निरंजन मेढेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्त्रियांच्या बाबतीत ‘सेक्शुअल सेल्फ प्लेजर’ अर्थात स्वत:च स्वत:ला लैंगिक समाधान देणं, हा एक अळीमिळी गुपचिळीवाला विषय. स्त्रीला लैंगिक सुखासाठी पुरुषावरच अवलंबून राहावं लागतं, हा गैरसमज दृढ असल्याने ते न मिळाल्यास अनेक स्त्रिया लैंगिक सुखापासून दूर राहातात आणि त्याचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम भोगत राहातात. त्यावर एकच उपाय म्हणजे, हस्तमैथुन.

आनंदी राहणं, सुखाची-समाधानाची आशा करणं ही मनुष्याची अगदी सहज प्रेरणा असली तरी काही सुखांची अनुभूती मिळवणं हे आपल्या समाजात आजही गैर मानलं जातं. ‘सेक्शुअल सेल्फ प्लेजर’ अर्थात स्वत:च स्वत:ला लैंगिक समाधान देणं हा असाच एक अळीमिळी गुपचिळीवाला विषय. त्यातही लग्न झाल्यावर जोडीदारानं स्व-सुखाचा विचार करणं हा विषय तर आपण जणू काही कायमसाठी ऑप्शनला टाकून दिलाय. वैवाहिक कामजीवनातील समस्या, लैंगिक अनुभूती प्राप्तीतील (orgasm) अडथळे तसंच वेगवेगळय़ा कारणांनी एकटं-एकाकी राहाणाऱ्या स्त्री-पुरुषांचं प्रमाण वाढत असताना सेल्फ प्लेजरला चिकटलेला अपराधगंड काढला तर जगणं खरंच आनंददायी होऊ शकेल का, हे जाणून घेणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.

वैवाहिक जीवनातील हस्तमैथुनाचं महत्त्व अधोरेखित करताना इचलकरंजीस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. मंदार देशपांडे सांगतात,‘‘नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात समागमाची भीती वाटत असते. अशा वेळी एकमेकांचं हस्तमैथुन केल्यानं ( mutual masturbation) शारीरिक जवळीक निर्माण होऊ शकते. या क्रियेमुळे जोडीदाराच्या जननेंद्रियांची नीट ओळख होऊन शरीररचनेविषयी अज्ञान असेल तर ते दूर होते. अनेकदा सेक्स थेरपीचा भाग म्हणूनही डॉक्टरांकडून जोडप्यांना परस्परांचे हस्तमैथुन करण्यास सुचवले जाते. याचं प्रमुख कारण म्हणजे काही वेळा पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणा एकाला समागमातून ‘ऑरगॅझम’ मिळत नाही. अशा वेळी हस्तमैथुन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. असं करण्यात काहीही गैर नाही हे समजून घ्यायला हवे. लग्नानंतर केवळ जोडीदारासोबतच सेक्स करावा आणि हस्तमैथुन हद्दपार करून टाकावे, असा कुठलाही नियम नाही.’’

हस्तमैथुनाचा विचार करता या शब्दाचं प्रयोजन केवळ पुरुषांसाठीच आहे असा बहुतेकांचा समज असतो. कारण स्त्रिया ते करतात, करू शकतात याची पुरुषांनाच नाही तर अनेकदा स्त्रियांनाही माहिती नसते.स्त्रीला लैंगिक सुखासाठी पुरुषावर अवलंबून राहावं लागतं, हा समज दृढ असल्यानं पुरुषालाही त्याचं दडपण येऊन मग त्याची परिणती शीघ्रपतनासारख्या व्याधीत होण्याची शक्यता असते. हायमन, ज्युलिया आर., लोपिकोलो आणि लेसली लो लिखित Becoming Orgasmic: A sexual and personal growth programme for women या पुस्तकात अधोरेखित करण्यात आलंय, की १९६० पूर्वी स्त्रियांच्या लैंगिकतेत ऑरगॅझमला फार महत्त्वाचं स्थान नव्हतं. तसेच स्त्रियांच्या लैंगिक सुखात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या योनीच्या वरच्या भागातील शिश्निकेचा (clitoris)उल्लेख १९८० च्या अखेपर्यंत बहुतांश आरोग्य पुस्तकांमध्ये टाळण्यात येत असे. शालेय अभ्यासक्रमातील लैंगिकता- विषयक शिक्षणातील पुस्तकांमध्येही योनीचा उल्लेख असला तरी शिश्निकाबाबत गुपितच ठेवण्यात येत असे. दुसरीकडे ‘कॉस्मोपॉलिटन’ या अमेरिकी नियतकालिकानं २०१५ मध्ये१८ ते ४० वयोगटातील २३०० स्त्रियांचं ‘ऑरगॅझम’विषयक सर्वेक्षण केलं. यातून असं दिसून आलं, की केवळ ५७ टक्के स्त्रियांना समागमातून समाधान मिळतं. हेच प्रमाण पुरुषांमध्ये ९५ टक्के आहे. अनेक स्त्रियांसाठी कामक्रीडेतून समाधान मिळवण्यासाठी फोर प्ले आणि शिश्निकेचं उद्दीपन आवश्यक ठरतं. पण शिश्निका म्हणजे काय आणि ती नेमकी कुठे असते याविषयी अज्ञान असणाऱ्यांचं प्रमाण मोठं असल्याचं यात आवर्जून नमूद करण्यात आलंय.

नागपूरमधील ‘सेक्सॉलॉजिस्ट’ आणि ‘काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहुड इंटरनॅशनल’ या संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे सांगतात, ‘‘भारतात सुख (pleasure) हा विषयच एकूण दुर्लक्षित आहे. आपल्या संस्कृतीला सुख मान्य नाही. याउलट पाश्चात्य संस्कृती ही सुखाभिमुख आहे. लैंगिक स्व-सुखाला दुय्यम लेखण्यामागे किंवा त्याचा विचारच न करण्यामागे हे कारण असावे असे वाटते. वास्तविक ‘कामसूत्र’ हा ग्रंथ तसेच खजुराहोसह अनेक मंदिरांवरील शिल्पकला या माध्यमातून लैंगिकतेचा सहज स्वीकार करणारीदेखील भारतीय संस्कृतीच आहे.’’

लैंगिक सुखाकडे बघण्याच्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असतो हा मुद्दा उलगडताना डॉ. संजय सांगतात, ‘‘बहुतेक स्त्रिया लैंगिकदृष्टय़ा अंतर्मुखी असतात. कारण लैंगिक इच्छांची (sexual desire)आस धरणं सामाजिकदृष्टय़ा गैर मानलं जातं. त्यामुळे लैंगिक स्व-सुखाच्या इच्छा स्त्रियांकडून व्यक्त होत नाहीत. परिणामी त्या कृतीत परावर्तितही होत नाही. यामुळे बऱ्याच स्त्रियांना लैंगिक स्व-सुखाची गरजही जाणवत नाही. या सगळय़ामुळे स्त्रियांमध्ये हस्तमैथुनाचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येतं. स्त्रियांमध्ये लैंगिकतेचा संबंध गर्भधारणेशी असल्यानं सेक्स ही जबाबदारी समजली जाते. याउलट पुरुष हा सेक्सविषयी बहिर्मुखी असतो. तो याचा अधिक विचार करतो. हस्तमैथुनाबद्दल कितीही अपराधगंड असला तरी तो ते करतो.’’

‘देहभान’ हे सदर सुरू झाल्यापासून येणाऱ्या वाचकांच्या इ-मेल्समध्येही हस्तमैथुनानं ‘ग्रस्त’ झालेल्या तरुणांचं प्रमाण लक्षणीय आहे. हस्तमैथुनाच्या सवयीमुळे सेक्स पॉवर कमी होतेय, लिंग आखूड होतंय, लग्नानंतर मी पत्नीला सुख देऊ शकेन का, अशा काल्पनिक भीतीनं धास्तावलेले हे तरुण आहेत. कुमारवयातील हस्तमैथुनाचा ‘गिल्ट’ इतका मोठा असतो, की बऱ्याचदा केवळ मनाची तशी पक्की समजूत केल्याने लग्नानंतर शीघ्रपतन किंवा लैंगिक ताठरतेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हस्तमैथुनासंदर्भातल्या गैरसमजांची व्याप्ती लक्षात घेत डॉ. विठ्ठल प्रभू यांनी ‘प्रश्नोत्तरी कामजीवन’ या त्यांच्या पुस्तकात हस्तमैथुनाविषयक प्रश्नांसाठी एक स्वतंत्र प्रकरण दिलं आहे. यात ते नमूद करतात, ‘‘हस्तमैथुन ही नैसर्गिक प्रवृत्ती असते. संभोगाला एक पर्याय असतो. हस्तमैथुनाची ‘सवय’ लागत नाही. विवाहानंतर हस्तमैथुनाचे प्रमाण कमी होते. किती वेळा हस्तमैथुन करायचे हे स्वयंचलित चेतासंस्था ठरवते. भूक, तहान, झोप यावर निसर्ग नियंत्रण ठेवतो, तसे हस्तमैथुनावर निसर्गाचे नियंत्रण असते. हस्तमैथुनाने अपाय होत नाही, पण हस्तमैथुनासंबंधी भीती, पापाची भावना यामुळे मात्र नुकसान होते. ‘हस्तमैथुनामुळे मुरमे येतात, पाठ दुखते, क्षयरोग होतो, डोळे अधू होतात, थकवा येतो, शिश्न वाकडे होते, शैथिल्य/ नपुंसकत्व येते, वीर्य पातळ होते किंवा संपते’ या सर्व गैरसमजुती आहेत. हस्तमैथुन हा कामविकासाचा एक नैसर्गिक टप्पा आहे असं सिद्ध झाले आहे.’’

