– प्रभा गणोरकर

आमच्या लहानपणी भीती फक्त भुताखेतांची असे त्यामुळे त्यावर मात करता येई, पण आता माणसांचीच भीती वाटायला लागली आहे. आपल्यावर कधी, केव्हा, कसं, काय ओढवेल सांगता येत नाही अशी स्थिती आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक मारहाण, हत्या करताहेत, त्यामुळे इतरांच्या मदतीला धावून जाणंही थांबलंय. पण इतकं भयग्रस्त होऊन जगायचं असतं का? नाही. त्यावर उपाय आहेतच…

Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय

‘भयभूती’ सदरातल्या या लेखासंबंधी विचार करायला लागल्यावर मला दोन चित्रे आठवली. एक, ‘किंकाळी’ हे एडवर्ड मुंकचे आणि दुसरे, जॉर्जिओ द शिरिकोचे, ‘खिन्न आणि विषण्ण रस्ता’ हे चित्र, ज्या चित्रात एक मुलगी आनंदाने रिंग फिरवत धावते आहे. पलीकडे अंधूक प्रकाशातली एक इमारत आहे आणि इमारतीपलीकडून रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीची सावली दिसते आहे.

हेही वाचा – ‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’

भय नावाच्या अनादी, आदिम भावनेनं वेगवेगळ्या मानसिक आणि प्रत्यक्ष अशा पातळ्यांवर भयग्रस्त व्हावं, अशी वृत्ते, बातम्या सर्वांच्या रोजच कानी येण्याचा, वाचावी लागण्याचा हा काळ आहे. आपल्यावर कधी, कुठे, कसे, काय ओढवेल याची शाश्वती राहिलेली नाही, विशेषत: बाईला, आणि प्रत्येक पालकाला. लहान मुलांना शाळेत पाठवताना, मुलीला नोकरीवर पाठवताना किंवा ती कुठे गेलेली असताना भीती दाटून येते. शेजारीपाजारी, घरातलीच माणसे किंवा अकल्पित असे कोणीही, त्यांच्यापासून आपण सुरक्षित नाही. शिरिकोच्या चित्रातल्या भिंतीआडून डोकावणारी सावली आज प्रत्येकाच्या मनात दडून आहे. यापूर्वीच्या, माझ्या लहानपणीच्या काळात भय किती साधे होते. अंधाराचे काल्पनिक भय. भुताखेतांचं उडवून लावण्याजोगं तुच्छ भय!
माझं अंधाराचं भय एका प्रसंगाने नकळत पण कायमचं गेलं. खेड्यात सेंटर नसल्यानं आमची मॅट्रिकची परीक्षा अमरावतीला होती. दुसऱ्या दिवशी गणिताच्या पेपरची तयारी करताना आठवलं, सोडवून ठेवलेल्या महत्त्वाच्या गणितांची वही खेड्यावरच राहिली. झालं, निघाले. संध्याकाळची बस घेऊन मी रात्री दहानंतर आमच्या गावी उतरले आणि दाणदाण चालत आमराईतल्या पायवाटेनं घरी पोचले. अंधार दिसलाच नाही, कारण समोर फक्त गणिताचा पेपरच दिसत होता आणि ती वही.

शाळेत जायला लागल्यावर वक्तृत्व स्पर्धा, गायनाच्या स्पर्धा अशा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लागतोच आणि आपल्या रोजच्या वर्गातली मुलंच ते ऐकायला समोर बसलेली दिसली की मग भय वाटू लागतं. घरून निघताना नीट लक्षात ठेवलेलं भाषण माईक समोर आला की विसरायला होतं. हातात घडी करून ठेवलेल्या भाषणाचा कागद चुरगळून गेलेला असतो. त्यावरची अक्षरे दिसेनाशी होतात. त त प प होऊ लागल्यानं हसायलाच समोर बसलेले मुलगे हसू लागतात आणि आपण रडकुंडीला येतो. गाण्यातले शब्द न आठवणं, बेसूर होऊ लागणं सुरू होतं. काही लोकांना श्रोते समोर असले की विशेष स्फूर्ती येते, माईक सोडता सोडत नाहीत, पण काहींना श्रोत्यांचे, समोर बसलेल्या गर्दीचे भय हळूहळू वाढायला लागते अशा मुलांना घरच्यांनी, विशेषत: शिक्षकांनी ‘तयार’ करावं लागतं. प्रोत्साहन द्यावं लागतं. आमच्या शाळेत ‘हिंदी’ शिकवायला एक उत्तर प्रदेशातले शिक्षक आले होते. त्यांनी ‘कविसंमेलन’ घडवून आणलं आणि मी पहिल्यांदा ‘ये तो झाशीवाली रानी थी’ ही कविता वाचून दाखवली. त्या पहिल्या वाचनानं माझं शाळेतल्या टारगट श्रोत्यांविषयीचंच नाही, तर एकूणच श्रोत्यांविषयीचं भय नाहीसं झालं.

