श्रद्धांचे आकार

माझी पत्नी गीता मेहरा आणि मी १९ सप्टेंबर २०२३ चा उगवता सूर्य पाहिला तो गिझाच्यापिरॅमिड्सवर. नाईल नदीच्या सहाशे मैल, सोळा दिवस आणि सहा हजार वर्षांच्या प्रवासानंतर ४ ऑक्टोबर २०२३ चानाईलवर मावळता सूर्य पाहिला, तो आस्वानच्या‘कॅटरॅक्ट हॉटेल’च्या खुल्या रेस्टॉरंटमधून. इथे अॅगाथा ख्रिस्तीबाईंच्या‘डेथ ऑन द नाईल’ रहस्यकथेतल्या काही घटना घडतात. इजिप्तचा इतिहासदेखील एक प्रदीर्घ रहस्यकथा आहे. प्राचीन इजिप्तच्या बहुतेक भव्य वास्तू‘मृत्योत्तर जीवन’ या संकल्पनेशी निगडित आहेत, पण त्यात निर्मात्यांची उत्कट जीवनेच्छा दिसते. इजिप्शियन कलाकारांच्या छिन्नी-कुंचल्यांतून त्यांचे वनस्पतींच्या श्वासोच्छ्वासांवरचे, कीटकांच्या सूक्ष्म हालचालींवरचे, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वक्र रेषांवरचे आणि एकूण वर्तमान जीवनावरचे प्रेम प्रत्येक कलाकृतीत उतरले आहे.

Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj
‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

इजिप्शियनांनीविश्वजन्मकथा आणि इतर मिथके कल्पिली ती ‘सूर्य पूर्वेत जन्मतो, पश्चिमेत बुडतो, रात्री तो कुठे असतो? क्षितिजाखाली अंधाराचे दुसरे जग आहे का?’ अशा प्रश्नांच्या उत्तरांतून. दृश्य पार्थिव रूपाला ते ‘का’ म्हणत आणि अदृश्य अपार्थिवाला ते ‘बा’ म्हणत. सर्व मृत व्यक्ती आयुष्याचा हिशेब एकाच दिवशी चुकता करतात ही इजिप्शियनांची श्रद्धा होती. ‘अंतिम निर्णया’चा दिवस ही त्यांची संकल्पना नंतर यहुदी, ख्रिस्ती, इस्लामी आणि अनेक धर्मविचारांनी स्वीकारली.

देवाने फेअरोंना जर अनंत काळ जीवन जगण्याकरिता निर्मिले आहे, तर त्यांचा ‘का’ हा चांगल्या अवस्थेत असायला हवा. म्हणून शरीराला ममी करून सुरक्षित ठेवीत. त्याच्याभोवती जरुरीची, तसेच विलासाकरिता लागणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि प्राणीही असत. त्यांचे घर हे स्वर्गाच्या जवळात जवळ पोहोचणारेपिरॅमिड्स. या वास्तूरेगिस्तानात औषधालाही नसलेल्या, दुरून आणलेल्या पाषाणात घडवल्या आणि हजारो वर्षे टिकल्या. इ.स.पू. २७०० ते २२०० वर्षे हा काळ इजिप्तचे ‘ओल्ड किंग्डम’ वा पिरॅमिड्सचा काळ म्हणून ओळखला जातो. इजिप्तच्या ‘मिडलकिंग्डम’चा काळ इ.स.पू. २०४० ते १७८२ हा मानला जातो. त्यात फेअरोंनी भव्य दगडी पिरॅमिड्स केले नाहीत. इ.स.पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ३० पर्यंतचा ‘न्यू किंग्डम’चा काळ हे इजिप्शियन साम्राज्याचे सुवर्णयुग. याच काळात फेअरोंनीनाईलच्याकार्नाकच्या समोरच्या दुर्गम अशा पश्चिम तटावरच्या खडकाळ वादींत‘व्हॅली ऑफ किंग्ज’ आणि ‘व्हॅली ऑफ क्वीन्स’ या दफनभूमीस्थापल्या. जवळच शिल्पकार, चित्रकार आणि कष्टकारकारागिरांसाठी वेगळी वस्ती स्थापली. त्यांची सौंदर्यदृष्टी त्यांनी स्वत:करिता बांधलेल्या साध्या आणि सुबक घरांतून दिसून येते.

प्रत्येक थडग्याच्या परिसरात अंत्यसंस्कारां- करिता आणि राजाची स्मृती कायम राहावी याकरिता स्मृतिमंदिर ही वास्तू पूर्वीपासून होती; पण तिचे अतिभव्य स्वरूप हे ‘न्यू किंग्डम’मध्ये प्रकटले. लक्झोर, कार्नाक येथील मंदिरे, त्यातले बुलंद खांब आणि विस्तीर्ण भिंती, या एके काळी विविध चित्रांनी आणि हिअरोग्लिफ या ध्वनी-चित्रलिपीने भरून गेल्या होत्या. छत सुंदर नक्षीकामाने शोभिवंत होते. कार्नाक आणि लक्झोर यांना जोडणाऱ्या‘अॅव्हिन्यू ऑफ स्फिंक्स’च्या सुमारे दोन मैलांवर दुतर्फा स्फिंक्सच्या आणि एडक्यांच्या विशाल मूर्ती होत्या.

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन : ऋणानुबंधाच्या ‘इटालियन’ गाठी!

आम्ही भर दुपारी या स्थळांतून चालत होतो. तापमान सुमारे ४७ डिग्री सेल्सिअस होते. औषधालाही सावली नव्हती. एरवीच्या दिवशीही सकाळचे दोनेक तास सोडल्यास हीच परिस्थिती. कधी शंभरेकमीटर्सचे खडबडीत चढउतार, कधी जमिनीच्या खाली असलेल्या वास्तूंत जणू भट्टीचे तपमान; परंतु अनुभवांचे वैविध्य, व्याप्ती आणि तीव्रता इतकी होती, की ते वाटून घेताना चैतन्याचे अनोळखी स्रोत खुले होत.

इजिप्शियन चित्रभाषा

इजिप्शियनचित्रभाषेशी- चित्रलिपीशी नव्हे- अगदी जेमतेम तोंडओळख करून घेतली तरी इजिप्तच्या प्रवासाचा अनुभव किती बदलतो! निसर्गाचे उत्तम निरीक्षण आणि संकेतांची दृढ चौकट यातूनइजिप्शियनचित्रभाषा घडली. तिचे संकेत युरोपीय किंवा अतिपूर्वेकडीलशैलीसंकेतांपेक्षा फार वेगळे आहेत. इजिप्शियन शैलीत प्रोफाइलला महत्त्व आहे. काय ‘दिसते’पेक्षा काय ‘असते’ याला महत्त्व आहे. प्रोफाइलरेखाटताना दोन्ही हात व दोन्ही पाय दिसत नसले, तरी ते ‘असतात’. म्हणून ते चित्रातही ‘दिसतात’. चित्रकर्त्यांच्या कलात्मक आणि सामाजिक अर्थचौकटींतल्या महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या पाहिजेत आणि त्यांचे महत्त्व हे चित्रांतून समजले पाहिजे.

इजिप्शियनचित्रकला‘पस्र्पेक्टिव्ह’ वापरत नाही; परंतु प्रेक्षकापासून वस्तूंची विविध अंतरे सुचवण्याकरिता स्पष्ट संकेत आहेत. जवळच्या वस्तू चित्राच्या तळाशी. मग त्यापासून जरा दूरच्या त्यावरच्या थरात. सर्वात वरचा थर हा सर्वात दूरच्या वस्तूंचा. एकाच वस्तूचे प्रोफाइल चित्र आणि गरुडदृष्टीने काढलेले चित्र इजिप्शियन शैली एकमेकांनंतर मांडते. प्रेक्षकाने त्यांची मनात बेरीज करून अचूक उत्तर शोधावे ही अपेक्षा.

