निरंजन मेढेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वैवाहिक जोडप्यांना जोडून ठेवणाऱ्या अनेक गोष्टींमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधानी शरीरसंबंध. मात्र अनेकदा शीघ्रपतनामुळे दोघांनाही त्याचा आनंद उपभोगता येत नाही. तो आजार नसून मुख्यत्वे मानसिक ताणामुळे उद्भवणारी गोष्ट असल्यानं जोडप्यांनी सामंजस्यानं यावर उपाय केल्यास ‘पतनातून येणारं दमन’ टाळून दोघांनाही दीर्घ सुख मिळू शकतं.
जगभरातल्या सर्व वयोगटातल्या पुरुषांना भेडसावणारी सगळय़ात लक्षणीय लैंगिक समस्या कुठली याचा विचार करता शीघ्रपतनाचा (Premature Ejaculation) सगळय़ात वरचा क्रमांक लागेल. वेगवेगळय़ा संशोधनांनुसार तब्बल एकतृतीयांश पुरुषांना शीघ्रपतनाच्या समस्येनं ग्रासलेलं असू शकतं आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान हा पुन:पुन्हा डळमळीत होत असतो. आपला समाज अजूनही पुरुषप्रधान असल्यानं आणि हा विषय थेट पौरुषाशी निगडित असल्यानं त्यामुळे अहंकाराला लागलेली ठेचही मोठीच असते! पण शीघ्रपतनाच्या समस्येमुळे पुरुषांइतक्याच किंवा पुरुषांपेक्षाही जास्त त्यांच्याकडून लैंगिक सुखाची अपेक्षा बाळगून असलेल्या स्त्रिया घुसमटत राहतात. ‘देहभान’ हे सदर सुरू झाल्यापासून येणारी वाचकांची पत्रं आणि ई-मेल्समध्येही शीघ्रपतनासंबंधीच्या मेल्सचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच शीघ्रपतनाची नेमकी व्याख्या, त्यामागची कारणं आणि त्यावरच्या उपचारांचा हा थोडक्यात आढावा.
कन्सिल्टग सेक्सॉलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट डॉ. राजसिंह सावंत लिखित ‘कामकुतूहल’ या पुस्तकात ‘शीघ्रपतन म्हणजे काय?’ या प्रश्नाचं विवेचन करताना नमूद केलंय, ‘लिंगाचा योनीत प्रवेश होण्यापूर्वी किंवा प्रवेश झाल्यावर एका मिनिटाच्या आत वीर्यस्खलन झाल्यास त्याला शीघ्रपतन असं म्हटलं जातं. शीघ्रपतनाच्या समस्येचं स्वरूप हे ती भेडसावणाऱ्या प्रत्येक पुरुषागणिक वेगळं असू शकतं. काही पुरुषांना समागमापूर्वी, काहींना प्रणयक्रीडेदरम्यान अनपेक्षितपणे, तर काही पुरुषांमध्ये लिंगाचा योनीत प्रवेश झाल्यानंतर पाच ते दहा सेकंदांत वीर्यपतन होतं.’
शीघ्रपतन ही ठळक लैंगिक समस्या असली, तरी त्याचा उल्लेख ‘लैंगिक आजार’ म्हणून केल्याचं कुठल्या पुस्तकात आढळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अकाली वीर्यपतनामागे बहुतांश वेळा शारीरिक कारणांपेक्षा मानसिक कारणं असतात. कामाचा किंवा अन्य कुठल्या गोष्टीचा सततचा ताण, चिंता, आत्मविश्वासाची कमतरता आणि प्रत्यक्ष समागमादरम्यान आपण पत्नीला सुख देऊ शकू का याची मनात धास्ती (performance anxiety) असेल तर त्याचं पर्यवसान हे चटकन वीर्यपतन होण्यात होतं.
‘‘पौगंडावस्थेत पदार्पण केल्यावर पुरुष जेव्हा हस्तमैथुन करायला लागतो, तेव्हा पहिला टप्पा हा शीघ्रपतनाचाच असतो. वीर्यपतनावर नियंत्रण मिळवणं ही प्रयत्नपूर्वक साधण्याची बाब आहे. ही गोष्ट पुरुषांनी समजून आत्मसात करायला हवीच, पण तितकीच ती स्त्रियांनीही समजून घ्यायला हवी. शीघ्रपतन झाल्यावर जोडीदाराला त्यावरून टोमणे मारल्यानं, चिडचिड केल्यानं ही समस्या आणखी वाढते,’’ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात.
त्यांच्याकडे अलीकडेच आलेल्या रोहन आणि निशा या जोडप्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं. ‘‘रोहनला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून शीघ्रपतनाची समस्या होती आणि त्यामुळे निशा लैंगिक सुखापासून उपेक्षित राहात होती. ते जेव्हा उपचारांसाठी आले तेव्हा त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झालेली होती. उपचारांचा रोहनला चांगला लाभ झाला आणि आता त्यांच्या लैंगिक सुखात कुठलाही अडथळा राहिलेला नाही.’’
डेबी हरबेनिक लिखित ‘सेक्स मेड इझी’ या पुस्तकात स्त्रियांच्या मनात पुरुषांच्या लैंगिकतेबद्दल कशा भ्रामक समजूती असतात याचं विश्लेषण असं स्पष्टपणे नमूद केलं आहे, की ‘लिंगाच्या ताठरतेवर किंवा वीर्यस्खलन नेमकं कधी व्हावं, समागम सुरू झाल्यावर किती वेळानं व्हावं यावर पुरुषांचं नियंत्रण असतं असं स्त्रियांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं.’ या गोष्टीत जरी तथ्य असलं, तरी शीघ्रपतनाच्या समस्येत पुरुषांची काहीच भूमिका नसते असंही म्हणता येणार नाही.
‘‘पुरुषाच्या लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू हा वीर्यपतनात असतो. त्यामुळे एकदा का वीर्यस्खलन झालं की त्यांच्या दृष्टीनं समागम संपतो. परिणामी स्त्री अतृप्तच राहते. बऱ्याचदा शीघ्रपतनावरून बायकोनं कितीही तक्रार केली, तरी नवऱ्याचा स्वभाव बेफिकिरीचा किंवा दुर्लक्ष करण्याचा असेल, तर ही समस्या सुटत नाही. शीघ्रपतन ही पुरुषकेंद्री समस्या असली, तरी उपचारासाठी जोडप्यानं येणं अपेक्षित असतं. बऱ्याचदा संकोच, माहितीचा अभाव किंवा उपचारांचा खर्च, अशा कारणांमुळे पुरुषांचा उपचार टाळण्याकडेच कल असतो. बऱ्याच प्रकरणांत केवळ समुपदेशनानंही या समस्येवर प्रभावी इलाज होतो,’’ असं सेक्सॉलॉजिस्ट, सेक्स थेरपिस्ट आणि जनरल फिजिशियन डॉ. राजेंद्र साठे सांगतात.
शीघ्रपतनाच्या समस्येनं ग्रस्त पुरुषांचं प्रमाण हे जगभर लक्षणीय असल्याचं वेगवेगळय़ा जागतिक संशोधनांद्वारेही दिसून येतं. स्वित्झरलँडमधल्या झुरिक विद्यापीठातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अँड्रिया बुरी यांनी मेक्सिको, इटली आणि दक्षिण कोरियातल्या १५०० स्त्रियांचं २०१४ मध्ये सर्वेक्षण केलं. या संशोधनानुसार शीघ्रपतनामुळे केवळ पुरुषांना मनस्ताप होतो असं नाही, तर या समस्येमुळे स्त्रियांनाही मोठय़ा मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. या सर्वेक्षणातल्या ४० टक्के स्त्रियांनी समाधानी शरीरसंबंधांत पुरुषांचं वीर्यपतनावर नियंत्रण (ejaculation control) असणं अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा अधोरेखित केलाय. या संशोधनातला आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे बहुतांश स्त्रियांच्या कामजीवनातल्या निराशेमागे समागमाचा अल्प कालावधी हे कारण नसतं, तर शरीरसंबंधांदरम्यान पुरुषांचं सगळं लक्ष हे वीर्यपतन लांबवण्यावर राहिल्यामुळे समागमपूर्व किंवा समागमादरम्यानच्या प्रणयाकडे (foreplay) त्यांचं पूर्ण दुर्लक्ष होतं. त्यामुळे स्त्रियांच्या कोणत्याच शारीरिक गरजांची पूर्तता अशा अपूर्ण संबंधांमधून होत नाही.