आपल्याकडे उपचारांसाठी आलेल्या एका जोडप्याचं उदाहरण देताना डॉ. मंदार सांगतात, ‘‘पती नोकरीनिमित्त हैदराबादला होता तर त्याची पत्नी महाराष्ट्रात. त्यामुळे त्यांची महिन्यातून जेमतेम एकदा भेट व्हायची. इतक्या दिवसांनी भेटल्याने समागमाची ओढ असायची. पण या लाँग डिस्टन्स नात्यात पतीला शीघ्रपतनाची समस्या भेडसावू लागली. यावर उपाय म्हणून समागमाच्या काही वेळ आधी हस्तमैथुन करण्याचा सल्ला त्यांना दिला. हस्तमैथुनाचा उपाय तीव्र लैंगिक इच्छा (Hyper sexuality) असलेल्या व्यक्तींनाही उपयुक्त ठरू शकतो. लग्नाला ठरावीक काळ लोटल्यावर आठवडय़ातून दोन ते तीन वेळा समागम करणं नॉर्मल गणलं जातं. पण यापेक्षाही अधिक वेळा सेक्स करावासा वाटत असल्यास जोडीदारावर बळजबरी करण्यापेक्षा हस्तमैथुन केल्यास लैंगिक भावनांचा निचराही होऊन नात्यात विनाकारण ताण निर्माण होत नाही.’’

ठरावीक परिस्थितीत जोडीदार लैंगिकदृष्टय़ा अक्षम असला तर हस्तमैथुनाचा समावेश करत नात्यातील ‘चार्म’ कायम ठेवता येऊ शकतो, हे विशद करताना डॉ. मंदार सांगतात, ‘‘स्त्रियांच्या बाबतीत गर्भारपणाचा काळ मोठा असतो. या काळात डॉक्टरांनी काही कारणानं समागम न करण्याचा सल्ला दिल्यास प्रणयात हस्तमैथुनाचा समावेश करता येतो. याशिवाय अपघातामुळे शारीरिक दुखापत झाली किंवा हात-पाय मोडल्याने शारीरिक हालचालींवर मर्यादा आली तरीही स्व-सुखाचा मार्ग अवलंबता येतो. थोडक्यात, कोणत्याही कारणाने जोडीदार सोबत नसेल किंवा समागम करण्यास सिद्ध नसेल तर विवाहबाह्य संबंधांसारख्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा हस्तमैथुन करणे केव्हाही सुरक्षित ठरते.’’

स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीमार्ग कोरडा होण्याची समस्या भेडसावू शकते. या वेळी तसेच पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी करण्यामध्ये हस्तमैथुन महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे हस्तमैथुनाकडे स्त्रियांनी पूर्वग्रह बाजूला ठेवत स्वच्छ दृष्टीने बघण्याची गरज आहे, असे स्त्रीरोगतज्ज्ञ हेमलता यांनी नमूद केले. तर आपल्याकडे आलेल्या एका केसचं उदाहरण देताना डॉ. संजय सांगतात, ‘‘या स्त्रीला समागमातून ‘ऑरगॅझम’ची अनुभूती मिळत नव्हती. यावर तिला शिश्निकेच्या उद्दीपनातून हे सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. पण लग्नानंतर हस्तमैथुन करण्यास ती फार उत्सुक नव्हती. वास्तविक कामतृप्ती ही दर वेळी प्रत्यक्ष समागमातूनच मिळायला पाहिजे, असा अट्टहास असू नये. सेक्सकडे कामगिरी म्हणून बघण्यापेक्षा कामक्रीडा म्हणून बघायला हवं. तसंच प्रत्येक रोमान्सचा समारोप समागमातच व्हायला हवा हा आग्रह नसावा. संभोग या शब्दाचा अर्थ सम-भोग म्हणजेच दोघांनाही समान आनंद मिळावा हा आहे. मग हा आनंद प्रत्यक्ष समागमातून मिळवायचा
की एकमेकांच्या हस्तमैथुनातून हा प्रत्येक जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.’’

‘वल्र्ड असोसिएशन ऑफ सेक्शुअल हेल्थ’ या जागतिक संस्थेतर्फे ४ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक लैंगिकता आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी या दिवसाची संकल्पना ‘Let’s talk pleasure’ अशी होती. लैंगिक सुखाविषयीचे गैरसमज दूर करण्यावर यामध्ये भर देण्यात आला.जननेंद्रिय शरीराचे अविभाज्य भाग असून, त्यांची रचना-कार्य जाणून घेत लैंगिक गरजांचं जबाबदारीनं शमन करण्याचा प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहे, हे समजून घेणं खरोखर गरजेचं आहे. अन्यथा एकीकडे कृत्रिम प्राज्ञेच्या आणि झपाटय़ानं बदलत्या जगाच्या चर्चा करताना शारीर पातळीवर मात्र समाज म्हणून आपण अजूनही काही दशकं मागे असण्याचा धोका संभवतो. लैंगिक स्व-सुखाकडे मोकळय़ा, निकोप दृष्टीने बघण्याची म्हणूनच नितांत गरज आहे.

niranjan@soundsgreat.in