डॉ. हृषीकेश रांगणेकर

प्रत्येक पिढीची दिवाळी वेगळी. प्रत्येक पिढीचं आयुष्य वेगळं. बाप-लेकीच्या संवादातून उलगडणारं हे दोन पिढय़ांचं जगणं.. दोघांनाही समृद्ध करणारं!

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार

रोग जडलाय फोटो काढण्याचा प्रत्येकाला इथं.
हाव सुटलीये ज्याला-त्याला जो-तो क्षण
मोबाइलमध्ये कॅप्चर करण्याची.
फोटो दाखवल्याशिवाय कुणी विश्वासच ठेवायला
तयार नाहीये कुणावर!
जणू नाही काढला फोटो तर देईलच कुणी सुळावर!
सुग्रास जेवण समोर आलं की
तोंडाला पाणी सुटत नाहीये आजकाल..
त्याऐवजी मोबाइलमधला कॅमेरा सोकावतोय
वारं पिऊन उधळलेला झालाय बघ भवताल.
‘कधी एकदा सगळय़ांना सांगू’
असं होऊन गेलंय सगळय़ांना..
ऐकून कुणी घेतच नाही
सांगतच सुटलेत सगळे सगळय़ांना!
००००
मान्य डॅड! आम्ही आहोत जरा जास्तच एक्स्ट्राव्हर्ट..
जो-तो मोमेंट आम्ही जगतोही आणि पसरवतोही!
आवडतं आम्हाला शेअर करायला..
तुम्हाला नको इतकंही केअर करायला!
लाइफ एकच आहे, जगून घेताहोत भरभरून!
‘कनेक्टेड’ राहून शिवाय मोकळेही राहतो वरून!
००००

हेही वाचा : निवडू आणि वाचू आनंदे..

सेल्फी काढले जाताहेत भसाभस..
मानेला झटके देऊन, भुवयांना आळोखेपिळोखे देत,
तोंडाचे चंबू करत, डावा किंवा उजवा डोळा घालत.
आणि ओतले जाताहेत बदाबदा सगळय़ांच्या स्क्रीन्सवर.
डिलीट करण्यातच डी-लिट् मिळेल कित्येकांना..
सेल्फीस्टिक हाच आधार आहे आजच्या तरुणांना!
००००
डॅड, जग जिंकायचं खूळ मुळी आमच्यात नाही
प्रेमाचं वजन जगातल्या कुठल्या काटय़ात नाही!
जगावर प्रेम करायला नक्की काय करता येईल? तर,
स्वत:वर प्रेम केलं की जगावरही करता येईल!
‘सेल्फी’ आमचे ते क्षण संपूर्ण जगणंच नसतं, तर
मित्रांना पाठवणं अन् उद्यासाठी साठवणंही असतं!
००००
‘‘आमच्या काळात असं नव्हतंऽऽ
आमच्या काळात असं नव्हतंऽऽ’’
हेकेखोर टुमणं हे मी लावणार नाही बेटा..
हेही तितकंच खरं की
‘आमच्या काळात असं नव्हतं’
हे खोटं आहे अशातलाही काही भाग नाही!
००००

हेही वाचा : आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

डॅड चिल, तुमचा काळ होता! ओके!
आमचा काळही असेल ओक्के-में-टोक्के!
म्हणणे हेच विनोदी भारी, की
‘आमच्या काळचाच’ नॉस्टाल्जिया भारी!
००००
उदाहरणार्थ पोरी, काळी आमच्या,
केली कुणी उधळमाधळ, झाली चुकून सांडलवंड,
म्हणत त्याला टोचून, ‘दिवाळी आहे काय?’
किंवा मग ‘झालीय कसली इतकी घमेंड?’
दिवाळी हा सणांचा निर्विवाद राजा होता..
तोरणं, सनई-चौघडे, बेंडबाजा होता!
००००
दिवाळी आजही सणांचा राजाच आहे, डॅड
गतकातरतेत मात्र आम्ही होत नाही मॅड किंवा
गेलाबाजार सॅड!
सण ऑर नो-सण, आम्ही कधीही चिल करतो
खातोपितो एन्जॉयतो, बिल भरतो!
००००
हॅलोविनपासून ते वेगवेगळे ‘डे’ज् ‘सेलिब्रेट’ करणं सोड,
असं काही असतं हे गावीही नव्हतं.
दिवाळी तेव्हाची ही ‘दिवाळी’ होती.
बिलीव् ह मी
‘अप्रूप’ नावाची गोष्टच आगळीवेगळी होती!
‘थोडक्यात सुख’, ‘आहे त्यात समाधान’,
‘पांघरूण पाहून हातपाय’ यातच जीवनाचं सार होतं..
दिवाळीतल्या पणतीसारखं तेज सौम्यगार होतं.
००००

हेही वाचा : आदरणीय श्रीपु..

