प्रतिभा वाघ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपले अनुभव व आजूबाजूला जे पाहातो ते मनात साठवण्याचे आणि कलाविष्कारातून साकारण्याचे स्त्रियांना जणू उपजत कौशल्यच लाभले आहे. मग ही कला भरतकाम वा चित्रकलेपासून पाककलेपर्यंत कोणतीही असो. राज्यात आणि बाहेरही ठिकठिकाणी काम करणाऱ्या स्त्री कलाकारांनी विविध माध्यमांत असे प्रयोग केले आहेत. त्यांना गणपतीचे जे रूप भावले ते त्यांनी नव्या माध्यमांतून समोर आणले. अशा काही कलाकार स्त्रियांनी साकारलेल्या या लोभसवाण्या गणेश प्रतिमा! यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने..
सातत्याने नावीन्याचा शोध घेणे हा स्त्री-स्वभावच आहे. म्हणूनच नवीन फॅशन आणि नवीन पाकक्रियाच नव्हे, तर कल्पकतेला वाव देणाऱ्या अगदी कोणत्याही विषयात ती रममाण होते. गणपतीच्या उत्सवात तर स्त्रियांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसतो. घराघरांतील स्त्रियांना बाप्पाच जणू कलानिर्मिती करायला प्रोत्साहन देत असतो. गणपतीची आरास, रांगोळय़ाच नाहीत, तर स्वयंपाकातील मोदकसुद्धा. हाताने मोदक बनवणे हेही कलाकृती निर्मितीसारखेच वाटते मला! सुंदर, नाजूक समान पाकळय़ांचे पांढरेशुभ्र आवरण, आतील बाजूस असलेले केशरी छटेचे पिवळसर सारण.. सुंदर आकार, सुंदर रंग. सारेच कलात्मक!
गणेशोत्सवात स्त्रिया इतरही अनेक सर्जनशील कलाकृती बनवत असतात. काही जणी गणेशमूर्ती बनवतात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यावसायिक मूर्तीनिर्मिती क्षेत्रात मूर्तिकार स्त्रिया आपल्या गणेशमूर्तीवर निगुतीने हात फिरवताना पाहिल्या की स्त्रीत्वातून त्यांच्यात उतरलेली ममता आणि त्याची सर्जनाला मिळालेली जोड, हेच दिसते. याव्यतिरिक्तही काही स्त्री कलाकार वेगवेगळय़ा माध्यमांत प्रयोग करत आहेत. या प्रयोगांतून मिळालेल्या सफलतेमुळे त्याचे व्यवसायात झालेले रूपांतरही पाहायला मिळते आहे. या सर्व जणी कला महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्याच आहेत असेही नाही. अनेक जणी केवळ एक आवड म्हणून याकडे वळल्या आणि त्यातून सुंदर कलारचना निर्माण झाल्या. येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण गणपतीच्या विविध माध्यमांमध्ये साकारलेल्या कलाकृती पाहू या. गणपती एकच, मात्र तो विविध माध्यमांत कसा सजतो, हे पाहाणे आनंदाचे आहे. ‘कोटि कोटि रूपे तुझी’ हे वर्णन गणपती बाप्पालाही शोभून दिसावं, इतक्या अनंत रूपांत, माध्यमांत आपण त्याला पाहिलं आहे.
अपेक्षा देवळेकर या वाणिज्य शाखेच्या पदवीधर. मुलाला छंदवर्गात शिकवलेला कागदाच्या लगद्याचा गणपती पाहून त्याही तो करायला शिकल्या. त्यात त्या इतक्या पारंगत झाल्या की पूर्वी करत असलेली नोकरी सोडून हाच व्यवसाय म्हणून स्वीकारला. त्या कागद पाण्यात भिजवून त्याचा लगदा तयार करतात. त्यात माती, गोंद, दगड बारीक करून मिसळतात. हे तयार झालेले मिश्रण साच्यात भरून ठेवतात. पुढची व मागची बाजू असे त्याचे दोन भाग असतात. दोन दिवस हा लगदा वाळायला लागतात आणि नंतर ते दोन्ही भाग जोडून रंगवतात. पंचवीस मूर्ती बनवणाऱ्या अपेक्षा यांनी या वर्षी १२५ मूर्ती बनवल्या आहेत. परदेशातही त्यांच्या गणेशमूर्तीना मागणी आहे. वजनाला हलक्या असणाऱ्या या कागदी लगद्याच्या (पेपरमॅश) मूर्ती पर्यावरणाचे रक्षण करतात. पती अरुण देवळेकर यांच्या पाठबळामुळे आपण या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे ‘आकार पॉट आर्ट’मध्ये टेराकोटापासून सुंदर कलात्मक वस्तूंची निर्मिती केली जाते. येथेच मला आशा पाटेकर ही बारावी उत्तीर्ण झालेली तरुणी भेटली. चित्रकला आणि रांगोळीमध्ये गती असलेली. त्यात काही प्रमाणपत्रेही मिळवलेली हसरी आणि मेहनती मुलगी. गावातील मुलांना हस्तकौशल्यामधून निर्मितीचा आनंद आणि पुढे उपजीविकेचा मार्गही मिळावा, या उद्देशाने हे युनिट राजेश कुलकर्णी यांनी सुरू केले आहे. टेराकोटा म्हणजे भाजलेली माती. गावातील मातीमध्ये गुजरात, वाराणसी येथील माती मिसळून उत्तम माती तयार करतात, त्यामुळे सफाईदारपणा येतो. आधुनिक पद्धतीच्या भट्टीमध्ये ती माती भाजतात. ‘आकार’मध्ये लहानमोठय़ा आकाराच्या गणेशमूर्तीही बनवल्या जातात. छोटय़ा गणेशमूर्ती पूर्णपणे हाताने बनवण्याचे काम आशा करते. दिवसभरात ती वीस गणपती बनवते. ‘मायक्रो गणपती’देखील ती बनवायची. या कामाचे वैशिष्टय़ असे, की ते काचेच्या भिंगातून पाहावे लागतात. वाद्य वाजवणारे, पुस्तक वाचणारे असे विविध आविर्भावातील आकर्षक गणपती आशा कौशल्यपूर्णतेने बनवते. ‘आकार’मध्ये आल्यावर ती सहकाऱ्यांकडून हे काम शिकली. आता मात्र नवीन येणाऱ्या उमेदवारांना ती आत्मविश्वासाने शिकवतेही. कलेची आवड जात्याच असेल तर नवनवीन प्रयोग स्त्री कलाकार करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजेच ही आशा नरेश पाटेकर.
स्वाती साबळे या चित्रकला विषयात ‘एम. ए.’ असून त्यांनी ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ पूर्ण केले आहे. सातत्याने कला प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या स्वाती यांना राज्य पुरस्कार आणि ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी कॅनव्हासवर चित्रित केलेल्या गणेशाबद्दल त्या म्हणतात, ‘‘धागा धागा अखंड विणू या- यातील बोलमात्रांची घट्ट वीण कलाकारांच्या बाबतीतही आहे. कॅनव्हास चित्रकाराचा ईश्वर आहे. कॅनव्हासवर चित्रकार स्वयंभू आकार उमटवतो, म्हणूनच जाडसर दोरा हे माध्यम निवडून मी कॅनव्हासवर गणरायाचे रूप साकारले आहे.’’ हे गणेशाचे रूप जुन्यापुराण्या मंदिरातील असल्याचा भास त्याच्या रंगसंगतीमुळे होतो. दोरा आणि कागद हे वेगळे माध्यम वापरून हा आगळा प्रयोग करण्यात स्वाती यशस्वी झाल्या आहेत.
कुंभार कला जशी प्राचीन आहे तशीच काचेवरील चित्रे (रिव्हर्स पेंटिंग- उलटय़ा बाजूवर केलेली चित्रे) ही प्राचीन कला आहे. काच या माध्यमावर काम करणाऱ्या सुमन यांनी जी. डी. आर्ट पेंटिंग पूर्ण केले असून त्या २००६ पासून स्टेन्ड ग्लास रिस्टोरेशन आर्टिस्ट आहेत. सुमन वाढय़े यांनी भायखळा (मुंबई) येथील ग्लोरिया चर्च, फोर्टमधील यहुदी प्रार्थनास्थळ आणि सिंगापूरमधील चर्चमध्ये असलेल्या काचचित्रांना नवे जीवन दिले आहे. सध्या त्या ‘ग्लास स्टुडिओ’शी जोडलेल्या आहेत. समकालीन चित्रकाराने पारंपरिक चित्रकलेच्या संपर्कात राहायला हवे, अशा विचारातून त्या ग्लास पेंटिंग करतात. या कामाची पद्धती वेगळी आहे. चित्राचे रेखाटन कागदावर उलटे छापून घेतात. हा कागद काचेखाली ठेवतात आणि नेहमीच्या चित्रपद्धतीत ज्या गोष्टी शेवटी करतात त्या इथे प्रथम कराव्या लागतात. उदा. चेहरा असेल तर कुंकू, नाकातील नथ, भुवई, डोळय़ांचे तपशील उदा. डोळय़ांतील चमक (हायलाइट) दाखवणारा तीव्र प्रकाश, हे आधी रंगवून ते वाळल्यावर चेहऱ्याच्या कांतीचा रंग लावला जातो. मागील बाजूस रंग लावल्याने ते पाण्याने किंवा तीक्ष्ण वस्तू लागून निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर मागील बाजूच्या कडेने गोंद लावून पूर्ण काच झाकली जाईल अशा पद्धतीने कागद चिकटवला जातो किंवा इनॅमल रंगाचा पातळ थर दिला जातो.
मूळची परभणीची असलेली रसिका लाटणे ही तरुण शिल्पकार सासवणे येथील शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर यांची शिल्पे पाहून अतिशय प्रभावित झाली आणि तिने सर जे. जे. कला महाविद्यालयात शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. येथून डिप्लोमा झाल्यावर सांगलीतील कलाविश्व महाविद्यालयातून ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ पूर्ण केले. तीही वेगवेगळय़ा माध्यमांत प्रयोग करते आणि त्यात यशस्वीही होते. तिने फायबरमध्ये बनवलेला गणपती दगडी शिल्पाचा आभास निर्माण करतो. या पद्धतीत प्रथम ‘क्ले’मध्ये गणपतीची मूर्ती घडवून त्याचा साचा तयार करावा लागतो. रेझिन, हार्डनर, कोबाल्ट, शंखजीरा पावडर, काचेपासून बनवलेली चटई असे साहित्य लागते. या साहित्याचे मिश्रण करून तीन पायऱ्यांमध्ये हे काम केले जाते. फायबर या माध्यमात दगड, संगमरवर, लोखंड, तांबे अशा कोणत्याही माध्यमाचा परिणाम साधता येतो. इतर माध्यमांच्या तुलनेत कमी वेळात काम पूर्ण होते. फायबर वजनाने हलके असते. यात बनवलेली कलाकृती हलकी असते. रसिका सांगली येथील आपल्या स्टुडिओत शिल्पनिर्मितीचा पुरेपूर आनंद घेते.
जी. डी. आर्ट स्कूलच्या विद्यार्थिनी वर्षां खरटमल या मूळच्या सातारच्या. त्या पुण्यातील आपल्या स्टुडिओमध्ये कलानिर्मिती करत आहेत. आजवर त्यांची वीस सांघिक कला प्रदर्शने झाली असून दोन एकल चित्रप्रदर्शनेही झाली आहेत. त्या सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांतून आपली चित्रे प्रदर्शित करत असतात. ओघवती रेषा, अलंकारिकता ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत. वर्षां या मूक असून आपल्या चित्राकृतींतून थेट आणि सुंदर संवाद साधतात. जलरंग आणि अॅक्रॅलिक या माध्यमांत काम करणाऱ्या वर्षां यांनी वेगळय़ा माध्यमात प्रयोग करून पाहिला आहे. विविध पोत आणि विविध नक्षी असलेल्या कापडांचा त्यांनी कलानिर्मितीसाठी प्रयोग केला आहे. दोन हात असलेल्या या गणेशाचे रूप दैवी न दाखवता मानवी दाखवून तो भक्ताच्या जवळ सहज जाऊन एकरूप होईल असे वाटते. वर्षां खरटमल या पाच राष्ट्रीय पुरस्कार व दोन राज्य पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.
हर्षदा कोळपकर यांनी ‘जी. डी. आर्ट’ आणि ‘डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन’ अभ्यासक्रम पूर्ण केले असून पुणे येथील स्टुडिओमध्ये त्या कलानिर्मिती करतात. लँडस्केप आणि स्केचिंग या विषयात त्यांनी पुरस्कार मिळवले आहेत. त्यांचा अनेक कला प्रदर्शनांत सहभाग असून कला शिबिरांनाही उपस्थिती असते. कॅनव्हास व अॅक्रॅलिक रंगांत त्या चित्रनिर्मिती करतात. अनेकदा कोकण हा विषय त्यांच्या चित्रांतून डोकवतो. त्यांनी कोकणातील गणपती साकार करताना मिश्र माध्यमाचाही प्रयोग केला आहे. नारळ, करवंटी, खोबरे, नारळाची शेंडी यांच्या साहाय्याने सुपात स्थानापन्न झालेला हा गणपती. पार्श्वभूमीला पितांबराचा पिवळा रंग त्या वापरतात, तर गणपतीच्या प्रिय दुर्वा उन्नती आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून वापरतात. मोजक्या रंगांचा वापर करून पर्यावरणाचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न सफल झाला आहे.
