एखाद्या सामान्य घटनेचा अर्थ चुकीचा आणि स्वत:शी संबंधित लावणे अर्थात ‘संदर्भाचा भ्रम’ निर्माण होणे, वास्तव जगाचा विसर पडणे तसेच विचार करण्याची, जगण्याची विचित्र पद्धत, अशा प्रकारची काही लक्षणे ‘स्किझोटीपल’ या व्यक्तिमत्त्व विकारात आढळतात. या व्यक्तिमत्त्व विकाराचे निदान होण्यासाठी या विकाराची किमान ४५ लक्षणे त्या व्यक्तीमध्ये आढळावी लागतात. कोणती आहेत याची लक्षणे आणि उपाय?

इंटरनेट जेव्हापासून मोबाइलवर उपलब्ध झालं तेव्हापासून आपल्याला सगळ्याच विषयातलं बऱ्यापैकी कळायला लागलं. (निदान आपल्याला तसं वाटायला तरी लागलं.) चांगली छायाचित्रं कशी काढायची, जगभरातले कोणतेही पदार्थ कसे करायचे इथपासून ते शेअर बाजार, आहारशास्त्र, मानसिक आरोग्य इथपर्यंत सगळे विषय छोट्या छोट्या रील्समधून आपण चाखून पाहिलेले असतात. त्यामुळे त्या त्या विषयाची परिभाषा माहिती होते आणि त्यातले जे काही समजायला सोपं आणि थोडं मनोरंजक असतं, त्यावर आपण खूप अधिकारवाणीनं बोलायला लागतो. याच सगळ्या गदारोळात मानसशास्त्रातला ‘स्किझोफ्रेनिया’(Schizophrenia) हा शब्दही सामान्य जनतेच्या खूप ओळखीचा झाला. चित्रपट निर्मात्यांनाही स्किझोफ्रेनियावर आधारित ‘१५ पार्क अवेन्यू’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ हे चित्रपट काढायचा मोह आवरला नाही. ‘स्किझोफ्रेनिया’ हा एक गंभीर मनोविकार आहे. त्याच्याशी मेळ खाणारा, बऱ्याच लक्षणांमध्ये साम्य असणारा ‘स्किझोटीपल’ (STPD – Schizotypal personality disorder) हा एक व्यक्तिमत्त्व विकार आहे. याचाच अर्थ ती लक्षणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

क्लस्टर ‘अ’ मधील विचित्र आणि विक्षिप्त लक्षणांचा समूह असलेले ‘पॅरॉनॉईड’(Paranoid Personality Disorder)आणि ‘स्किझोईड’(Schizoid personality disorder) या व्यतिरिक्त ‘स्किझोटीपल’ हा तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना भ्रम आणि आभास (delusions आणि hallucinations) होत असल्यामुळे त्यांना वास्तव जगाचा विसर पडतो आणि त्यामुळेच त्यांचं वर्गीकरण मनोविकार (psychotic) या प्रकारात केलं जातं. मात्र ‘स्किझोटीपल’च्या रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळून येत नाहीत. विचार आणि वर्तनाच्या विशिष्ट प्रकारामुळे त्यांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. नावात साम्य असल्यामुळे मनोविकार आणि व्यक्तिमत्त्व विकारात गोंधळ होऊ नये म्हणून इथे आपण सुरुवातीलाच हा फरक नीट समजावून घ्यायला हवा.

हेही वाचा : तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?

या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींमध्ये विचित्र वागणं, संवादाच्या विचित्र पद्धती, विचित्र वेशभूषा हे ठळकपणे दिसून येतं. यातलं पहिलं लक्षण ‘संदर्भाचा भ्रम’(ideas of refernce) हे आहे. या व्यक्ती एखाद्या सामान्य घटनेचा चुकीचा अर्थ लावतात आणि तो अर्थ त्यांच्या स्वत:शी संबंधित असतो. उदाहरणार्थ निकिशा, ही २७ वर्षीय तरुणी बँकेत कामाला होती. ती कॅश कॉऊंटरवर बसली की, तिच्यातल्या एका अलौकिक शक्तीमुळे तिथले पैसे कधीच संपत नाहीत, अशी तिची धारणा होती. आणि ती इतकी पक्की होती की, ती ब्रांच मॅनेजरकडे कॅश काऊंटरवर ड्युटी मिळावी म्हणून रोज भांडण करायची.

दुसऱ्या एका प्रकरणामध्ये रियानं एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमान खानला प्रत्यक्ष पहिलं आणि नंतर ती म्हणू लागली की, सलमान तिच्या प्रेमात पडला आहे आणि म्हणून तो कोणाशीच लग्न करत नाही आणि करणारही नाही. या लक्षणामध्ये व्यक्ती स्वत:ला अतिरिक्त महत्त्व आहे, असं समजते. तसेच माझ्यावर सतत कोणीतरी पाळत ठेवली आहे असंही म्हणते. अशा लोकांना रस्त्यावर एखादी पावती सापडली तरी तो विश्वानं दिलेला शुभ संकेत आहे असं वाटतं. रेडिओ किंवा टीव्हीवर एखादी गोष्ट ऐकली तर ती त्यांच्याशी संबंधित आहे किंवा निवेदक त्यांच्याशीच प्रत्यक्ष बोलत आहे, असं सांगतात. हे सगळे वाचताना हे भ्रमच आहेत असं वाटू शकतं पण नाही, इथे घटना प्रत्यक्ष घडत आहेत. फक्त ते त्याचा अर्थ चुकीचा आणि स्वत:शी जोडत आहेत. त्यांच्या या भ्रमामध्ये या धारणा पक्क्या असतात, पण संदर्भाचा अर्थ त्या व्यक्तीला जर व्यवस्थित समजावून सांगितला, तर तो अर्थ काही प्रमाणात बदलू शकतो.

दुसरं लक्षण म्हणजे विक्षिप्त किंवा जादूई गोष्टींवरचा त्यांचा विश्वास. एक प्रकारे अंधविश्वासच असतो तो. या लोकांचा काळी जादू, जादूटोणा या गोष्टींवर गाढ विश्वास असतो. ‘बुराडी सामूहिक आत्महत्या’ प्रकरण आठवा. त्यामध्ये त्यांनी गळफास लावून घ्यायच्या आधी एका कपामध्ये पाणी भरून ठेवलं होतं. त्या पाण्याच्या माध्यमातून देव येऊन त्या सगळ्यांना वाचवणार होता, असा त्यांचा समाज होता. नुसत्या अंधश्रद्धा असल्या, तर वेगळी गोष्ट आहे, पण या जादूई गोष्टींवरचा विश्वास त्यांच्या वर्तनावर, महत्त्वाच्या निर्णयांवर परिणाम करतो. एका रुग्णानं एके ठिकाणी असं वाचलं की, डाळिंब खाल्ल्यानं सगळे आजार बरे होतात. त्यामुळे त्यानं स्वत: तर फक्त डाळिंबं खायला सुरुवात केलीच, पण कुटुंबातल्या इतरांनाही फक्त डाळिंब खायची सक्ती केली. डाळिंब खाणं वाईट नाही, पण फक्त डाळिंबच खात राहाणं किती फायदेशीर असेल? पण असेच विक्षिप्त विचार असतात या व्यक्तींचे. बिल्लू हा एक कामगार. त्याला त्याच्या मुलीला शाळेत घालायचं होतं. तो वेगवेगळ्या शाळा शोधत होता. एक शाळा त्याला आवडली, पण त्याच्या लक्षात आलं की, या शाळेचा गणवेश स्कर्ट आणि शर्ट हा आहे. त्याला तर चुडीदार गणवेश असलेल्या शाळेत मुलीला घालायचं होतं. यावर मुलीच्या सुरक्षेसाठी बिल्लूला चुडीदार हवा असं वाटू शकतं, मात्र स्कर्टमध्ये जास्त डास चावतात, तुलनेनं चुडीदारमध्ये डास चावणार नाहीत, असं त्याचं म्हणणं होतं.
‘स्किझोटीपल’ या व्यक्तिमत्त्व विकारानं ग्रासलेल्या व्यक्तींमध्ये आणखी एक लक्षण आढळून येतं. त्यांची विचार करायची, जगण्याची एक विचित्र पद्धत असते. जी सर्वसामान्यांपेक्षा निश्चितच वेगळी असते. पूर्णपणे अतार्किक म्हणता येणार नाही, पण ती काळाशी आणि समाजाच्या मानदंडांशी सुसंगत नसते हे नक्की.

हेही वाचा : स्वसंरक्षणार्थ…

सुरेश या ३६ वर्षीय व्यक्तीला हाच व्यक्तिमत्त्व विकार होता. तो मुंबईतील एका कंपनीमध्ये काम करत होता. त्यांच्या कार्यालयात वातानुकूलित यंत्रणाही नव्हती. तरीही तो रोज कार्यालयात येताना स्वेटर, कानटोपी घालून यायचा, भर उन्हाळ्यातसुद्धा. मुंबईच्या दमट वातावरणात जिथे कॉटनचा शर्टही नकोसा होतो. तिथं सुरेशचं स्वेटर घालणं विक्षिप्तच होतं. त्याबाबतीत त्याला सहज कोणी छेडलं तर तो अस्वस्थ व्हायचा. कोणीतरी त्याच्याकडचं गुपित चोरत आहे, असं त्याला वाटायला लागायचं. पण तो असं का वागतो हे कधी सांगत नसे. एकंदरीत त्यांचं वागणं संतुलित नसायचं.

एकंदर या ‘क्लस्टर’मधील रुग्णांमध्ये ‘संशय’ हे लक्षण आढळतंच. कुणाल जेव्हा वसतिगृहात राहायचा तेव्हा तो कोणाशीच संपर्क ठेवायचा नाही. त्याला सतत असा संशय यायचा की, इतर विद्यार्थी बोलता-बोलता त्याच्या डोक्यातील परीक्षेला येणारे प्रश्न चोरून नेतील. तो त्यांना नजर वर करून बघायचासुद्धा नाही. त्याच्या खोलीमध्ये त्याच्याबरोबर राहायला कोणीच तयार नसल्यामुळे तो एकटाच राहायचा. त्यानं त्याच्या दारावर एका विचित्र आणि भयावह राक्षसाचं चित्र लावलं होतं. त्याच्या खोलीच्या बाहेर जी लिफ्ट होती, तिच्या आवाजालासुद्धा तो त्या राक्षसाच्या राज्यातील मंत्र आहेत, असं काहीतरी सांगायचा. कुणालसारख्या लोकांचा केवळ बाहेरच्या लोकांवरच नाही, तर त्यांचा संशय स्वत:च्या पालकांवरही असू शकतो.

मागच्या लेखात (१७ ऑगस्ट) आपण ‘स्कोझोईड’मध्ये ‘थंड भावनिक प्रतिसाद’ हे लक्षण पहिलं होतं. या प्रकारात परिस्थितीला योग्य अशी प्रतिक्रिया दिली जात नाही. ‘स्किझोईड’मध्ये अशा व्यक्तींवर काही भावनिक परिणामच होत नाही, पण ‘स्किझोटीपल’ प्रकारात मात्र प्रतिक्रिया दिली जाते, फक्त ती परिस्थितीला साजेशी नसते. प्रतीकचे मामा कर्करोगामुळे वारले. निरोप मिळाल्याबरोबर प्रतीक आईला घेऊन गावी जायला निघाला. रस्त्याने जाताना त्यानं गाडीत पार्टीत वाजविली जाणारी गाणी लावली. स्वत:ही मोठमोठ्यानं गाणी म्हणत होता. आईची मन:स्थिती कशी आहे याचं त्याला भानही नव्हतं. तिथं गेल्यावरही सगळ्या दु:खी वातावरणात तो पाहुणे आले की, मोठमोठ्यानं बोलत त्यांचे स्वागत करत होता. छोट्या मुलांबरोबर हास्यविनोद करत होता. जसं काही घरात काय झालं आहे, याच्याशी त्याला देणंघेणंच नव्हतं.

हेही वाचा : माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

एकतर हे रुग्ण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाहीत. उलट सगळ्यांवर त्यांचा संशय असतो. शिवाय यांचं विचित्र वागणं बघून इतर लोक यांच्याशी मैत्री करायला धजावत नाहीत. अगदी घरातले सदस्य आणि जवळचे नातेवाईक वगळता त्यांचे कोणाशीच संबंध नसतात. ते आपल्याच समज-गैरसमजात, विचारात मग्न असतात. अशा परिस्थितीत त्यांना मित्र किंवा विश्वसनीय व्यक्तींचे संबंध तयार करणं नेहमीच अवघड जातं. आपण कोणत्याही नव्या ठिकाणी गेलो, नवी नाती जोडायला गेलो तर साहजिकच थोडा काळ का होईना, पण आपल्याला ताण येतो. जसजसा काळ पुढे जाईल तसतसा हा ताण निवळतो आणि आपण नवीन ठिकाणी रुळतो. पण या रुग्णांचा तो ताण खूप काळ टिकतो. एक प्रकारची सामाजिक चिंता त्यांना दीर्घकाळ किंवा कायम जाणवत राहते अर्थात त्यामागचे कारणही त्यांना येणारा संशय हेच असते. दोन व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतील, तर त्यांच्यात नातं विकसित होईल, पण इथे कायमचा संशय सामाजिक चिंता तयार करतो.

आता यातली सगळीच्या सगळी लक्षणे कोणत्याच व्यक्तीमध्ये आढळणार नाहीत. या व्यक्तिमत्त्व विकाराचे निदान होण्यासाठी यातली किमान ४-५ लक्षणे त्या व्यक्तीमध्ये आढळावी लागतात. तशीच बरीच लक्षणे ही इतर मनोविकारांमध्ये किंवा व्यक्तिमत्त्व विकारांमध्ये आढळून येतात. त्यामुळे मुळात या विकाराचं निदान करण्याचं काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं. या विकाराच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी ही आहे की, बऱ्याच प्रकरणांमध्ये या विकाराचं नंतर ‘स्किझोफ्रेनिया’मध्ये रूपांतर होऊ शकतं. कित्येकदा या व्यक्तीच्या कौटुंबिक इतिहासातसुद्धा हा विकार आढळून येतो. चांगली बातमी ही आहे की, या विकारात दिसणाऱ्या लक्षणांवर औषधोपचार चांगले काम करू शकतात. तसेच जर रुग्ण मानसशास्त्रज्ञाकडे पोहोचला आणि नियमित थेरपी घेतली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो.

(तळटीप – या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)
trupti. kulshreshtha@gmail.com

Story img Loader