निरंजन मेढेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्या जोडप्यांना मूल हवंय, त्यांना ते न होण्यामागे केवळ शारीरिक कारणंच नसतात. जीवनशैलीशी निगडित अनेक गोष्टींचा अशा बाबतीत बारकाईनं विचार करावा लागतो. गर्भधारणा राहण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरण्यामागे व्यसनाधीनता असू शकते, हे मागच्या लेखात आपण बघितलंच; पण वरवर गर्भधारणेशी संबंधित न वाटणाऱ्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टी जननक्षमतेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे निरोगी आरोग्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये जननक्षमता वृध्दिंगत होईल अशी सकारात्मक जीवनशैली अवलंबण्यावर भर द्यायला हवा.
वंशसातत्याच्या नैसर्गिक ऊर्मीबरोबरच निरपेक्ष मायेचा अखंड स्रोत म्हणून आपलं स्वत:चं मूल हवं असा बहुतेक जोडप्यांचा आग्रह असतो. पण जेव्हा काही कारणांमुळे प्रयत्नांनंतरही मूल होत नाही तेव्हा जोडप्यांमध्ये कमालीचं नैराश्य येतं. जननक्षमतेमागील समस्येमागे दर वेळी उपचार करता येण्याजोगी किंवा उपचार नसलेली शारीरिक कारणंच असतात की मानसिक तसंच जीवनशैलीशी निगडित कारणंही असतात, हा आजच्या तरुण पिढीसाठी कळीचा मुद्दा आहे.
आज एकविसाव्या शतकात विवाहसंस्था शाबूत असली, तरी लग्नाकडे बघण्याच्या तरुणाईच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. पुण्यातील स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सांगतात, ‘‘आजच्या तरुण पिढीचं लग्नाचं वय पुढे गेलं असलं, तरी लग्नाआधी अनेकांची ‘अफेअर्स’ झालेली असतात. त्यांना शरीरसंबंधांचा अनुभव असतो. त्यामुळे तिशीनंतर ते बाळाचा विचार सुरू करतात. पण तोवर समागमातली ओढ संपून एक प्रकारचं बर्नआऊट फीलिंग आलेलं असतं. स्त्रियांच्या बाबतीत विचार करता तिशीनंतर जननक्षमता कमी व्हायला सुरुवात होते तर पस्तिशीनंतर ती झपाटय़ानं कमी होते. भारतीय तरुणींमध्ये ही समस्या प्रामुख्यानं दिसून येते. वंध्यत्वाच्या उपचारांसाठी दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला गर्भधारणा राहण्याची शक्यता असलेल्या दिवसांत संबंध ठेवायला सांगण्यात येतं. पण त्याचा अनेकदा पुरुषांवर ताण येऊन त्यांना लैंगिक ताठरतेची समस्या सुरू होऊ शकते. दुसरीकडे आयव्हीएफ आणि आययूआयसारखे उपचार करण्यास बऱ्याचदा जोडपी आणि विशेषत: पुरुष तयार नसतात. यात बराच काळ निघून जातो आणि केसेस अवघड होत जातात.’’
छत्रपती संभाजीनगरमधील स्त्रीरोग आणि लैंगिक समस्यातज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश पाटसकर सांगतात, ‘‘बऱ्याचदा पती-पत्नी दोघांच्याही वैद्यकीय चाचण्यांमध्ये कोणताही दोष दिसून येत नसला, तरी गर्भधारणा राहात नसते. अशा वेळी त्या जोडप्याचं नातं नेमकं कसं आहे, हे तपासण्याची गरज असते. म्हणजेच समाजात वावरताना जरी त्यांच्यातला बंध उत्तम दिसत असला तरी प्रत्यक्षात समागमाचं प्रमाण अत्यल्प असू शकतं. यामागे नोकरीनिमित्त पती-पत्नी वेगवेगळय़ा शहरांमध्ये असणं, दोघं आय.टी.सारख्या क्षेत्रात असतील तर कामाचा प्रचंड ताण असणं, मुंबईसारख्या शहरात घर असेल आणि एकत्र कुटुंब असेल तर पुरेसा एकांत न मिळणं, अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. मानसिक कारणांचा विचार करता पुरुषाच्या मनात समागमाचा वा अन्य कुठल्या गोष्टींचा ताण-चिंता असेल तर त्याची परिणती ‘कॉर्टिसॉल’ हे संप्रेरक वा हॉर्मोन स्रवण्यात होते, ज्याचा नकारात्मक परिणाम लिंगाच्या ताठरतेवर होतो.’’
