मागील लेखात आपण चत्वारवाणी, व्यक्तिमत्त्व, आरोग्य व ॐकाराबद्दल जाणून घेतले. या लेखात मानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्ती म्हणजे काय व ॐकार साधनेतून त्यांचे शुद्धीकरण व बलीकरण प्रक्रिया कशी होते, हे जाणून घेऊ.
मानवी देहात नांदणाऱ्या दश:प्राणशक्तींची संकल्पना फक्त भारतीय तत्त्वज्ञानातच आहे, इतर कोठेही नाही. सामान्यत: लोक प्राण व श्वास एकच समजतात पण ते तसे नाही. देहात प्रवेश केलेल्या वायूचे प्राणशक्तीत रूपांतर करते ते नादचतन्य. तेव्हा असे म्हणता येईल- नादचतन्याचे सान्निध्य लाभलेला श्वास म्हणजे प्राणशक्ती. भारतीय तत्त्वज्ञान सांगते, घेतलेल्या श्वासाचे दश:प्राणशक्तीत रूपांतर होते ते ओटीपोटाच्या मध्यभागात स्थित असलेल्या स्वाधिष्ठान चक्रात व नंतर त्या त्या प्राणशक्तीला विशिष्ट देहाच्या स्थानी पोहचवले जाते.
दश:प्राणशक्तीदोन भागांत विभागल्या आहेत त्यामध्ये पाच मुख्य प्राणशक्ती आहेत- प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तसेच यांच्या पाच उपप्राणशक्ती- नाग, कुर्म, क्रुकल, देवदत्त व धनंजय. पुढच्या दोन ओळींत या पाच मुख्य प्राणांची स्थाने विशद होतात, ती अशी –
      गुदस्थानी अपान राहे, प्राण वसे हृदयात ,
 नाभीशी समान, कंठी उदान, व्यान सर्व देहांत
या पंचप्राणांपकी सर्व शरीरभर पसरलेली प्राणशक्ती म्हणजे व्यान. व्यान ही प्राणशक्ती अपान व प्राणाची संधी आहे. कोणत्याही आवाजनिर्मितीत सर्व देहात पसरलेल्या व्यान प्राणबलाला अतिशय महत्त्व आहे. देहातील व्यान प्राणशक्ती उरलेल्या नऊ प्राणशक्तींना गतिमान करते, त्यांचे बल वाढवते. मूल जन्माला येताना अति उंच स्वरात मोठय़ाने रडते आणि व्यान प्राणशक्तीच्या वृद्धिंगतेतून उरलेल्या नऊ प्राणशक्तींना गतिमानता देते. शास्त्रशुद्ध ॐकार उच्चारणातून निर्माण होणाऱ्या व्यान प्राणशक्ती बलाला अतिशय महत्त्व आहे. कारण त्या प्रभूत्वातूनच अष्टगुणी ॐकाराचे उच्चारण होते किंवा असे म्हणता येईल- शास्त्रशुद्ध ॐकार उच्चारणातून व्यान प्राणशक्तीची वृद्धी व शुद्धी होते.
जोपर्यंत दश:प्राणशक्ती मानवी देहात बलशाली आहेत व त्यांचे एकमेकांचे कार्य हातात हात घालून सहयोगाने चालते आहे तोपर्यंत व्यक्ती निरामय आरोग्याचा लाभ घेते. कोणताही आजार म्हणजे दश:प्राणशक्तींची क्षीणता, अकार्यक्षमता व असहयोगीता होय. शास्त्रशुद्ध ॐकार साधनेतून दश:प्राणशक्ती पुलकित होतात, बहरतात म्हणजेच दश:प्राणशक्तींची वृद्धी होते, त्यांची कार्यक्षमता बहरते आणि त्यांच्या एकमेकांच्या कार्यातील सहयोगित्व वधारते. म्हणूनच साधक व्यक्तीची निरामय आरोग्याकडची वाटचाल सुकर होऊ लागते.
डॉ. जयंत करंदीकर – omomkarom@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा