अंग आहे अशा व्यक्तींना सहा ते आठ तास बोलावे किंवा गावे लागते. एखादी व्यक्ती स्टेशनवर कुणाची वाट पाहात आहे व त्या वेळेस तोंड उघडून श्वास घेत आहे तर ते चुकीचे, अनसर्गिक व हानिकारक आहे. तसेच एखादी व्यक्ती बोलता गाताना मात्र मुद्दाम तोंड बंद करून नाकाने श्वास घेत असेल तर तेही चुकीचेच व अनसर्गिक आहे. नाकाने श्वास घेणे व तोंडाने श्वास घेणे यातील चांगले वाईट गुण दोन ओळीत सांगतो.
* नाकाने श्वास- गाळून श्वास, गरम श्वास पण कमी श्वास.
* तोंडाने श्वास- पटकन श्वास व भरपूर श्वास.
व्यक्ती जेव्हा चत्वारवाणीतून बोलण्या-गाण्याच्या रूपात कोणताही आवाज निर्माण करते तेव्हा त्या व्यक्तीने तोंडाने, कंठाने, पोटाने, सहज व लयबद्ध श्वास घेणे महत्त्वाचे आहे. कारण बोलता-गाताना पटकन व भरपूर श्वास घेणे जरुरीचे आहे. आपल्या लेखमालेत श्वासाबद्दल किंवा श्वासोच्छ्श्वास क्रियेबद्दल एवढा ऊहापोह करण्याचे कारण ॐकाराचा उच्चार जेव्हा साधक व्यक्ती चत्वारवाणीतून प्रगट करते त्या वेळेस परमशुद्ध नादचतन्यस्वरूप आवाजनिर्मिती होते. पण ओ नंतर म्कार गुंजन सुरू होते अन् ते सूक्ष्म करत संपवावे लागते. त्या वेळेस तो उच्चार करणाऱ्या साधक व्यक्तीने उच्चार संपल्यावर श्वास घेताना अलगद ओठ विलग करून अल्पतोंड उघडून सहज लयबद्ध श्वास घेणे महत्त्वाचे आहे. पण ती साधक व्यक्ती जर मानस ॐकार नादचतन्य जप करत असेल तर त्या वेळी मात्र साधक व्यक्तीने सहज लयबद्ध नाकानेच श्वास घ्यायचा आहे.
सारांश- चत्वारवाणीतून उमटलेल्या ॐकार साधनेचे वेळी दोन ॐकारामधील श्वास तोंडाने, कंठाने, पोटाने (श्वासपटलाने) सहज, लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून, खालच्या दिशेने घेणे महत्त्वाची गोष्ट आहे. तर ॐकाराच्या मानस जपसाधनेच्या वेळी नाकाने, कंठाने, पोटाने (श्वासपटलाने), सहज लयबद्ध, फुप्फुसाच्या मागच्या भागातून खालच्या दिशेने घेणे महत्त्वाचे आहे, हेच वैद्यकीयदृष्टय़ा  शास्त्रशुद्ध व नसíगक आहे.
पुढील लेखांकात ॐकार साधनेत श्वासपटलाधारित श्वसन क्रियेचे महत्त्व का व कसे आहे याविषयी..
डॉ. जयंत करंदीकर – omomkarom@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा