मुग्धा गोडबोले

अफवा का पसरवल्या जातात यामागे मनुष्यस्वभावाचं एक खोल गुपित दडलेलं आहे. अनेकांचा त्यामागे स्वार्थ असतो, काहींचा, मलाच पहिल्यांदा आणि सगळं काही समजलं हे सांगण्याचा अट्टहास असतो. काही वेळा ‘हे आपल्या आयुष्यात का घडलं नाही’ याची खंत तर ‘याला बरं जमलं, आम्हाला का नाही’ याविषयीचा मत्सर. काहींना त्यातून क्षणिक आनंद मिळतो तर काहींच्या तो अस्तित्वाचाच प्रश्न होतो, कारणं काहीही असली तरी अनेक जण विवेक, संयम बाजूला ठेवून हा उथळ, काही वेळा जीवघेणा होणारा खेळ खेळतातच.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?

गभरात सगळ्यात जास्त बघितला जाणारा खेळ म्हणजे सॉकर किंवा फुटबॉल, असं म्हणतात. त्याखालोखाल खेळले जातात क्रिकेट, मग हॉकी, टेनिस, बास्केटबॉल आणि बॅडमिंटन. बुद्धिबळ, पाण्यातले वेगवेगळे खेळ, बर्फावरचे खेळ, कॅरम, गेलाबाजार, पाच तीन दोन, नॉट अॅट होम, बदाम सात, सापशिडी आणि अगदी तीन पत्तीसुद्धा… मुख्य हेतू काय तर मनोरंजन, आणि त्यानंतर स्पर्धा. मैदानी खेळांमधून व्यायाम होतो हे बरोबर आहे, पण त्यापेक्षा खेळामुळे मन रमतं. बुद्धीला चालना मिळते. जिंकायची इच्छा निर्माण होते, माणूस कृतिशील होतो. जगण्याच्या विवंचना बहुतेक वेळा विसरल्या जातात. खेळ ही माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे जगात सगळ्यांना मान्य आहे. तरीसुद्धा कितीही म्हटलं तरी प्रत्येकाला काही खेळता येत नाही. वयाच्या मर्यादा, जागेच्या मर्यादा, सामाजिक, आर्थिक एकूण जडणघडणीच्याही मर्यादा असतात. मग माणूस आपली ती खेळाची, चुरस लावायची, जिंकायची हौस कशी भागवणार! तर त्यासाठी त्यानं शोधून काढलाय एक नवा खेळ. ज्याचं नाव आहे, ‘अफवा पसरवणे’! या खेळाची अनेक वैशिष्ट्यं आहेत.

हेही वाचा >>> वुमन ऑफ ‘सबस्टन्स’

खर्च शून्य, जागेचं बंधन नाही. खेळाडूची तंदुरुस्ती महत्त्वाची नाही. वय, बुद्धी यांचा फारसा संबंध नाही, वर्षानुवर्षांच्या साधनेमुळे हा खेळ अधिक चांगला खेळता येऊ शकतो, पण अगदी नवख्या खेळाडूलाही तो जमतो. कोचिंगची गरज नाही. पंच नसतील तर उलट बरंच. आणि मुख्य म्हणजे या खेळाला वेळेची जाचक चौकट नाही. अर्ध्या तासाचाच गेम, एक तासाचीच मॅच असा जुलूम नाही. एकदा अफवेचा डाव मांडला की तो सुरूच राहतो. आपली आपण जाहिरात होते, खेळाडू आपणहून सामील होतात. आणि मग चोवीस तासातल्या कुठल्याही प्रहरी गडी मैदानात उतरून हुतुतुतू म्हणत खेळत राहतात. उदाहरणार्थ, ‘खेळाडू क्रमांक एक’ म्हणतो, ‘‘परवा चम्याला कुठल्या तरी पोरीबरोबर बाइकवरून जाताना पाहिलं रे.’’ ‘खेळाडू क्र.२’ दोन पुढे येतो. ‘‘हुतुतुतू… अरे, ती मनी असेल. मला कधीपासून शंका येतच होती.’’ खेळाडू तीन फॉर्मात असतो. तो आपल्याकडचे पत्ते बघतो आणि एक्का काढतो. ‘‘अरे, मी बऱ्याचदा पाहिलंय त्यांना एकत्र.’’ ‘खेळाडू क्रमांक चार’ शड्डू ठोकतो, ‘‘अरे, ती मनी पुढच्या वर्षी यूएसला चालली आहे, म्हणजे ती चम्याला टेंपररी फिरवणार.’’ ‘खेळाडू क्रमांक पाच’ जमिनीला हात आणि मग डोक्याला हात लावून सरसावते, ‘‘कबड्डी… कबड्डी… अरे, मनी तसलीच आहे. मागे तो पक्यासुद्धा असाच झुरला.’’ ‘खेळाडू क्रमांक सहा’ एक, दोन-अडीच करत घोड्याची चाल खेळते. ‘‘पण आता पक्या पिंकीबरोबर असतो नं?’’ अचानक नव्या बॉलवर सिक्सर मारल्यामुळे खेळाडू क्रमांक सहा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरतो. आणि एक मॅच संपते. खेळाडू जल्लोष करतात. शेवटी सगळे दमून झोपतात आणि दुसऱ्या दिवशी ‘अफवा ऑल’ म्हणत सगळे खेळाडू हाच खेळ पुन्हा सुरू करतात. सगळ्यांचं मनोरंजन होतं. छंद जोपासला जातो. शिवाय जगात माणसं आणि विषय खूप आहेत. त्यामुळे ही नेट प्रॅक्टिस अव्याहत चालू राहू शकते. जगातला सगळ्यात स्वस्त आणि उथळ असा हा खेळ.

हेही वाचा >>> आयुष्याचा तोल साधताना…

अफवा म्हणजे कोणत्याही आधार किंवा पुराव्याशिवाय सांगितलेली गोष्ट. यात वैयक्तिक, खासगी, सार्वजनिक, असा काहीही भेदभाव नसतो. कारण मुळात यात खरं-खोटं तपासण्याची कुणाला काही गरजच वाटत नसते. आपल्याकडे आलेला बॉल अधिक जोरात लाथ मारून पुढे ढकलणं इतकाच प्रयत्न असतो. इंग्रजीमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल वदंता उठते तेव्हा त्यांना ‘गॉसिप’ म्हणतात आणि सामाजिक-राजकीय विषयांबद्दल पसरतात त्यांना ‘रूमर’ म्हणतात. मराठीत आपण एकूण या भावनेलाच ‘कंड्या पिकवणं’असं सरसकट म्हणतो. या खेळाचा कैफ एवढा असतो की, यात आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल वाईट बोलतो आहोत, त्याचं काही तरी नुकसान करतो आहोत, हे या खेळाडूंच्या खिसगणतीतही नसतं.

प्रत्यक्ष युद्धापेक्षा जैविक युद्धं भयंकर असतात, कारण ती डोळ्यांना दिसत नाहीत, तसं हेही एक छुपं युद्धच असतं जे रोज कुणी तरी कुणाविरुद्ध तरी जिंकत असतं. अफवा पसरवणाऱ्याला बहुतेक वेळा हे माहीत असतं की, आपण जे बोलतोय त्याला काही पुरावा नाही, त्यात तथ्य नसण्याची शक्यता जास्त आहे. आणि यातून आपण सहेतुक एखाद्या व्यक्तीची बदनामी करतो आहोत किंवा एखाद्या घटनेचा विपर्यास करतो आहोत. पण तरीही हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का केलं जात असावं?

विवेक, संयम, विचारीपणा हा खरंच इतका अवघड आणि कष्टदायक असतो का? की याहून काही वेगळं कारण यामागे असेल? असणारच… एक म्हणजे तेवढ्यापुरतं स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा दुष्ट प्रयत्न. समोरच्या माणसापेक्षा रंजक आणि गुंतवून ठेवणारं काही तरी आपण सांगतो आहोत ही स्पर्धा जिंकण्याची भावना. आणि त्यामुळे चार जणांमध्ये मिळणारं महत्त्व! एरवी हे महत्त्व मिळवायला माणसाला आयुष्यभर केवढे कष्ट करावे लागतात. अफवा पसरवताना काहीच कष्ट नसतात. तरी सगळे आपलं ऐकतात! मग अजून काही तरी मोठं सांगू जेणेकरून आपल्यावरचा प्रकाशझोत टिकून राहील अशी एक भाबडी आशा असते. तशीही या कानगोष्टींची शहानिशा कुणीच करत नाही. त्याची गरज कुणाला वाटत नाही, कारण कुणा तरी तिसऱ्याचं नुकसान होतंय ना, आपलं नाही!

दुसरं म्हणजे केवळ कंटाळा घालवण्याचा प्रयत्न. नाही म्हटलं तरी रोज तेच तेच जगत असताना कंटाळायला होतंच. घडलेल्या घटनेला थोडा मसाला लावून सांगितलं तर जगण्याची चव वाढेलच! एकदा कोंबडं कापलं की ते काही मसाल्याची तक्रार करत नाही, लावा कितीही. तिसरं म्हणजे मनातली खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, आपण एखाद्याबद्दल जेव्हा अफवा पसरवतो तेव्हा मनात कुठे तरी ‘हे आपल्या आयुष्यात का घडलं नाही याचं दु:ख असतं.’ कुणाचं तरी कुणाशी तरी अफेअर आहे अशी चर्चा करताना मनात ‘याला बरं जमलं, आम्ही नाही बाबा असं काही करत, किंवा माझ्या आयुष्यात अशी मजा का नाही.’ इथपर्यंत असंख्य गोष्टी असतात.

