अमोल उदगीरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लक बाय चान्स’चं वेगळेपण म्हणजे हा सिनेमा फिल्म इंडस्ट्रीकडे एका स्त्रीच्या नजरेतून बघतो. तो जितका मुख्य स्त्री पात्रांबद्दल बोलतो, तितकाच शिक्षण क्षेत्रातल्या, पत्रकारितेमधल्या, कॉर्पोरेटमधल्या, व्यावसायिक स्त्रियांबद्दलही बोलतो. सोना मिश्राचं पात्र एका वेगळय़ा उंचीवर नेणाऱ्या कोंकणा सेन-शर्मासाठी आणि दिग्दर्शिका झोया अख्तरसाठी हा चित्रपट पाहायला हवा.

‘लक बाय चान्स’ चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच एक फार मार्मिक प्रसंग आहे. एका अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण देणारा एक शिक्षक समोर बसलेल्या मुलामुलींना अभिनयाचे धडे देत असतो. बॉलीवूडमध्ये अभिनेता बनणं किती अवघड असतं, हे समजावून सांगताना तो म्हणतो, ‘‘हॉलीवूड फिल्ममध्ये हिरो बनणं खूप सोपं असतं, पण बॉलीवूडचा हिरो बनणं खूप अवघड असतं. बॉलीवूडचा हिरो फक्त अभिनय करत नाही. तर तो गाणं गातो, डान्स करतो, कॉमेडी करतो, अ‍ॅक्शन करतो. बॉलीवूडचा हिरो बनायला तुमच्याकडे खूप काही असावं लागतं.’’ हे सगळं सांगून झाल्यावर समोर बसलेली एक विद्यार्थिनी विचारते, ‘‘आणि बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी काय लागतं, सर?’’ यावर तो शिक्षक चपापतो, गोंधळात पडतो आणि वेळ मारून नेण्यासाठी उत्तर देतो, ‘‘हो, त्यालाही बऱ्यापैकी मेहनत लागते खरं तर.’’ आणि दुसऱ्या विषयाकडे वळतो.

बॉलीवूड कितीही पुढारलेपणाच्या, समानतेच्या टिमक्या वाजवत असलं तरी ही इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे. इथं बहुतांश चित्रपटांच्या कथा हिरोला मध्यवर्ती ठेवून लिहिल्या जातात. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरोची छबी सगळय़ांना झाकोळून टाकणारी असते आणि नायिका कुठंतरी कोपऱ्यात असते. नायक आणि नायिका यांना मिळणाऱ्या मानधनाच्या आकडय़ात प्रचंड तफावत असते. नायकाच्या आयुष्यातल्या संघर्षांचे नंतर सोहळे केले जातात आणि नायिकांनी केलेल्या संघर्षांची कुठं नोंदही ठेवली जात नाही. ‘लक बाय चान्स’चं वेगळेपण म्हणजे हा चित्रपट सिनेसृष्टीकडे एका स्त्रीच्या नजरेतून बघतो.
‘लक बाय चान्स’ हा सिनेसृष्टीबद्दल बोलणारा चित्रपट आहे. तसे चित्रपट तुलनेने फार कमी बनले आहेत. लगेच आठवणारे काही चित्रपट म्हणजे ‘गुड्डी’, ‘डर्टी पिक्चर’, ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं. हे चित्रपट सिनेक्षेत्राचा वापर फक्त कथानकाच्या सोयीसाठी न करता या क्षेत्रावर एक गंभीर भाष्य करतात. चित्रपटांवरचे चित्रपट अनेकदा सिनेक्षेत्र ही कशी काळोखी जागा आहे आणि इथं काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कशा शोकांतिका घडतात हे दाखवण्याच्या सापळय़ात अडकतात. ‘लक बाय चान्स’ या सापळय़ात अडकण्याचं नाकारतो. तो सिनेक्षेत्रातले अंधारे कोपरे तर दाखवतोच, पण या क्षेत्रात काम करण्याची झिंग, सुंदर अनिश्चितताही दाखवतो.

चित्रपटात नशीब काढण्यासाठी मुंबईत दाखल झालेले दोन स्ट्रगलर्स विक्रम जयसिंग (फरहान अख्तर) आणि सोना मिश्रा (कोंकणा सेन शर्मा) योगायोगाने एकमेकांना भेटतात. एकमेकांना आधार देत पुढं जाण्याचा धीर देताना एकमेकांच्या जवळ येतात. एका उद्ध्वस्त होण्याच्या क्षणी विक्रम ‘मौके मिलते नही है, सोना. बनाये जाते है,’ असं सोनाला कवेत घेऊन सांगतो आणि हे नातं सोनासाठी खूप महत्त्वाचं होऊन जातं.मित्राकडून झालेल्या अपमानामुळे आणि सततच्या अपयशी संघर्षांमुळे विक्रम उन्मळून पडतो तेव्हा सोना त्याला आधार देते. विक्रम आणि सोना दोघंही स्ट्रगलर असले तरी त्यांच्यात बाकी साम्य तसं काही नाही. विक्रम दिल्लीच्या सुखवस्तू घरातून आलेला. मुंबईतही राहण्याची आलिशान व्यवस्था असणारा. त्याच्यात आत्मविश्वास आणि त्यातून आलेला काहीसा उद्धटपणा आहे. याउलट सोना मिश्रा. आग्य्रासारख्या निमशहरी भागातून अभिनयात नशीब आजमावण्यासाठी घरातून पळून आलेली ‘अकाऊंटंट मिश्राजीची’ मुलगी. चित्रपटात काम करणं म्हणजे अतिशय वाईट गोष्ट, असं मानणाऱ्या परिवाराने आपल्या या मुलीला आता वाळीत टाकलेलं आहे. आपण अभिनय बरा करत असलो तरी ‘पारंपरिक बॉलीवूड नायिकांच्या’ साच्यात बसत नाही याची दुखरी जाणीव तिला आहे. विक्रमप्रमाणे इतर आर्थिक स्रोत तिला नसल्याने ‘बी ग्रेड’ चित्रपटातल्या नायिकांच्या भूमिका, मोठय़ा चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका तिला स्वीकाराव्या लागतात. त्यातच योगायोगाने मोठा ब्रेक मिळालेला विक्रम आणि आहे तिथंच राहिलेली सोना यांच्या नात्यात दरी पडायला लागते.

‘लक बाय चान्स’ हा चित्रपट विक्रम जयसिंग आणि पर्यायाने फरहान अख्तरभोवती फिरतो अशी समजूत पहिल्यांदा हा चित्रपट बघितल्यावर होण्याची शक्यता आहे. विक्रमच्या पात्रात हिरोच्या आयुष्यात येतात असे चढउतार आहेत आणि त्याला आयुष्यात हवं ते सगळं मिळतही जातंय. वर्षांनुवर्ष पलायनवाद विकणाऱ्या बॉलीवूडने ‘हॅपी एंडिंग’ म्हणजेच खराखुरा शेवट असं आपल्याला शिकवलं आहे, पण खरंच ‘हॅपी एंडिंग’ कुणाची आहे ‘लक बाय चान्स’ मध्ये? सर्व काही मिळूनही एकटय़ा पडलेल्या विक्रमची की काही तडजोडी करून, पण स्वाभिमान जपून आनंदी राहणाऱ्या सोनाची?
चित्रपटाचा ओपिनग शॉट सोना या पात्राची ओळख करून देणारा आहे. सुरुवातीची काही मिनिटं सोनाच्या पात्राला ‘एस्टॅब्लिश’ करण्यासाठी वापरलेली आहेत. सोना मिश्राच्या पात्राबद्दल काही प्रसंगांमुळे प्रेक्षकांना आपलेपणा वाटायला लागतो. वर्षांनुवर्ष मध्यवर्ती भूमिकेचं आश्वासन देऊन आपलं शोषण करणारा निर्माता आता आपल्या आश्वासनापासून दूर पळतोय हे लक्षात आल्यावर सोनाचा बांध फुटतो, हा प्रसंग चित्रपटाच्या ‘हायलाइट्स’पैकी एक आहे. हा प्रसंग ‘मेलोड्रॅमॅटिक’ होण्याच्या अनेक शक्यता असताना कोंकणाने आपल्या अभिनयाने तो तसा होऊ दिला नाही. चित्रपटातलं विक्रमचं पात्र बऱ्यापैकी एकमितीय आहे, पण सोनाच्या पात्राला अनेक स्तर आहेत. कोंकणाने आपल्या समर्थ अभिनयाचे पुरावे चित्रपटभर विखरून ठेवले आहेत. तिच्या अभिनयाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. निक्की वालिया या पात्रासोबतचा प्रसंग असो, विक्रमसोबतचा हॉटेल लॉबीमधला प्रसंग असो, गॉसिप मॅगझिनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्या रिपोर्टर मित्राला बडवण्याचा प्रसंग असो कोंकणाने स्क्रीन अक्षरश: व्यापून, झपाटून टाकली आहे, पण सोना मिश्राचं पात्र एका वेगळय़ा उंचीवर जातं ते शेवटच्या दहा मिनिटांत. चित्रपटा‘क्लायमॅक्स’ बघताना अनेकांना जाणवतं, की आपण पडद्यावर जे जग बघत होतो ते सोना मिश्राचं जग आहे. विक्रम तर फक्त या जगातलं आणखी एक पात्र आहे. चित्रपटाची सुरुवात सोनापासूनच होते आणि शेवटही सोनाच्या अप्रतिम मोनोलॉगने आणि तिच्या एकटीवर रोखलेल्या कॅमेऱ्याने होते.