डोना एम. Everything you need to know about fertility या पुस्तकात जीवनशैलीतील वेगवेगळय़ा घटकांचा जननक्षमतेवर कसा थेट परिणाम होतो याचं विश्लेषण करण्यात आलं आहे. यानुसार सतत बाहेरचं ‘प्रोसेस्ड’ फूड खाल्ल्यानं त्याचा फर्टिलिटीवर नकारात्मक परिणाम होतो. याउलट रोजच्या आहारात ताजी फळं, भाज्या, प्रथिनं यांचं प्रमाण जितकं जास्त, तितकी जननक्षमता सुधारते. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे वीर्याचा दर्जा सुधारतो, असं यात नमूद करण्यात आलं आहे. आहाराइतकाच महत्त्वाचा वाटा हा व्यायामाचा ठरतो. नियमित व्यायामाचा बाकी अवयवांप्रमाणेच जननेंद्रियांच्या आरोग्यालाही फायदा होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं चक्र सुरळीत होण्यास तसंच वेगवेगळय़ा हॉर्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास व्यायामामुळे मदत होते.
वेगवेगळय़ा व्यसनांचा कामेच्छेवर आणि कामजीवनावर कसा थेट परिणाम होतो याचा सविस्तर आढावा याआधी ‘देहभान’ सदरात प्रसिद्ध झालेल्या ‘संसाराचा ताल बिघडवणारे नाद’ (२७ मे) लेखात घेतला आहे. जननक्षमतेशी संबंधित समस्यांचा विचार करतानाही जोडप्यापैकी एकाची किंवा दोघांचीही जीवनशैली निव्र्यसनी आहे की नाही, याचाही बराच प्रभाव पडतो. अल्कोहोल आणि तंबाखूच्या सेवनामुळे पुरुषांच्या बाबतीत शुक्राणूंच्या प्रमाणावर (sperm count) आणि त्यांच्या वहन क्षमतेवर (motility) थेट परिणाम होतो तर स्त्रियांमध्ये या व्यसनांमुळे पाळीचं चक्र बिघडून ओव्ह्युलेशनच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे बाळाचा विचार करत असताना किंवा एरवीही निरोगी कामजीवनाची अपेक्षा ठेवताना व्यसनांपासून चार हात दूर राहणं केव्हाही चांगलं.
वाढत्या वजनाचा मुद्दाही जननक्षमतेच्या समस्येत मोठी भूमिका बजावतो. बॉडी शेमिंगला विरोध करत स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारण्याचा हल्ली ट्रेंड असला, तरी शरीरावरील अतिरिक्त चरबी ही जननक्षमतेवर थेट परिणाम करते, हे समजून घेण्याची गरज आहे. याविषयी बोलताना डॉ. शिल्पा सांगतात, ‘‘आपल्या समाजात लठ्ठपणाची (obesity) समस्या मोठय़ा प्रमाणात दिसते. त्याचा थेट संबंध जननक्षमतेशी आहे. लठ्ठपणामुळे वीर्यातील शुक्राणूंचं प्रमाण घटतं. तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं प्रमाण लक्षणीय आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही, वेगवेगळी व्यसनं आणि त्याला मोबाइल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मिळालेली जोड, यामुळे तरुणाईला लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रासलेलं आहे. मोबाइलच्या व्यसनामुळे शरीरसंबंधांची इच्छादेखील (libido) कमी होते. त्यामुळे अनेक जोडप्यांना मूल हवं असलं, तरी त्यासाठीही शरीरसंबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नसल्याचं दिसून येतं.’’
करिअरमध्ये आणि आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर झाल्याशिवाय मुलाचा विचार करायला नको, हा विचार योग्य असला तरी काही वेळा त्याचा अतिरेक केल्यानंही नंतर मूल होण्यात अडचणी उद्भवू शकतात, हे विशद करताना डॉ. शिल्पा सांगतात, ‘‘माझ्याकडे एक तिशीचं जोडपं आलं होतं. त्या तरुणीचा याआधी एक गर्भपात झाला होता. त्यामुळे वाढतं वय बघता त्यांनी लगेच मुलाचा विचार करणं आवश्यक होतं. पण ते दोघंही स्वत:चं घर घेण्यासाठी अगदी आग्रही होते. घर झाल्याशिवाय मुलाचा विचारही न करण्यावर ते अगदी ठाम होते. कुणाला घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, तर कुणाला परदेशी जाण्याचं. पण ही स्वप्नं पूर्ण करण्याच्या नादात वय वाढल्यानं वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते याचा विचार जोडप्यांनी करायला हवा.’’
याचं अगदी दुसरं टोक म्हणजे कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल पद्धतशीरपणे पेरण्यात आलेले गैरसमज. लग्नानंतर पहिल्या वर्षांत मूल होऊ दिलं नाही तर नंतर मूल होण्यात अडचणी येतात हा सगळय़ात मोठा गैरसमज असून, लग्न झालेल्या आपल्या मुला-मुलींनी लगेच ‘चान्स’ घ्यावा म्हणून ज्येष्ठ पिढीनं मुद्दाम हा समज रुजवलाय, असा दावा डॉ. शिल्पा करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) व्याख्येनुसार कोणतीही कुटुंब नियोजनाची साधनं न वापरता वर्षभर सातत्यपूर्ण शरीरसंबंध ठेवूनही गर्भधारणा न राहणं या स्थितीला वंध्यत्व म्हणता येऊ शकतं. बऱ्याच जोडप्यांची अशी समजूत असते की कुटुंब नियोजनाची साधनं वापरणं बंद केलं की लगेच गर्भधारणा होईल. प्रत्यक्षात यासाठी काही महिने किंवा वर्षभराचा अवधी लागू शकतो. त्यामुळे जोडप्यापैकी कुणाला बाकी कुठल्या लैंगिक समस्या नसतील, शारीरिक व्याधी नसतील आणि वय पस्तिशीच्या पुढे नसेल तर आपल्याला वंध्यत्व आहे असा परस्पर समज करून घेणं चुकीचं तर आहेच पण त्यामुळे विनाकारण न्यूनगंड आणि नैराश्य बळावू शकतं.
जीवनशैलीच्या अन्य मुद्यांचा विचार करता डॉ. ओमप्रकाश सांगतात, ‘‘तरुणाईत आणि विशेषत: पुरुषांमध्येही टाइट जीन्स वापरण्याची फॅशन असली तरी तंग पँट्समुळे जननेंद्रियांची उष्णता वाढू शकते. त्यामुळे मोकळेढाकळे कपडे वापरावेत. हीच गोष्ट अंतर्वस्त्रांनाही लागू होते. अंतर्वस्त्रं ही शक्यतो कॉटनची असावीत. याशिवाय कामाचा विचार करता अनेक जणांना लॅपटॉप मांडीवर घेऊन बसण्याची सवय असते. याचा परिणाम जननक्षमतेवर होतो का यासंदर्भात संशोधन सुरू आहे. त्यामुळे हे टाळलेलं चांगलं. याशिवाय खूप गरम पाण्यानं आंघोळ केल्यासही वृषणांवर परिणाम होऊन शुक्राणूंचं प्रमाण घटू शकतं. त्यामुळे वर्षभर अगदी थंड पाण्यानं नाही पण कोमट पाण्याने स्नान करावं.’’
