मुलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट का करतात याचा विचार अनेकदा त्यांच्या जागी जाऊन करायला हवा, पालकांच्या लक्षात येतंच असं नाही. त्या हट्टांमागे आपल्याच विविध ‘शक्यतांच्या भीती’ची लेबलं लावत मुलांना गप्प केलं जातं. अशा वेळी मुलं शांत होण्याऐवजी बिथरतात. पण हिमानीने ‘कूल मॉमगिरी’ करत तिच्याच नव्हे तर दुसऱ्या मुलांनाही आपलंसं केलं.

एका साड्यांच्या प्रदर्शनात राधिका आणि हिमानी अचानक भेटल्या. राधिकाचा निशांत आणि हिमानीची भूमी पाचवीत एका वर्गात होते. त्यामुळे अर्थातच ‘मुलं’ या लाडक्या विषयावर बोलत दोघी जवळच्या कॉफी शॉपमध्ये शिरल्या. राधिका म्हणाली,

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड

‘‘हल्ली निशांत फार उद्धटपणे वागतो, उलट उत्तरं देतो. काल मला ‘कटकटी मॉम’ म्हणाला. ‘मी कटकटी वाटते, तर बिन-कटकटी मॉम कोण आहे?’ असं विचारल्यावर म्हणाला, ‘भूमीची आई बघ. ती आहे कूल मॉम.’ तेव्हापासून तुला फोन करायच्या विचारात होते, तर योगायोगाने भेटलीसच. मला सांग ना, भूमी नाही का उद्धटपणे वागत? तुमच्यात नाही वाद होत?’’ हिमानीला हसायला आलं.

‘‘मुलांशी वाद होत नाहीत असं कसं होईल? पूर्वी आमचे खूपच वाद व्हायचे, पण मध्यंतरी दोन प्रसंग असे घडले की भूमीच्या उद्धटपणाकडे, रागाकडे मी वेगळ्या नजरेने बघायला लागले. तिच्या वागण्याची कारणं समजायला लागली तशी दोघींचीही चिडचिड कमी झाली. बोलणं नीट व्हायला लागलं, मग दोस्ती वाढली.’’

‘‘ मला सांग ना ते प्रसंग.’’ राधिकाला राहावेना.

‘‘मध्यंतरी माझी एक मोठी शस्त्रक्रिया झाली, हे तर तुला माहितीच आहे राधिका. तेव्हा ते बँडेज, ड्रेसिंग पाहून सुरुवातीचे काही दिवस भूमी घाबरलेली असायची, लांब लांब राहायची. मी रुग्णालयातून घरी आल्यावर भीती कमी होऊन जवळ यायला लागली, पण अशक्तपणामुळे मीही झोपलेली असायचे, शिवाय भेटायला बरेच पाहुणेही यायचे. त्यामुळे भूमीशी पूर्वीसारख्या गप्पा होत नव्हत्या. तिच्या धसमुसळेपणामुळे जखमेला धक्का लागेल अशी सर्वांना भीती वाटायची. त्यामुळे ती माझ्या जवळ जवळ करायला लागली की, ‘आईला त्रास देऊ नको’ असं कोणीतरी सांगायचं. ती हिरमुसली व्हायची. ‘सगळे पाहुणे मी शाळेतून आल्यावर, नाहीतर शनिवार-रविवारी येतात. मला तुझ्याशी कुणी बोलूच देत नाही,’ म्हणून रुसायची. ‘अगं, थोडेच दिवस राणी, लोक आपुलकीनं भेटायला येतात, त्यांच्यावर कशी रागावतेस?’’ अशी मी समजूत घालायचे.

आणखी वाचा-आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’

‘‘एके दिवशी ती शाळेतून आली, शाळेत काहीतरी बिनसलं असणार, ते तिला मला सांगायचं होतं. पाहुणे आलेले असल्यामुळे तिला माझ्याजवळ बसता आलं नाही. त्यात तिला बाबा रागावला आणि फालतू कारणावरून ती त्याच्याशी जोरजोराने भांडायला लागली. पाहुण्यांसमोर उलट उत्तरं, तमाशा नको म्हणून आजोबांनी आवाज चढवला तर ही भडकलीच. त्यांना उलटून बोलली. मग काय, तुंबळ युद्ध. एकाच वेळी सगळे मोठे तिला रागवायला लागले. मी हतबल होऊन नुसतीच बघत होते. भूमी तोंडाला येईल ते बोलत सुटली होती. मला तिचा उद्धटपणा, आकांडतांडव अजिबात आवडलं नव्हतं. तरीही, तिच्या काहीही बोलत सुटण्याचं मला नवल वाटलं. लहान असल्यापासून भूमी कधीच निरर्थक वाद घालत नाही. भांडली तरी मुद्द्यांनीच भांडते हे मला माहितीय, त्यामुळे मी तिच्याकडे निरखून पाहिलं, तर तावातावाने भांडतानाही, तिच्या डोळ्यांत मला रागाऐवजी एक असहाय्य वेदना दिसली. ती इतकी तीव्र होती, की काही कळायच्या आत, मी उठून तिला पटकन जवळ घेतलं. फक्त थोपटत राहिले. तीही मला घट्ट बिलगली आणि शांत झाली. जसं काही तिला तेवढंच हवं होतं. विशेष म्हणजे, राधिका, इतक्या दिवसांनी ती बिलगल्यावर मलाही खूप बरं वाटलं. हरवलेलं सापडल्यासारखं वाटलं गं.’’ हिमानी म्हणाली. मन लावून ऐकणाऱ्या राधिकाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. ती म्हणाली,

