आपण वैद्यकीयदृष्टय़ा जेव्हा मानवी श्वासोच्छवास क्रियेचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात घेणे जरुरीचे आहे. ती म्हणजे आधी श्वासोच्छवास क्रियेचे स्नायू त्या त्या क्रियेचे वेळी आकुंचन पावतात व त्यानंतर श्वास फुप्फुसात घेतला जातो किंवा बाहेर सोडला जातो. श्वास घेण्याच्या क्रियेचा प्रमुख स्नायू आहे श्वासपटल. या स्नायूला उजवा व डावा असे दोन घुमट आहेत. या श्वासपटलाला वैद्यकीय परिभाषेत डायफ्रम (Diaphragm)  अशी संज्ञा आहे.
 छातीचा िपजरा व पोट यांना विभागणारा हा स्नायू आहे. नसर्गिकरीत्या श्वास घेताना हा स्नायू प्रथम आकुंचन पावतो आणि दोन्ही फुप्फुसांच्या खालच्या रुंद भागात प्राणवायू घेतला जातो. याचप्रमाणे श्वास सोडताना उच्छवासाचे प्रमुख स्नायू म्हणजे छातीच्या िपजऱ्याच्या १०-११-१२ या  फासळ्यामधील स्नायू ज्याला वैद्यकीय परिभाषेत Lower Intercostal muscles  असे संबोधले जाते, ते आकुंचन पावतात व श्वासपटल शिथिल होते व फुप्फुसातील श्वास कर्बद्विप्रणील वायूच्या रूपात बाहेर टाकला जातो. ॐकारसाधनेत श्वासपटलाधारित श्वसन म्हणजेच दोन ॐकारांच्या मध्ये श्वास घेण्याची क्रिया श्वासपटल आकुंचन पावूनच झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत दोन ॐकार उच्चारणातील श्वास खांदे उचलून आणि छातीचा वरचा निमुळता भाग फुगवून अजिबात व्हावयास नको, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचे मुख्य कारण नादचतन्यातून आरोग्यप्राप्तीची क्रिया व्हायची असेल अगर करून घ्यावयाची असेल तर ॐकार उच्चारणातून निर्माण होणारी सर्व स्पंदने खुल्या कंठातच (अनुक्रमे ब्रह्मकंठ, विष्णुकंठ व शिवकंठ) शुद्ध स्वरूपात निर्माण होणे गरजेचे आहे, तरच त्याचे सुपरिणाम दिसतील अन्यथा नाही.    
जेव्हा श्वासपटल आकुंचन पावून श्वास घेण्याची क्रिया केली जाते तेव्हा जिभेमागील जिनीओग्लॉसस व जिनीओहायॉईड हे दोन स्नायू आकुंचन पावतात आणि जिभेला पुढे ढकलतात व त्रिकंठ खुला करतात. त्यामुळे ॐकाराची परमशुद्ध स्पंदने साधकास प्राप्त होतात. म्हणूनच आरोग्यावरील सुपरिणाम दृष्टोत्पत्तीस येतात. तेव्हा श्वासपटल श्वास – आरोग्याला तारक खांदे उचलून श्वास – आरोग्याला मारक हेच सत्य आहे.
सारांश – ज्या ज्या साधकांना ॐकार नादचतन्यातून निरामय आरोग्याकडची वाटचाल करायची आहे त्यांनी छातीचा वरचा निमुळता भाग फुगवून, खांदे उचलून मर्त्य श्वास घेऊ नये. अशा श्वासाला वैद्यकीय परिभाषेत (Clavicular Breathing) अशी संज्ञा आहे. कारण तशा श्वासाने जिभेवर, मानेवर व हृदयावर ताण येतो, जीभ मागे खेचली जाते, कंठ बंद होतो त्यामुळे अपेक्षित परमशुद्ध स्पंदने प्राप्त होत नाहीत आणि श्वासही कमी मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा