निरंजन मेढेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कामक्रीडेत ‘फोरप्ले’लाही तेवढंच महत्त्व असतं, याची पुष्कळ जोडप्यांना माहितीच नसते. माहिती असली, तरी संकोच आडवा येतो आणि संभोग झटपट उरकण्याकडे कल राहतो. अशा जोडप्यांमधल्या स्त्रियांना त्यात आपण वंचित राहिल्याची भावना जशी निर्माण होते, तसंच अनेकदा पुरुष जोडीदारही कामक्रीडेचा खुलेपणानं आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे संभोगापूर्वी आणि नंतरचा निरामय संवाद- अर्थात ‘कामसंवाद’ जोपासायला हवा.

‘असाच एक जण चक्क मला म्हणाला,
‘‘आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही!
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?’’..’

कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या प्रसिद्ध कवितेतलं हे कडवं त्या काळाचा विचार करता अगदी वास्तवदर्शी आहे! म्हणूनच त्यात प्रेमाच्या नावानं नाकं मुरडणाऱ्या समस्त समकालीनांना शालजोडीतून लगावली आहे! माध्यमांच्या, चित्रपटांच्या प्रभावामुळे प्रेमाविषयीच्या स्वीकारभावात आज काही अंशी सुधारणा दिसत असली, तरी दुसरीकडे वैवाहिक सहजीवनाचा विचार करता जोडप्यांमध्ये कामसंवादाचा अभाव आहे का? आणि हा नाजूक संवाद असणं का गरजेचं आहे? या गोष्टींचा या लेखात आढावा घेऊ या.

एक नवविवाहित तरुणी लग्नानंतर तीन महिन्यांतच माहेरी परत आली, ती परत कधीच सासरी जायचं नाही हा निर्धार करूनच. मुलगी उच्चशिक्षित होती, नवरा इंजीनिअर होता. पण ‘नवरा काय वाटेल ते करतो’ असं तिचं म्हणणं होतं. तिची आई तिची पाठराखण करताना म्हणत होती, की ‘आमची मुलगी कडक शिस्तीत वाढलेली आणि अगदी सातच्या आत घरात येणारी आहे!’

या प्रातिनिधिक केसचं विश्लेषण करताना इचलकरंजीस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. मंदार देशपांडे सांगतात, ‘‘या संबंधित तरुणीला प्रणय-अनुनय (foreplay) म्हणजे काय, हेच माहिती नव्हतं. त्यामुळे तिचा पती तिला व्हिडीओंच्या माध्यमातून ते दाखवत तसं करायला सांगत होता. पण त्यालाही याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात कामविषयक जो संवाद प्रस्थापित व्हायला पाहिजे, तो झालाच नसण्याची शक्यता आहे.’’ कामविषयक संवादाच्या अभावामुळे समागमपूर्व प्रणय हा अतिशय दुर्लक्षित विषय ठरतो. दुसरीकडे मुलामुलींशी लहानपणापासून मोकळा संवाद करण्याची सवय नसल्यानं लग्न ठरल्यावरही पालक मुलांना याबद्दल काही सांगायला धजावत नाहीत. ‘नवरा जे काही करेल ते करून घे’ असाच काय तो सल्ला बऱ्याच माता आपल्या लग्न ठरलेल्या मुलींना देतात. पण हा सल्ला देताना एक स्त्री म्हणून लैंगिक कृतींना नेमका प्रतिसाद कसा द्यायचा, त्यावर आपली भूमिका काय हवी, याबद्दल बहुतेकदा पालकांमध्येही घोर अज्ञान असतं, की विलक्षण संकोच असतो, हा प्रश्न आहे.

वैवाहिक कामजीवनात समागमपूर्व अनुनयाला असलेलं महत्त्व डॉ. लीली जोशी यांनी आपल्या ‘आनंदी शरीर, आनंदी मन’ या पुस्तकात उलगडलंय. ‘कामजीवन- तिसरा पुरुषार्थ’ या प्रकरणात त्यांनी नमूद केलंय, ‘जननेंद्रियाचा आकार किंवा समागमाचा अवधी यावरच कामतृप्ती अवलंबून असते का? खरं तर नाही. कोणत्याही कारणानं यात त्रुटी असेल, तरी पुरेसा काळ समागमपूर्व अनुनयात घालवला आणि दोघेही जोडीदार पुरेसे उद्दीपित झाले, तर ही त्रुटी भरून काढता येते. याउलट अनुनयाला काहीच महत्त्व न दिल्यानं जोडीदाराची शारीरिक आणि मानसिक तयारी झाली नसेल, तर ती क्रिया अतिशय यांत्रिक आणि वेदना देणारीही होऊ शकते. एवढंच नव्हे, तर अशा यांत्रिकतेमुळे मनात कामक्रीडेबद्दल भीती-घृणा निर्माण होऊ शकते.’’
‘फोरप्ले’विषयी आपल्या समाजात अजूनही अज्ञान आहे. याच सदरातील ‘कामजीवन : आई-बाबा झाल्यानंतरचं’ (१३ मे) या लेखावर एका तरुणाची मेलवर आलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. तो म्हणतो, की ‘या लेखात गर्भारपणानंतर पत्नीशी पुन्हा नातं प्रस्थापित करताना समागमापेक्षा प्रणयावर भर द्यावा असं म्हणण्यात आलंय. पण समागम आणि प्रणय या दोन्ही गोष्टींचा अर्थ ‘सेक्स’ असाच आहे असं मी समजत होतो.’