‘‘अगदी डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग, ते पिल्लू किती दिवस ‘मिस’ करत असेल तुला.’’

‘‘हो ना. सगळ्यांना फक्त तिचं उद्धट वागणं दिसत होतं. पण गंमत अशी की ‘ओरडू नकोस’ हेदेखील सगळे मोठे तिला ओरडूनच सांगत होते.’’

‘‘खरंच गं. माझ्याकडूनही घडतं असं. लक्षात नव्हतं आलं कधी.’’

‘‘हो ना. आपल्या मोठ्यांच्या वागण्यात अशा भरपूर विसंगती असतात पण मुलांकडून मात्र आपण ‘आदर्श’ वागण्याची अपेक्षा करतो. त्या दिवशी इतकी भडकलेली असताना, जवळ घेतल्या बरोबर तिचं एका क्षणात शांत होणं हा अनपेक्षित वेगळा अनुभव होता. शिवाय आजारपणामुळे माझ्याकडे निवांत वेळही होता. त्यामुळे मी त्यावर नव्यानं विचार केला. भूमीच्या भांडण काढण्यामागचं कारण वेगळंच आहे, तिला कशाचा तरी इतका त्रास होतोय, की तो झेपत नसल्यामुळे तिला नीट वागताच येत नाहीये हे तिच्या डोळ्यांतली वेदना दिसल्यामुळे मला जाणवलं. मनानं क्षणभर तिच्या जागी पोहोचल्यावर तिची भावनिक गरज मला ‘आतून उमगली’. तिला अतिशय एकटं पडल्यासारखं, असुरक्षित वाटतंय, खूप भीती वाटतेय आणि या अनावर भावनांचं काय करायचं ते न कळून, असहाय्य होऊन तिनं भांडण काढलंय हे मला कळलं. मी कुशीत घेतल्याबरोबर तिचा आवेश आणि आवेग संपला. तिला फक्त एक प्रेमाचा स्पर्श, आईशी हक्काची जवळीक हवी होती. ती गरज समजून न घेता ‘तुझं कसं चुकतंय’ हे सगळे एकाच वेळी वरच्या पट्टीत, अधिकाराने सांगत होते. ते एकटं लहान मूल किती दुखावलं जातं, अपमानित होतं हे मला तेव्हा तीव्रतेनं जाणवलं. मुलांनी शिस्त पाळावी, मोठ्यांशी आदराने वागावं वगैरे अपेक्षा एरवी योग्यच असतात, पण बहुतेकदा फक्त त्यावरच फोकस होतो. कधी कधी मुलांच्या गरजा इतक्या साध्या, छोट्या, पण अति तीव्र असू शकतात हे आपल्याला सुचतही नाही.’’ हिमानी म्हणाली.

‘‘खरंय. निशांत जरा बिथरल्यासारखा वागला की ‘हा बिघडणार तर नाही?’ अशी भीती वाटायला लागल्यामुळे मी जिभेचा पट्टा सोडते बहुतेक.’’ राधिका विचार करत म्हणाली.

‘‘हो, मोठ्यांना साध्या गोष्टींतसुद्धा असंख्य शक्यता दिसतात आणि त्यांच्या काल्पनिक भीती किती वाढतात तेही मला याच काळात स्पष्ट दिसलं. एकदा भूमीनं ‘आईसगोला पाहिजे’ म्हणून जामच हट्ट धरला. तिच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गोलावाल्याला बोलावलं होतं. पहिल्यांदाच खाल्लेला तो रंगीबेरंगी प्रकार तिला फारच ‘भारी’ वाटला. आमच्या घरात मात्र आईसगोल्याबद्दल प्रचंड भीती. नुसता बर्फाचा कीस आणि रंग कशाला खायचं? कुठलं तरी घाणेरडं पाणी वापरतात, त्याने सर्दी होते, घसा बसतो, आजारी पडशील इथपासून तो गोलावाला आंघोळ कधी करतो देव जाणे इथपर्यंत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कमेन्ट. घरातले लोक तिला आइसक्रीम, मस्तानी, फालूदा, पीयूष काय हवं ते द्यायला तयार होते, फक्त आईसगोला सोडून. आणि ‘मला ‘फक्त आईसगोलाच’ हवाय, तुम्ही देत नाही, तर मीही तुमचं काही ऐकणार नाही’ हा तिचा पवित्रा. त्यामुळे तिच्यावर हट्टीपणाचा पक्का शिक्काच बसला.

