राज्यभरातील खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या प्रवासात खरा ठेवा सापडला तो जुन्या आणि विस्मृतीत गेलेल्या पदार्थाचा, म्हणूनच ‘शोध आठवणींतल्या चवींचा’ हे सदर. या प्रवासात असंख्य स्त्रिया, काही पुरुषही भेटले ज्यांच्याकडून अनेक पदार्थ नव्याने चाखता आले, काही नव्याने कळले आणि ही खाद्यसंस्कृती अशीच टिकत, वाढत, बदलत समृद्ध होत राहाणार याची खात्री पटली.

यंदा, जानेवारी महिन्यापासून आपण सर्व वाचक माझ्याबरोबर महाराष्ट्रातल्या ‘आठवणीतील चवीं’च्या शोधप्रवासात सामील झालात. या प्रवासाला एक वर्ष पूर्ण होतंय. आपण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, विदर्भात नागपूर आणि अमरावती अशा प्रांतांचा प्रवास पूर्ण केला. अनेक जुने, काही विस्मृतीत गेलेले पदार्थ आणि त्यांच्या कृतींसह तिथली संस्कृती, बोली, म्हणी, गोष्टी अशा अनेक बाबी अनुभवल्या. आपला हा इथला प्रवास घडू शकला तो केवळ ‘लोकसत्ता-चतुरंग’मुळे. अशा वेगळ्या विचारांना, कल्पनांना आणि कामाला न्याय व्यासपीठ देणारं ‘लोकसत्ता’ हे एकमेव दैनिक आहे, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

या खाद्यसंस्कृतीच्या शोधाच्या प्रत्यक्ष केलेल्या प्रवासात मी जरी एकटी असले, तरी या लेखनप्रवासात मात्र लाखो लोक माझ्याबरोबर होते, हे तुमच्या प्रतिक्रियांवरून मला समजलं. वेळेअभावी सर्वच प्रतिक्रियांना मला उत्तर नाही देता आलं, त्यासाठी क्षमस्व. मात्र मला आलेली प्रत्येक प्रतिक्रिया मी वाचली आहे आणि प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी प्रेरणादायी होती. अनेकांनी मला त्यांच्या भागातील काही पदार्थ सांगितले, तर काहींनी मला थेट त्यांच्या गावी येण्याचं आमंत्रणदेखील दिलं. त्यामुळे अशा एखाद्या भागात किंवा गावात जाताना मला आता हक्काचं एक घर मिळाले आहे, याचा आनंद वाटतो.

खरं तर सुरुवातीच्या लेखात माझ्या प्रवासाची सुरुवात, संकल्पना वगैरे गोष्टींबाबत मी लिहिलं होतं, तरीही काही जणांच्या शंका, काही प्रश्न आहेत, म्हणून पुन्हा थोडक्यात सांगते. साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू झाला, तो माझ्या मनात दडलेल्या एका ‘काश’मुळे! आणि त्यातून घेतल्या गेलेल्या खाद्यसंस्कृतीच्या या प्रवासाच्या खऱ्याप्रणेत्या म्हणजे माझ्या‘आज्या’. आता आज्या माझ्याबरोबर नाहीत, परंतु त्यांच्या हातच्या साध्या स्वयंपाकाच्या आणि विशेष पदार्थाच्या चवी आजही माझ्याजिभेवर तशाच तरळतात. वाटलं, की अशा अनेक आजी आणि नाती असतील महाराष्ट्रात.. त्यांच्याही मनात असा ‘काश’ असेल! मग सुरुवात झाली माझ्या प्रवासाला. केवळ आज्याच नाही, तर विविध समाज-समुदायातल्या हजारो जाणकार लोकांना मी भेटले. त्यांच्याकडून जुना ठेवा जाणून घेता आला. काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या, की तुम्ही या लेखांचं पुस्तक तयार करा. मी सांगू इच्छिते, की मुळात हा प्रवास, हे संशोधन पुस्तक लिहिण्यासाठीच सुरू झालं. हे लेख म्हणजे माझ्या संपूर्ण प्रवासातल्या काही निवडक आठवणी आहेत. या ठेव्याचं केवळ पुस्तकच नाही, तर विविध माध्यमातून तो ठेवा, ज्ञान सर्वदूरपोहोचवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

मराठवाडा आणि खान्देशमधून मला अनेक प्रतिक्रिया आणि आमंत्रणं आली आहेत. काहींनी त्यांच्या भागातले काही पदार्थ आणि आठवणी त्यांच्या ईमेलमधून सांगितल्या. खरं तर प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास साधारण एका-एका लेखातून लिहिला गेलाय. खरं सांगायचं तर, प्रत्येक लेखानंतर असं वाटायचं, की अरे अजूनही बरंच सांगायचंराहिलं आहे. इतकी विविधता आणि आठवणी त्या-त्या भागाच्या आहेत. मात्र वेळेची आणि जागेची मर्यादा! त्यामुळे या लेखमालेत खान्देश आणि मराठवाडा यांविषयीपुरेसं नाही लिहिता आलं. त्याबद्दल क्षमस्व! हीच बाब अनेक पदार्थाविषयी. एखादा पदार्थ एखाद्या प्रांतात एका विशिष्ट पद्धतीनं केला जातो, तोच दुसऱ्या एखाद्या प्रांतात काहीशावेगळय़ापद्धतीनं केला जातो.

