डॉ.सविता नायक मोहिते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा कालखंड. याच काळातच तिचं सर्वच स्तरावरचं ‘घडणं’ सुरू असतं. शिक्षण, करिअर या बरोबरीने तारुण्यातील अनेक आव्हानात्मक आणि साहसी कृत्य करण्याचा आणि स्वतच्या कुटुंबासाठीचे निर्णय घेण्याचा, तो अनुभवण्याचा हा काळ असतो. तिच्या सर्वच क्षमतांचा कस लागणाऱ्या या काळातील विविध पैलूंविषयीचे हे सदर दर पंधरा दिवसांनी.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सविता नायक मोहिते गेल्या ३० वर्षांपासून कुटुंब नियोजन, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, स्त्रियांवर होणारे अन्याय, त्यांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्यासाठीचे कार्यक्रम आदी सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात. त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’, ‘विचार भारती’, ‘मृण्मयी’, ‘रुपवाणी’ अशा विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, ‘महिला दक्षता समिती,’ ‘निर्भया विभागासाठी’ त्या समुपदेशक म्हणून काम करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
‘द हाव्या वर्षीच मासिक पाळी आली हो,’ असं चिंतेच्या स्वरात सांगत मुलीला दवाखान्यात घेऊन येणाऱ्या आजच्या आईची काळजी मी समजू शकते. पूर्वी वयाच्या साधारणत: बाराव्या-तेराव्या वर्षी येणाऱ्या मासिक पाळीचे वय आता नवव्या किंवा दहाव्या वर्षापर्यंत अलीकडे येऊ लागलं आहे. या मुलींच्या बाल्यावस्थेतील चेहऱ्यावरचे निरागस भाव शाबूत असतानाच मातृत्व येण्याच्या शक्यतेतला विरोधाभास आजच्या पालकांना अस्वस्थ करणारा असतोच.
लवकर मासिक पाळी येणाऱ्या मुलीचा प्रश्न एका बाजूला तर दुसरीकडे एखाद्या मुलीला १४-१५ वर्षं होऊन गेली तरीही मासिक पाळी आली नाही तर तोही या पालकांच्या जिवाला घोर लावणारा विषय ठरतो, कारण त्याकडे केवळ लग्नासाठी येणारा अडथळा आणि पुढे जाऊन मातृत्वात येणाऱ्या अडचणी एवढ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. त्याचे दुसरे काही वेगळे आयाम असण्याची शक्यता तपासलेच जात नाहीत.
ऋतुप्राप्ती म्हणजे मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया व ती थांबण्याचा काळ म्हणजे ऋतुसमाप्ती. यादरम्यानचा कालावधी खरं म्हणजे मुलींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. जिथे शारीरिक, मानसिक वाढ तर होत असतेच, पण आयुष्यातल्या या महत्त्वाच्या कालावधीमध्ये शिक्षण, करिअर, लग्न, मुलांचा जन्म असे आयुष्यातले सगळेच महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याच काळात रचनात्मक आणि उद्यामशीलतेसाठी लागणारी ऊर्जा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. तरीही कुटुंब आणि समाज या मासिक पाळी येण्याच्या प्रक्रियेकडे स्त्रीचे पूर्णत्व म्हणजे जननक्षमतेची पूर्तता इतक्या दृष्टीनेच बघतो. म्हणूनच आजही भारतातील अनेक राज्यांमध्ये व परदेशातही अनेक ठिकाणी मुलींच्या या मासिक पाळी येण्याची सुरुवात एका उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. (दक्षिण भारतात त्याला ‘हाफ साडी’, ‘चंद्राची पार्टी’ तर ओडिसामध्ये ‘मिथुन संक्रांती’ या नावाने संबोधले जाते.) महाराष्ट्रातही पूर्वी मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तिला हिरव्या रंगाची साडी नेसवून तिची पूजा करण्याची पद्धत होती. अर्थात कालानुरूप बदलणाऱ्या जीवनपद्धतीमुळे या सर्वांमध्ये खूपच बदल घडून आले आहेत. मुलींनी घराच्या चौकटीच्या आत असलेली जागा ओलांडून स्वत:चं विश्व, स्वत:चं अवकाश निर्माण करायला सुरुवात केली आहे. व्यवसायाचे अनेक पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या सर्व प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.