चौथं म्हणजे आपण त्या समाजातून किंवा ग्रुपमधून बाहेर फेकले जाऊ नये याची काळजी. चाललेल्या महत्त्वपूर्ण चर्चेत आपण काहीच भर घातली नाही तर आपली कुणाला काही किंमत आणि गरज राहणार नाही. त्यापेक्षा अर्धवट माहितीच्या आधारावर छातीठोकपणे दोन पुड्या सोडणं सोपं. थोडंसं नाट्य सगळ्यांनाच आवडतं. पण हा क्षणिक आनंद किंवा ‘डोपामाइन इफेक्ट’ असतो. तेवढ्यापुरतं बरं वाटतं, तेही दुसऱ्याच्या जिवावर.

लहानपणी ऐक लेली गोष्ट आठवतेय,एकदा एका जंगलात एका सशाच्या अंगावर झाडावरचं पान पडलं. त्याबरोबर तो ससा ‘आभाळ कोसळतंय पळा पळा’ म्हणत धावायला लागला. तो धावतोय हे बघून त्यामागचं कारण न शोधता इतर प्राणीही पळायला लागले. काही क्षणात जंगलात हाहाकार माजला. प्राणी सैरावैरा पळायला लागले. त्यात चेंगराचेंगरी आणि मारामारी होऊन अर्धे अधिक मेले. एखाद्यानं जरी किंचित खोलात जाऊन माहिती काढली असती, तरी हा अनर्थ टळला असता. कधी कधी पुढे पुढे करण्यासाठी टाकलेलं पाऊल मागे घेण्यातही शहाणपणा असतो तो असा. अफवा पसरवणारे त्या प्राण्यांसारखे असतात. सैरावैरा धावत सुटतात.

करोना साथीच्या काळात तर अफवांचं प्रमाण भयानक वाढलं होतं. प्रत्येकाला वाटत होतं आपल्याला जेवढं कळतंय किंवा माहीत आहे तेवढं कुणालाच नाही. मग आपल्याकडे असलेले ‘ज्ञानकण’ लोकांना वाटण्याच्या नादात आपण नको त्या चार गोष्टी सांगतो आहोत, उगाच भीती पसरवतो आहोत याचं सामाजिक भान पूर्णपणे सुटलेलं आपण पाहिलं.

मग यावर उपाय काय… तर संयम, आणि आपल्याला जो आणि जेवढा अनुभव आलाय तेवढंच बोलणं. ही दोन पथ्यं पाळली तरी किमान आपल्याकडून अफवा बाहेर पसरत नाही. आजतागायत कुठल्याही अफवेचा भाग झालो नाही असा एकही माणूस नसतो. कधी कधी नकळतसुद्धा आपण अफवा पसरवतो. कारण आपल्या कानावर आलेलं खोटं आहे हेच आपल्याला माहीत नसतं. इतकी त्याला सामाजिक मान्यता मिळालेली असते.

मध्यंतरी एका अभिनेत्रीच्या संदर्भात हे असंच झालं. कुणी तरी तिच्याबद्दल काही तरी बोललं. वाहत्या गंगेत हात धूत इतर लाखो माणसं बोलायला लागली. आपल्याला अजिबात माहीत नसणाऱ्या, आपली वैयक्तिक ओळख नसलेल्या व्यक्तीबद्दल, स्त्रीबद्दल आपण अतिशय चुकीचं, घाणेरडं काही तरी पसरवतो आहोत, याचं अजिबात भान उरलं नव्हतं. प्रत्येक जण आपल्या बुद्धीच्या अवाक्यानुसार, त्या आगीत दोन लाकडं सरकवत होता. यात स्त्री-पुरुष असाही काही भेदभाव नसतो. अफवा पसरवण्यात मात्र आपल्याकडे संपूर्ण समानता आहे.

‘अफवा पसरवणं’ हे नैतिकदृष्ट्या चूक आहेच, पण भारतीय दंड संहितेनुसार, हा एक गंभीर गुन्हा आहे. जेव्हा जेव्हा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर बाब घडते तेव्हा तेव्हा सगळ्यात आधी फोनचे मार्ग बंद केले जातात. ‘अफवा पसरवण्यापासून थांबवणं’ हा मुख्य प्रयत्न असतो. अर्थात हा मनुष्यस्वभावाचा एक इतका खोलवर रुजलेला भाग आहे, की पुढच्या क्षणी ‘ऐकलंस का’ किंवा ‘काय सांगतोस काय’ अशी वाक्यं कानावर आली की, पुन्हा जंगलातले प्राणी सैरावैरा धावायला लागणार आहेत. खेळाडू फुलटॉस नवीन अफवा टाकणार आहे. आपल्यातले अनेक जण ‘ये लगा चौका’ म्हणत त्यावर धावा काढणार आहेत. आणि उरलेले आपण त्या बॉलची अवस्था न बघता खेळाडूसाठी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देणार आहोत. खेळ सुरू राहील, संवेदनशीलता मात्र संपलेली असेल.

Story img Loader