निरंजन मेढेकर
‘तुम्ही आई-बाबा होणार आहात’ ही बातमी मिळाल्याच्या क्षणीच बहुतेक जोडप्यांच्या मनात त्यांचं कामजीवन आता किमान पुढचे नऊ महिने बंद राहणार आहे, याची खूणगाठ बांधली जाते. या अत्यंत खासगी विषयाबद्दलच्या संकोचामुळे आणि गैरसमजांमुळे हे घडतं. मात्र काही पथ्यं पाळली तर गर्भारपणातही स्त्री-पुरुष शरीरसुखाचा निरामय आनंद घेऊ शकतात.
‘स्त्री ही क्षणाची पत्नी अन् अनंतकाळची माता असते’ या वाक्याची प्रचीती मूल होऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या प्रत्येक जोडप्याला, म्हणजेच पुरुषांबरोबर स्त्रियांनाही येत असते. कारण गर्भारपणापूर्वी फक्त आणि फक्त एकमेकांसाठी असलेला वेळ आता तिसऱ्याबरोबर विभागला जाणार असतो. या सगळय़ा प्रक्रियेत सर्वाधिक पणाला काही लागणार असेल तर ते आपलं कामजीवन, अशी चिंता बऱ्याच जोडप्यांना भेडसावत असते. त्यामुळेच गर्भारपणातलं कामजीवन कसं असतं, मुळात ते काही शिल्लक राहतं का (!) असे प्रश्न जोडप्यांना पडणं अगदी साहजिक आहे. त्यामुळे गर्भारपणातल्या कामसुखाच्या समज-गैरसमजांचा हा आढावा.
शरीरसुख आणि मातृत्व या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अगदीच थेट संबंध असला तरी वैवाहिक शरीरसुखातून जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा मात्र अचानक शरीरसंबंधांना पूर्णपणे हद्दपार करण्याची बहुतेकांची मानसिकता निर्माण होते. यामागे शास्त्रीय कारणांपेक्षाही वेगवेगळय़ा समजुती, गैरसमज आणि परंपरांचाच वाटा अधिक आहे असं दिसतं.
स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात, ‘‘गर्भारपणातले शरीरसंबंध हा विषय बऱ्याचदा जोडप्यांकडूनही काढला जात नाही आणि स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनही त्याबद्दल माहिती दिली जात नाही; पण या विषयाबाबत संकोच बाळगण्याचं काही कारण नाही. गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीनं झाली असेल आणि त्यात कुठलीही गुंतागुंत किंवा तब्येतीच्या तक्रारी नसतील, तर गर्भारपणात शरीरसंबंध ठेवल्यानं बाळावर किंवा आईवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. असं दिसून येतं, की अनेकदा स्त्रीला माहितीच नसतं, की ती गर्भवती आहे, त्यामुळे अगदी पाचव्या-सहाव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवले जातात. गर्भारपणात शरीरसंबंध ठेवल्यानं कुठलेही अपाय होत नसल्याचं वेगवेगळय़ा संशोधनांतून स्पष्ट होतं.’’
‘Sex during pregnancy how to guide’ या काकालिना हिन्नत (Kakalina Hinnant) लिखित पुस्तकात याचं विवेचन करताना, गर्भारपणात शरीरसंबंध न ठेवण्यात शारीरिक मर्यादांपेक्षा मानसिक कारणंच अधिक असतात असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘‘बऱ्याच गर्भवतींच्या बाबतीत असं घडतं, की एकदा त्यांना दिवस गेले, की त्यांच्या जीवनातून कामसुख हद्दपार होऊन जातं. हा विषय जणू दुसऱ्याच कुठल्या ग्रहावरचा असून या निरामय आनंदाशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नसल्याचा त्यांचा अचानक पवित्रा होऊन जातो.’’
