दीपोत्सव म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. गडद अंधाराला भेदण्याची क्षमता प्रकाशाच्या एका बारीकशा किरणातही असते. त्यामुळे अमंगल, नकारात्मक, अंधाराचा नाश करणाऱ्या दिव्याचे पूजन करणाऱ्या दिवाळीत दिव्यांची आरास करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या पारंपरिक मातीच्या पणत्यांऐवजी आता अरोमा मेणबत्त्या, सोया वॅक्स, टी लाइट्स, विविध आकाराच्या, सुगंधी, रंगीबेरंगी मेणबत्त्या असे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. आधुनिक काळात पणतीचे स्वरूप कितीही बदलत असले, तरी गाभा मात्र तोच, तेजाचा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळी आली की अभ्यंगस्नान, सुगंधी उटणं, रांगोळीची सजावट हे सर्व मुख्य घटक प्रथेनुसार आलेच, पण या सणाला वातावरणातील चैतन्य खुलवण्याचे काम करते ती इवलीशी पणती. या दिवसांत ठिकठिकाणी पणत्यांची सुरेख आरास पाहायला मिळते. दिवाळीतल्या या पणत्यांसंदर्भात माझी एक विशेष आठवण आहे. दिवाळीच्या दिवशी सांजवेळी देवळातल्या आवारात सगळीकडे लावलेल्या असंख्य पणत्या, आणि त्यांच्या मंद उजेडात गूढ गंभीर वाटणारे ते मंदिर. काळ्या निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर पणत्यांनी उजळलेला दीपस्तंभ आणि पणत्यांच्या तेजाने प्रकाशलेलं वातावरण. अशी अलौकिक, पणत्यांच्या गर्भरेशमी उजेडातली संध्याकाळ ही आतादेखील प्रत्येक दिवाळीत माझ्या मनात साकार होत राहाते.

हेही वाचा – सांदीत सापडलेले…! मैत्री

देवळात या पणत्या लावण्यासाठी काही दिवस आधीपासून गावकरी गडबडीत असतात. देवळाचे आवार स्वच्छ करणे, पणत्या, वाती, तेल गोळा करणे आणि इतर कामांचीदेखील वाटणी झालेली असते. प्रत्यक्ष दिवाळीच्या दिवशी दुपारपासूनच वाती आणि तेल घालून या पणत्या आवारात मांडल्या जातात. सगळे कठडे, मोकळ्या जागा, गर्भगृहासमोरची जागा, दीपस्तंभ सगळीकडे दिवे ठेवून होतात. सांजवेळ झाली की, देवासमोर दिवा लावून मग या पणत्या उजळायला सुरुवात केली जाते. लहान लहान मुलं आपापल्या आजी-आजोबांचा हात धरून देवळात येतात आणि ते दिवे उजळायला मदत करतात. इतक्या पणत्या असतात की, सगळ्या लावून होईपर्यंत सुरुवातीच्या पणत्यांमधलं तेल कमी होतं. काही जण ते तेल पुन्हा भरायला घेतात. सगळी लगबग आणि तरीदेखील शांत, समाधानी वातावरण ही एक वेगळीच अनुभूती त्यावेळी येते.

देवळात हा प्रकाशोत्सव साजरा करायच्या आधीच्या दिवसापासूनच घराघरांतदेखील दारासमोर रांगोळी घालून दरवाजासमोर, घराबाहेर, व्हरांड्यात पणत्या ठेवून देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. घराघरांत धनधान्य, संपत्ती आणि आरोग्य लाभू देत अशी प्रार्थना केली जाते. दीपज्योति: परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन:। दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते।। ही दिव्याची ज्योत म्हणजेच परब्रह्म आहे; हा प्रकाश सगळ्या जगातली दु:खे दूर करणारा परमेश्वर आहे आणि माझ्या मनातल्या पाप आणि अंधाराचा नाश करणाऱ्या दिव्याला माझे नमन असो, असे मनोभावे प्रार्थिले जाते. हा दीपोत्सव भारतभरात उत्साहात आणि विविध प्रकारे साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत शरयू नदीच्या काठी आणि नदी घाटावर हजारो पणत्या लावल्या जातात. वाराणसीमध्ये असंख्य तरंगणारे दिवे मनोभावे गंगा नदीच्या पात्रात सोडले जातात. ओडिशामध्ये दिवाळीच्या काळात देवळासमोर रात्री मशाली पेटवून पूर्वजांची प्रार्थना केली जाते. भाषा वेगळ्या, प्रथा वेगळ्या पण जाणिवा मात्र जोडलेल्या. आपल्या संस्कृतीत दीप किंवा दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी दिवे आणि पणत्या उजळून सणवार, उत्सव साजरे करण्याची आपली प्रथा आहे म्हणूनच हा तेजाचा उत्सव, प्रकाशाची आराधना पुढच्या पिढीच्या मनात रुजवणे हा आपल्या परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता जसजसा काळ बदलतोय तशीच ही मंद तेवणारी इवलीशी पणतीदेखील बदलतेय. कधी तिला आधुनिक साज मिळतो, तर कधी वेगळंच काहीतरी रूप घेऊन ती समोर येते. पण गाभा मात्र तोच, तेजाचा!