आयुष्याच्या एका टप्प्यावर सोनाला आता कुणाहीबद्दल राग नाहीये, असूया नाहीये. विक्रमकडेही तो असाच स्वार्थी असणार आहे, असं गृहीत धरून सहानुभूतीने बघण्याची प्रगल्भता आहे. थोडक्यात, विक्रमच्याच शब्दात सांगायचं तर, ती आता ‘content’ आहे आयुष्यात.कोंकणाने तिच्या करियरमध्ये अनेक उत्तम भूमिका केल्या आहेत आणि आता दिग्दर्शक म्हणूनही ती मैदान गाजवत आहे. परंतु एका पिढीसाठी तिने केलेली ‘वेक अप सिड’मधली आयेशा बॅनर्जी आणि ‘लक बाय चान्स’मधली सोना मिश्रा खूप खास आहेत. दोन्ही चित्रपटात तिच्यासोबत असलेली मुख्य पुरुष पात्र ‘मॅन चाईल्ड’ आहेत हा योगायोग असेल का ?

‘लक बाय चान्स’मधली इतर स्त्री पात्रंही फार रोचक आहेत. डिंपल कपाडियाने नीना वालिया या एका जुन्या काळातल्या अभिनेत्रीचं पात्र रंगवलं आहे. नीना वालिया आता स्वत:च्या मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्यासाठी झपाटून गेली आहे. आपल्याला जे यश मिळालं नाही ते यश आपल्या मुलांमध्ये शोधणाऱ्या पिढीची नीना ही प्रतिनिधी आहे. तिच्या मनाचा एक भाग अजूनही तिच्या रम्य भूतकाळातच रमलेला आहे. या अतिशय स्वयंकेंद्रित नीनाच्या कडक निगराणीखाली तिची अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू करणारी मुलगी घुसमटली आहे. ती आपल्या स्वार्थी आईविरुद्ध बंडखोरी करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा नीना चवताळते. तिच्या उद्रेकातून तिचा एक कटू भूतकाळ समोर आल्यावर तिच्याबद्दल सहानुभूतीची एक लकेर मनात उमटून जातेच. अशीच दुसरी व्यक्ती म्हणजे शिबा चढ्ढा. वर्षांनुवर्ष शिबा छोटय़ा मोठय़ा भूमिकांमध्ये जीव ओतून परफॉर्मन्स देत आली आहे. यातलं शिबानं केलेलं पिंकीचं पात्र भूमिकेच्या लांबीच्या दृष्टीने लहान असलं तरी चित्रपटाच्या कथानकात उत्प्रेरकाची भूमिका बजावतं. आपल्या मोठय़ा बहिणीच्या (जुही चावला) स्टेट्ससमोर आणि श्रीमंतीसमोर ती झाकोळली गेली आहे. निर्माता म्हणून जम बसवण्यासाठी धडपड करणारा तिचा नवराही तिला कायम गृहीत धरत असतो. अशी ही स्वत:चा आवाज नसणारी आणि दबून राहणारी पिंकी चित्रपटाच्या कथानकाला तिच्याही नकळत कलाटणी देते. तिच्या एका कृतीमुळे या पात्रांच्या आयुष्यात तीनशे साठ अंशात बदल होतात आणि चित्रपटाला एक वेगळं वळण मिळतं. आपल्या एका कृतीमुळे एवढी उलथापालथ झाल्याचं जेव्हा पिंकीला कळतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक निव्र्याज हसू येतं. पिंकीचं पात्र या स्वार्थी जगातल्या स्वार्थी लोकांपेक्षा अनेक अर्थाने वेगळं आहे. एका ओल्ड स्कूल प्रोडय़ुसरच्या (ऋषी कपूर) बायकोच्या भूमिकेत जुही चावलाही आहे. एका कचकडय़ाच्या जगात राहून तशीच दिखाऊ आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करणारी ‘लाऊड’ पम्मी जुही चावलाने तिच्यात उपजतच असणाऱ्या विनोदाच्या टायिमगच्या जोरावर केलीये, पण टेचात. त्याशिवाय स्वत:चं डोकं वापरण्यास नकार देणारी आणि अभिनयात ‘ढ’ असणारी निक्की (हल्लीचे स्टार किड्स बघितले की हीच आठवते), सोनाची मैत्रीण असणारी कोरियोग्राफर, गॉसिप विकणाऱ्या मॅगझिनची संपादक अशी पात्रे चित्रपटात रंग भरतात.

