|| डॉ. राजन भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंद्रियाचा आकार कमी असणे या कारणावरून अनेक जोडप्यांचे घटस्फोट तरी होतात किंवा अनेक पुरुषांना न्यूनगंड तरी येतो. वास्तव काय आहे, हे समजून घेणं आणि आपलं अज्ञान मुलांपर्यंत न पोचू देणं हे पालकांनीच करायला हवं.
लग्नानंतर चार वर्षांनी संजयची बायको दोन वर्षांच्या लहानग्या रवीला वडिलांपाशीच सोडून विभक्त झाली. तिचं कुणावर तरी प्रेम होतं व संजयपासून वेगळं होताच तिनं त्या व्यक्तींशी लग्नही केलं. आपण कुठे कमी पडलो याचा खूप विचार संजयने केला, अनेक अनुमान बांधले. कुठेतरी संजयला आपण कशात कमी पडलो याचा आतून अंदाज होता. पण छोटय़ा रवीचा काय दोष? ही खंत संजयला व्यथित करत असे.
वेगळं होण्याआधी बायकोने केलेल्या काही तक्रारी, दिलेले काही दोष व केलेले काही आरोप संजयला अस्वस्थ करत असत. ‘‘तू मला सुख देऊ शकत नाहीस. कमी पडतोस. तुला नेहमी घाई असते. तुला माझ्या गरजा कधी कळल्याच नाहीत. तू स्वार्थी आहेस. तुला माझ्या सुखाची पर्वा नाही.’’ अशा प्रकारच्या तिच्या तक्रारी असत. ‘आपण बायकोला वैवाहिक सुख देण्यात कमी पडलो. तिनं ते बाहेर शोधलं!’ हा न्यूनगंड संजयला खूप उद्विग्न करत असे, झोंबत असे. म्हणूनच संजयनं दुसरं लग्न करण्याचा विचारही केला नाही. दुसरं लग्न करण्याबाबत संजयच्या वृद्ध आईनं संजयला अनेक वेळा आग्रहानं सुचवलं पण संजयनं त्याला स्पष्ट नकार दिला.
दोन वर्षांच्या रवीला मोठं करताना संजयला स्वत:च्या वृद्ध आईची मदत घ्यावी लागली. रवी शांत स्वभावाचा होता. अभ्यासात चांगला पण खेळांची फारशी आवड नाही. मित्र कमीच पण प्राणीमात्रांमध्ये रमणारा. घरात कुत्रा पाळला होता. छोटं मत्स्यालयही होतं. रवीला काही कमी पडू नये याची विशेष काळजी संजय सतत घेत असे.
रवी अवघा नऊ वर्षांचा असतानाच एका विशिष्ट तक्रारीसाठी त्याला घेऊन संजय आपल्या फॅमेली डॉक्टरांकडे गेला. ‘रवीचं इंद्रिय खूप लहान आहे. वयोमानाप्रमाणे त्याच्या जननेंद्रियाची वाढ होत नाही आहे, असं मला वाटतं. पुढे वैवाहिक जीवनात यामुळे तो कमी पडेल.’ अशी काळजीवजा तक्रार संजयनं डॉक्टरांसमोर मांडली. फॅमिली डॉक्टरांना या प्रकारच्या तक्रारीची कारणमीमांसा कशी करावी याची कल्पना नसल्यानं त्यांनी संजयला सरळ एका ज्येष्ठ लंगिक विज्ञानतज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत सुचवलं. संजयनं तत्परतेने त्यांची भेट घेतली.
संजयची रवीच्या इंद्रियाबाबत असलेली तक्रार ऐकताच डॉक्टरांनी चटकन ‘रवी अजून फक्त नऊ वर्षांचा आहे,’ याची सूचक आठवण संजयला करून दिली. ‘‘इंद्रियाची वाढ पुढे पौगंडावस्थेत गेल्यानंतर होत असते. आज दिसणारा इंद्रियाचा आकार पुढे बदलत असतो. आज त्याचा विचार करण्याची फारशी गरज नाही.’’ हे समजावून सागितल्यानंतरही संजयनं ‘पण तुम्ही स्वत: एकदा त्याची तपासणी करून पाहा,’ अशी विनवणी डॉक्टरांकडे केली. बावरलेल्या छोटय़ा रवीकडे स्मित करत व त्याच्याशी काही हलक्या फुलक्या गप्पा मारत डॉक्टरांनी सहजपणे त्याची तपासणी केली. तपासणी करताच डॉक्टरांनी मुद्दाम रवीसमोरच हसत हसत संजयला सांगितलं, ‘‘तुझा मुलगा अगदी नॉर्मल आहे. त्याच्यात काहीही दोष किंवा कमतरता नाही. निश्चिंत राहा!’’ हे ऐकूनही संजय अजून साशंकच दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही समाधान दिसत नव्हतं. त्याला बहुतेक अजून काहीतरी विचारायचं किंवा सांगायचं आहे, हे डॉक्टरांच्या लगेच ध्यानात आलं.
डॉक्टरांनी नंतर त्याच्याशी झालेल्या वेगळ्या वैयक्तिक भेटीत संजयनं आपलं मन मोकळं केलं. त्याची पत्नी व तो विभक्त होण्यामागची नाजूक कारणं, स्वत:बाबत त्याच्या मनात असलेली दुबळेपणाची भावना, आपण पत्नीला सुख देण्यात, तृप्त करण्यात कमी पडलो याचा न्यूनगंड – या व अशा अनेक गोष्टी डॉक्टरांबरोबरच्या चच्रेत समोर आल्या.
‘‘डॉक्टर तुम्ही माझीसुद्धा तपासणी करून पाहा. माझ्या इंद्रियाचा आकारही मला खूप लहान वाटतो. त्यामुळेच पत्नीला सुख देण्यात आपण कमी पडलो होतो असं मला अनेक वेळा वाटतं!’’ अशा स्पष्ट शब्दात संजयनं आपली विवंचना डॉक्टरांपाशी बोलून दाखवली. डॉक्टरांनी संजयचीसुद्धा यथासांग शारीरिक तपासणी केली व संजयलाही ‘तू अगदी नॉर्मल आहेस. तुझ्या इंद्रियाचा आकार, लांबी, रुंदी कुठेही कमी नाही व जराही अपुरी नाही,’ अशा स्पष्ट शब्दात संजयला धीर दिला. या विषयावर अधिक स्पष्टीकरण करत पुढे जाऊन डॉक्टरांनी काही विशेष गोष्टी संजयला आवर्जून समजाऊन सांगितल्या. ‘‘पुरुषाचं व स्त्रीचं लंगिक समाधान हे पुरुषाच्या इंद्रियाच्या लांबी- रुंदी- जाडीवर जराही अवलंबून नसतं. स्त्रीचा योनीमार्ग साधारणपणे चार ते पाच इंच खोल असतो, पण त्याच्या बाहेरील एक तृतीयांश भागात म्हणजेच साधारण दीड इंच भागातच केवळ तिला लंगिक संवेदनांचा आनंद अनुभवता येईल अशी क्षमता असते. त्यामुळे पुरुषाच्या इंद्रियाचा आकार उत्तेजित अवस्थेत अगदी दोन इंच जरी असेल तरी तो स्त्रीला तृप्त करण्यासाठी पुरेसा असतो. जसं गोड- तिखट या चवी फक्त जिभेवरच अनुभवता येतात. या चवी घास गिळल्यानंतर अनुभवता येत नाहीत. आकार विविध असले तरी त्यापासून मिळणारं सुख हे तुमचं आमचं सेमच असतं.’’ एका प्रथितयश तज्ज्ञांकडून अशा शब्दात हे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळताच संजयचा जीव भांडय़ात पडला. मनावर असलेलं एक खूप जुनं ओझं उतरल्यासारखं त्याला वाटलं. आपण निदान या बाबतीत तरी कमी पडलो नाही याची त्याला खात्री झाली. पण एवढंच सांगून डॉक्टर थांबले नाहीत.
‘‘पती-पत्नीमध्ये एकमेकांपासून मिळणारं लंगिक समाधान व तृप्ती ही अनेक बाबींवर अवलंबून असते – दोघांच्या मनात असलेलं एकमेकांबद्दलचं शारीरिक आकर्षण, अनन्य अशी भावनिक जवळीक, उत्कट व पुरेसा प्रणय (फोरप्ले), समागम व समागमानंतरही व्यक्त केलेली जवळीक (आफ्टरप्ले) – या व अशा अनेक गोष्टींवर स्त्रीचं व पुरुषाचं लंगिक समाधान अवलंबून असतं.’’ या प्रकारच्या अनेक स्पष्टीकरणांच्या माध्यमांतून डॉक्टर संजयचं समुपदेशन करत गेले. सुमारे तासभर झालेल्या या भेटीत खूप नवीन गोष्टी संजयला शिकायला मिळाल्या व कळत गेल्या. एका बाजूला आपल्या स्वत:च्या लंगिक वर्तनात आपल्या नेमक्या कुठे चुका होत होत्या याचा अचूक अंदाज त्याला येत असतानाच आपण कमीपणाच्या काल्पनिक व एकतर्फी ओझ्याखाली जीवनाचं एक महत्त्वाचं अंग केवळ अज्ञानामुळे झुगारून बसलो आहोत याची चाहूल संजयला लागली व कुठे तरी त्याच्या आशा पल्लवीत झाल्या.
सात वर्षांपूर्वी, घटस्फोट घेण्याआधी संजय व त्याची पत्नी याच तक्रारीसाठी एका मनोविकारतज्ज्ञांकडे गेले होते. त्यांनी या गोष्टी कधीच समजावून सांगितल्या नाहीत. या उलट ‘‘तू तुझ्या पत्नीच्या लंगिक गरजा पूर्ण करण्यात अपुरा पडतोस. तिला याचा त्रास होतो. तरी तू तिला मुक्त कर.’’ असा सल्ला त्यांनी संजयला दिला होता.
आज इतक्या वर्षांनी संजयला भेटलेल्या या नवीन डॉक्टरांनी एक नवीन आशा संजयमधे जागृत केली होती. डॉक्टर म्हणाले, ‘‘रवीच्या इंद्रियाबाबत तू विनाकारण बाळगलेली काळजी उद्या रवीमध्ये स्वत:बाबत न्यूनगंड निर्माण करण्यास कारणीभूत होऊ शकते. आई-वडिलांचे शब्द, त्यांची मतं मुलांवर खोल परिणाम करत असतात. आई-वडिलांच्या शब्दावर लहान मुलांची गाढ श्रद्धा असते. तुझ्या मनात असलेली निराधार भीती, काल्पनिक काळजी, शंका व संशय तू नकळत मुलावर लादशील. एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती व खात्री असल्याशिवाय त्याची वाच्यता मुलांसमोर करू नये. मोठय़ा वयात अनेक व्यक्तींमध्ये दिसून येणारे अनेक भयगंड व न्यूनगंड अनेक वेळा केवळ आई-वडिलांच्या अज्ञानातून किंवा पूर्वग्रहातून उपजलेले असतात.’’
संजयला डॉक्टरांच्या बोलण्यातलं मर्म व गांभीर्य दोन्ही दिसून आलं. स्वत:च्या अज्ञानामुळे व पूर्वग्रहांमुळे मुलांवर विपरीत संस्कार करणाऱ्या पालकांची संख्या अगदी शहरांमध्येही आज खूप मोठी आहे. निष्पाप, निरागस मुलं फार श्रद्धेने पालकांच्या शब्दांवर विश्वास ठेवतात. पूर्वीच्या मानाने या काळातल्या मुलांना इंटरनेटच्या माध्यमातून खूप लवकर योग्य माहिती मिळू लागते. अर्थातच, पूर्वी पालकांनी दिलेली माहिती किती अर्धवट किंवा चुकीची होती हे ध्यानात यायला त्यांना आजकाल वेळ लागत नाही. अशामुळे पालकांवर असलेल्या विश्वासालाच तडे पडतात. पालकांबद्दल केवळ अविश्वासच नव्हे तर कधी अनादरसुद्धा त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. हा अनादर मग अनेक प्रकारे नात्यांमधे गुंते, क्लेश व संघर्ष निर्माण करू लागतो. याची अनेक उदाहरणं आजकाल घराघरात दिसू लागली आहेत.