मूल होत नसेल तर आजही बहुतांश वेळा स्त्रियांना जबाबदार धरलं जातं. वास्तविक वंध्यत्वाच्या समस्येत पहिल्यांदा पुरुषाची वीर्य तपासणी करणं अपेक्षित असतं. कारण ती सहज होणारी प्रक्रिया असते. पण याचा थेट संबंध पुरुषत्वाशी जोडण्यात येत असल्यानं बरेच पुरुष याला तयार नसतात. अशोक आगरवाल, आदिती मुलगंद, आला हमादा आणि मिशेल रेनी छायाट लिखित A unique view on male infertility around the globe या संशोधन अहवालानुसार २० ते ३० टक्के प्रकरणांमध्ये मूल न होण्यासाठी पुरुष जबाबदार असतात. तर आणखी २० ते ३० टक्के प्रकरणांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांमधील अक्षमता वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरते. थोडक्यात, या अहवालानुसार जननक्षमतेच्या समस्येत स्त्री आणि पुरुष दोघांचाही वाटा समसमान असतो. त्यामुळेच मूल होत नाही यासाठी केवळ स्त्रीला जबाबदार धरणं योग्य नाही.
जननक्षमतेसंदर्भात पुरुषांच्या समस्यांचा विचार करता शीघ्रपतन आणि लैंगिक ताठरतेची समस्या ही दोन प्रमुख कारणं असल्याचं डॉ. ओमप्रकाश आवर्जून नमूद करतात. ‘‘लैंगिक ताठरतेची समस्या असलेल्या पुरुषांना बऱ्याचदा गोळय़ा खाऊन समागम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सेक्स ही काही यांत्रिक क्रिया नाही. त्यामुळे फोरप्लेद्वारे नैसर्गिकरीत्या लिंग उत्तेजित झालं तरच गोळीचा फायदा होतो, हे जोडप्यांनी समजून घेणं आवश्यक आहे.’’ दुसरीकडे वेगवेगळय़ा संशोधनांनुसार समाजातल्या एक तृतीयांश पुरुषांना शीघ्रपतनाच्या समस्येनं ग्रासलेलं असू शकतं. यावर खात्रीशीर उपचार होऊ शकतात, हेच अनेक पुरुषांना माहिती नसल्यानं किंवा केवळ संकोचापायी ते डॉक्टरांकडे जात नाहीत. स्त्रियांचा विचार करता योनीआकर्ष
(vaginusmus) किंवा वेदनामय संभोग (dyspaeunia, sexual pain disorder) या शारीरिक-मानसिक व्याधींमुळे समागमच होऊ शकत नाही. सेक्सविषयी भीती, चिंता असेल तर समागमादरम्यान स्त्रीच्या योनीमार्गातले स्नायू तिच्याही नकळत आकुंचित पावतात. परिणामी लिंगाचा योनीमार्गात प्रवेश होऊ शकत नाही. या व्याधी मनोकायिक प्रकारात मोडणाऱ्या आहेत. बऱ्याचदा पत्नीला योनीआकर्षांची समस्या असेल तर प्रयत्न करूनही समागम न जमल्यानं पतीला लैंगिक ताठरतेची समस्या भेडसावू शकते. या समस्यांवर उपचार घेण्याऐवजी अनेक जोडपी आपल्याला वंध्यत्वाची समस्या असल्याचा निष्कर्ष काढून मोकळी होतात. कधी जीवनशैलीत काही छोटे-मोठे बदल करून तर कधी योग्य वैद्यकीय मदत घेत जननक्षमता सुधारणं आणि जननेंद्रियांशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावर उपचार करणं शक्य आहे. गरज आहे ती कामजीवनाकडे सजगपणे पाहण्याची.
niranjan@soundsgreat.in