कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी बनवतात. भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषत: दक्षिणेकडील-बंगळुरू, उटी, म्हैसूर, केरळ या राज्यांमध्ये होते. डोंगरउतारावर रांगेत कॉफीच्या वृक्षांची लागवड केली जाते.
कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्याची पावडर करतात व कॉफी हे पेय तयार करतात. या बिया भाजल्यानंतर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा सुगंध निर्माण होतो. कॉफी या पेयात कॅफिन (१.२ टक्के), टॅनिक अॅसिड (५.८ टक्के), कलॉल या नावाचे उडनशील तलद्रव्य असते. या तलद्रव्यामुळे कॉफीला उत्तम सुगंध येतो. अनेक वेळा चिकोरी नावाचे द्रव्य कॉफीमध्ये मिसळतात. त्यामुळे कॉफीला वेगळा स्वाद निर्माण होतो. बरेच लोक अशी मिश्र स्वरूपाची कॉफी पिणे पसंत करतात. कॉफीच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्या सर्वामध्ये नेसकॉफी ही सर्वात उत्तम आहे, असे समजतात. ही कॉफी बनविताना कुंबाडिया, चिंचोके व कासुंदराच्या बियांचे चूर्ण मिसळतात. काही लोक अभिमानाने सांगतात की, आम्ही चहा पीत नाही, फक्तकॉफी पितो. परंतु चहा आणि कॉफीचे दुष्परिणाम जवळजवळ सारखेच आहेत. चहा व कॉफीमध्ये स्वत:चे अशी पोषणमूल्ये जवळजवळ नाहीत. त्यामुळे अति कॉफी घेऊ नये.
गुणधर्म –
हिवाळा ऋतूमध्ये खूप थंडी पडल्यास किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून जर कधी प्रवास करण्याची वेळ आली, तर थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी क्वचित कधी तरी अर्धा कप कॉफी पिणे ठीक आहे. कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन स्फूर्ती येते. सुस्ती व आळस कमी होऊन मेंदूला चालना मिळते, मज्जासंस्थेला उत्तेजना मिळते.
दुष्परिणाम –
पर्यायी पदार्थ –
काही लोक चहापेक्षा कॉफी पिणे प्रतिष्ठेचे मानतात. मात्र हा केवळ एक समज आहे. चहा व कॉफी ही दोन्ही पेये टाळून उत्साह निर्माण होण्यासाठी नसíगक आरोग्यपूर्ण पेय प्यावे.
कृती- ७-८ तुळशीची पाने, ४-५ पुदिना पाने, अर्धा इंच आले, अर्धा चमचा आवळा पावडर, २ चमचे लाल गूळ व दीड कप पाणी हे सर्व मिश्रण एक कप पाणी होईपर्यंत उकळावे व नंतर हे पेय गाळून प्यावे. ही सर्व घटकद्रव्ये नसíगक असल्यामुळे त्यांच्यामधील पोषण मूल्यद्रव्य (अँटीऑक्सिडंट) भरपूर प्रमाणात शरीरास मिळतात व त्यामुळे नक्कीच आरोग्य सुधारते. त्याचबरोबर हळद, ओवा, शतावरी कल्प टाकून दूध पिणे हेही आरोग्यास उत्तम आहे.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com
आहारवेद – कॉफी
कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी बनवतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-02-2015 at 03:09 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coffee