या पणत्या आपल्याला दिवाळीत दिसत असल्या, तरी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या पणत्या तयार करण्याचे काम मात्र काही महिने आधीपासूनच सुरू झालेले असते. पूर्वी पणत्यांचा आकार अगदी साधा असायचा. दिवाळीच्या आधी बाजारातून मातीच्या पणत्या आणून पाण्यात भिजवून, वाळवून ठेवायच्या. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून दारासमोर, बाल्कनीमध्ये तेजाळायच्या. मगच खरोखरीची दिवाळी सुरू झाली हे कळतं. पूर्व भारतात तर तूप आणि वाती घातलेले दिवेच मिळतात, घरी आणून लगेच लावता येतात. या मातीच्या दिव्यांबरोबरच पूर्वी काही घरांसमोर पाण्यातले कलात्मक दिवेदेखील असायचे. एका ग्लासमध्ये रंगीत पाणी घेऊन त्यावर हळुवारपणे तेल ओतायचं. हे तेल पाण्यावर तरंगतं. मग त्यात तरंगणारी एक वात घालून दिवे पेटवायचे. पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांचं अनेकांना अप्रूप वाटायचं.

गेल्या काही वर्षांत मातीच्या पणत्या तयार करणाऱ्या कलाकारांच्या हातून पणतीचा साधा, नेहमीचा आकार बदलत गेला. त्याऐवजी त्यांना फुला-पानांचा, पक्ष्यांचा आकार मिळाला. त्या विविध आकारांच्या पणत्यांवर रंगरंगोटी चढली आणि त्या वर्षी सगळीकडे रंगीत पणत्या दिसायला लागल्या. मग केव्हातरी त्यावर खडे, मोती, मणी यांची सजावट झाली. सध्या मातीच्या रंगाच्या पणत्या आधुनिक रूपात समोर आल्या आहेत. पाच ज्योतींचे, एकावर एक थर असणारे अनेक मातीचे दिवे आता सहज मिळतात आणि त्यांना खूप मागणी असते.

अनेकदा असं होतं की, कितीही काळजी घेतली तरी तेल खाली येतंच आणि सगळी जमीन, तेलकट होते. मग त्यावर अनेक उपायदेखील उपलब्ध झाले. मग एक उलटी पणती आली. तिच्यात खालून तेल भरून तिला सुलट करायची, तेल अजिबात सांडत नाही, जादूच जणू! अलीकडे दिसणारा एक नवा प्रकार म्हणजे दगडी दिवे. खरं तर ही आपलीच प्राचीन कला. त्याला नव्या रुपात आणून साताऱ्याच्या ‘माणदेशी फाऊंडेशन’ने गरजू स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने असे दगडी दिवे करून घेतले आहेत. या स्त्रियांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. हे अगदी वेगळे दिसतात आणि त्यात वात लावण्याची वेगळी व्यवस्थादेखील आहे.

गोमयापासून (गायीच्या शेणापासून) केलेले दिवेदेखील उपलब्ध झाले आहेत. हे दिवे एखाद्या पणतीमध्ये किंवा ताटलीत ठेवून लावावे लागतात. त्यात आरोग्यदायी वनस्पती आणि धूपदेखील असल्याने त्यांचा एकत्रित सुंगध वातावरण तेजोमय करून टाकतो. अनेक गोशाळांमधे असे दिवे विक्रीला उपलब्ध असतात.

काही वर्षांपूर्वीपासून मेणाचे इवलेसे दिवेदेखील मिळायला लागले आहेत. अॅल्युमिनियमच्या पातळ वाट्यांत तयार केलेले हे मेणाचे दिवे वापरायला एकदम सोपे आहेत. त्यामुळे त्यांचा सहजच घरात प्रवेश झाला. त्यांना ‘टी लाइट्स’ असे गोंडस नावदेखील आहे. ‘टी लाइट्स’ नुसतेच एखाद्या सुरेख सजवलेल्या पणतीमध्ये ठेवून दारासमोर ठेवता येतात आणि चिकटपणा न येता सुरेख दिसतात. हे टी लाइट्स पाण्यावर तरंगतात. त्यामुळे चकाकणाऱ्या तांब्या-पितळेच्या मोठ्या घंगाळात पाणी घालून त्यात टी लाइट्स आणि फुलांची सजावट करून घरात आणि दारासमोर ठेवले जाते. ते घंगाळं खूपच सुंदर दिसतं.

हेही वाचा – ‘भय’भूती: मम भय कोण वारिते?

सोनेरी रंगाच्या हलक्या धातूच्या मेण घातलेल्या पणत्यादेखील आजकाल मिळतात. त्यातही अनेक आकार आणि प्रकार असतात, त्यावर सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, सुकवलेली पाने इत्यादी टाकून सजवले जाते. अलीकडे भिंतीवर टांगता येतील, असे टी लाइट्स स्टँडदेखील मिळायला लागले आहेत. वरून सोडलेल्या एलईडी दिव्यांच्या माळा, भिंतीवर लावलेले टी लाइट्स आणि खाली ठेवलेल्या मोहक पणत्या अशी सुरेख सजवलेली घरातली किंवा घरासमोरची भिंत ही नक्कीच आपले लक्ष वेधून घेते.

खरं तर मेणबत्ती म्हटलं की, अगदी अलीकडेपर्यंत आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे वीज नसताना वापरायची पांढरी मेणबत्ती आणि केकवर लावायची रंगीत आकडेवाली मेणबत्ती. पण आता मेणबत्त्या म्हणजे फक्त अंधार दूर करण्यासाठी लावलेली पांढरी मेणबती हा विचार जाऊन सुंदर विविध आकार आणि प्रकारातल्या, भेट देण्यासाठी योग्य, घरात आणि घरासमोर लावण्यासाठी म्हणून असंख्य प्रकार उपलब्ध होत आहेत. खनिज तेलाचे मेण हानिकारक असल्याने आणखी वेगळे पर्याय शोधण्यात आले.

सर्वात नवीन आणि अगदी अलीकडे वापरात आलेले मेण म्हणजे वनस्पतीजन्य तेलांवर प्रक्रिया करून त्यापासून तयार केलेले मेण. यात सोयाबीनपासून तेल काढले जाते आणि त्यावर प्रक्रिया करून त्याचे मेण अर्थात ‘सोया वॅक्स’ तयार केले जाते. या मेणाचे फारसे दुष्परिणाम नसल्यामुळे हे ‘सोया वॅक्स’ आता मान्यता पावत आहे. शिवाय ‘दाणेदार वॅक्स पावडर’ हा एक नवाच पर्यायदेखील आला आहे. त्यात मेणबत्त्या साचे न वापरता नुसत्या दाणेदार पावडरवर विशिष्ट प्रकारची वात ठेवून ती ज्योत लावता येते. या मेणामध्ये विविध प्रकारची सुवासिक तेले वापरून मंद, शांतता देणारा सुगंध तयार करता येतो. आजकाल घरात वापरासाठीसुद्धा अशा ‘अरोमा मेणबत्त्यां’ना मागणी आहे.

दिवाळीत नुसत्या पणत्याच नाही, तर सुंदर विविध आकार आणि प्रकारातल्या, भेट देण्यासाठी योग्य अशा मेणबत्त्यादेखील आता मिळतात. गुलाबाची किंवा इतर आकाराची फुले, पाने, देखावा, खाद्यापदार्थ आणि मिठायांच्या आकाराच्या मेणबत्त्या अशा अनेक प्रकारच्या मेणबत्त्या तयार केल्या जातात. मोतिचूर लाडू, काजुकतली, मोदक, रसमलाई अशा मिठाईच्या रूपातल्या मेणबत्त्यांना यावर्षी खूप मागणी आहे. या मेणबत्त्या अगदी हुबेहूब खाद्यापदार्थांसारख्याच दिसतात. अनेक तरुण, नवनवीन कलाकार आपापली कल्पनाशक्ती वापरून अतिशय कलात्मक, सुबक मेणबत्त्या तयार करत आहेत, आणि अनेक नवीन उद्याोजकही या व्यवसायात उतरत आहेत. या विविध मेणबत्त्या तयार करण्यासाठी लागणारे साचे स्वत: तयार करणं, हवा तो पोत मिळण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढणं हे सगळे या कलाकारांना फार आनंद देतं. सुरेख, रंगीबेरंगी आकारातील या मेणबत्त्या पाहून त्या तयार करणाऱ्या कलाकाराच्या कलेला नक्की दाद द्यावीशी वाटते.

हे कलाकार उद्योजक आपली कला फेसबुक, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर टाकून त्यातून आपला व्यवसाय वाढवतात. आजकाल दिवाळीत कॉर्पोरेट गिफ्टिंग किंवा जवळच्या लोकांना भेटवस्तू म्हणून या कलात्मक मेणबत्त्या निवडल्या जातात. त्यात हवे असलेले बदल करून हव्या तशा आकाराच्या भेटवस्तू करून घेतल्या जातात. आज हा मेणबत्ती व्यवसाय कलात्मकतेच्या वाटेवर चालत खूप सुंदर प्रवास करतोय.

थोडक्यात, घरासमोर पारंपरिक पणत्या लावा किंवा या आधुनिक युगातल्या सजवलेल्या मेणबत्त्या वापरा किंवा एलईडी लाइट्स. तेजाचे पूजन करण्याची आपली प्रथा अबाधित आहे.

जेव्हा सूर्य अस्ताला गेलेला असतो त्यावेळी एक छोटीशी पणतीदेखील नवीन आशा द्यायला पुरेशी असते असे सांगणारा हा दीपोस्तव आहे. या अशा दीपावली उत्सवातून प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार त्या तेजोमय प्रकाशाचे हे दान पुढील पिढीला देत जातो. वाईट, अमंगल अशा तिमिराचा नाश करून आनंदरूपी प्रकाश पुढच्या पिढीलादेखील मिळू देत, हेच एक मागणे या तेजोत्सवात आहे.

swapnalim@gmail.com