सर्व बाबतीत आई-वडिलांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या विद्रोही, बंडखोर तरुण मुला-मुलींचं प्रमाण आजकाल खूप वाढत चाललेलं आहे. ‘तुम्ही आम्हाला अज्ञानात ठेवलेत, तुम्ही आम्हाला चुकीची माहिती दिली.’ अशा परखड विधानांपासून ते आई-वडिलांचे टोकाचे अपमान करणाऱ्या मुलांची बरीच प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. पालकांबरोबर शिक्षकांनाही मुलांनी केलेल्या अशा आक्रमणाला आजकाल सामोरं जावं लागत आहे. या गोष्टीला आळा घालण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच ‘स्वत:च्या ज्ञानाचं सातत्याने आधुनिकीकरण करत राहाणं’. स्वत:च्या मर्यादित अशा बौद्धिक व शैक्षणिक पात्रतेमुळे जर ते शक्य नसेल तर त्याची प्रांजळ कबुली देण्यात पालकांनी कधीच कमीपणा मानू नये. पण असं न करता उलट आपण सर्वज्ञ आहोत व आपल्याला जणू काही सर्व काही माहिती आहे, असा दांभिक पवित्रा काही पालक घेतात. तिथेच चूक होते. ‘‘आपली आई अशिक्षित असली तरी ती प्रामाणिक, प्रांजळ व प्रेमळ आहे. तिला सर्व प्रकारचं ज्ञान नसेल पण ती चौकस, समंजस व उत्साही आहे’’.. बेताचं शिक्षण झालेल्या आईचं किंवा वडिलांचं असं आदरपूर्वक वर्णन करणारी मुलंही काही दुर्मीळ नाहीत.
संजयच्या मुलाची तपासणी करून त्याच्या देखतच व त्याला कळेल अशा स्पष्ट शब्दात तो पूर्णपणे ‘नॉर्मल’ आहे व त्याच्यात कसलीही कमतरता नाही हे सांगून डॉक्टरांनी छोटय़ा रवीचंसुद्धा एकप्रकारे समुपदेशनच केलं होतं. त्याचा योग्य परिणाम झाला. स्वत:ची वैयक्तिक भेट घेऊन संजय जेव्हा घरी परत आला तेव्हा तो येताच लहानग्या रवीने अत्यंत सूचकपणे स्वत:हून त्याला एक गोष्ट सांगितली, ‘‘मला हे नवीन डॉक्टर खूप आवडले.’’
मुलं खूप संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असतात. स्वत:बाबतच्या शंकेबरोबरच वडिलांना वाटत असलेली काळजी रवीने ओळखली होती. ‘आपण ठीक आहोत, माझी काळजी करू नका’ हे सूचित करणारं व वडिलांनाच दिलासा देणारं रवीचं हे छोटं वाक्य संजयला खूप काही सांगून गेलं.
वरील घटना ही पूर्णपणे सत्य व बारा वर्षे जुनी आहे. गोपनीयतेच्या उद्देशाने नावं मात्र बदलली आहेत. वाचकांना वाचून आनंद वाटेल की या घटनेनंतर वर्षभरात संजयने पुनर्वविाह केला व आज संजय एक सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. रवीला सात वर्षांची एक लहान बहीण आहे व आज एकवीस वर्षांचा रवी एका नामांकित पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे.
rajanbhonsle@gmail.com
chaturang@expressindia.com