कितीही ठरवलं लवकर निघायचं तरी नाहीच लवकर निघणं होत. सध्या कामाची इतकी गडबड आहे की, रोजच रात्री घरी यायला उशीर होतोय. मग झोपायलाही उशीर. पण स्वत:चे पसे मिळवण्याची मजा काही औरच आहे आणि ‘कॅम्पस’मध्ये निवड झाल्यामुळे तर मी अगदी खूशच आहे. जाम भारी वाटतंय. जॉब लागून सहा महिने झालेसुद्धा…
उद्या मस्त शनिवार आहे. उद्या आणि परवा रविवारी मला खरंतर गाण्याचा रियाझ करायचाय, पण आई करू देईल की नाही कुणास ठाऊक. सध्या ती मला गृहकृत्यदक्षतेचे धडे देत असते, कारण आता म्हणे माझं लग्नाचं वय झालंय! मी २५ वर्षांची झाले म्हणजे आता लग्न मस्टच, असं तिचं मत. कुणी ठरवलं हे लग्नाचं वय? केवळ माझं शिक्षण झालं आणि जॉब लागून मी त्यात स्थिरावले की झालं लग्नाचं वय? मला लग्न करावंसं वाटतंय का, याचा विचार कुणाच्याच मनात का नसतो?
मला एका गोष्टीची खूप गम्मत वाटते.. इतकी र्वष आई आणि मी अगदी बेस्ट फ्रेण्ड होतो. पण आजकाल आईच्यातला आणि माझ्यातला संवादच हरवलाय. आमच्यातल्या कुठल्याही संवादाचा शेवट माझ्या रडण्यातच होतो. सगळ्याचा विलक्षण त्रास होतोय. आई आणि मी पूर्वी किती गप्पा मारायचो! पण आता मात्र…
तसंही मुळातच मला त्या कुठल्यातरी विवाह मंडळात नाव घालायचं आणि त्या याद्या पाहायच्या (आता इंटरनेटवर) ही प्रोसेसच आवडत नाही. किती इरिटेटिंग आहे हे सगळं! बरं विवाह मंडळात नाव घालायचा विषय निघाल्याबरोबर तो फोटो साडीतलाच पाहिजे याबद्दल इतकी आग्रही होती आई! मला समजतच नाही, आई अशी का वागते ते! काय होतं तिला अचानक? इतके दिवस किती मस्त वातावरण होतं घरात. पण आता सगळं ढवळूूनच निघालंय! आणि ते माझ्या लग्नाच्या विषयामुळे, हे कळल्यावर तर जास्तच वैताग येतोय मला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा