१९ मेला आम्हाला अमेरिकेतल्या कॉन्सुलेटकडून ‘सेल्फी’ नाटकाचा प्रयोग करण्यासाठी मान्यतेचं पत्र मिळालं. ही ‘नोटीस ऑफ अ‍ॅप्रूवल’ ईमेलद्वारे मिळाल्याबरोबर व्हिसाच्या इंटरव्हूसाठी आम्ही तारीख मागितली. सुदैवाने म्हणा किंवा पूर्वपुण्याईच्या जोरावर आम्हाला लगेचच ३१ मे २०१६ ही तारीख मिळाली. ज्यामुळे ५ जूनच्या प्रयोगाला आम्ही पोहोचू शकत होतो. पण.. अज्ञेय, अमेय नियतीचा प्रत्यय आम्हाला यायचा होता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राधिका विद्यासागरचे कुटुंबीय अमेरिकेत बॉस्टनला रहातात. त्यांनी तिथल्या महाराष्ट्र मंडळाला सुचवलं म्हणून फेब्रुवारी २०१६ च्या सुरुवातीला अमेरिकेतील बॉस्टन महाराष्ट्र मंडळाच्या शिल्पा कुलकर्णीचा फोन आला. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होऊ शकतात का याची चौकशी त्यांनी केली. नाटकातले कलाकार तिथे घेऊन जायचे आणि नाटक तिथे सादर करायचं म्हणजे खूपच खर्चीक काम. फक्त एकाच मंडळाने प्रयोग करणं तर अशक्यप्राय. कारण जवळजवळ १५ हजार डॉलर्स खर्च येऊ शकतो. एका प्रयोगासाठी जी रक्कम प्रेक्षकसंख्या आणि प्रायोजकांकडून वसूल करणं म्हणजे शिवधनुष्य उचलणं आहे. अशा वेळी इतर मंडळांच्या सहकार्यानं एखाद्या नाटकाचे किमान आठ प्रयोग केले तर होणारा सगळा खर्च आठ मंडळांमध्ये विभागला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मंडळावरचा भार हलका होऊ शकतो. उरलेल्या सात मंडळांचा शोध सुरू झाला तो यातून.

डेट्रॉइट येथील महाराष्ट्र मंडळातर्फे पुढील वर्षी २०१७ मध्ये मोठं संमेलन भरवलं जाणार आहे. या मंडळाचे हर्षद अनिगेरी माझ्या संपर्कात होते. त्यांनी ‘अलिबाबा’च्या प्रयोगांमध्ये रस दाखवला. मे २०१६ मध्ये ‘अलिबाबा’चे प्रयोग करायचे ठरवले तर आणखी किती मंडळांचं सहकार्य लाभेल याची चाचपणी आम्ही सुरू केली. राले येथे राहणारा मंदार बर्वे आमच्या आंतरनाटय़ संस्थेतला तसंच वेस्ट कोस्टला सिअ‍ॅटलमध्ये सक्रिय कार्यरत असलेला मोहित चिटणीस आणि सुभग ओक यांनी प्रचंड उत्साह दाखवून तयारीला सुरुवातही केली. बे एरियातील मुकुंद मराठे, अजय चित्रे यांनी आपापली चाचपणी सुरू केली. न्यू जर्सीमध्ये मराठी प्रेक्षक संख्येने जास्त आहेत. तिथे विलास सावरगावकर नावाचं एक रसायन राहातं. उत्साह आणि आत्मविश्वास याचं जबरदस्त मिश्रण या माणसात आहे. नितीन जोशी, आशीष चौगुले यांसारख्या मित्रांनीही पाठिंबा दिला. पण..

‘अलिबाबा..’मध्ये आहेत सात कलाकार. त्यात भर दोन तंत्रज्ञांची. म्हणजे एकूण संच नऊ जणांचा. या नऊ जणांचा प्रवास खर्च आणि अंतर्गत आदरातिथ्याचे प्रश्न जटिल होऊ लागले. त्यात किमान आठ प्रयोग करावे लागणार म्हणजे या कलाकारांना किमान एक महिना आपापली इथली कामं सोडून अमेरिकेत राहावं लागलं असतं. हे सगळे लोकप्रिय कलाकार फार फार तर दहा दिवस आपल्या आधीच्या कमिटमेंटस सोडून वेळ देऊ शकत होते. ज्या दहा दिवसांमध्ये तिथल्या मंडळांना केवळ चार किंवा फार फार तर सहा प्रयोग करता येऊ शकले असते, जे आर्थिकदृष्टय़ा परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे ‘अलिबाबा’चा अमेरिका दौरा रहित करावा लागला आणि कल्पना पुढे आली माझ्याच दुसऱ्या नाटकाच्या दौऱ्याची.. आणि ‘व्हॉटस अ‍ॅप’वर एक ग्रुप तयार केला, ‘सेल्फी इन अमेरिका.’