‘लक बाय चान्स’ हा झोया अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. पण तो बनण्यामागचा संघर्षही त्यातल्या कथानकाइतकाच रोचक आहे. झोयाचा हा चित्रपट बरीच वर्ष रखडला होता. या चित्रपटात सोनाचं पात्र मध्यवर्ती आहे आणि विक्रमच्या पात्राला नकारात्मक छटा आहेत, याची जाणीव अभिनेत्यांना स्क्रिप्ट नॅरेशनमध्येच व्हायची आणि अभिनेते या भूमिकेसाठी नकार देत. सोना मिश्राच्या भूमिकेसाठी करीना कपूरची निवड झाली होती, पण नंतर तिनेही या रखडलेल्या चित्रपटातून अंग काढून घेतलं. जावेद अख्तरसारखा दिग्गज बाप, हनी इराणीसारखी तालेवार आई आणि फरहानसारखा यशस्वी भाऊ असूनही झोयाचा संघर्ष काही चुकला नाही, पण झोयाने चिकाटीने चित्रपट पूर्ण केला. विक्रमची भूमिका करण्यासाठी अखेर फरहानलाच पुढं यायला लागलं. फरहाननं कोंकणा सेन शर्मासमोर काहीशी दुय्य्म भूमिका घेण्याची तयारी दाखवणं हे वाखाण्यासारखं होतं. झोयाने कथानकामध्ये काही तडजोडी केल्या असत्या आणि विक्रमला नायक बनवलं असतं तर कदाचित एखादा मोठा स्टार चित्रपटात आला असता आणि तो लवकरही तयार झाला असता, पण झोयाने कुठलीही तडजोड करणं नाकारलं. झोयाचं स्वत: स्त्री असणं हे इथं महत्त्वाचं ठरलं असेल. हा चित्रपट सोना मिश्रापासून सुरू होईल आणि सोना मिश्रापाशीच थांबेल ही झोयाची जिद्द होती. तिने ती पूर्ण केली.

चित्रपटाचे ‘ओपिनग क्रेडिट्स’ आणि ‘एन्ड क्रेडिट्स’ हा रोचक, तितकाच दुर्लक्षित विषय आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना हे क्रेडिट्स बघण्यात फारसा रस नसतो, पण प्रेक्षकांनी आवर्जून हे क्रेडिट्स बघायला हवेत. ‘लक बाय चान्स’च्या ओपिनग क्रेडिट्सला ‘ये जिंदगी भी’ हे अप्रतिम गाणं पार्श्वभूमीला वाजतं. ‘ओपिनग क्रेडिट्स’मध्ये चित्रपटासाठी योगदान देणाऱ्या सगळय़ांची, नेहमी जे दुर्लक्षित असतात त्यांची नोंद घेतली आहे. चित्रपटात काम करणारे एक्स्ट्राज, कोरसमध्ये गाणारे गायक, कॅमेरा युनिटमध्ये काम करणारे लोक, ‘साऊंड’मध्ये काम करणारे लोक, तिकीटखिडकीवर बसून तिकीट विकणारे लोक, पोस्टर तयार करणारे लोक आणि आणखी किती तरी. चित्रपट निर्मितीमध्ये सामील असणाऱ्या दुर्लक्षित लोकांना दिग्दर्शिका झोया अख्तरने दिलेला हा ‘होमेज’. त्याचं गाण्यात एक फार अस्वस्थ करणारं व्हिज्युअल आहे. परीच्या भरजरी पांढऱ्या कपडय़ांमध्ये एक सुंदर मुलगी सिनेमाच्या सेटवर दिसते. पुढच्याच शॉटमध्ये ती सेटवरच्याच अतिशय अस्वच्छ स्वच्छतागृहात शिरताना दिसते.

‘लक बाय चान्स’ हा चित्रपट क्षेत्रातल्या स्त्रियांवर बोलत असला तरी तो जितका सोना मिश्रा किंवा परीच्या वेशभूषेतल्या मुलीबद्दल बोलतो तितकाच अप्रत्यक्षपणे का होईना शिक्षण क्षेत्रातल्या, पत्रकारितेमधल्या, कॉर्पोरेटमधल्या, व्यावसायिक स्त्रियांबद्दलही बोलतो.
झोया अख्तरचं हे सगळय़ात मोठं यश.

amoludgirkar@gmail.com