आणखी वाचा-सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा

त्या दरम्यान एकदा भेटायला आलेली माझी बहीण दीप्ती, भूमीला फिरायला बाहेर घेऊन गेली. ‘तुला काय पाहिजे?’ विचारल्यावर भूमीने अर्थात ‘आईसगोला’ मागितला. दीप्तीला घरातल्या ‘गोलायुद्धाची’ कल्पना नव्हती. आईसगोला तिचाही आवडता असल्यामुळे दोघी खाऊन खुशीत घरी आल्या खऱ्या, पण दोघींनाही बोलणी बसली. त्यावर ‘हो का? सॉरी. मला पण आवडतो म्हणून आम्ही खाल्ला. पण गोला कधीतरीच खायचा, नाही तर घसा धरतो,’ असं मी आधीच भूमीला सांगितलंय.’ ही दीप्तीची सफाई होती. भूमीही लगेच ‘हो’ म्हणाली. तिनं खरंच पुन्हा आईसगोला मागितला नाही.

एकदाच आईसगोला मिळाल्यावर भूमी शांत झाली, एवढे दिवस पेटणारा विषय एका मिनिटांत संपला तेव्हा पुन्हा विचार करणं आलंच. मग लक्षात आलं की, भूमीसाठी आईसगोला खाण्यात काहीतरी ‘भारी’ करण्याचा आनंद’ होता, तो तिला पुन: एकदा अनावरपणे हवा होता, तर घरातल्यांसाठी ‘आरोग्य’ हा मुद्दा आणि त्याला जोडून सवय लागेल, पुन: मागेल, हट्टीपणा वाढेल अशा असंख्य ‘शक्यतांच्या भीती’ होत्या. आपापल्या वयानुसार आणि आपापल्या जागी दोघांचंही बरोबर होतं. पण भूमीला आईसगोला इतक्या तीव्रपणे हवा असणं आणि घरातल्या मोठ्यांचा इतका तीव्र नकार म्हणजे दोघेही दोन टोकांचे सारखेच हट्टी नव्हते का? मात्र हट्टीपणाचा लेबल एकट्या, छोट्या भूमीवर. ‘एकदा’ आईसगोला द्यायला काय हरकत होती खरं तर? त्या छोटीच्या मनात आईसगोल्याची अनावर क्रेझ, ती पूर्ण होणं मोठ्यांवर अवलंबून, ते तिला चुकीची आणि हट्टी म्हणतात, त्यामुळे काय करावं ते न कळून ती काहीतरी वागते, ज्याला ‘उद्धट’ म्हटलं जातं. तरीही त्या अनावर ओढीमुळे ती पुन्हा आईसगोलाच मागत असते. छोट्या गोष्टीतून केवढं दुष्टचक्र.’’ हिमानी म्हणाली.

‘‘हो गं, अशीच चक्रं पुन:पुन्हा घडून मुलांवर लेबलं लागून ती पक्की होत असणार.’’ राधिकाला स्पष्टच दिसलं.

‘‘भूमी पूर्वी बिथरायची, तेव्हा, ‘ही अशी सटकल्यासारखी का वागते? लोक काय म्हणतील? हट्टी झाली तर?’ या प्रश्नांनी भीती वाटायची. आता तिचा उद्धटपणा, विचित्र वागणं सुरू झालं की माझे ‘अँटेना’ उघडतात. ‘ती अशी ‘कशामुळे’ वागतेय? या वागण्यामागे तिची ‘गरज’ काय आहे? मी माझ्याच अपेक्षा, गृहीतकं समोर ठेवून तिच्याकडे पाहतेय का? हे मी शोधायला लागते. तिला कशाचा त्रास होतोय? काय व्यक्त करता येत नाहीये? हे तिच्या जागी जाऊन बघायचा प्रयत्न करते. मग न दिसलेलं वेगळंच काहीतरी दिसायला लागतं. भीती संपतेच. भूमी पूर्ण गुणी बाळ नाहीच्चे. कधी कधी चॅप्टरपणाही करते, पण माझी ‘शोधक’ नजर तेही बरोबर पकडतेच.’’ हिमानी हसत म्हणाली.

‘‘हं. यांचा अर्थ, मुलांच्या जागी जाऊन, लेबल न करता त्यांच्याशी वागणं जे तुला जमायला लागलंय, त्यालाच मुलं ‘कूल मॉमगिरी’ म्हणत असावीत बहुतेक.’’ सारं काही उलगडल्याच्या खुशीत राधिका म्हणाली.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader