साठी-पासष्टी आली तरी निवृत्तीचे विचार फारसे मनात न आणणारे अनेक ‘तरुण’ आपल्याला अवतीभवती दिसतात. ‘अभी तो मैं जवान हूँ’ म्हणत जगण्याचा आनंद घेत राहतात. हा आनंद वृद्धिंगत करण्याचा एक मार्ग म्हणजे सतत काही तरी शिकणं. कुणी नव्याने कॉम्प्युटर, इंटरनेट शिकतो, तर कुणी फेसबुक, ट्विटर नाही तर ‘व्हाट्स अप’ शिकून घेतात. कुणी आजी तर ड्रायव्हिंगही शिकायला जातात, तर कुणी इंग्रजीचे क्लासेस लावतात. तर कुणी पदवी घेतात, कु णी पीएच. डीसाठी बसतात, कुणी आजोबा एखाद्या पाककृतीचा प्रयोग करून नातवंडांना खूश करतात. कुणी गाणं, बागकाम शिकतं. किंवा यापेक्षा काही वेगळाच अनुभव घेतात. तुम्ही अलीकडे काय नवीन शिकलात किंवा वेगळं काही करून पाहिलंत का? कसा होता हा अनुभव? का शिकावंसं, करावंसं वाटलं? कुणाची मदत घेतलीत का? फसगत झाली का? करताना काही चुका केल्यात की नाही? त्यातून काय शिकलात? आणि एकंदरीत हा अनुभव कसा होता? तुम्हाला कसा किती आनंद देऊन गेला. आम्हाला कळवा. ३०० शब्दांमध्ये. ते शिकतानाचा तुमचा फोटो असेल तर उत्तमच. मग काय ज्येष्ठ नागरिक वा आजी-आजोबांनो आम्हाला कळवणार ना तुमचे किस्से!
आमचा पत्ता- ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा मेल करा.
chaturang@expressindia.com.

Story img Loader