‘तोषोनी मज द्यावे पसायदान हे..’ संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना पसायदान आजदेखील आपल्या मनाला ऊर्जा देते. आपल्या जीवनात प्रार्थनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद, प्रार्थना हा मनाचा आधार आहे. असे म्हणतात, सात दिवस प्रार्थनेशिवाय राहिले तर मन दुर्बल होते म्हणजे मनाचा आत्मविश्वास कमी होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगशास्त्राप्रमाणे प्रार्थनेमुळे शरीरातील सहा चक्रांना ऊर्जा मिळते. नियमित प्रार्थनेने विचारात फरक पडतो, चिंता काळजी कमी होते. ईश्वरावरील श्रद्धा वाढत जाते. Bible says, preyar is road to heaven but faith opens the door. प्रार्थनेचा चमत्कार अगदी अलीकडे एका डॉक्टरने सांगितला, ईश्वरावर आणि प्रार्थनेवर प्रचंड विश्वास असलेले एक दाम्पत्य बडोद्याला डॉ. मेहता यांच्याकडे आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन आले. या मुलीला जन्मल्यापासून हृदयविकार होता. हा विकार वाढत चालला होता. मुलगी फार काळ जगणार नाही, शस्त्रक्रिया केली तर जगण्याची आशा आहे. परंतु शस्त्रक्रिया अवघड आहे. कदाचित शस्त्रक्रियेमध्ये मुलीचा मृत्यू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर पुढे अनेक वर्षे ती उत्तम जीवन जगेल याची कल्पना डॉक्टरांनी दिली. १ जानेवारी २००९ रोजी शस्त्रक्रिया करायचे ठरले. या आधी एक आठवडा मुलीची आई व ती मुलगी ईश्वराची प्रार्थना करत होत्या. आपल्या हृदयात देव आहे, तो तुला बरे करणार असा आई तिला दिलासा देत असे. ऑपरेशन टेबलवर मुलगी घाबरली नाही. उलट डॉक्टरांना म्हणाली, ‘‘माझे हृदय तुम्ही उघडले तर देव कसा दिसतो ते मला सांगा हं.. आई म्हणते, तो मला बरे करणार..’’ हे ऐकून डॉक्टर गंभीर झाले. शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, हृदयातले अडथळे दूर करताना एकाएकी हृदय बंद पडले. डॉक्टर हताश झाले. डॉक्टरांना मुलीचे शब्द आठवत होते. मुलीचा आणि आईचा देवावर विश्वास होता, आईला काय सांगायचे या विचारात असताना त्यांनी सहज पुन्हा निराशेने मुलीकडे पाहिले. काय आश्चर्य.. पुन्हा हृदयाने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. आपल्या हाताखालील डॉक्टरांना डॉ. मेहतांनी हाक मारली. मुलीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने विचारले, ‘‘हृदयात देव कसा दिसला?’’ डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळले. ते म्हणाले, ‘‘बेटा, देव पाहिला नाही पण तुझ्या प्रार्थनेने अनुभवला, I treat He cures.ll

– माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com 

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effect of prayer