पदार्थ गोड असो वा तिखट, काजू घातले की तो शाही बनतो. भरपूर कॅलरीज आणि फॅट असूनही काजू चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात आणि वाईट
कोलेस्टेरॉल कमी करतात. मँगेनीज, पोटॅशियम, कॉपर, झिंक, सेलेनियम अशी अनेक खनिजं, जीवनसत्त्व ब ५, ब ६, ब १ आणि प्रथिनं यांनी समृद्ध अशा काजूला जीवनसत्त्वांची नैसर्गिक गोळी म्हटलं जातं.
काजूची फळं पिवळी, केशरी रंगाची असतात आणि काजू बी मात्र फळाखाली लटकत असते, या फळात भरपूर ‘क’ जीवनसत्त्व असलं तरी त्याची चव आंबट, तुरट आणि घशाला खाज आणणारी असते. रसाचा उपयोग बहुधा मदिरेच्या उत्पादनासाठी केला जातो.
झटपट काजू कतली
साहित्य : ३ वाटय़ा काजूची पावडर, २ वाटय़ा पिठीसाखर, १ वाटी साई न काढलेल्या दुधाची पावडर, अर्धी वाटी दूध, चिमूटभर केशर आणि अर्धा चमचा वेलची पावडर.
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून
२ मिनिटं मायक्रोवेव्ह करावं, मिश्रणाचा मऊ गोळा झाला नसेल तर आणखी ३० सेकंद, २० सेकंद मायक्रोवेव्ह करावं. मध्ये ढवळावं. मिश्रण कोमट झालं की तुपाचा हात लावलेल्या ट्रेवर लाटावं, थोडय़ा वेळाने वडय़ा कापाव्या.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा