-संकेत पै

अनेक माणसं आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय कुणाला तरी विचारून, सल्ला घेऊनच घेतात. हा सल्ला कुणाचा?… प्रसंगी आईवडिलांचा, वडीलधाऱ्या विश्वासू, आदर्श व्यक्तींचा. पण आपल्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढायला त्यांचा अनुभव पुरा पडतो का?… कधी पडतो, कधी नाही. अशा वेळी काय करावं?… निर्णय घेताना त्यास आणखी तीन तत्त्वांची जोड द्यावी. कोणती आहे ती त्रिसूत्री?

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
chaturang article men struggle
आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा

हल्लीच्या काळात सर्वसाधारणपणे माणसाचं आयुष्य वाढलेलं आहे. आताची तरुण, मध्यमवयीन पिढी ही त्यांचे पालक आणि आजीआजोबांपेक्षा दीर्घायुषी आहे. त्यांची मुलं आणि नातवंडं कदाचित त्यांच्यापेक्षा दीर्घायुषी असतील. ‘जागरूकतेनं जगणं’ या विषयावर बोलताना तर हा मुद्दा प्रकर्षानं लक्षात घ्यायला हवा! माणसाचं दीर्घायू असणं गृहीत धरून योग्य ते नियोजन करण्याची आणि हे आयुष्य अर्थपूर्ण, नवनव्या शक्यतांनी परिपूर्ण असावं, यासाठी प्रयत्न करण्याची ही संधीच मानता येईल.

हेही वाचा…इतिश्री: चुकलं तर चुकलं!

याचा दुसरा अर्थ असाही आहे, की आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवणं, आवडीनिवडी जोपासणं, यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे! म्हणजे जग सोडताना आपण मागे एक संपन्न वारसा निर्माण केला असेल… किंवा निदान तसं अपेक्षित आहे, असं मानायला हरकत नाही.

पण वास्तव काय आहे?… एवढा अधिक वेळ आपल्याकडे असूनही आपण मात्र संघर्षाच्या, काटेकोर जीवनशैलीच्या, ‘टू डू लिस्ट’ पूर्ण करण्याच्या आणि आपलं काम सर्वोत्तम असावं यासाठी शिकस्त करण्याच्या मानसिकतेत अडकून पडलोय. आयुष्याशी आपण जुळवून घेतोय. जगणं कशानं अर्थपूर्ण होईल, याचा विचार करण्यासाठी आपल्याला उसंत नाही. आपण अशा धावपट्टीवर धावतोय, जिथे धावणं कधी संपतच नाही! लिंडा ग्रॅटन आणि अँड्रयू स्कॉटलिखित ‘द हंड्रेड इयर लाइफ’ या पुस्तकातला एक संदर्भ देतो- या लेखकांच्या मते, एका संशोधनानुसार गेल्या दोनशे वर्षांत आपलं आयुर्मान दर दशकामागे अंदाजे दोन वर्षं अशा स्थिर दरानं वाढतंय. म्हणजे आता जर तुम्ही विशीत असाल, तर तुम्ही शंभर वर्षांहून अधिक जगण्याची पन्नास टक्के शक्यता आहे. जर चाळिशीत असाल, तर पंचाण्णव वर्षे वयाचा टप्पा गाठण्याची शक्यता पन्नास टक्के. आणि जर साठीत असाल, तर निदान नव्वदी गाठण्याची शक्यता पन्नास टक्के आहे!

हेही वाचा…लैंगिकता वाढतं आकर्षण आणि गुन्हेगारीही!

मला तर ‘आपण दीर्घायुषी असू,’ हे गृहीत धरून मग आयुष्याचा विचार करण्याची जी मानसिकता असते, ती एक मूल्य म्हणून अंगीकारावीशी वाटते. जीवनात योग्य निर्णय घेताना, योग्य मार्गावरून चालताना ही मानसिकता दिशादर्शकाप्रमाणे मला मदत करते. वाढीव मिळालेल्या आयुष्याला आणखी उत्तम प्रतीचं बनवण्यासाठी काही तत्त्वं अमलात आणणं मला गरजेचं वाटतं.

पहिला मुद्दा- ‘लवचीकता’. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, राहणीमान हे कितीही सुधारलं असलं, तरी आजही आपल्या जीवनातले काही नाजूक निर्णय, आपण सहसा आपल्यासाठी आदर्श असलेल्या व्यक्तींच्या सल्ल्यानुसारच घेतो. या आदर्श व्यक्ती कुणीही असतील- पालक, आजी-आजोबा किंवा आपली आवडती व्यक्तीही असू शकेल. अर्थातच इथे त्यांच्या सल्ल्यास कमी लेखण्याचा हेतू अजिबातच नाही. पण ते सल्ले पुष्कळदा त्यांच्या काळातल्या आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतात. ते आजच्या काळातल्या आपल्या निवडींशी आणि निर्णयांशी सुसंगत असतीलच असं नाही.

हेही वाचा…संवेदनशील भावविश्वाच्या सुरक्षितेसाठी..

मागच्या पिढीतल्या या व्यक्तींपैकी बहुतेकांनी त्यांच्या जीवनात एक सरळसोट मार्ग स्वीकारला होता- म्हणजे शिक्षण, काम आणि निवृत्ती! पण आताचं वाढलेलं आयुर्मान पाहता आपल्यासाठीही हाच पारंपरिक, सरधोपट मार्ग योग्य आहे का? रवींद्रनाथ टागोर म्हणाले आहेत, की ‘तुमच्या मुलांना तुमच्या स्वत:च्या अनुभवांपुरतं सीमित ठेवू नका! कारण त्यांचा जन्म वेगळ्या काळात झाला आहे.’ आपल्यासाठी आदर्श असलेल्या व्यक्तींना त्यांच्या काळात उपलब्ध असलेल्या संधी आणि निवडीचे मार्ग मर्यादित होते. त्या काळात असलेल्या माणसांच्या सर्वसाधारण आयुर्मानाचा विचार करता त्यांना बदलाची गरज आपल्यापेक्षा अल्प प्रमाणात होती.

जितका जीवनकाल मोठा, तितक्या अद्भुत शक्यता आणि संधी आपल्यापुढे उभ्या राहतात. पण हा जादूई बदल घडण्यासाठी आपली मानसिकता मात्र लवचीक हवी! मार्ग बदलणं, निर्णयांचा पुनर्विचार करणं, चुका करणं आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, हे अशा परिस्थितीत स्वागतार्ह आहे. दीर्घायुष्याच्या वरदानाचा अर्थ असा, की या वाढीव कालखंडाच्या रूपानं आपल्या जुन्या सवयी, जुनं वळण बदलण्याची, ठोकळेबाज विचारसरणी मोडीत काढण्याची आणि नव्या संकल्पना, धोरणं प्रायोगिकदृष्ट्या अमलात आणण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दोन दशकं कॉर्पोरेट जगात काम करण्यात घालवल्यानंतर ‘लाइफ कोच’ होण्यासाठीचा मार्ग जेव्हा मी निवडला, तेव्हा लवचीकता या मूल्याचं सामर्थ्य स्वत: अनुभवलं. हा प्रवास अनिश्चिततेनं भरलेला होता, पण लवचीकता आत्मसात केल्यानं या प्रक्रियेत होणाऱ्या बदलांमधून वाट काढत पुढे जाणं सोपं झालं.

हेही वाचा…सांधा बदलताना: जिजीविषा..

दुसरं तत्त्व- संयम! आपण दीर्घ आयुष्य जगत असलो, तरी आजही आपल्याला प्रत्येक गोष्टीचा त्वरित परिणाम दिसायला हवा, अशी घाई असते. पण जागरूकतेनं जगताना, तर संयम अत्यावश्यक! आपण ध्येय तर ठरवतो, पण ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला पुरेसा वेळच देत नाही. आधीच त्याच्या पूर्तीसाठी घाई करू लागतो. बिल गेट्स म्हणतात, ‘Most people overestimate what they can do in one year and underestimate what they can do in ten years.’ अर्थात अनेक जण एका वर्षात साध्य करण्यासाठीचं ध्येय त्यांच्या क्षमतेपेक्षा कैक पटीनं जास्त असं ठरवतात आणि दहा वर्षांत ते जितकं साध्य करू शकतात, त्यापेक्षा त्यांचं ध्येय कैक पटीनं संकुचित असतं. थोडक्यात, प्रश्न अवास्तव ध्येय ठेवण्याचा नसून त्याच्या पूर्ततेसाठी स्वत:ला आवश्यक तो वेळ देण्याचा आहे. मग जर आपल्याकडे एवढा अधिक वेळ आहे, तर घाई कशाला? जरा आपली गती कमी करू या, प्रवासाची मजा घेऊ या!

माझ्या सुरुवातीच्या काळात एका अर्थसल्लागारांशी झालेली चर्चा मला आठवतेय. गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करताना तारुण्यसुलभ उत्सुकतेनं मी झटपट यशाच्या, त्वरित फायदा होईल अशा पर्यायांचा विचार करत होतो. त्यांनी मला म्युच्युअल फंडातल्या ‘एस.आय.पी.’ या संकल्पनेची ओळख करून दिली आणि सुरुवातीला केवळ एक हजार रुपये गुंतवण्याचा सल्ला दिला. मी उत्सुकतेनं विचारलं, ‘किती कालावधीसाठी?’ तेव्हा ते म्हणाले, ‘पंचवीस वर्षांसाठी!’

हेही वाचा…‘एका’ मनात होती..!: ‘तुझ्याच मी माहेरच्या वाटेवरचा दगड!’

सगळ्याचा परिपाक काय, तर प्रदीर्घ आयुष्याच्या देणगीचा उपभोग घेताना त्वरित परिणामांची अपेक्षा थोडी लांबणीवर टाकण्याची, आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंना कल्पक आणि नावीन्यपूर्ण बनवत एकत्र गुंफण्याची जबाबदारी आपण पार पाडायला हवी. मदर तेरेसा सांगतात, ‘जर संयम नसेल तर (क्षमतेपेक्षा) आपण कमी शिकतो, कमी पाहतो, कमी अनुभवतो, कमी ऐकतो… उपरोधिकदृष्ट्या सांगायचं, तर ‘घाई’ आणि ‘जास्त’ या शब्दांचा अर्थ हा नेहमी ‘कमी’ असाच असतो!’

तिसरं आणि शेवटचं तत्त्व म्हणजे शिकण्याची क्षमता. आधीच्या पिढीतल्या अनेकांची सरधोपट विचारसरणी अशी होती, की कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असावं. साहजिकच आपल्या पालकांनी, आपल्या इतर ‘आदर्श’ व्यक्तींनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात निवृत्तीपूर्वीचा बराचसा कालखंड एकाच ठिकाणी काम केलं. आजच्या पिढीच्या व्यावसायिक जीवनात मात्र स्थित्यंतरं फार वेगानं घडताहेत. आणि प्रदीर्घ आयुष्य गृहीत धरलं, तर अशी अनेक स्थित्यंतरं आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. हे बदल केवळ वयावर अवलंबून नसून प्रत्येकाच्या निवडीवर आणि त्या वेळच्या परिस्थितीवरही अवलंबून असतील.

‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’चा अंदाज या मुद्द्याला दुजोरा देतो. भविष्यात तंत्रज्ञानात एवढी क्रांती घडून येईल, की त्यामुळे आपली कार्यपद्धती आमूलाग्र बदलून जाईल. हा झपाट्यानं होणारा विकास पाहता ज्ञान आणि कौशल्यं यात आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागेल. अमेरिकी लेखक अॅल्विन टॉफ्लर म्हणतात, की ‘एकविसाव्या शतकात लिहिता-वाचता न येणारी व्यक्ती अशिक्षित नसून शिकण्याची, शिकलेलं विसरून पुन्हा नव्यानं शिकण्याची क्षमता नसलेली व्यक्ती खरी अशिक्षित ठरेल!’ एखाद्या व्यक्तीनं तिच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरुवातीला आत्मसात केलेली कौशल्यं आणि काही विशिष्ट विषयांत मिळवलेलं प्रावीण्य तिला दीर्घकाळ पुरेल अशी कल्पना करणंही आता अशक्य आहे! कौशल्यं सतत विकसित करत राहणं आणि त्यातही एखाद्या विशिष्ट कौशल्यावर अवलंबून न राहता नवनवीन विषयांत, कौशल्यांत प्रावीण्य मिळवत राहण्याचा प्रयत्न आयुष्यभर करावा लागणार आहे.

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: ‘नो स्मार्टफोन, प्लीज!’

जेव्हा मी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तेव्हा मी वर्गातल्या इतर मुलांपेक्षा सरासरी दहा वर्षांनी मोठा होतो, विवाहितही होतो. एका मुलीचा बाबा होणार होतो! मला तेव्हा जाणवलं, की इथून पुढे आपल्याला शिकणं आणि ज्ञान मिळवणं यासाठी वयोमर्यादा कधीच आडवी येणार नाही. हल्ली जगभर हे दिसून येतं. विचारसरणीत झालेल्या या बदलामुळे संपूर्ण जीवनात हवं तेव्हा आणि शक्य होईल तेव्हा शिक्षणाची, ज्ञानार्जनाची संधी निर्माण होते. नजीकच्या भविष्यात कर्मचारी विविधांगी ज्ञान व कौशल्यं असणारे, अधिक कृतिशील आणि कॉर्पोरेट नोकरीकडे पाहण्याचा जो एक पूर्वापार दृष्टिकोन आहे, त्याच्या पलीकडे जाणारे असतील. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात, तरी शिकण्याची क्षमता अंगी बाणवणं हा सजग जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

हेही वाचा…‘भय’भूती: द गिफ्ट ऑफ फिअर!

अर्थात लवचीकता, संयम आणि शिकण्याची क्षमता या गोष्टी आत्मसात केल्यानं केवळ आपणच अनुभवसंपन्न होत नाही, तर हळूहळू संपूर्ण समाजच एक परिपूर्ण आयुष्य जगण्यास प्रेरित होतो. आता वेळ स्वत:ला एक प्रश्न विचारण्याची- ‘मी अजूनही माझ्या आदर्शांच्या विचारसरणीला अनुसरूनच का वागतोय?’


sanket@sanketpai.com

Story img Loader