बऱ्याचदा‘पदार्थ एक, नावं अनेक’ अशीही परिस्थिती असते. उदाहरणार्थ- बाफले, रोडगे, बाटी, लिट्टी, साधारण एकसारखेच असणारे हे पदार्थ; पण प्रांत बदलला की त्यांच्या कृती आणि काही घटकांमध्ये बदल होतो आणि नावातही! आपल्याकडे पुरणाचीिदडं केली जातात, तर कर्नाटकात गेल्यावर सुकामेवा भरलेली दिंडं मला खायला मिळाली. आपला हा प्रवास आताचा आहे; पण हे पदार्थ खूप काळापासून अनेक प्रांतांतून प्रवास करत आले आहेत आणि अजूनही करत आहेत. असो! ‘पदार्थाचा प्रवास’ हा तर एका स्वतंत्र लेखमालेचा विषय असू शकतो; पण तूर्तास मला आपल्या प्रतिक्रियांवरून हे सांगावंसंवाटतं, की ‘हे आमचं नाही, असं आमच्याकडे होतच नाही..’ वगैरे वादांमध्ये अडकण्यापेक्षा तो पदार्थ तिथे कधीपासून तयार होऊ लागला, त्याचं काही कारण आहे का, वगैरे माहिती घेणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

या लेखमालेच्या निमित्तानं काही जणांनी असा प्रवास किंवा पदार्थाच्या नोंदी करणं सुरू केलं आणि काही जण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या अशा संदर्भातल्या प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं. त्या सगळय़ांनामला एकच सांगावंसंवाटतं, की आपली खाद्यसंस्कृती ही फक्त पदार्थाची यादी नाही. ‘आहारातून आरोग्य’ ही आयुर्वेदातली संकल्पना आपल्या रोजच्या जीवनात आणि जेवणातदेखील आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळेच एखाद्या पदार्थाची नोंद करताना त्यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, हे समजून घ्या. हे करत असताना प्रत्येक वेळी ‘जुनं तेच सोनं’ हाही अट्टहास नको! काळ बदलला, कामं, जीवनशैली बदलली. त्यामुळे जुन्या काळातल्या गोष्टी आजच्या काळात जशाच्या तशा मानवणंदेखील शक्य नाही, हाही विचार करा.

काही वाचकांनी असा प्रवास कसा करायचा, असा प्रश्न विचारला आहे. तर मला वाटतं, तुम्हाला आधी असा प्रवास का करायचा आहे, हे शोधणं महत्त्वाचं आहे. माझ्या प्रवासामागे संशोधन, आवड हे ध्येय होतं. माझा अभ्यासाचा विषय पक्का होता. तसं तुम्हाला तुमच्या प्रवासाचं उद्दिष्ट आधी निश्चित करायला हवं. त्यानंतर यासाठीचं आर्थिक नियोजन करावं. कारण खेडोपाडी, आदिवासी भागांत, दुर्गम भागांत प्रवास करणं तसं खूप अवघड, वेळ खाणारं आणि खर्चीक गणित आहे. शिवाय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला संयम ठेवून काम करावं लागेल. या प्रवासाला वेळ लागू शकतो. ज्या भागात प्रवास करायचा आहे तिथली भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थिती माहीत असणं आवश्यक आहे. याचं एक छोटं उदाहरण देते- मी सुरुवातीला प्रवासात पाणी विकत घ्यायचे नाही. याची दोन कारणं होती. एक तर मला सर्व ठिकाणचं पाणी पिऊन पाहायचं होतं आणि दुसरं म्हणजे बाटल्यांचा कचरा करायचा नव्हता. शिवाय यामुळे थोडेफार का होईना पैसे वाचायचे. त्यामुळे ज्या ठिकाणी जायचे तिथलं पाणी मी माझ्याकडच्या बाटलीत भरून घ्यायचे. अशाच एका भागात प्रवास करताना माझ्याकडचं पाणी संपलं; पण मी नििश्चत होते, की पुढे गावात गेल्यावर मला पाणी भरून मिळेल; पण त्या गावात पोहोचल्यावर कळलं, की तिथे अनेक वर्षांपासून दुष्काळ आहे. माझ्याच समोर स्त्रिया-मुलं अनेक कोसांवरून पाणी भरून आणत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी मला पाणी दिलं, चहा दिला.. मात्र त्यांची ही बिकट परिस्थिती पाहून माझ्यानं त्यांच्याकडून आणखी पाणी मागणं झालं नाही. जर तिथे जाण्यापूर्वी माझा अभ्यास पूर्ण असता तर माझी गैरसोय झाली नसती. त्यामुळे प्रवासात निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी तर आपण घ्यायचीच, मात्र आपलीही गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेणं महत्त्वाचं. दोन्हींचा योग्य समतोल हवा.

सरतेशेवटी इतकंच सांगेन, की आपल्याबरोबर हा आठवणींचा प्रवास करता-करता एक संस्मरणीय अनुभव मला मिळाला. आपले पदार्थ, आपली संस्कृती ही लाखमोलाची आहे आणि तिला मानाचं स्थान देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी एकजुटीनं प्रयत्नही करणं आवश्यक आहे. मला खात्री आहे, की या लेखमालेनंतर आपणही आपल्या आसपासचे, जुने, विस्मृतीत गेलेले, जाऊ शकणारे पदार्थ तयार कराल, कृती लिहून ठेवाल, त्याचा व्हिडीयो करून ठेवाल. आपल्या घरी, परिसरात, गावपातळीवर तरी आपण असा प्रयत्न करूच शकतो. तेच या सदराचे साफल्य ठरेल.

या लेखमालेचा शेवट सुगीतील गोड पदार्थानं- तिळाचे कोंद

साहित्य : भाजलेले तीळ, गूळ.

कृती : तीळ भाजून गार झाल्यावर गुळासह उखळात वाटून घ्यावेत. हा पदार्थ संक्रांतीसाठी विदर्भात केला जातो. संक्रांतीनिमित्त एकमेकांना तिळगुळाप्रमाणे कोंद वाटलं जातं.

parandekar. shilpa@gmail. com

(सदर समाप्त)