माझं सारं बालपण लहानशा खेड्यात गेलं. घराच्या माडीच्या कौलांवर रोज एक घुबड येऊन बसे आणि त्या घूत्काराने मी अंथरुणात थरथरू लागे. मी मैत्रिणींकडून घुबडाविषयीच्या काही कथा ऐकलेल्या होत्या. त्यातली एक कथा अशी की, तेव्हा घुबड हा साधा पक्षी नव्हता. त्याला दगड मारला की तो झेलून नदीवर जाई आणि तो दगड उगाळत बसे. जसजसा दगड झिजत जाई तसतसं दगड मारणाऱ्याचं आयुष्य कमी होत जाई. खरं तर घुबडाला दगड मारणं शक्यच नसायचं. एकतर ते दूर गढीवर बसलेलं असे किंवा रात्री आवाज देत कौलांवर. घुबडाप्रमाणेच भूत-प्रेत चकवे अनेकांना येता-जाता भेटल्याच्या कथाही ऐकवल्या जात. शिवाय गावात ‘करनाटकी बाया’ होत्या, त्या म्हणे, करणी करत. एक घटना आठवतेय, एक प्रेतयात्रा रस्त्याने जात होती. त्यात पैसे फेकले जात असल्याने त्याच्या मागे काही मुलंही होती. मीही त्या प्रेतयात्रेच्या जरा जवळ गेले तर मला दिसलं की, त्या बाईला बसवून नेलं जात होतं आणि तिचं बांधलेलं डोकं हलत होतं. झालं, त्या दिवसापासून ती बाई आणि तिचं ते डोकं मला रोज माडीच्या कौलांवर दिसू लागलं. आणि भीतीने मी अस्वस्थ होऊ लागले. शेवटी आईने मला तिच्या माहेरी पाठवून दिलं. तिथे मात्र रात्री वाड्याच्या पत्र्यांवर छान झोप होऊ लागली. मृत्यूबद्दल कथांतून निर्माण झालेलं भय एका घटनेनं कायमचं नाहीसं झालं.

हेही वाचा – लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’

आणखी एक घटना आठवतेय, माझी नव्वदी ओलांडलेली पणजी… दादी अंथरुणाला खिळली होती. मला तिच्यासोबतीला ठेवून घरातले सर्व जण बाहेर बसले होते. थोड्या वेळानं दादीने मला खुणेनं जवळ बोलावलं. ती अंगाखालची चादर गुंडाळण्याचा प्रयत्न करत होती. तिला काय सांगायचं होतं, ते मला खेड्यातल्या ‘ज्ञाना’नं लक्षात आलं. ती, ‘‘मला खाली ठेवा.’’ असं सांगत होती. तिला अंथरुणावर मरायचं नव्हतं. जमिनीवर शेवटचा श्वास घ्यायचा होता. मृत्यू जवळ आलेला तिला कळत होता, पण ती घाबरली नव्हती. मृत्यूला घाबरायचं नसतंच, उलट शांतपणे त्याच्या स्वाधीन व्हायचं असतं हे तिनं मला अशा कृतीनं दाखवून दिलं. त्यानंतर मी खूप जणांचे शेवटचे क्षण अनुभवले. वडील जाताना मी घरातल्या सर्वांना बोलावलं, जागं केलं, ‘चला, काका जात आहेत, या सगळे त्यांना निरोप द्यायला.’ इतक्या शांतपणे.

लहानपणापासून वडिलांनी मला सतत निर्भयतेचे धडे दिले. अंधारात जिने चढायला सांगितले. रात्री माडीवर एकटीला झोपायला पाठवलं. शाळेतल्या वर्गातल्या मुलांना मला सायकल चालवायला शिकवायला लावलं. खेड्यातून बसनं एकटीनं प्रवास करायला सांगितलं, ड्रायव्हर, कंडक्टरला, ‘मुलीला नीट घेऊन जा’, असं बजावून मुलगी असल्यानं भ्यायचं असतं हे मनात येऊच दिलं नाही. खरं तर माझी आजी आणि आई दोघीही त्यांनाच भीत. आजही वडिलांना, भावाला, नवऱ्याला भिणाऱ्या मुली घरात तयार होतात. ज्या सतत धास्तावलेल्या असतात. खरं तर असं का व्हावं?

एकदा एक मुलगा दोन दिवस माझा पाठलाग करतो आहे, असं माझ्या लक्षात आलं. टायपिंगचा क्लास संपवून मोठ्या मैदानातून मी एकटीच घरी परतत असे. एक दिवस चालता चालता मी अचानक थांबले आणि मागे वळून पाहिलं तर तोच दचकून थांबला. त्याला, ‘माझ्या मागे का येत आहेस?’ असं थेटच विचारलं, तर म्हणाला, तो मला दुसरीच कोणीतरी, त्याच्या भावाला त्रास देणारी समजत होता. मी ती नाही असं कळल्यावर तो परत फिरला. अशा मुलांना कशाला भ्यायचं?

पण आत्ताची आजूबाजूची बदललेली परिस्थिती पाहाता असं वाटतं की, माणसं बदलली आहेत, सूड घेणारी, विकृत, क्रूर होताहेत का? माणसाला फक्त ‘माणसाचं’ भय आहे, असं वाटू लागलं आहे. पूर्वी हिंदीतली ‘खुदा से डरो’ ही म्हण प्रचलित होती, आता ते भय कुणालाही नाही, असं दिसतं. माणसे बेदरकार वागतात. कायद्याला तर सोडाच, ‘कुणाच्या बापालाही’ भीत नाहीत. परवा म्हणे, एका वृद्धाने शेजारच्या मुलाला ‘घरासमोर फटाके फोडू नको’, असं म्हटल्यावर तो सरळ घरी जाऊन सुरी घेऊन आला आणि त्या वृद्धाला भोसकलं. याचमुळे आता कोणी कोणाच्या भांडणात पडत नाही. समोर मारपीट, हत्या होत असताना बघत राहतात, सोडवायला जात नाहीत. आपल्या देशातली लैंगिक अत्याचार विकृती किती पराकोटीला गेली आहे याचे भीषण दर्शन घडतंच आहे. कोणतं शहर ‘भयमुक्त’ आहे? सुरक्षित आहे? माणसांना मारण्यासाठी सुपाऱ्या देऊन किंवा सरळ शस्त्र चालवून हत्या करण्यात माणसं तरबेज झाली आहेत. घरातला तरुण मुलगा मित्रांकडूनच मारला गेल्यावर त्या घरातल्यांचं काय होत असेल असा विचार करण्याइतकी संवेदनशीलता या देशातल्या माणसांमध्ये तरुणांमध्ये उरलेली नाही का? हे वास्तव फार खिन्न विषण्ण करणारं, भयभीत करणारं आहे.
तरी आपण भयग्रस्त होऊन का जगायचं? घरातल्यांनी मुलांना ‘सज्ञान’ करायला हवं. धोके नीट समजावून द्यायला हवेत आणि समजा कोणी घात केलाच तर आपण त्यांना आधार देणारे आहोत, असा विश्वास त्यांच्या मनात जगवायला हवा. सासरचा, नवऱ्याचा छळ सोसणाऱ्या बायकांना शेजाऱ्यांचा, माहेरच्यांचा आधार आहे, असं मनोमन वाटायला पाहिजे, त्यांना ‘सांगण्याचं’ भय वाटता कामा नये. हाच धर्म आज गरजेचा आहे. आपलं ‘लेखन’सुद्धा लपवून ठेवणाऱ्या बायका मी पाहिल्या आहेत. त्या का एवढ्या भयग्रस्त असतात? बाहेरच्यांची नव्हे, पण आधी घरातल्यांच्या प्रतिक्रियांची त्यांना भीती वाटते.

आम्हा बायकांना कायम ‘सुरक्षित’ नसण्याचं भय वाटतं. एकटीनं कसं जगता येईल असं वाटत राहतं. शिवाय त्यामुळेच ‘बाई’ असण्याचं, इतरांच्या अधिकाराचं इतकं भय निर्माण होतं की, त्या कुंठित होतात. ‘विचार’ करणं विसरू लागतात. स्वत:चं सामर्थ्य, शक्यता यांचं भान गमावून बसतात. इतरांच्या संदर्भातच स्वत:कडे बघू लागतात.

‘मी’ म्हणजे ‘कोणी एक’ नसून सर्व प्रकारचे मानवी सामर्थ्य असलेली व्यक्ती आहे, याची जाणीव असल्याशिवाय ‘मी’ भयमुक्त होणार नाही. आणि ती तशी आहे हे समाजानेही लक्षात ठेवून तिच्याशी वागलं पाहिजे. इतिहासातल्या कर्तृत्ववान स्त्रियांची समाजाला आठवण असली पाहिजे. कुटुंबातल्या कर्तृत्ववान आजी, आई, पणजी, आत्या आठवल्या पाहिजेत, मग त्यांची ‘दृष्टी’ बदलेल. बाई ही उपभोगाची, उपयोगाची वस्तू नसून ते आपल्या जीवनातलं, आयुष्यभर आपल्याला बळ देणारं, कायमच महत्त्वाचं असणारं अस्तित्व आहे याची जाणीव होणं, करून देणं, आणि सतत व्यक्त करणं हाच आजच्या समाजाचा धर्म व्हावा. त्याशिवाय भयमुक्त समाज अस्तित्वात येणार नाही.

एकेकाळी तसा समाज होता आणि म्हणून कर्तृत्ववान, निर्भय स्त्रिया तयार होत होत्या. आज जाणवतं की, सगळ्याच नाही, पण अशा स्त्रिया निर्माण होताहेत… आत्मविश्वास गमावलेल्या, दुबळ्या,असहाय मानल्या गेलेल्या, हे आपण आपल्या घरातूनच थांबवलं पाहिजे, हिमतीनं!

prganorkar45@gmail.com

Story img Loader