आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे सगळ्यांना आवडणाऱ्या सोप्या बेक्ड करंज्या आणि तिखट-मिठाचे नमकपारे. यंदाच्या दिवाळीतला हा डाएट फराळ..
मा झं लग्न दसऱ्याच्या दिवशी झालं. मधुचंद्राहून परत येईपर्यंत दिवाळी उजाडली. स्वयंपाकाची मला आधीपासूनच आवड होती. शिवाय रोजचे पदार्थ करायची सवय होतीच; थोडे-फार बेकिंगसुद्धा करून माहीत होते. परंतु दिवाळीचा फराळ कधीच केला नव्हता, किंबहुना फराळाचे पदार्थ करायला मला उगीच भीती वाटायची. घरातल्या स्त्रियांना विविध स्वरूपाचे पाक करताना मी पहिले होते आणि ‘एवढं अवघड काम आपल्याला नक्कीच जमणार नाही’ म्हणून त्याच्याकडे कधी लक्ष दिले नव्हते. सुरुवात कशी करायची आणि काय करायचे हे सुचेना. माझ्या सासूबाई ओल्या नारळाच्या अतिशय उत्कृष्ट करंज्या करतात- बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि ओलसर. त्यांच्या पिढीच्या नव्वद टक्के मराठी बायकांप्रमाणे त्यादेखील दिवाळीच्या कित्येक दिवस आधीपासून तयारीला लागतात. शंकरपाळे, करंज्या, चकल्या आणि चिवडा आवडीने बनवतात आणि घरातल्या लोकांना डबे उघडण्यापासून थांबवायचा प्रयत्न करत त्यांची दिवाळीची तयारी सुरू होते.
अखेर, दिवाळीचा दिवस उजाडला की आम्ही सगळे एकत्र येतो आणि दिवाळीच्या फराळाची आमचीच एक ‘पॉटलक पार्टी’ करतो. तिन्ही घरातल्या बायकांनी केलेला फराळ मांडला की घर लहानसं दुकान आहे की काय असं वाटू लागतं. त्या दिवशीची न्याहारी म्हणजे विविध प्रकारचे लाडू, चिवडे, करंज्या आणि त्या वर्षी प्रयोग करून पाहिलेला एखादा नवीन पदार्थ. या फराळाची न्याहारी मला अगदी नवीन होती. माझ्या आईकडे दिवाळीचा फराळ बशीच्या एका बाजूला असे; मूळ पदार्थ तिखटा-मिठाचा असे- बहुदा इडली किंवा सांजा. फराळाला एवढे महत्त्व असेल हे मला ठाऊक नव्हते!
लग्नानंतरची पहिली दिवाळी मी एक चिवडा आणि नारळाची वडी असे दोन साधे-सुधे पदार्थ करून भागवली. मग पुस्तकं वाचून आणि प्रयोग करून करून, जरा लाडू-साटोरी करणे जमू लागले. बेकिंग आणि स्वयंपाकाचे क्लास घेऊ लागल्यापासून मला अशा कित्येक तरुणी भेटल्या ज्यांना फराळाचे पदार्थ करून पाहायची इच्छा होती, पण त्यात असणारे भरपूर तेल-तुपाचे प्रमाण पाहून त्या घाबरायच्या. त्यांची समस्या मी समजू शकते. आपल्या आजी-आजोबांच्या तुलनेत आपली स्थिती वेगळी आहे. पूर्वीचे लोक सहज दोन-तीन करंज्या, एखादं-दुसरा लाडू, बशीभर चिवडा-शेव इत्यादी एकाच वेळेला खाऊ शकत असत. आज आपण विचारदेखील
आणखी एका गोष्टीमुळे आपण घरी फराळ बनवायला घाबरतो. पिढीजात चालत आलेल्या पाककृती कठीण आणि वेळखाऊ आहेत असा आपला समज आहे. ऑफिस ते घर ट्रॅफिकशी लढून, दमल्यावर पाक करायला आणि तळणीच्या कढईसमोर उभं राहायला आपल्यात ना शक्ती असते ना उत्साह. त्यात आई-आजी अंदाजाने प्रमाण सांगतात. हा अंदाज त्यांच्या स्वयंपाकघरात अगदी बरोबर ठरतो, पण आपल्या स्वयंपाकघरात फक्त फजिती होते. अशा परिस्थितीत बाहेरून फराळ आणणे सोपे ठरते. अर्थात बाहेरून आलेल्या, डालडा घातलेल्या फराळाला घरच्या साजूक तुपाचा सुंदर, खमंग वास नसतो. घरी केलेल्या फराळात असलेले प्रेम नसते. शेवटी दिवाळी म्हणजे काय, एकत्र येणे, आपल्या चांगल्या तब्येतीला ‘सेलिब्रेट’ करणे. या सगळ्यात बाहेरचा फराळ बसतो का? एखादा पदार्थ तरी घरी करावा असं मला वाटतं. मग तो एखादा सोपा पदार्थ असला तर काय हरकत आहे, असा विचार करून मी या दोन पाककृती तयार केल्या- पारंपरिक चवीच्या आणि तरीदेखील करायला सोप्या. आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे दोघांना आवडणाऱ्या. या दिवाळीत सोप्या करंज्या आणि तिखटा-मिठाचे नमकपारे करूनच पाहा- आपल्या माणसांना आपण केलेली एखादी वस्तू खायला द्या आणि ती अगदी परफेक्ट जरी झाली नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा आणि त्या तेजात दिवाळी उजळ करा!
उत्सव दिव्यांचा : फराळाची मांदियाळी
आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या; लहान-मोठे सगळ्यांना आवडणाऱ्या सोप्या बेक्ड करंज्या आणि तिखट-मिठाचे नमकपारे. यंदाच्या दिवाळीतला हा डाएट फराळ..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2012 at 03:24 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festival food diwali faral