ॐ कार उच्चारणात कोणकोणती काळजी घ्यावी, याविषयीची काही महत्त्वाची तत्त्वे-
*  ॐकार उच्चारणात तो कंठाने उच्चारला पाहिजे, कानाने ऐकला पाहिजे, डोळ्याने ‘पाहिला’ पाहिजे आणि मनाने चिंतला पाहिजे. थोडक्यात, काया-वाचा-मनाने त्यांचे उच्चारण झाले पाहिजे. यालाच ॐकाराचा अनुक्रमे कायिक, वाचिक व मानस जप म्हणतात.
* ॐकार  साधना करताना पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ ठेवला पाहिजे, त्याला कोठेही बाक नको. पद्मासन, सुखासन किंवा वज्रासन घालून ॐकार साधना केली तर उत्तमच. पण ज्यांना ते जमणार नाही त्यांनी अगदी खुर्चीवर बसून वर नमूद केल्याप्रमाणे फक्त पाठीचा कणा सरळ रेषेत ताठ ठेवून ॐकार साधना केली तरी चालेल. कारण ॐकार उच्चारणातील तेच मूलतत्त्व आहे.
* साधना करताना साधकाची मान सरळ रेषेत हवी. हनुवटी वर उचलली जाऊ नये अथवा खालीही जाऊ नये. त्याने स्वरतंतूंवर ताण येतो. म्हणूनच मान डोळ्यांच्या सरळ रेषेत असावी.
* ॐकाराचा उच्चार व त्याचा स्वरलगाव पाठीमागून पुढे म्हणजे कंठाकडून ओठाकडे गोलाकार घडय़ाळ्याच्या काटय़ाप्रमाणे असावा.
* ॐकार साधना करताना कपडे सलसर असावेत; जेणेकरून ॐकार साधनेत अभिप्रेत असलेली दोन ॐकार उच्चारणामधील उदरश्वसनाची म्हणजे पोटाच्या श्वसनाची व हालचालीची क्रिया सहज होईल. त्यासाठी पुरुषांनी शक्यतो झब्बा, पायजमा व स्त्रियांनी पंजाबी ड्रेस घालावा. पुरुषांनी पँट घालावयाची असल्यास ती सल असावी, पट्टा घातलेला नसावा.
* ॐकार साधनेत साधनेचे स्थळ, साधनेसाठीचे आसन, परिसर, देह, मन आणि उच्चार शुद्ध, स्वच्छ व शुचिर्भूत हवेत. त्यामध्येही मनाची शुद्धता व उच्चाराची शुद्धता महत्त्वाची आहे.
* ॐकार  उच्चारणात शरीर व मन जितके स्थिर राहील, तितके जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उच्चाराबरोबर डोलू नये.
* ॐकार साधनेसाठी ब्रह्ममुहूर्त, पहाटेची वेळ सर्वात चांगली आहे. पण इतर वेळेस साधना केली तरी चालते. फक्त साधनेच्या आधी एक तास पोटात अन्न नको, ते रिकामे हवे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा