योगी अरविंदांच्या आश्रमात योगसाधनेचा ध्यास घेतलेल्या मीरा रिचर्ड पाँडेचरीच्या आश्रमाच्या आधारस्तंभ होत्या. फ्रान्समध्ये जन्माला आलेल्या मीरा अलेसो विवाहानंतर मीरा रिचर्ड झाल्या. एका अनामिक ओढीने हिंदुस्तानात आल्या, लहानपणापासून त्यांना ईश्वरभेटीची उत्सुकता होती. त्या दहा-बारा वर्षांच्या असताना त्यांना एक स्वप्न पुन:पुन्हा पडत असे. त्यांचा घेरदार फ्रॉक उलगडलेल्या छत्रीसारखा दिसे. या छत्रीखाली सर्व जग सुरक्षित आहे असे दिसत असे. त्यांचे पती ज्या वेळी भारतात आले त्या वेळी योगायोगाने त्यांची पाँडेचरी येथे योगी अरविंद यांच्याशी भेट झाली. आपल्या पत्नीला ईश्वरभेटीसाठी हे योग्य मार्गदर्शन करतील, याबद्दल त्यांची खात्री पटल्यानंतर ते मीरा यांना पाँडेचरीला घेऊन आले. जीवनात आयुष्य कसे वळण घेते हे कोणालाच समजत नाही. अरविंद घोष कोलकत्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील. इंग्लंडला जाऊन आय.सी.एस. झालेले. भारतात आल्यावर सशस्त्र क्रांतीत भाग घेतल्याबद्दल माणिक टोला प्रकरणात त्यांना अलिपूरच्या तुरुंगात ठेवले होते. इथे योगाभ्यास करता करता ते पारमार्थिक जीवनाकडे वळले. साधकांसाठी अनेक ग्रंथ लिहिले. मीरा रिचर्ड यांनी योगी अरविंदांना आपले गुरू केले. अल्पावधीत मीरा यांनी साधनेत खूप प्रगती केली. त्यांना सर्व माताजी म्हणू लागले. आनंदी प्रसन्न मनच ईश्वरभेट घेईल हे त्या सांगत. त्या म्हणत, The best way to express ones gratitude to Divine, is to feel simply Happy ईश्वराकडे कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर नेहमी आनंदात राहा. आपल्यातील आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर पाँडेचरीला योगी अरविंदांच्या समाधीसमोर फक्त दोन मिनिटे डोळे मिटले तर या आनंदाच्या लहरींचा अनुभव येतो. असा अनेकांचा अनुभव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधवी कवीश्वर – madhavi.kavishwar1@gmail.com

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira richard life