त्यामुळे फोरप्ले म्हणजे नेमकं काय, हे आधी समजून घ्यायला हवं. डॅन ब्रेनन यांच्या What is foreplay या संशोधनात्मक लेखात या विषयाची उकल करताना नमूद करण्यात आलंय, की ‘प्रत्यक्ष समागमापूर्वी होणाऱ्या लैंगिक क्रियांना फोरप्ले असं म्हणतात. एका अर्थी हा एक प्रकारचा ‘वॉर्म अप’ असतो. पण दर वेळी फोरप्लेची परिणती समागमात होतेच असं नाही. फोरप्लेमध्ये चुंबन, मिठी, स्पर्श किंवा प्रणयात्मक संवादाचा समावेश असू शकतो.’’ फोरप्लेचं महत्त्व उलगडताना काही महत्त्वाची निरीक्षणंही नोंदवण्यात आली आहेत. ‘चुंबनाच्या क्रियेतून ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाईनसारखी ‘फील-गुड’ हॉर्मोन्स स्रवतात, ज्यामुळे ताण कमी होतो आणि संभोगातला आनंद द्विगुणीत व्हायला मदत होते. फोरप्लेमुळे तुमचं शरीर खऱ्या अर्थानं समागमासाठी सज्ज होतं. या क्रियांमुळे जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा वाढतो आणि योनीमार्गात नैसर्गिक ओलावा निर्माण होतो. यामुळे समागमाचा अनुभव वेदनादायी न होता सुखद होतो.’

स्वत:च्या शरीराविषयी, लैंगिकतेविषयी आणि विशेषत: जननेंद्रियांच्या आरोग्याविषयी स्त्रियांना जागरूक करण्यासाठी पुण्यातल्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांनी ‘व्ही फॉर व्हजायना’ हा मोफत इंग्रजी पॉडकास्ट सुरू केलाय. या पॉडकास्टमध्ये फोरप्लेसंदर्भातल्या भागात त्या सांगतात, ‘‘मध्यंतरी एक स्त्री रुग्ण तिच्या पतीची तक्रार घेऊन आली होती. ‘पतीला सेक्समधलं काही कळत नाही, प्रणयाचं अजिबात ज्ञान नाही. इतकंच काय, तर त्याला साधं चुंबनही नीट घेता येत नाही,’ असा तिचा तक्रारीचा सूर होता. यावर मी तिला विचारलं, की ‘तू त्याला सांगितलंस का, की तुला नक्की त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत?’ त्यावर ती म्हणाली, की ‘नाही. त्याला माहिती पाहिजे. कारण तो पुरुष आहे!’ स्त्री असो अथवा पुरुष, प्रत्येकाला स्वत:च्या शरीराबद्दल आणि त्याच्या गरजांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. स्वत:च्या लैंगिक सुखासाठी किंवा त्याच्या अपूर्ततेसाठी दर वेळी जोडीदाराला जबाबदार धरणं योग्य नाही.’’

त्या म्हणतात, ‘‘प्रणय-संभोगातल्या काही गोष्टी पटत नसल्या, तरी जोडीदारावर थेट टीका करण्यापेक्षा ‘सँडविच टेक्निक’ वापरावं. हे तंत्र आत्मसात करण्यासाठी ‘फोरप्ले’इतकाच समागमानंतरचा ‘आफ्टर-प्ले’ महत्त्वाचा आहे. सँडविच टेक्निकमध्ये प्रथम नुकत्याच घडलेल्या प्रणयातल्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात. त्यानंतर मग यामध्ये आणखी काय सुधारणा करता येतील त्याविषयी बोलून परत शेवट गोड करावा. हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, की जोडीदाराला सतत टोचून बोलल्यानं, टोमणे मारल्यानं त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊन तो किंवा ती शरीरसंबंध टाळायला लागतात.’’ लैंगिकदृष्टय़ा विचार करता स्त्रियांना आणि पुरुषांना उत्तेजित व्हायला लागणारा काळ तसंच प्रत्यक्ष समागमातून समाधानपूर्ततेचा काळ हा भिन्न असू शकतो. यावर प्रकाश टाकताना डॉ. मंदार सांगतात, ‘‘लैंगिक सुखाचा विचार करता स्त्रियांना उत्तेजित व्हायला वेळ लागतो. याउलट पुरुष चटकन उत्तेजित होतात आणि त्यामुळे समागमात त्यांचं वीर्यस्खलनही लवकर होतं. त्यामुळेही समागमापूर्वी फोरप्लेला पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरतं. यामुळे दोन्ही जोडीदारांची कामपूर्ती साधारण एकाच वेळी होण्याची शक्यता वाढते.’’