शीघ्रपतनावरच्या उपचारांसाठी आलेल्या एका जोडप्याविषयी सांगताना डॉ. राजेंद्र म्हणाले, ‘‘या जोडप्यात पतीला शीघ्रपतनाची समस्या असल्यानं पत्नीला लैंगिक सुख मिळत नव्हतं. ‘ही परिस्थिती अशीच राहिली तर माझं पाऊल घसरू शकेल,’ असा थेट इशारा पत्नीनं दिला होता. त्यामुळे तो पती काहीसा धास्तावलेला होता. एकमेकांवर दोषारोप करण्याबरोबर हे असे इशारे, शाब्दिक हल्ले टाळायला हवेत. या जोडप्याचं समुपदेशन करताना शीघ्रपतनावरच्या उपचारांबरोबरच कामजीवनासंदर्भातले दोघांचे विचार जाणून घेत त्यातल्या अनाठायी अपेक्षा वास्तवदर्शी कशा होतील, याचाही प्रयत्न करण्यात आला.’’
लेखात याआधी उल्लेख केलेल्या ‘कामकुतूहल’ पुस्तकाचे लेखक डॉ. राजसिंह यांनी सांगितलं, ‘‘पतीला तीव्र शीघ्रपतनाचा त्रास असेल आणि त्यामुळे पत्नी लैंगिक सुखापासून वारंवार वंचित राहात असेल, तर स्त्रीची लैंगिक इच्छा कमी होत जाते. कारण समागम कशासाठी करायचा? अशी स्त्रियांची भावना होत जाते. पुरुषाचं परमोच्च सुख वीर्यपतनात असतं, तसं स्त्रीच्या लैंगिक सुखाच्या परिपूर्तीसाठी समागम ठरावीक काळ सुरू राहणं आवश्यक असतं, हे जोडप्यांनी समजून घ्यायला हवं.’’ या संदर्भात जनजागृती आवश्यक आहे, असं ते म्हणतात. ‘‘कोल्हापूरमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या जोडप्यांतील स्त्रियांमध्ये तितकी सजगता दिसत नाही. याउलट मी जेव्हा गोव्यात जातो तेव्हा स्त्रिया मोकळेपणानं हा विषय मांडतात, असं प्रॅक्टिसदरम्यान आढळतं. डॉक्टरांशी या संदर्भात बोलून उपचार घेण्याविषयी त्या पतीला सांगतात. इतकंच नाही, तर कित्येकदा स्वत: डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन पतीसह उपचारांसाठी येतात. शीघ्रपतनाचं प्रमाण लक्षणीय असलं, तरी त्यावर मोकळेपणे बोलल्याशिवाय आणि उपचार घेतल्याशिवाय जोडप्यांना कामजीवनाचा निरामय आनंद घेता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.’’
शीघ्रपतनाच्या शारीरिक कारणांमध्ये लिंगाचा पुढील भाग- म्हणजे शिश्नमुंड (glance penis) अतिसंवेदनशील असणं हे प्रमुख कारण असतं. यावर गर्भनिरोधक (काँडम) लावून समागम करण्यास सुचवलं जातं. त्यामुळे लिंगाच्या पुढील भागाची संवेदनशीलता कमी होते. याशिवाय शिश्नमुंडाची संवेदनशीलता कमी करण्यासाठी बाजारात काही स्प्रे, मलमंदेखील उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यानं समागमाचा कालावधी वाढू शकतो. जो पत्नीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो; परंतु लिंगाचा पुढील भाग बधिर झाल्यामुळे पुरुषाला लैंगिक सुखाची अनुभूती मिळत नाही, असं निरीक्षण डॉ. राजसिंह नोंदवतात. शीघ्रपतनावरच्या उपचारांमध्ये औषधांपेक्षा काही साधेसोपे उपाय सुचवले जातात.
डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकात ‘कामसमस्या’ या प्रकरणात जेम्स सेमन पद्धत, मास्टर्स व जॉन्सन यांनी सुचवलेली दाबपद्धती, डॉ. हेलन सिंगर यांनी संशोधन केलेली कॅप्लान पद्धत म्हणजेच ‘थांबणे व सुरू करणे’ असे वेगवेगळे आपले आपणच करता येणारे उपाय सुचवण्यात आले आहेत. याशिवाय ‘रॅशनल इमोटिव्ह थेरपी’, ‘कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी’, ‘सायकोडायनॅमिक थेरपी’ अशा मानसोपचार पद्धती किंवा कीगल्स व्यायामप्रकारांनीही समस्या कमी होऊ शकते. हे उपचार करूनही शीघ्रपतनाची समस्या दूर होत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्लानं औषधं घ्यावीत. इतर कुणाच्या सल्ल्यानं किंवा सेक्स टॉनिक्सच्या जाहिरातींवर विसंबून परस्पर मनानं औषधे घेतल्यास उपायापेक्षा अपाय होण्याची शक्यता अधिक असते.
‘‘समागमाचा सरासरी कालावधी हा तीन ते चार मिनिटांचा असतो. अगदी एक मिनिटापेक्षाही तो जास्त असला, तरी नॉर्मल समजलं जातं,’’ असं डॉ. राजसिंह सांगतात. थोडक्यात, अनेक पुरुषांना शीध्रपतनाची खरी समस्या नसते, तर त्यांना वीर्यपतनावर नियंत्रण मिळवत एकूण समागमाचा कालावधी वाढवायचा असतो. तो याआधी नमूद केलेल्या उपायांनी वाढवता येऊ शकतो. वीर्यस्खलनाशी संबंधित इतर समस्यांमध्ये निरुद्ध वीर्यस्खलन हीसुद्धा समस्या काही पुरुषांमध्ये असते. या समस्येत अर्धा-एक तास समागम करूनदेखील वीर्यस्खलन होत नाही. शीघ्रपतनाच्या तुलनेत या समस्येचं प्रमाण कमी असतं. या समस्येची कारणं विशद करताना
डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, ‘संवेदनावाहन क्रियेत मानसिक कारणांमुळे अडथळा निर्माण झाला असता वीर्यस्खलन होत नाही. लहानपणी हस्तमैथुन केल्याबद्दल पालकांनी कडक शिक्षा करणं, झोपेत स्वप्नं पाहताना होणाऱ्या वीर्यस्खलनाबद्दल नापसंती, कामेच्छेचा अभाव, प्रणय-श्रृंगाराचा अभाव, पत्नीविषयीचा असंतोष, पत्नी गरोदर राहण्याची भीती, धार्मिक बंधनं, अशा कारणांमुळे निरुद्ध वीर्यस्खलनाची समस्या उद्भवते. मधुमेह, टेस्टोस्टेरॉन हार्मोनची उणीव, यामुळेही निरुद्ध वीर्यस्खलन होऊ शकतं. जे पुरुष कधीच हस्तमैथुन करत नाहीत अशा पुरुषांतही अशी समस्या उद्भवते. वीर्यस्खलनाची प्रतिक्षिप्त क्रिया होत नसल्यामुळे शरीरसंबंधांत किंवा हस्तमैथुनात वीर्यस्खलन होत नाही.’
थोडक्यात, वीर्यस्खलन आणि वीर्यस्खलनाचा कालावधी हा समागमातला एक महत्त्वाचा टप्पा असून त्यातल्या समस्येमुळे पुरुषांचं लैंगिक समाधान होत नाहीच, शिवाय स्त्रियांच्या लैंगिक सुखातही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अकाली वीर्यपतनावर वेळीच उपचार घ्यायला हवेत. काही कारणांनी उपचार घेण्यासाठी नवरा टाळाटाळ करत असेल, तर पत्नीनं लैंगिक दमन सहन न करता पुढाकार घेत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. निरोगी समाजासाठी वैध मार्गानं लैंगिक सुखाची अनुभूती मिळवणं हा प्रत्येक व्यक्तीचा आणि जोडप्याचा मूलभूत अधिकार आहे.