मुलांना निवांत वाढू देणं, घराची ओढ राहील अशी वागणूक देणं ही पालकांची जबाबदारी असते, मात्र अनेकदा आपल्याच दोन मुलांमध्ये तुलना करताना ज्या अपशब्दांचा वापर केला जातो, ते शब्द, ती विशेषणंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वप्रतिमेचा भाग बनून त्यांना त्यांच्याच जगण्याचं ओझं करतील, याची जाणीवही पालकांना नसते. अभयच्या बाबतीतही हेच घडत होतं. त्याचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी पाटील काकांनी त्याच्या आईवडिलांचे डोळे एका वाक्याने उघडले…

रात्री अकरा वाजता दारावरची घंटा वाजली, तेव्हा शशांक आणि रोहिणी गाढ झोपेतून जागे झाले. शशांक दार उघडायला गेला आणि रोहिणीसुद्धा पटकन गाऊनवर ओढणी घेऊन बाहेर आली. दारात शेजारचे पाटील काका घरच्या कपड्यातच उभे! शशांकच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काकू अनेक वर्षं अंथरुणावर आहेत आणि तब्येत आताशा जास्तच बिघडली आहे. हे सोसायटीमधील सर्वांना माहीत होते.
‘‘काका?’’ शशांकच्या आवाजात दाट काळजी होती.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
children passport loksatta news
पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
mentally challenged woman , mother,
आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न

हेही वाचा : आहे जगायचं तरीही…

‘‘घाबरू नको. आमच्याकडे सगळं ठीक आहे. अभयच्या बाथरूममधून रडण्याचा आवाज येतो आहे. बराच वेळ झाला. रडणं थांबत नाहीये. तुझी बेडरूम दुसऱ्या बाजूला आहे म्हणून तुला ऐकू आलं नसेल.’’
आता शशांकच्या चेहऱ्यावरच्या काळजीची जागा रागानं घेतली. आणि तो ताडकन आत वळला, ‘‘बघतो जरा अभयकडे.’’ रोहिणीसुद्धा त्याच्या पाठोपाठ गेली. हॉलमध्येच मुलांच्या खोलीचं दार होतं. शशांकने दोनदा दार वाजवलं, ‘‘अभय, दार उघड’’ म्हणून थोडं जोरकस आवाजात सांगितलंसुद्धा पण आतून काही हालचाल झाली नाही.
‘‘कितीदा सांगितलं की, दार आतून बंद करायचं नाही. पण हा नालायक ऐकत नाही.’’
‘‘शशांक, अरे तो बाथरूममध्ये दार बंद करून बसला असेल तर ऐकू जाणार नाही त्याला. तू जरा दम धर. मी माझ्या बाथरूममधून त्याला आवाज देतो. छोट्या घरांचे काही फायदे तर आहेतच की.’’
शशांकचा राग वाढतच होता. ‘‘काका, उगाच तुम्हाला त्रास होतोय. माफ करा. आधीच काकूंच्या तब्येतीची काळजी आणि आता आमचा त्रास.’’
‘‘मला तरी अर्ध्या रात्री मदतीला तुझ्याशिवाय कोण धावून येणार आहे? काळजी करू नको. मी अभयशी तिथून बोलतो.’’
पाटील काका काय बोलले माहीत नाही, पण अभय स्वत: दार उघडून काही वेळानं बाहेर आला. आणि बाबांपासून लांब आईच्या मागे उभा राहिला. अजून त्याचे हुंदके थांबले नव्हते आणि डोळे, नाक ओले आणि लाल झाले होते.
शशांक काही बोलणार तेवढ्यात पाटील काका परत आले. ‘‘मी याला घेऊन जातो माझ्याकडे झोपायला. उद्या नाही तरी रविवार आहे. तुम्ही दोघे नाश्ता करायला आठ-साडेआठपर्यंत या. मी चहा-पोहे बनवून ठेवतो.’’ उत्तराची वाट न बघता ते अभयला हाताला धरून घेऊन गेले. अभयने नजर उचलून आई-बाबांकडे बघितलंसुद्धा नाही. ‘‘आज काकांनी अभयला वाचवलं. मी तर त्याचं थोबाड फोडलं असतं.’’
रोहिणीने फक्त एक धारदार कटाक्ष टाकला. शशांकचा राग आणखीनच उफाळला, ‘‘घाल त्याला पाठीशी. आज शाळेत जो अपमान झाला तो पुरेसा नाही का? सध्या शाळेतून बोलावणी येताहेत. हे असंच चालू राहिलं, तर पुढच्या काही वर्षांत तुरुंगात चिरंजीवांच्या भेटीसाठी जावं लागेल, जेवणाचे डबे घेऊन. विचारून ठेव पाटील काकांना की त्यांचे कोणी ओळखीचे अधिकारी तिथं आहेत का? गरज पडणार आहे म्हणावं आम्हाला.’’

‘‘तू झोपायला येणार आहेस की इथंच रात्रभर शिव्या-शाप देत उभा राहणार आहेस?
दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक आठच्या ठोक्याला दोघेही पाटील काकांकडे पोहोचले. काकांनी टेबल मांडलं होतं. गरमागरम चहा समोर ठेवून काका म्हणाले, ‘‘हा पहिला चहा. पोहे येतीलच. मग दुसरा चहा घेऊ.’’
‘‘काका, तुम्ही अगदी शशांकला ओळखून आहात. दोन कप चहा झाल्याशिवाय याचं इंजिन सुरूच होत नाही.’’
‘‘माणसांत काही तरी तर विक्षिप्तपणा हवा की नको? चहा हा तसा सोपाच विक्षिप्तपणा म्हणायचा. माझे एक साहेब तर तीन सिगरेट ओढून दिवस सुरू करायचे.’’
‘‘दगडापेक्षा वीट मऊ,’’ रोहिणी हसत हसत म्हणाली. आणि शशांकसुद्धा हसला. म्हणाला, ‘‘चला, निदान दगड या जागेवरून आमचं प्रमोशन झालं म्हणायचं.’’
‘‘अभय झोपला आहे अजून. रात्री बराच वेळ बोलत होता. उशीर झाला झोपायला. म्हणून मी उठवलं नाहीये त्याला अजून. हीसुद्धा बारापर्यंत नाही उठत आताशा. दोघेही झोपले आहेत आत.’’
‘‘काय सांगितलं अभयनं? काल आम्हाला शाळेत बोलावून शिव्या पडल्या. तो गेल्या दोन महिन्यांत १५ वेळा शाळेत गेला नव्हता. घरातून वेळेवर निघत होता, पण शाळेत जात नव्हता. आमच्या खोट्या सह्या करून डायरी भरत होता. हे सगळं सांगितलं का त्यानं?’’ शशांकचा आवाज रागानं कापत होता. रोहिणीनं त्याच्या हातावर हात ठेवला.
‘‘काकू जाग्या होतील.’’
‘‘सॉरी काका.’’
‘‘सारखा सॉरी म्हणू नको रे. काका म्हणतोस आणि सॉरी पण म्हणतोस? आणि हो, अभयनं हे सगळं मला सांगितलं. शिवाय शाळा बुडवून तो कुठे जात होता तेसुद्धा सांगितलं.’’
‘‘व्वा. बोलला एकदाचा नालायक. काल शाळेत आणि घरी इतका वेळ त्याला हाच प्रश्न विचारला सगळ्यांनी. पण पट्टीच्या गुन्हेगारासारखा तोंड बंद करून बसला होता. मुळीच दाद दिली नाही त्यानं. मी सांगतो, तुम्हालासुद्धा थाप मारली असेल त्यानं. त्याला खात्री आहे की तुम्ही त्याला वाचवाल. कुठे जातो तो शाळा बुडवून? कोणत्या गुन्हेगारी टोळीचा मेंबर झाला आहे का?’’
‘‘वरती आपल्याच गच्चीवर जाऊन बसत होता. दिवसभर तिथंच थांबायचा. मला वाटतं की तो खरं सांगतोय.’’
‘‘बाप रे. गच्चीवर होता. त्याने काही वेडावाकडा विचार तर केला नाही ना?’’ रोहिणीच्या डोळ्यात पाणी होतं.
‘‘झकास! उद्याोग करायचे आणि वर अशा धमक्या. म्हणजे आता कोणी काही बोलायची सोय नाही. मी पण आता असंच करतो. रोज ऑफिसऐवजी पत्ते खेळायला क्लबमध्ये जातो. कोणी काही बोलायचं नाही मला.’’
‘‘बघा ना काका. हा कसा बोलतो ते. रोज हेच चाललंय घरात. मलाच जीव नकोसा झालाय.’’
‘‘उत्तम. आपण तिघेही एकत्र जीव देऊन टाकू. प्रश्नच संपेल. सायली स्वत:चं बघून घेईल. नाही तरी ती मोठी झाली आहेच.’’

हेही वाचा : आला हिवाळा…

हे सर्व ऐकून पाटील काकांच्या पोटात खड्डा पडला. काकूंच्या दुर्धर आजारपणात असा विचार त्यांच्या मनात अनेकदा आला होता. पण त्यांची परमेश्वरावरची नितांत श्रद्धा अशा कठीण प्रसंगी त्यांना धीर देई.

