समंजस जाणिवेची, परिपक्व आकलनाची, संपन्न विचारांची  भरगच्च मेजवानी २०२१ मध्येही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी, रोहिणी..

ज्येष्ठ कलाकार रोहिणी हट्टंगडी सांगताहेत त्यांच्या अभिनय प्रवासातील बहुविध अनुभव..

गद्धेपंचविशी

विशी ते तिशीचा काळ प्रत्येकाच्याच आयुष्यातला पायाभरणीचा काळ. नामवंतांकडून ऐकू या त्यांचे या काळातले त्यांना यशापयशाचा अर्थ सांगणारे, जगणं शिकवणारे अनुभव – लिहिताहेत, दिलीप प्रभावळकर, मंगला नारळीकर, विक्रम गोखले, पुरुषोत्तम बेर्डे, गजेंद्र अहिरे, सोनाली कुलकर्णी आणि नामवंत..

पुरुष हृदय बाई

पुरुषांना आकळलेला पुरुषत्वाचा अर्थ त्यांच्याच शब्दांत. लिहिताहेत –   राजन खान   बालाजी सुतार   किरण येले   क्षितीज पटवर्धन   गणेश मतकरी   सुनील सुकथनकरआणि नामवंत..

व्यर्थ चिंता नको रे

अस्थिरता, भीती, अस्वस्थता सध्याच्या जगण्याचा भाग झालेली आहे..  त्यावर कशी करावी मात हे  सांगत मनाच्या गाठी उकलताहेत – डॉ. आशीष देशपांडे

सावित्रीचे लेक 

स्त्रीविषयक जाणिवेविषयी सजग होण्यापासून स्त्री-चळवळीत सक्रिय होण्यापर्यंतचा पुरुषांचा वैचारिक प्रवास अनेकांनी  दाखवून दिला तो प्रत्यक्ष कृतीतून. अशाच काही बदलकर्त्यांचे अनुभव – हरीश सदानी

ज्येष्ठांचे लिव्ह इन

विवाहसंस्थेला पर्याय म्हणून अनेकांनी सहजीवनाचा मार्ग स्वीकारला. लग्न न करताही एकत्र राहाण्याचा हा अनुभव स्वत:च्या आणि समाजाच्या जाणीवनेणिवेत कसा स्वीकारला गेला, जातोय हे सांगणारी अनेक जोडप्यांच्या अनुभवांची गोष्ट – सरिता आवाड

स्मृती आख्यान

स्मृती-विस्मृतीचा काळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. मात्र त्याला टोकाच्या विस्मरणाच्या दरीपर्यंत न्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हायला हवं –  डॉ. मंगला जोगळेकर

वसुंधरेच्या लेकी

ग्रेटा थनबर्ग या कु मारवयीन मुलीनं ज्या धाडसाने जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न मांडला त्याच धाडसाने अनेक कु मारवयीन मुली आपापल्या देशात पृथ्वीला सांभाळण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामाविषयी – सिद्धी महाजन

जगणं बदलताना

दोन पिढय़ांतील वैचारिक बदल असो वा बदलत्या जीवनशैलीचा स्वीकार असो. तो अपरिहार्यपणे आपल्या आयुष्यात येतच असतो. माणसांच्या नात्यावर, जगण्याच्या- बोलण्याच्या शैलीवर, त्याचा कसा परिणाम होत गेला त्याविषयी – अपर्णा देशपांडे 

दशकथा

२०२० या वर्षांबरोबर  एक दशकही संपलं. हे दशक विविध क्षेत्रांतल्या स्त्रियांना काय देऊन गेलं,  काय मिळवलं, काय गमावलं या दशकात..  याविषयी.

याशिवाय ‘मनातलं कागदावर’ आणि वाचकांना व्यक्त होण्यासाठी ‘पडसाद’ ही सदरे आहेतच.