जे. जे.मधून पेंटिंगचा डिप्लोमा घेतलेल्या कला पटनाईक या राज्य पुरस्काराच्या मानकरी आहेत. आपल्या कलानिर्मितीसाठी कला यांनी निवडलेले माध्यम आहे मेण. मेणाचे हुबेहूब खाद्यपदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. इडली, फालुदा, बटाटा वडा, पावभाजी, थालीपीठ, असा मेनू त्यांच्याकडे सतत तयार असतो.. पण मेणामध्ये बनवलेला!
मेणापासून विविध कलात्मक वस्तू आणि मेणबत्त्या कशा बनवाव्या, हे गेली ४५ वर्षे त्या शिकवतात. हजाराहून अधिक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकले आहेत. मेण हे माध्यम हाताळायला कठीण आहे. ६० ते ७० डिग्री तापमान असताना त्यावर कोरीव काम करावे लागते. थंड झाले तर ते अशक्य होते. थंड झाल्यास पुन्हा ती वस्तू गरम, पातळ मेणात बुडवून त्वरित थंड पाण्यात घालावी लागते. रंगीत मेण बनवण्यासाठी त्या वॅक्स क्रेयॉनचे रंग वापरतात. मेणाचा गणपती बनवण्यासाठी एका चौकोनी डब्यात मेणाचा साचा तयार करून आवश्यक तेथे कोरीव काम केले जाते. मेण कोरताना ते सुकले की त्याचे पापुद्रे सुटू लागतात आणि आकार बिघडण्याची शक्यता निर्माण होते. परंतु त्यांच्या या प्रयोगातून एका वेगळय़ा माध्यमातील साध्या आकाराचा गणपती सुंदर साकार झाला आहे.
अस्मिता पोतदार या कोल्हापूरच्या कलाकार १९८८ मध्ये ‘जी. डी. आर्ट’ उत्तीर्ण झाल्या. भरतकामातील सुंदर कलाकृती हे त्यांचे वैशिष्टय़. राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून परदेशात त्यांच्या भरतकामातील कलाकृती संग्रहित आहेत. भरतकामाचे विविध विषयांवरील चित्राकृतींचा संग्रह असलेले ‘जतन’ हे कलासंग्रहालय २०२३ मध्ये कोल्हापुरातील गुलाबनगर येथे सुरू करण्याची त्यांची योजना आहे. अस्मिता यांनी गणपतीची प्रतिमा कोलाज पद्धतीने बनवली आहे. यातील त्यांचे माध्यम आहे बांगडीच्या काचांचे तुकडे. पिवळा, केशरी, तपकिरी, निळा अशा विविध रंगाचे आणि लांबीचे तुकडे कौशल्यपूर्ण पद्धतीने मांडून गणरायाचे लोभस रूप त्यांनी सादर केले आहे.
मध्य प्रदेशातील उमरिया येथील लोढा गावात बैगा आदिवासी संतोषीबाई बैगा यांनी लाकडी ओंडक्याला गणेशमुखाचा आकार देऊन त्यावर सुंदर रंगसंगतीत रंगवले आहे. कोणत्याही कलाशाळेत न गेलेल्या या आदिवासी स्त्रिया सतत निसर्गाच्या सहवासात असतात आणि निसर्गच त्यांना कळत-नकळत शिकवत असतो. अगदी लहान वयात रूपा बैगा हिलादेखील वाळलेल्या दुधी भोपळय़ाच्या आकारात गणेश दिसला आणि सुंदर पद्धतीने तिने तो रंगवला.
गणेशाचे रूप इतके कलात्मक आहे, की सतत नावीन्याचा शोध घेणाऱ्या स्त्रियांना तो कलानिर्मितीची प्रेरणा देतो. मग त्या शहरातील असोत वा दाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या असोत! या केवळ कलारचना नाहीत. कलेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहात तिची विविध रूपे जाणून घेण्याचा, त्यांना आपल्या कल्पक बुद्धीची जोड देऊन नवे रूप साकारण्याचा हा एक आविष्कारच. गणेशाच्या या लोभस प्रतिमा पाहाताना, तुमच्याही मनात कुतूहल जागृत होवो, आणि यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमच्याही हातून नव्या माध्यमात गणेशरूप साकारले जावो, ही सदिच्छा!
plwagh55@gmail.com