Bible tells you how much god loves you हेलेन केलर हिला थोडे समजू लागल्यावर, तिला सांभाळणाऱ्या सुलीवनबाईंनी तिच्या हातात एक दिवस बायबल ठेवले. हेलेनने ग्रंथावरून हात फिरविला, त्या क्षणाला तिच्या अंतर्मनाला एक दिलासा मिळाला. लहानपणीच अंधत्व आलेले, त्यातच वाणी अबोल झालेली, बहिरेपणही आलेल्या हेलेनला फार निराशा आली होती. तिची मदतनीस सुलीवनबाई तिला जिवापाड सांभाळत असे.
हेलेन लहान असताना, तिला भेटायला रोज बिशप ब्रूक्स येत असत. तिला बायबलमधील चांगले विचार सुलीवनबाईमार्फत सांगत असत. लहान हेलेनला त्या वेळी कळत नसे, पण ती जशी मोठी होऊ लागली तसा ती त्यावर विचार करू लागली.
हेलेन म्हणते, ‘बायबलमुळे मला खोल समाधान मिळाले, आपल्याभोवती असणाऱ्या साऱ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत, या जगात आणखी काही अदृश्य आहे, जे शाश्वत आहे, हे बायबलमधून समजले.’ एक दिवस, तिने बिशपना विचारले, ‘‘जगात एवढे धर्म का?’’
त्यावर बिशप म्हणाले, ‘‘हेलेन, खरं सांगतो, या जगात फक्त एकच विश्वधर्म आहे तो प्रेमाचा. तू तुझ्या आत्म्याने व मनाने ईश्वरावर व त्याच्या लेकरांवर प्रेम कर.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘ईश्वराचे पितृवात्सल्य व मानवातील बंधुभाव, हेच प्रत्येक धर्माचे मूळ आहे.’’
बिशपच्या व हेलेनच्या या संवादांनंतर, हेलेन अधिक आवडीने बायबल वाचू लागली. तिला बायबलने मनाचे सामथ्र्य दिले. पाहता पाहता आपल्या पंगुत्वावर मात करून, हेलेनने विद्यापीठातही शिक्षण घेतले. हेलेन या डॉ. हेलेन झाल्या. १९४३ च्या दुसऱ्या महायुद्धात अंध झालेल्या, बहिऱ्या झालेल्या रुग्णांची सेवा करू लागल्या. एक थोर समाजसेविका म्हणून त्यांना अनेक सन्मान मिळाले. ‘स्टोरी ऑफ माय लाइफ’ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्या म्हणतात-
When one door of happiness closes, another opens, but often we look at closed door and we do not see the one which has been opened for us.
अंध, बहिऱ्या, मुक्या म्हणून त्यांची कोणी कीव केली तर त्यांना आवडत नसे. त्या स्वत: कधीही निराशा दाखवत नसत. याबद्दल त्या म्हणतात-
Self pity is our worst enemy, and if we yield to it, we can never do anything good in world स्वत:ची कीव कधीही करू नका. बायबलमधील ईश्वराच्या अस्तित्वाच्या वचनांनी हेलेन यांना मनोधैर्य दिले.
शेवटी, ज्याने चोच दिली त्याने दाणापाण्याची व्यवस्था केली आहे, हे ध्यानात घेतलं, तर किती तरी काळज्या, विवंचना दूर होतील नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com