३ ऑक्टोबर २०१५ ला शुभारंभ झालेलं ‘सेल्फी’ नाटक प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. मानांकने, पारितोषिकं, यामुळे ते अमेरिकेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे तिथल्या मंडळांना ‘सेल्फी’ पाहायचंच होतं. पण ‘अलिबाबा’ रद्द होईपर्यंत बराच कालावधी निघून गेला होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मे २०१६ मध्ये प्रयोग करणं आयोजनाच्या दृष्टीने कठीण झालं असतं. त्यामुळे आता तारखा ठरल्या जूनमधल्या. पण तारखा बदलल्यामुळे निराळेच प्रश्न निर्माण झाले. ज्या मंडळांबरोबर आधी बोलणी झाली होती त्यांचे इतर कार्यक्रम जूनमध्ये ठरले होते. काही मंडळांकडे त्या कालावधीत सभागृह उपलब्ध नव्हते. या अडचणीमुळे शिल्पा, मोहित आणि हर्षद पुन्हा एकदा कामाला लागले आणि संदीप बेलखोडे (ऑस्टिन), राहुल रेगे, अतुल देवल (अटलांटा), संग्राम भोसले (न्यूयॉर्क) आणि लॉस एंजलिसचे माझे मित्र शैलेश शेटय़े व संजीव कुवाडेकर यांना शेवटच्या क्षणी येऊन मिळाली ह्य़ूस्टनची धडाकेबाज मेघा ओझरकर! आणि ‘सेल्फी’चे प्रयोग ठरले.. ५ जून पासून २९ जूनपर्यंत!

हे सर्व करत असतानाच मार्च- एप्रिलमध्ये व्हिसा आणि तिकिटांसाठी धावपळ सुरूच होती. तिकिटांसाठी वीणा पाटील, सुनिला पाटील यांचा भक्कम आधार मिळाला. पण सर्वात मोठा प्रश्न होता वेळेवर व्हिसा मिळण्याचा. अमेरिकन कॉन्सुलेटचे नियम अत्यंत कडक असतात. अशा प्रकारच्या प्रयोगासाठी परफॉर्मन्स व्हिसा काढावा लागतो. ज्यासाठी अनेक कागदपत्रं, सादर करून त्यांची छाननी करून घ्यावी लागते. अमेरिकेतील सर्वच मित्रांनी जेवढं जमेल तेवढं सहकार्य करून तिथल्या वकिलातर्फे तिथल्या कॉन्सुलेटला परवानगीसाठी अर्जसुद्धा (पिटिशन) दाखल केला. तिथल्या कलाकार संघटनेचे (आर्टिस्ट गिल्ड)चं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं. ते मिळवण्यासाठी थोडा वेळ गेला पण १९ मे २०१६ ला आम्हाला तिथल्या कॉन्सुलेटकडून प्रयोग करण्यासाठी मान्यतेचं पत्र मिळालं. ही ‘नोटीस ऑफ अ‍ॅप्रूवल’ ईमेलद्वारे मिळाल्याबरोबर व्हिसाच्या इंटरव्हूूसाठी आम्ही तारीख मागितली. खरं तर इथल्या कॉन्सुलेटमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे तारीख त्वरित मिळणं कठीण असतं. पण सुदैवाने म्हणा किंवा पूर्वपुण्याईच्या जोरावर आम्हाला ३१ मे २०१६ ही तारीख मिळाली. ज्यामुळे ५ जूनच्या प्रयोगाला आम्ही पोहोचू शकत होतो.

पण.. या मुलाखतीसाठी जायला आमच्याकडे १९ मे रोजी जारी झालेली ‘नोटीस ऑफ अ‍ॅप्रूवल’ची प्रत्यक्ष प्रत असणं आवश्यक होतं आणि ती तिथल्या वकिलाकडून आम्हाला किमान २७ मेला मिळायलाच हवी होती. कारण २८, २९ शनिवार, रविवार असल्यामुळे इथली कुरिअर सव्‍‌र्हिस बंद होती. तसेच ३० मे अमेरिकेचा मेमोरियल डे असल्यामुळे कॉन्सुलेट बंद होती. म्हणजे सगळी मंजुरी मिळूनही ते कागद प्रत्यक्ष इथे पोहोचले नसते तर सगळंच मुसळ केरात गेलं असतं. मंडळांनी सभागृहे आरक्षित केली होती, विमानांच्या तिकिटांची तयारी झाली होती. पण त्यांचा काहीच उपयोग झाला नसता. १९ मेला नोटीस जारी झाली, पण प्रत्यक्ष प्रत तिथल्या कॉन्सुलेटकडून कॅलिफोर्नियातील आमच्या वकिलांकडे पोहोचली २६ मेला. कुरियरने ती इथे २९ पर्यंत पोहोचणं गरजेचंच होतं. अशा वेळी तंत्र आणि आधुनिक साधनं यापेक्षाही महत्त्वाची ठरली माणुसकी आणि मैत्री!

मी एक निरोप फ्लॅश केला. अमेरिकेहून मित्र किंवा नातेवाईकांपैकी कुणी शनिवार २८ पर्यंत भारतात येतंय का? ऑस्टिनच्या संदीपचा सहकारी संजय जाधव शुक्रवारी २७ ला निघून न्यूयॉर्कमार्गे मुंबईला शनिवारी पोहोचणार होता. आता त्याच्यापर्यंत ही कागदपत्रं पोहोचणार कशी? कारण ती होती कॅलिफोर्नियात, म्हणजे अक्षरश: दुसरं टोक. विलास सावरगावकरने शक्कल लढवली. त्याने कॅलिफोर्नियातले पेपर्स न्यूयॉर्कला मागवले. दरम्यानच्या काळात संजय ऑस्टिनहून न्यूयॉर्कला पोहोचला. विलास ताबडतोब निघाला आणि मिळालेले पेपर्स घेऊन पोहोचला थेट न्यूयॉर्क  एअरपोर्टला आणि अखेर त्याने संजयकडे ते पेपर्स सुपूर्द केले. यातली गंमत अशी की आम्ही कुणीच एकमेकांना ओळखत नव्हतो. बंध फक्त एकच. मराठी नाटकाबद्दलचं, भाषेबद्दलचं प्रेम! मला वाटलं चला, झालं काम, आता उद्या आपल्या हातात कागदपत्रं आली की झालं. पण नाटकापेक्षाही रोमहर्षक घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडतात..

संजय जाधव न्यूयॉर्कहून निघाला आणि विमानात तांत्रिक बिघाड झाला म्हणून त्याचं विमान दोन तासाच्या प्रवासानंतर पुन्हा न्यूयॉर्ककडे वळवण्यात आलं. आता मात्र आम्ही सगळेच चिंताग्रस्त झालो. कुणाचीच काही चूक नव्हती. आणि काही करणं कुणाच्याच हातात नव्हतं. आता त्याचं विमान कधी निघणार किंवा पुढची फ्लाइट कधीची काहीच कळायला मार्ग नव्हता. दुसऱ्या दिवशी अक्षरश: फ्लाइट ट्रॅकर या अ‍ॅपकडे डोळे लावून बसलो. ठरलेल्या नवीन वेळेनुसारसुद्धा फ्लाइट निघेचना. संपर्क केला तेव्हा कळलं त्या विमानात खानपान सामुग्री वेळेवर न पोहोचल्यामुळे अजून थोडा विलंब. म्हणजे शनिवारी पोहोचणारं विमान रविवारीही पोहोचू शकत नव्हतं. मंगळवारी ३१ ला आमचा इंटरव्हू. आता अजून काही घडलं असतं तर? सोमवारीसुद्धा संजय पोहोचला नाही तर? फेब्रुवारीपासून जूनपर्यंत सर्वानीच केलेली मेहनत, नावलौकिक धुळीला मिळाला असता. पण मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे रसिकांचं प्रेम आणि पूर्वपुण्याई! संजय सोमवारी संध्याकाळी मुंबईत भेटला. हुश्शऽऽ! त्याच्याकडून पेपर्स मिळवले आणि टीम सेल्फी मंगळवारी इंटरव्हू  देऊन व्हिसा मिळवू शकली..

५ जूनला आमचा प्रयोग होता. ऑस्टिन टेक्सासमधलं एक टुमदार शहर. प्रयोगाआधी दोन दिवस पोहोचलो होतो. अमेरिकेमध्ये नाटकाच्या दृष्टीने जिकिरीचं काम असतं. नेपथ्य उभारणी आणि तांत्रिक बाजू सांभाळणं. भारतातील कुशल माणसं आपल्याला तिथे नेता येणं आर्थिकदृष्टय़ा परवडण्यासारखं नसतं. त्यामुळे नाटकाचे फोटो आणि नेपथ्याचा आराखडा तिथे आधी पाठवायचा आणि प्रत्येक शहरातल्या हौशी नाटकवाल्यांनी त्याप्रमाणे नेपथ्य उभारणी करायची असं ठरलेलं असतं. ऑस्टिनला ही जबाबदारी घेतली होती संदीप बेलखोडे, सुजीत पाटील आणि अमोल पत्कीने. मनात धाकधूक होतीच. काय केलं असेल या मंडळींनी? पण प्रयोगाच्या आदल्या दिवशी त्यांची तयारी पाहिली आणि काळजीचं ओझं कमी झालं. नाटकाची हौस किती दांडगी असते याचा प्रत्यय त्यानंतर प्रत्येक शहरातल्या या हरहुन्नरी आणि मेहनती कार्यकर्त्यांमुळे आला. मूळ नेपथ्याच्या जवळ जाणारं नेपथ्य उभारण्यासाठी किती खटपटी लटपटी करतात ही मंडळी. अटलांटाला राहुल रेगे, चंदन गोखले आणि शार्दूल म्हसकरने स्वत:च्या गॅरेजमध्ये खपून उत्तम सेट बनवला. न्यूयॉर्कमध्ये एकदम वेगळाच अनुभव. तिथला सेट डिझाइनबरहुकूम होता, पण त्याचा ‘लुक’ एकदम वेगळा. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सामानातून त्यांनी सेट उभा केला होता. दिसायला मूळ सेटपेक्षा पूर्णपणे भिन्न असणाऱ्या या सेटवर नाटक करणं हा एक वेगळा अनुभव!

न्यूयॉर्कची आठवण म्हणजे तिथे असताना आम्हाला मिळालेली एक महत्त्वाची बातमी. इथे ‘सेल्फी’ हे अ. भा. नाटय़ परिषदेचं सवरेत्कृष्ट नाटक ठरलं आणि तिथे सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आलं. तिथे संग्राम भोसले, रवी- तेजा गवाणकर, किनी प्रभाकर यांना जणू काही त्यांच्याच नाटकाला पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद झाला. आणि अर्थातच शँपेन उघडून तो साजराही करण्यात आला.

न्यूयॉर्क ते बॉस्टन हा प्रवास म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. कारण हा प्रवास आम्ही केला रेल्वेने. या व्यतिरिक्त अमेरिकेतला सर्व अंतर्गत प्रवास आम्ही रस्ते किंवा हवाई वाहतुकीने केला. या ट्रेन – प्रवासात जी अमेरिकेतली थोडीफार कंट्री साइड दिसली ती लाजवाब होती. वाफाळलेले कॉफीचे मग्ज आणि आपण चित्रपटात पाहिलेली पँट्री कार. व्वा! क्या बात है!

बॉस्टनला आम्ही उतरलो होतो. ‘अ‍ॅक्टन’च्या शिल्पा- जीतेंद्र कुलकर्णीच्या घरी. जीतेंद्रला ‘साऊंड’शी खेळण्याचा छंद. त्यामुळे त्याने नाटकासाठी उत्तम दर्जाची साऊंड सिस्टिम जमवून ठेवली आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. पण पठ्ठय़ा श्रीनिवास सानेला सेट उभा करण्यातही हातभार लावायला मागेपुढे पाहत नव्हता. डेट्रॉइटला ही जबाबदारी घेतली होती आरती नेवाळकरने. आता एक मुलगी/ स्त्री सेट कसा उभा करणार? मला वाटलं तिथे गेल्यावर आपल्यालाच काही हालचाल करावी लागणार. पण काय आश्चर्य. आरती अगदी शांतपणे आणि नेमकेपणाने काम करत होती. तिच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांकडून छोटी छोटी काम करवून घेत तिने दोन तासात थिएटरवर सेट सहज उभा केला आणि आम्ही निश्चिंत झालो.

अमेरिकेत बऱ्याच वेळा तुम्हाला एखाद्या शाळेच्या सभागृहात नाटक सादर करावं लागतं.  ही सभागृहं तशी आपल्या थिएटरसारखीच सुसज्ज असतात. अशाच एका सभागृहात ह्य़ूूस्टनला आमचा प्रयोग झाला. सुनील पेंडसे, समित गोखले आणि अमोल डोंगरकर या तरुणांनी आधुनिक यंत्रसामाग्रीचा वापर करत नाटकाच्या सेटमध्ये वजनाने अत्यंत हलक्या अशा वस्तूंचा वापर करत आपली कल्पकता दाखवली. सिअ‍ॅटलचा सुभग ओक तर आपला मुंबईचा नाटकवाला. त्याच्या कामामध्ये सफाई होतीच आणि जुनं ते सोनं करून दाखवण्याची चलाखीसुद्धा. ही सगळी मंडळी तिथे आपल्या व्यक्तिगत व्यवसायात विशिष्ट स्थान प्राप्त करून बसलेली प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे आहेत. पण नाटक करायचं म्हटल्यावर एलएच्या गेल्या वर्षीच्या बीएमएमचे संयोजक असलेले शैलेश शेटय़े, संजीव कुवाडेकर, सुदेश, रक्षित, शशिकांत हे सगळेच अगदी अर्धी चड्डी घालून हातोडा घेऊन, घाम गाळत नेपथ्य उभारणीसाठी झटले. या आणि त्यांच्याबरोबरच्या असंख्य कार्यकर्त्यांमुळेच ‘सेल्फी’ दणक्यात साजरं झालं. त्यांची नाटकाच्या प्रति असलेली आवड आणि कलाकारांबद्दल असलेलं प्रेम शब्दात मांडणं अवघड आहे.

या सर्वाच्या आणि अर्थातच ‘सेल्फी’मधल्या कलाकारांच्या, सुकन्या कुलकर्णी, ऋजुता देशमुख, पूर्वा गोखले, शिल्पा नवलकर आणि सोनाली पंडित यांच्या अथक परिश्रमामुळे आठही शहरांत उत्तम प्रतिसाद मिळत गेला. प्रत्येक प्रयोगानंतर तिथल्या प्रेक्षकांशी संवाद साधताना नवीन काहीतरी मिळत गेलं. एका शहरात नाटक पाहून एक स्त्री प्रेक्षक म्हणाली, ‘‘स्वत:कडे वळून बघायला शिका, असं सांगणारं हे नाटक मला खूप काही देऊन गेलं. जे आहे ते स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी आणि ते मान्य करण्याचा मोकळेपणा आपल्यामध्ये यायला हवा. ती शक्ती आज मला मिळाली आहे. माझ्या मुलीने तिच्याच एका मैत्रिणीबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी मला सागून घेतला. पण मी तो कुणाला सांगत नव्हते. आज ‘सेल्फी’ पाहिल्यावर इथे सगळ्यांसमोर  हे मोकळेपणाने मी प्रथमच जाहीर करते आहे.’’

एका नाटकाला, दिग्दर्शकाला, कालाकाराला यापेक्षा आणखी काय हवं असतं, नाही का? असो. पण ‘सेल्फी’च्या यशस्वी अमेरिका दौऱ्याच्या पडद्यामागे जे घडलं ते चित्तथरारक होतं एवढं नक्की. राधिका विद्यासागरच्या पुढाकाराने सुरू झालेला ‘अलिबाबा इन अमेरिका’ हा प्रोजेक्ट तिच्याशिवाय ‘सेल्फी इन अमेरिका’ झाला. नियती अशी असते- अज्ञेय, अमेय!

अजित भुरे

निर्माता, दिग्दर्शक,अभिनेता

ajitbhure13@gmail.com