डॅडा, एका क्लिकवरती मिळतो आम्हाला पिझ्झाही,
टीव्ही, वॉशिंग मशीन, घर, बाइक,
पासपोर्ट आणि व्हिसाही!
हॅप्निंग अश्या या जगात समोर मिष्टान्नांची थाळी आहे
खरं सांगू? रोजचाच दिवस आमच्यासाठी दिवाळी आहे!
सेलिब्रेट करतो आम्ही असणं आयुष्याचं
देखण्या आयुष्याच्या देखणं दिसण्याचं!
००००
चातकाच्या चोचीने आम्ही दिवाळीची वाट पाहत असू..
साळीन्दराच्या काटय़ासारखे
नवीन कपडे अंगावर मिरवीत असू..
सहामाही परीक्षेनंतरची दिवाळीची सुट्टी
दोन्ही हातांनी ओरबाडीत असू..
भुईनळे, भुईचक्र, टिकल्या, फुलबाज्या, आपटीबार,
लवंगी, पानपट्टी, डबलबारपासून लक्ष्मी अॅ टमबॉम्बपर्यंत
काय काय फोडत, वाजवत असू.
बेटा, तेव्हाच्या धुराला पोल्युशनचा वास नसे.
जाळ अन् धूर, दोन्ही अगदी निरागस निरागस असे.
००००
डॅड, सॉरी टू से, पण निरागसतेपेक्षा
तुम्ही अज्ञानात सुखी होता..
आवाज, धूर, फटाके, कचरा अँड व्हॉट नॉट!
मला सांगा..
एन्वायरन्मेंटबद्दल तुम्ही कितीसे जागरूक होता?
ग्लोबल वॉर्मिग, सगळय़ाचंच प्रदूषण,
समुद्राची पातळी आणि वितळत्या ग्लेशिअर्सचा वाढता रेट
अकाली पूर, अचानक वणवे आणि बदलतं ऋतुचक्र
हीच का आमच्या पिढीला तुमची भेट?
००००
चकल्या, चिवडे, शंकरपाळय़ा, अनारसे,
करंज्या आणि शेव
पोरी.. हे सगळं अगदी र्खरखुरं असे!
नेटवरचे फोटो फॉर्वर्ड करून कुणाचंच पोट भरत नसे.
००००
विथ डय़ू रिस्पेक्ट डॅड, दिवाळीचा फराळ टेस्टी
असतोच, नो डाऊट
पण जागतिक क्विजिनचा आस्वादही घेते आमची पिढी!
आमच्या वेगवेगळय़ा डाएट्सला ‘फॅड’ तुम्ही म्हणता
प्रयोग करत, धडपडत, शिकत आम्ही पुढे जातो
हे तुम्ही कधी बघता?
००००
दिवाळीला आम्ही कधी मामाकडे जातसू,
कधी मावशीकडे
कधी काका घरी येई, कधी आत्याकडे जाणे होई!
आजीआजोबांना नातवंडांची भेट,
मुलांना समस्त भावंडांची भेट.
लांबचे पाहुणे, जवळचे रावळे यांच्यासोबत फराळ असे
पत्ते, क्रिकेट, दिवाळी अंक, फटाके,
रांगोळय़ा, आकाशकंदील..
सगळी नुसती बहार असे, धमाल असे, वातावरणात
एक खुमार असे!
भेटीही पोरा, होत तेव्हा अगदी खऱ्याखुऱ्या बरं का!
‘व्हर्च्युअल’ तेव्हा आमच्यासाठी फक्त ‘स्वप्न’ हेच असे.
००००
प्रत्यक्ष भेटीचं महत्त्व मी नाकारत नाही ना डॅड
पण वेगवेगळय़ा व्हाट्सॅप ग्रुप्सनीच तुम्हीही
तुमच्या शाळा-कॉलेजच्या मित्रांशी कनेक्ट झालात
की नाही?
व्हिडीओकॉलमुळेच आपण ताईचं परदेशातलं घर
पाहू शकतो की नाही?
मित्र माझे, डॅड, विविध देशोदेशी आहेत!
त्यांच्याशी मैत्र ही माझी ठेव खाशी आहे.
टेक्नॉलॉजीशी हात मिळवण्यातच ‘समृद्ध’ आम्ही झालो..
‘भेट खरी की व्हर्च्युअल?’ याच्या कधीच पुढे गेलो!
००००

हेही वाचा : दखल: लढाऊ वृत्तीची कहाणी

काळातली आमच्या
दिवाळी म्हणजे दिवाळी म्हणजे दिवाळी होती
तुमची आणि आमची आतासारखी वेगवेगळी नव्हती!
दिवाळीच्या आगमनापूर्वी लागत असे
पंखे, भिंती, फर्निचरला फडकं
गावाकडचं घरही सजून, सारवून
सडा रांगोळय़ांनी होतसे बोलकं!
चिमुकल्या हातांनी आम्ही तेव्हा
बांधत, सजवत असू किल्ला
एकोप्याची एक भावना होती नांदत
घर असो, गल्ली की कुठलाही मोहल्ला!
००००
डॅड, रेंगाळणे, उगाळणे, थबकणे
याने वेग आमचा मंद होतो.
वाढत्या वेगासरशीच खरं तर
आम्ही लोक धुंद होतो.
राहता राहिला प्रश्न घराच्या साफसुफीचा
क्लिनिंग सर्विसची अॅयप्स असता
सांगा, फुकटचा लोड कशाला घ्यायचा?
००००
संस्कृती, संस्कार, इतिहास, परंपरा
महत्त्व याचंही आहेच बेटा..
००००
डॅड, सारासारबुद्धीने पटेल ते घेण्यात
भूतकाळाच्या ‘ओझ्या’चा कमी होईल रेटा!
००००
लक्षात ठेव, उभी असते पिढी तेव्हा
खांद्यांवर जुन्या पिढय़ांच्याच,
नव्या पिढीचे पाय असतात.
बालेकिल्ला बनतो तेव्हाच
अनेक कातळ-पत्थर जेव्हा आधी किल्ला बनतात.
००००
डॅड, नम्र होता दिसतोच आम्हाला
लाभलेला आम्हा भक्कम पाया,
सांगा तुम्हीच, तुम्हा आवडेल काय?
खालची मान? की वरची नजर, क्षितिज कवेत घ्याया?
००००
म्हणणं तुझं पटलं पोरी,
ये जवळ, भेट कडकडून!
००००
पाय माझे राहू दे जमिनीवरी
आशीर्वाद द्या, भेटते तुमच्या पाया पडून..
dr. rangnekar@gmail.com