‘अभिनंदन! तुम्ही बाबा होणार आहात’ किंवा ‘मुबारक हो! आप माँ बनने वाली हैं’ हा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांतला घिसापिटा संवाद! बहुतेकदा त्यापुढचं वाक्य ‘आता पुढचे नऊ महिने जवळीक बंद’ या स्वरूपाचं असतं; पण या सगळय़ात ज्या पुरुषामुळे ती स्त्री गर्भवती झालीय त्याचा विचारच केला जात नाही.
याची स्त्रियांना जाणीव करून देताना वर उल्लेखलेल्या इंग्रजी पुस्तकात म्हटलंय की, ‘‘स्त्री गर्भवती होणं हा तिच्या आयुष्यातला खूप मोठा बदल असला, तरी त्यांच्या ज्या भावना आहेत तशाच त्यांच्या पतीच्या असणं शक्य नाहीये, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. याचं प्रमुख कारण म्हणजे पतीचं पत्नीवर कितीही प्रेम असलं, तरी तो स्वत: गर्भार राहात नाही. तो पत्नीच्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेचा केवळ अदमास घेऊ शकतो आणि हळूहळू गर्भारपणाच्या एकूण प्रक्रियेत सहभागी होत जातो.’’
इथे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की, हे पुस्तक पाश्चात्त्य लेखकद्वयींचं असून, आपल्याकडे अजूनही अनेक घरांमध्ये गर्भारपण ही केवळ स्त्रीची जबाबदारी असते आणि पुरुष आपली जबाबदारी ढकलून सहज नामानिराळे होतात. थोडक्यात, पती किंवा पत्नीच्या अशा टोकाच्या भूमिका असतील, तर गर्भारपणात प्रणय आणि संभोग सोडाच, धड संवाद राहणंही अवघड होऊन जातं. त्यामुळेच गर्भारपण हा आयुष्यातला महत्त्वाचा आणि तितकाच आनंददायी भाग आहे, असा विचार करत एकमेकांमधलं नातं दृढ करण्याला प्राधान्य द्यायला हवं.
सोलापूरच्या माढा तालुक्यातले स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स काऊन्सिलर डॉ. मदन कांबळे गर्भारपणात स्त्रियांची कामेच्छा कशी बदलते, याविषयी माहिती देतात- ‘‘एकूण गर्भधारणेचा तीन-तीन महिन्यांच्या टप्प्यात विचार केला, तर पहिल्या तिमाहीत स्त्रियांची शरीरसंबंधांची इच्छा कमी झालेली दिसते. विशेषत: जर पहिली गर्भधारणा असेल, तर गर्भारपणासंबंधी भीती जास्त असते, ज्याची परिणती कामेच्छा घटण्यात होते. याउलट दुसऱ्या तिमाहीत कामेच्छा वाढू शकते. शेवटच्या तिमाहीत शरीरसंबंध ठेवणं गैरसोयीचं आणि काही वेळा धोकादायक होऊ शकतं.’’
गर्भारपणात संबंध ठेवले तर गर्भपात होईल का, अशी भीती अनेक जोडप्यांना वाटत असली तरी ज्यांना गर्भपाताचा, अकाली प्रसूतीचा पूर्वेतिहास आहे, आयव्हीएफसारख्या वैद्यकीय उपचारांनी दिवस गेले असतील, योनीमार्गातून रक्तस्राव होणं किंवा अन्य काही वैद्यकीय गुंतागुंत आहे, केवळ अशाच जोडप्यांना डॉक्टरांकडून गर्भारपणात संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ‘‘गर्भारपणाच्या संपूर्ण टप्प्यात बाळ हे गर्भाशयाच्या पिशवीत अगदी सुरक्षित असतं. त्यामुळेच या काळात शरीरसंबंध आल्यानं बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. अशी कोणती इजा होऊ शकते असा कुठलाही वैद्यकीय पुरावा नाही,’’ असं वर दिलेल्या इंग्रजी पुस्तकात नमूद करण्यात आलंय.