शशांकच्या कुटुंबाला या संकटातून वाचवणं हे आता आपलं कर्तव्य आहे, असं त्यांना वाटलं. म्हणाले, ‘‘हे बघा. सायली हाच मोठा अडचणीचा विषय आहे.’’

रोहिणीचे डोळे विस्फारले, ‘‘सायलीनं काय केलं? सतत शाळेत पहिली आली. प्रवेश परीक्षेत अव्वल मार्क मिळवून शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात गेलीय. इतक्या दूर हॉस्टेलमध्ये राहून ती मनापासून अभ्यास करतेय. नववीमध्ये गेल्यापासून तिनं मानेवर दगड ठेवून अभ्यास केलाय. म्हणून या वर्षी मेडिकल कॉलेजमध्ये गेली आहे. तिचा काय संबंध? तिची कशी अडचण होऊ शकते?’’

‘‘अभय सायलीच्याच शाळेत जातोय. ती कायमच आदर्श विद्यार्थी होती. सर्व शिक्षक तिची कायम आठवण काढतात. तिचं नाव उदाहरण म्हणून वापरलं जात नाही असा एक आठवडासुद्धा जात नाही,’’ काका चहाचा घोट घ्यायला थांबले.

‘‘अगदी खरंय,’’ रोहिणी म्हणाली, ‘‘काल शाळेत तेच ऐकलं. सायलीचा भाऊ आहे म्हणून फक्त तंबी देऊन सोडून देतो आहे. नाही तर शाळेतून काढून टाकला असता, असं म्हणाले मुख्याध्यापक!’’ शशांक परत बोलता झाला, ‘‘एवढंच नाही. आम्हाला ते म्हणाले की सायलीचा धाकटा भाऊ असा वागत असेल तर पालक म्हणून हा आमचा दोष आहे. आम्ही कमी पडतो आहोत.’’

रोहिणीचा आवाज आणखीनच भरून आला, ‘‘आधी तिची दहावी, आणि नंतर मेडिकलची प्रवेश परीक्षा म्हणून आणखी दोन वर्षं अशी तीन वर्षं अभयकडे लक्ष दिलं गेलं नाही. हिचं एकदा झालं की त्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करता येईल असं वाटलं मला. त्याची पाचवी ते सातवी अशीच गेली.’’

‘‘आणि आता आठवीत आल्यावर तुम्ही दोघांनी त्याची केस हातात घेतलीत. सतत बहिणीचं उदाहरण. घरात तेच आणि शाळेतसुद्धा तेच.’’
‘‘म्हणजे काय? तुम्हीच मागे म्हणाला होतात ना, की सतत सचिन तेंडुलकर आणि अब्दुल कलाम यांसारखी उदाहरणं देऊ नका. मुलांना टेन्शन येतं. आता काय सख्ख्या बहिणीचं उदाहरण पण नाही द्यायचं का?’’ शशांक अजून तापलेला होता.

‘‘सायली त्याच्या समोरच होती ना? तू जे रोज दहा वेळा सांगतो आहे ते त्याला नवीन आहे का? तो शिक्षकांना काही नाही सांगू शकणार, पण स्वत:च्या घरी तरी थोडं समजावून घेण्याची अपेक्षा असेल की नाही?’’ काका म्हणाले.

आता मात्र रोहिणीसुद्धा उचकली, ‘‘काका, कृपया अपमान मानून घेऊ नका. पण जो येतो तो आम्हालाच काही तरी सांगून जातो. आमच्या अपेक्षा अतिरेकी आहेत का? रोज शाळेत जा. नीट अभ्यास कर. खोटं बोलू नको. निदान बरे मार्क मिळव. या सध्या सोप्या गोष्टी नाहीत? एवढी साधी गोष्टसुद्धा जर अभयला जास्त वाटत असेल, तर पालक म्हणून आमचं काही तरी गंडलं आहे.’’

‘‘मी रोहिणीशी सहमत नाही. पालक म्हणून आम्ही काय करू शकतो याचं उदाहरण म्हणून सायली आहे ना. आम्ही काही गंडलेले पालक वगैरे नक्कीच नाही.’’

काका आत जाऊन पोहे घेऊन आले आणि मिश्कीलपणे म्हणाले. ‘‘जरा दोन घास खाऊन घ्या. भरल्या पोटी भांडू या. उपाशीपोटी भांडायला जोर येत नाही.’’

‘‘तुमची विनोदबुद्धी अचाट आहे बुवा. कसं सुचतं तुम्हाला हे बोलायला. माझ्या तर डोक्यात जाळ झालाय नुसता. रोहिणीला विचारा. काल रात्र एक मिनिट झोप लागली नाही. पित्त उफाळून येतंय.’’

काकांचा सूर अगदी शांत आणि स्थिर होता, ‘‘समोर पर्वत असेल आणि चढून जाणं अशक्य असेल तर निदान त्याचं सौंदर्य तर बघू या की. प्रत्येक प्रश्न १०० टक्के सुटला पाहिजे, असं कुठे होतं? हिच्या आजाराने तेवढी एक गोष्ट मला नीट शिकवलीये.’’
एक खोल श्वास घेऊन काकांनी पुन्हा तोच स्वर धरला, ‘‘तुमच्या पालकत्वाचा मी हिशेब लावत नाहीये. तो माझा अधिकारच नाही. तुमच्या मुलाची तुमच्यापेक्षा जास्त मला काळजी आहे असा आवसुद्धा नाही. ‘आमच्या वेळी’ असंसुद्धा सांगत नाहीये, कारण तो वेळ तेव्हाचा होता. आता त्याचा संबंध नाही.’’

‘‘जात्याच कमालीची बुद्धिमान असलेली सायली. स्वभावत:च नीटनेटकी आणि थोडी घाबरट असल्याने खूप शिस्तीत राहिली आणि परीक्षा या विषयात यशस्वी झाली. तिचं भलं होवो. पालक म्हणून तिची बुद्धिमत्ता आणि सालस स्वभाव याचं श्रेय तुम्ही घेऊ नये. विशेषत: शशांकने.’’
‘‘सायली या मोजमापावर संपूर्ण शाळेत एक-दोन मुलंसुद्धा उतरणार नाहीत. त्यामुळे तिच्या धाकट्या भावानं हीच शर्यत जिंकावी ही अपेक्षा मला चुकीची वाटते.’’

हेही वाचा : सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान

‘‘तुमच्या अपेक्षा अगदी रास्त आहेत. मी तुमच्याशी सहमत आहे. पण अभय मनाने मोडतो आहे हे तुम्हाला दिसत नाहीये का? मला कारण माहीत नाही. तो माझा विषय नाही. तुमचा इतक्या वर्षांचा शेजारी म्हणून मी अभयला पाहतो आहे. सायली कॉलेजला गेल्यापासून तो घरात कमालीचा एकटा पडला आहे. तिचा मेडिकल कॉलेजचा अभ्यास इतका जीवघेणा आहे की, तिच्या नवीन जगात फारशी उसंत राहिली नाहीये. इतक्या अपेक्षांचं ओझं तिलासुद्धा जास्त होत आहे, तर ती भावाला कुठे आणि कसा आधार देणार?’’

आता डोळे भरून येण्याची वेळ शशांकची होती, पण पाटील काका थांबले नाहीत, ‘‘तुझे शब्द किती भयानक आहेत याची तुला कल्पना आहे का? सारखं काय तुरुंग, गुन्हेगार, भिकारी आणि गरिबीच्या गप्पा? हे शब्द अभयच्या डोक्यात कायम राहतील आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्व-प्रतिमेचा भाग बनतील याची तुला काळजी नाही का वाटत?’’

‘‘आता तो आठवीत आहे. भरपूर वेळ आहे. मुलगा बुद्धीनं व्यवस्थित आहे. स्वभावानं चांगला आहे. चारचौघांत कसं वावरायचं याचं त्याला उत्तम भान आहे. काही तरी चांगलं होईलच त्याचं. पण मोठेपणी रस्ता सापडण्याची आशा जिवंत ठेवायची असेल तर आताच त्याचं मानसिक खच्चीकरण करणं बंद करावं लागेल.’’

हेही वाचा : स्वभाव-विभाव : अवलंबित्वाचं जग!

‘‘मी म्हणतो, मरो ती प्रसिद्ध शाळा. आपल्या शेजारच्या साध्या शाळेत घाल. तिथं कोणी सायलीबद्दल बोलणार नाही. रोज लवकर घरी येईल आणि माझ्याकडे थांबेल. तो दुपारी फोन आणि टीव्हीसमोर बसणार नाही, याची काळजी मी घेईन. तुम्ही दोघे कामावरून आलात की तुमच्याकडे सुपूर्द करेन. जरा निवांतपणे त्याला वाढू देऊ या. कुटुंबापासून तुटला तर फार महागात पडेल रे. घराची ओढ राहील, असं घर देऊ या त्याला. पुढे काही तरी चांगलं करेल तो. तुमचं उदाहरण आहे ना त्याच्यासमोर.’’
शशांक आणि रोहिणीने इतका पिसासारखा हलकेपणा खूप दिवसांत अनुभवला नव्हता.
chaturang.loksatta@gmail. com

Story img Loader