आकार हा या चित्रभाषेतला सर्वात महत्त्वाचा अलंकार. देव सर्वापेक्षा मोठा दिसला पाहिजे. फेअरो त्यापेक्षा जरा लहान किंवा तितकाच. सामान्यत: राणी राजापेक्षा लहान; पण काही राण्या त्यांच्या महत्त्वामुळे पतीएवढय़ाही दाखवल्या जातात. सर्वसामान्य व्यक्ती, परकीय, प्राणी इ. अगदी लहान आकारात चितारले जातात. ही शैली जगातल्या अत्यंत स्थिर चित्रशैलीतली आहे. डोळे जरा सरावले, की या शैलीतले सौंदर्य आणि लयींच्या गुंफणी ओळखता येतात.

रंगसंस्कृतीचा उगम

नाईल ही तांबुससोनेरी रेतीत सापासारखे वळसे घेत जाणारी देखणी, निळीभोर नदी. शतकानुशतके तिला पूर येत असत. ती पुराच्या पाण्याबरोबर गाळाची सकस काळी माती आणत असे. ओसरताना तिचा मोठाला थर पसरत असे. परतलेला शेतकरी या काळय़ा जमिनीतून हिरवी-पिवळी-सोनेरी नवी सृष्टी निर्माण करीत असे. काळा, हिरवा, पिवळा यांच्याबरोबर नाईलचा निळा रंगही इजिप्तने जीवनदायी मानला.

तळपणाऱ्या प्रखर सूर्याला इजिप्तने नेहमीच देवस्थान दिले होते. या तेजाला जमिनीवर उतरायला लागणारी शिडी ही शुद्ध सोन्याचीच असायला हवी. सोने सूर्यदेवाचे प्रतीक. सोन्याचा मुकुट घालणारा सम्राट फेअरो हा साक्षात देवच. तांबूस रेती ही इजिप्तच्या रहिवाशाला मृत्यूसारखी वाटत असे. वाळवंटाची लाली हे मृत्यूचे रक्तरंजित मुख. प्रखर उन्हाला परतवणारा पांढरा शुभ्र रंग हा इजिप्तच्या कापडात विणला गेला, घरांवर लेपला गेला, पवित्र ठरला.

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन: ‘संस्कृतीशोधा’चा प्रवास!

इ.स.पूर्व तीन सहस्रकांत दृढावलेली इजिप्तची रंगभाषामध्यपूर्वेच्या पश्चिम आशियातल्या ज्यू, झोराष्ट्रियन, ग्रीक आणि रोमन, बौद्ध इत्यादी संस्कृतींत भाषांतरित झाली. दैवी व्यक्तींचे वेगळेपण व्यक्त करणारे इजिप्शियनतेजोवलय अनेक देशांतून, धर्मातून फिरत फिरत शेवटी चलत्-चित्रभाषेत विसाव्या शतकात हॉलीवूडच्यासुवर्णकेशा नायिकांच्या चेहऱ्याभोवती अवतरले. जगभरच्यासिनेप्रेक्षकांना आजही ते भुरळ घालते आहे.

द्रौपदीची थाळी

मी कैरोत तीस वर्षांनी परतलो होतो. मध्यंतरीच्या काळात शहरात केवढा फरक पडला होता! शेकडो जुन्या इमारती पाडल्या जात होत्या. पिरॅमिड्सना ठेंगणे करणाऱ्या इमारती उभारल्या जात होत्या. उडणाऱ्या धुळीने कैरो हे युद्धभूमी वाटत होते. मृतांना दफन करणाऱ्या या संस्कृतीत शतकानुशतकांच्यामृतांची संख्या, जीवितांपेक्षा जास्त. कब्रस्तानांनी व्यापलेल्या जागा विपुल. अनेक दरिद्री बेघर कब्रस्तानात राहतात. तिथेच जन्मतात. लहानाचे मोठे होतात. बेवारशी मरतात. हे कैरोचे ‘जिवंत-मृत’. त्यांची संख्या आता चांगलीच वाढलेली आहे.

मैलन् मैल विस्ताराच्या ‘खान एल खालीली’ बाजारपेठेत व्यापारी तसेच ओरडत होते. स्वस्तात स्वस्त वस्तूंपासून महागात महाग, अशा सर्व प्रकारच्या वस्तू दुतर्फा हारीने लावल्या होत्या. ‘कॅफे नगिब माहफुज़’ अजून जसेच्या तसे होते. जुन्या वळणाचे नक्षीकाम केलेले लाकडी चौकटीतले आरसे, आरामगाद्या, हुक्के, जुने फर्निचर, उत्तम पारंपरिक इजिप्शियन खाद्यपदार्थ आणि काळाचा स्वल्पविराम वाटावा अशी लय. हा नागिब माहफुज़ साहेबांचा (‘नोबेल’ विजेते इजिप्शियन साहित्यिक) आवडता कॅफे. त्यांनी आधुनिक साहित्यात इजिप्तला मानाचे स्थान मिळवून दिले.

कैरोच्या इजिप्शिअन म्युझियमला लागून असलेल्या एका बागेत ओग्युस्तमारिएत आणि इजिप्तच्या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची कामगिरी केलेल्या प्राचीन हिअरोग्लिफीक लिपीचा उलगडा करणाऱ्या शांपालियाँसकट चोवीस जणांचे स्मारक आहे. स्वतंत्र इजिप्तमध्ये अनेक उलथापालथींनंतरही या युरोपीय संशोधकांबद्दल कृतज्ञता व्यक्त होते, हा या देशाचा केवढा मोठेपणा आहे!

गीताची आणि माझी इजिप्शिअन कलाकृतींशी पहिली ओळख युरोपीय म्युझियम्समध्ये झाली होती. अनेक युरोपीय देशांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत इजिप्तला सपाटून लुटले होते. रोझेटा स्टोन- ज्याच्या वापराने हिअरोग्लिफ्स लिपी उलगडली- हा ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. इतर एक लाख इजिप्शियन कलावस्तूही आहेत. ६० लाख वस्तू असलेला विंडॉर्फ संग्रहही तिथेच आहे. न्यू बर्लिन म्युझियममध्ये ८०,००० वस्तू आहेत. त्यात नेफेरतिती राणीचा जगात सर्वात सुंदर मानलेला पुतळा आहे. पॅरिसच्या लुव्ह्रम्युझियममध्ये, अमेरिकेत अॅणन आर्बरच्या केल्सीम्युझियममध्ये आणि बोस्टनच्या म्युझियम ऑफ फाइनआर्ट्समध्ये लाखो इजिप्शियनकलावस्तू आहेत.

इजिप्शिअन ओबेलिस्क म्हणजे अखंड पाषाणाचा स्तंभ. भौमितिक अचूकपणाची प्रचीती देणारा, निमुळता होत जाणारा आणि सुवर्णाच्छादित पिरॅमिडमध्ये शेवट होणाऱ्या चार समाकार पृष्ठभागांचा हा स्तंभ. हा अनंतत्वाचे, अमरत्वाचे पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारे प्रतीक होता. जगात असणाऱ्या अशा एकोणतीस स्तंभांपैकी केवळ पाच आज इजिप्तमध्ये आहेत. दोन रोममध्ये आहेत. एक लंडनच्या व्हिक्टोरिया एम्बँकमेंटमध्ये, एक न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये आणि एक पॅरिसमध्ये आहे. इजिप्तमधल्या इतक्या अतिसुंदर वस्तू लुटल्या गेल्या, तरी द्रौपदीच्या थाळीसारखी इजिप्तची माती अजून आपले खजिने रिकामे पडू देत नाही.

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन: क्षण असे जगण्याचे

नोहाची विराट होडी

आमच्या एका मार्गदर्शिकेचे नाव होते नोहा. आमचे जहाज एका अर्थी बायबलमधलेनोहाचे जहाजच झाले. त्या जहाजात जसे सर्व जीवजातींचे नमुने होते.. जहाजातून दिसणाऱ्यानाईल नदीच्या किनाऱ्यावर केवळ इजिप्तच नव्हता, शिवाय कित्येक मानवसंस्कृतींचे अंश विखुरलेले होते. सुमेरिअन, असिरियन, हिक्सोज आणि नुबियन्स होते. सामुद्री संस्कृती होत्या. इराणचे कॅम्बायसेस आणि दारायस होते. अलेक्झांडर द ग्रेट होता. इजिप्शिअन संस्कृतीचा स्वीकार केलेले टॉलेमी होते. क्लिओपात्राच्या प्रेमात पडणारे सीझर आणि मार्क अँटनीसारखे रोमन वीर होते. इजिप्तच्या जादूला आधुनिक युगातला नेपोलियनसुद्धा शरण गेला.

जहाजाच्या कॅबिनच्या भिंतीएवढ्या खिडक्यांतून वर्तमानातला इजिप्त दिसत होता. किनाऱ्यावर कधी केवळ हिरवळ, मळे, कधी खजूर आणि विविध प्रकारचे पाम वृक्ष, कधी केळय़ांच्या बागा. कधी कारखाने. कधी अवकळा आलेल्या उजाड वाटणाऱ्या वस्त्या. जहाजातल्या प्रवाशांचे ओरडून लक्ष वेधून घेणारी मुले. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळण्यापूर्वीच्या काळात त्याची जी ससेहोलपट होत होती, तेव्हा इजिप्तमध्ये ठिकठिकाणी येशू आणि त्याच्या कुटुंबाला जिथे वनवास आणि अज्ञातवासही भोगावा लागला, त्या जागा पाहायला मिळाल्या.

खिडक्यांतून जितक्या मशिदी दिसल्या, जवळजवळ तितकीच चर्चेस दिसली. कधी टेकडय़ांवरच्या मोनेस्टरीज. काहींना नंतर भेटीही दिल्या. सहप्रवाशांच्या संभाषणांतून फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन, फ्लेमिश भाषेचे आणि अरेबिकचेजुमले ऐकू येत. सोळा दिवसांच्या या प्रवासात मिळालेल्या नवीन मित्रांत दोन इजिप्शियन जोडपी आणि दोन म्युनिकवासी जर्मन मित्र मिळाले. नदीकिनाऱ्याकडे बघताना ही मंडळी वाटेतल्या विविध प्रदेशांची माहिती सांगत. स्वत:चे अनुभव सांगत, जहाजाच्या शांततेत पक्ष्याने पाण्यात सुळक्कन मारलेली उडीही ऐकू येते.

मंदिर संकुलाचा ‘उद्धार’

नासर तलावाच्या निर्मितीकरिता जी जमीन आवश्यक होती, तिथे प्राचीन नुबियन आणि इजिप्शियन संस्कृतींच्या अमूल्य वास्तू उभ्या होत्या. नासर तलाव संकल्प हा इजिप्त आणि बाजूच्या देशांना नाईलच्या पुरांपासून बचाव, कृषिक्रांती आणि विद्युतक्रांतीयांसाठी आवश्यक होता; पण तो साधायचा म्हटले, तर अबूसिंबेलबरोबर (भव्य दगडी मंदिरांचे ऐतिहासिक स्थळ) इतर अनेक महत्त्वाच्या वास्तू पाण्याखाली जाणार होत्या. विश्वसंस्कृतीच्या इतिहासाचेही मोठे नुकसान होणार होते. तेव्हा ‘युनेस्को’ने त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यताही दिली होती.