८०च्या दशकात, मी महाविद्यालयात असताना सहाव्या, सातव्या आणि क्वचित प्रसंगी आठव्या बाळंतपणाला आलेल्या स्त्रियांची संख्याही बऱ्यापैकी होती. आता मात्र एखादी स्त्री तिसऱ्यांदा बाळंतपणासाठी नाव नोंदवण्यासाठी आली तरी आश्चर्याने भुवया वरती जातात. स्वत:चे अस्तित्व शोधू पाहणाऱ्या, आजच्या बदलत्या काळातील मुलींच्या विचारसरणीचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर आणि एकूणच सामाजिक रचनेवर झाला नसता तरच आश्चर्य! आज मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा विशीपासून तिशीकडे आणि क्वचित ४० कडेही सरकलेली दिसून येते. मुलगे आणि मुली स्वतंत्रपणे राहण्याचा, लग्नाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काहींनी जाणीवपूर्वक मुलं न होऊ देण्याचा, तर काही जणांनी दत्तक घेण्याचा पर्यायदेखील स्वत:साठी निवडलेला आहे.
कौटुंबिक स्तरावर आणि साहजिकच सामाजिक स्तरावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत आहे. ‘चेंज इज द ओन्ली परमनंट थिंग’. बदल हा निसर्गाचा नियमच आहे, त्याला स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. नदीचं मार्ग बदलत असताना खळखळ करणं स्वाभाविकच आहे. त्या खळखळीचं गोंगाटात रूपांतर न होता त्यातून मधुर संगीत कसं निर्माण होऊ शकेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आजच्या तरुणांच्या विवंचना वेगळ्या आहेत तर आई-वडिलांच्या निराळ्याच. काही दिवसांपूर्वी माझ्या दवाखान्यात आलेल्या एका पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणीचे वय मी चार वेळा विचारून खात्री करून घेतल्याचं आठवतंय. कारण ती एका दुर्गम ग्रामीण भागातून आली होती. तिचं वय ३८ होतं आणि ती अविवाहित होती. बोलण्याच्या ओघात लक्षात आलं, ही तरुणी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे योग्य, मनासारखा जोडीदार मिळाल्याशिवाय फक्त वय झालं म्हणून लग्न करणार नाही, या निर्णयाला तिच्या आई-वडिलांचा पाठिंबा आहे. पण शेजारी आणि इतर नातेवाईक ही स्वत:ला समजते कोण? हिला नेमका कसा मुलगा पाहिजे? असे प्रश्न विचारून सतत टोचणी देत राहतात आणि त्याचा तिच्या मानसिकतेवर आणि त्याचा शरीरावर परिणाम दिसण्यास सुरुवात झाली होती.
इंटरनेट, समाज माध्यमं, या सर्वांमुळे जग घरात आलं आणि त्यामुळे नवीन पिढीच्या आशाआकांक्षा आणि स्वप्नंदेखील बदलली आहेत. या सर्व गोष्टींशी जुळवून घेताना मानसिक आंदोलने नक्कीच होत असणार. वयात येताना म्हणजेच ऋतुप्राप्ती आणि त्यानंतर ऋतुसमाप्तीच्या दरम्यान ही मानसिक आंदोलने अधिक तीव्र होतात, ती कशी यामागची कारणमीमांसा समजून घेणं गरजेचं आहे. मला आठवतंय, हॉस्पिटलमध्ये एकदा एक विधवा आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलीला घेऊन तपासायला आली होती. मुलगी अशक्त आहे, नीट जेवण जेवत नाही अशा तिच्या तक्रारी होत्या. मुलीचे वडील तिच्या लहानपणीच वारल्यानंतर आत्तापर्यंत किती जपलं आहे, हे देखील सांगत होती. तपासणीनंतर लक्षात आलं दोघींना शारीरिक व्याधी नव्हत्याच. मग दोघींनाही पाळी येण्याच्या आधीची मानसिकता आणि त्यामुळे होणाऱ्या PMS (प्री मेन्स्ट्युल सिंड्रोम) या अवस्थेबद्दल समजून सांगितलं आणि आईला मासिक पाळी जाण्याच्या ‘पेरी मेनोपॉझल’ अवस्थेत होणाऱ्या मानसिक बदलांची जाणीव करून दिली. दोघींना एकमेकांबद्दल असलेली अनुकंपा, त्यात होणारे गैरसमज याची उकल करून दाखवली आणि जुजबी शारीरिक काही कमतरता होती त्यासाठी औषधं लिहून दिली. त्या परत गेल्या त्याच खूप खूप धन्यवाद देऊन. काही गैरसमज दूर केले आणि त्यांच्या नात्यातील गुंता उकलायला मदत झाली. अशी एखादी घटना तो दिवस सार्थकी लावून जातो, समाधान देऊन जातो.
पारंपरिकता आणि आधुनिकता याची सांगड घालणं क्रमप्राप्त आहे. त्यात उलथापालथ होणारच. पण ती समजून घेणं अतिशय मनोरंजक, गमतीचं आणि उद्बोधकदेखील आहे. एकीकडे ऑफिसला जाताना, शाळेत जाताना सगळी माणसं एकत्र वावरतो, उठतो, बसतो, प्रवास करतो पण घरी आल्यानंतर अजूनही काही ठिकाणी मासिकपाळीत मुलींना बाजूला बसवण्याची प्रक्रिया चालूच आहे. याला काय म्हणावं? एका नातेवाईकांच्या मुलीने तिच्या आईला विचारल्याचं आठवतंय, ‘अगं आई, कोपऱ्यात बसून याला हात लावू नको त्याला हात लावू नको म्हणतेस, पण आपण एकाच फरशीवर बसलोय ना?’ त्याचं तिच्या आईजवळ काहीच उत्तर नव्हतं.
जशी मासिक पाळी येताना लहान मुलींची मानसिक आंदोलने, त्याची कारणे बदलली आहेत तसेच ऋतुसमाप्तीच्या वेळेस, प्रौढ वयाच्या स्त्रियांचेसुद्धा प्रश्न, समस्या आणि जीवनशैली बदलत आहे. वाढणारी आयुर्मर्यादा, उपलब्ध असलेले सगळे वैद्याकीय उपचार यामुळे पूर्वीसारखं ४०-४५ च्या वयामध्ये सगळं झालं करून आता नातवंडे सांभाळत उरलेलं आयुष्य व्यतीत करायचं ही मानसिकता कधीच मागे पडली आहे. आता नव्यानं आयुष्य जगण्याची ऊर्मी, स्वत:साठी कधीतरी जगून बघावं ही इच्छा आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न, धडपड हे नक्कीच पुढे येत आहेत.
पूर्वी दहा वर्षांचं अंतर म्हणजे दोन पिढीतील फरक ज्याला जनरेशन गॅप म्हटलं जात असे. ते अंतर आता चार-पाच वर्षांवरच आलेलं जाणवतं. एकाच घरातील दोन भावंडांमधल्या विचारसरणीमध्येदेखील फरक दिसून येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनामुळे जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलींच्या, स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गोष्टींवर होत आहे हे ओघाने आलंच. वाढणारे पीसीओडीचे प्रमाण, वंध्यत्व, उशिरा होणारे लग्न व मातृत्व, सरोगसी, लवकर होणारी ऋतुप्राप्ती आणि ऋतुसमाप्ती या सगळ्या गोष्टींचा वेगळ्या अंगाने तपास करणं, ते समजून घेणं आणि त्याला स्वीकारणं याला पर्याय नाही. जुन्या पिढीचा सतत कानावर पडणारा संवाद म्हणजे, ‘आमची पिढी ही ‘सँडविच’ पिढी आहे. आई वडील, सासू-सासऱ्यांचंही ऐकलं आणि आता मुलाबाळांचंही ऐकावं लागत आहे,’ तर दुसरीकडे नववधूंना त्यांच्या नवऱ्यांच्या अपेक्षा समजावून घेणं कठीणजातंय आणि नवऱ्यांना त्याच्याशी तडजोड करणं अवघड जातंय. नव्याचा जुन्याशी मेळ, पारंपरिक आणि आधुनिक याचे संतुलन साधणे हे इथून पुढे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याला पर्याय नाही.
म्हणूनच ‘ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती’ या अगदी महत्त्वाच्या काळाकडे वेगळ्या दृष्टीनं बघणं, वेगळ्या चष्म्यातून बघणं महत्त्वाचं ठरत आहे. त्यासाठीच जाणून घेऊ या कालावधीमधील स्थित्यंतरं, त्याचे होणारे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम. हे सगळं जास्तीत जास्त आनंदानं आणि माहिती करून घेऊन सजगतेनं स्वीकारणं शक्य झालं तर हा आयुष्याचा महत्त्वाचा कालावधी आपल्याला जास्त निर्मितीक्षम करून आनंदानं व्यतीत करता येईल.
इथून पुढे चालू होणारा या सदराचा प्रवास आपण एकत्र करायचा आहे. तुमच्या प्रतिक्रिया, शंका, मनात असलेले प्रश्न विचारायला विसरू नका. त्यामुळे तुमच्या स्वत:च्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त उजेड टाकण्याचा प्रयत्न करता येईल. हा सर्व प्रवास ‘फुलप्रूफ’ असेल असा दावा नाही. पण काही अंधारे कोपरे उजळण्याचा प्रयत्न, रस्त्यातील जळमटे, काटे दूर करून हा प्रवास आपल्यासाठी सहज सोपा व्हावा एवढीच अपेक्षा.
savitamohiterbk@gmail.com