उलट गर्भारपणात कामजीवन सक्रिय ठेवल्यानं पतीपत्नींमधील नातं आणखी दृढ होतं, हे उलगडताना डॉ. मदन म्हणतात, ‘‘गर्भारपणात शरीरसंबंध ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत. या काळात दोघांनाही उत्तम कामसुखाची म्हणजेच ‘ऑरगॅझम’ची अनुभूती मिळते. मात्र या काळात समागम करताना स्त्रीच्या पोटावर दाब येईल अशी ठरावीक कामआसनं टाळायला हवीत. त्यासाठी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेतल्यास उत्तम. या काळात बऱ्याचदा स्त्रियांचं वजन वाढतं, हालचालींवर मर्यादा येतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळेच आता आपण पूर्वीसारख्या दिसत नाही का? पतीला माझ्याबद्दल आकर्षण वाटत नाही का? असे नकारात्मक विचार स्त्रीच्या मनात डोकावू शकतात. म्हणूनच या काळात पतीनं पत्नीला मानसिक उभारी देणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच संबंध ठेवताना पत्नीची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात घेत उतावळेपणा टाळावा.’’
गर्भारपणात समागम करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘या काळात समागम करताना पुरुषांनी कंडोम वापरायला हवा. खरं तर गर्भारकाळात कुठलंच गर्भनिरोधक साधन वापरण्याची आवश्यकता नाही अशीच अनेकांची मानसिकता असते; पण चुकूनही स्त्रीच्या योनीमार्गात कुठला जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी ही काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्याकडे अजूनही शरीरसंबंधांतून लागण होणाऱ्या आजारांबाबत (sexually transmitted diseases) कमालीचं अज्ञान आहे. त्यामुळेच पुरुषाचे इतर कुणा स्त्रीशी संबंध असले आणि त्यानं निरोध न वापरता गर्भवती पत्नीशी संबंध ठेवले, तर अशा आजारांची लागण त्या बाईला होऊ शकते. गर्भारपणात स्त्रियांचं गोड आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. यामुळेही योनीमार्गात ‘यीस्ट इन्फेक्शन’ होण्याचा संभव असतो. म्हणूनही या काळात संबंध ठेवताना कंडोम वापरणं उत्तम.’’
मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. रियाध अहमद लिखित ‘Sex during and after pregnancy’ या पुस्तकात गर्भारपणात संभोग करणं सुरक्षित असतं का? या प्रकरणात नमूद करण्यात आलंय, ‘‘गर्भधारणा नैसर्गिक असेल तर या काळात संभोग करणं ही नैसर्गिक आणि अगदी नेहमीची बाब ठरते. प्रत्यक्ष समागमादरम्यान तसंच कामसुखाच्या अनुभूतीमध्ये योनीमार्गात ज्या हालचाली होतात त्यांचा आणि प्रसूतीवेदनेदरम्यान होणाऱ्या हालचालींचा काहीएक संबंध नसतो. तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून गर्भारपणात शेवटच्या आठवडय़ांत काही वेळा डॉक्टरांकडून संभोग टाळण्याचा सल्ला दिला जातो.’’
हे सगळं जरी असलं तरी प्रत्येक गर्भधारणा, प्रसूती आणि प्रत्येक व्यक्तीची-जोडप्याची कामेच्छा ही भिन्न असते, हे समजून घ्यायला हवं. गर्भारपणातलं कामजीवन हा अतिशय खासगी आणि तितकाच दुर्लक्षित विषय असल्यानं, या काळातल्या कामसुखाच्या अपेक्षांबाबत पतीपत्नींमध्ये एकवाक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा त्या जोडप्यात उत्तम संवाद असेल. गर्भारपणातलं कामसुख हे केवळ जननेंद्रियांद्वारे मिळवण्याचा अट्टहास ठेवण्यापेक्षा हे सुख मेंदूद्वारे-बुद्धीद्वारे मिळवायचं असतं, याची जाणीव जोडप्यांनी ठेवायला हवी. तशी ती ठेवली, तर प्रणय आणि कामसुख ही गर्भारपणातही सहजगत्या साध्य होणारी गोष्ट ठरू शकते.