इ.स. १९६४ ते १९६८ या काळात अबूसिंबेल संकुल काळजीपूर्वक कापून त्याच्या सरासरी २० ते ३० टन वजनाच्या शिळा बनवल्या. खास बनवलेल्या टेकडीवर त्यांची पुनस्र्थापना केली. त्याकरिता जुन्या जागेपेक्षा ६५ मीटर उंच आणि नदीपासून २०० मीटर मागे एक खास टेकडी बांधली. काझिमिरमिखालोव्ह्स्की या पोलिशविशेषज्ञाच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. पुराणवस्तुसंशोधनाच्या यंत्रशास्त्राच्या इतिहासाचे हे सोन्याचे पान आहे.

‘उद्धार’चा अर्थ वर खेचणे.अबूसिंबेल या मंदिरसंकुलाला तो बरोबर लागू आहे. दुसऱ्या रॅम्सीझने हे मंदिर बांधले. त्यात देवपूजेपेक्षा स्वपूजा जास्त. प्रवेशद्वारातच स्वत:चे चार पुतळे. प्रत्येकी वीस मीटरपेक्षा उंच. परंपरेचा पूर्ण उपयोग केला. कौशल्यपूर्ण मांडणी साधली आणि नव्या कल्पना योजल्या; पण लक्ष कायम स्वत:कडे वेधून घ्यायचे. सर्वसामान्य माणसाला ज्यातून आपला खुजेपणा जाणवेल आणि आपल्या नेत्याचे भव्यत्व जाणवेल, अशा स्थापत्यात ‘फॅशिझम’ची मुळे आहेत. आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रचाराकरिता स्थापत्यशास्त्राचा आणि स्वप्रतिमेचा उपयोग करणाऱ्या सर्व राजकारण्यांचे फेरोजखापरखापरपणजोबा होते.

भूस्वप्नातून जलस्वप्नाकडे

१९५६ पासून इजिप्तच्या सत्तेवर असणाऱ्या अब्दुल गमाल नासेर यांचे आस्वानडॅम हे स्वप्न होते. सुएझ कालवा ताब्यात घेतल्यानंतर जहाजांवरची जकात आणि सोव्हिएतयुनियनकडून मिळणाऱ्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीने आस्वान हाय डॅम पूर्ण केला. याकरिता वापरलेल्या दगडमातीचे घनफळ गिझाच्या सर्वात मोठ्या पिरॅमिडच्या सोळापट होते. आस्वानची पूर्णता झाली ती २३ जुलै १९७० रोजी. नासेर यांचा मृत्यू झाला १९७० च्या २८ सप्टेंबरला. जणू त्यांचे प्राण आपले स्वप्न वास्तवात यायची वाट पाहात होते. पिरॅमिड्स ही फेअरोजची उत्तुंग भूस्वप्ने होती व आस्वानडॅम हे नासेर यांचे विस्तृत जलस्वप्न होते.

रशिया आणि इजिप्त स्नेहसंबंधांचास्मृतिस्तंभ हा चार ओबेलिस्कसारख्यादिसणाऱ्या स्तंभासारखा आहे. या डॅमनंतरनाईल नदीचे पूर थांबले. दुष्काळ थांबले. शेती वाढली. इजिप्तच्या आणि सुदानच्याविद्युतपुरवठय़ात वाढ झाली. ही झाली सकारात्मक बाजू. अर्थातच पर्यावरणाची हानी ही नकारात्मक बाजू; पण हे जलस्वप्न आधुनिक इजिप्तच्या पहाटेचे स्वप्न होते.

आम्ही जेव्हा आमच्या नव्या मित्रांचा आणि पुराण्या इजिप्तचा पहाटे निरोप घेतला, तेव्हा एक आवंढागिळला आणि आस्वान विमानतळाची वाट धरली. कैरोला उतरताना परत एकदा पिरॅमिड्स दृष्टीस पडले. पिरॅमिड्स तेच होते; पण त्यांच्याकडे पाहाणारी दृष्टी बदलली होती.
arunkhopkar@gmail.com

Story img Loader