प्रत्यक्ष समागमादरम्यान स्त्री-पुरुषांमधील कामपूर्तीच्या कालावधीतील तफावतीविषयी (orgasm gap) माहिती देताना डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘ ‘समागमादरम्यान लैंगिक सुखाची अनुभूती’ याविषयी नेदरलँड्समध्ये झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, की पुरुषांची कामपूर्ती ही प्रत्यक्ष कामक्रियेत पाच ते सात मिनिटांत होते, तर स्त्रियांसाठी हाच काळ १४ ते १६ मिनिटांचा असतो. कामपूर्तीच्या कालावधीतल्या या तफावतीमुळे जोडप्यांमध्ये आणि विशेषत: स्त्रियांमध्ये असमाधानाची भावना वाढते. त्यामुळेच थेट समागमाला सुरुवात करण्यापेक्षा आधी काही काळ फोरप्लेसाठी पुरेसा अवधी देत ठरावीक लैंगिक उत्तेजना गाठल्यास स्त्रियांना शरीरसंबंधांतून अधिक समाधान मिळू शकतं.’’

फोरप्लेचा विचार करता शारीरिक स्वच्छता, मौखिक आरोग्य तसंच जननेंद्रियांचीही योग्य ती निगा राखणं गरजेचं असतं. तर आणि तरच प्रणयाचा अनुभव आनंददायी ठरू शकतो. Intimacy, Communication and Connection: A Sex Therapy Journey for Married Couples या पुस्तकात जोडप्यांतला प्रणय (intimacy) हा दर वेळी लैंगिकच असतो असं नाही, हे स्पष्ट करत तो भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि लैंगिक असा चार प्रमुख प्रकारचा असतो, असं नमूद करण्यात आलं आहे. या चारही पातळय़ांवरचा जोडीदाराबरोबरचा संवाद जितका सुखाचा, तितका त्या जोडप्यातला बंध उत्तम असतो. याच पुस्तकात कामसंवादाचं महत्त्व उलगडताना असं विशद करण्यात आलंय, की ज्यांना आपल्या जोडीदारांशी स्वत:च्या लैंगिक गरजांविषयी, अपेक्षांविषयी आणि मर्यादांविषयीही संवाद साधता येतो, अशा जोडप्यांमधल्या शरीरसंबंधांमध्ये कामपूर्ततेचं प्रमाण अधिक असतं. फोरप्लेसंबंधीच्या गैरसमजांमध्ये आपला जोडीदार स्वार्थी किंवा आळशी असल्यानं त्याला प्रणयात रस नसतो, असा अनेकांचा समज असतो. पण लैंगिक संबंधांविषयीचा संकोच, भीती ही कारणं त्यामागे असू शकतात. अशा वेळीही कामविषयक संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. दुसरीकडे लैंगिकताविषयक शिक्षणाच्या अभावामुळे कामविषयक माहितीसाठी अनेक जोडपी ‘पॉर्न’चा आधार घेतात. पण त्यातली भडक दृश्यं बघून त्याचा विपरीत परिणाम नात्यावर होण्याची किंवा त्यातून विनाकारण मनात न्यूनगंड रुजण्याचीही शक्यता असते. त्यामुळे नात्यात कामविषयक संवाद प्रस्थापित करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. फोरप्लेचा विचार करता आपल्या एकूण समाजात स्पर्शाला अतिशय दुय्यम लेखण्यात आल्याचंही जाणवतं. अगदी पती-पत्नी चारचौघांत हातात हात घेतानासुद्धा संकोचतात. त्याचंच प्रतििबब खासगी आयुष्यातही उमटतं. त्यामुळेच ‘शब्दांवाचून कळले सारे..’ या पाडगावकरांच्याच आणखी एका अजरामर गीताची अनुभूती घ्यायची असेल, तर जोडप्यांनी हे स्पर्शाचं, प्रणयाचं आणि कामसंवादाचं महत्त्व वेळीच ओळखायला हवं!
niranjan@soundsgreat.in