स्वर्गाशी हितगुज करण्याचा धरतीचा अंतहीन प्रयास म्हणजे वृक्ष! – रवीन्द्रनाथ टागोर
कुठलाच प्रयत्न कधीही छोटा किंवा क्षुल्लक नसतो. समुद्रातली छोटीशी लहर एखादी लाट बनायला हातभार लावते. अनेक लहान-मोठय़ा लाटा भरती आणतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात एखादी कळी उमलवण्याचं सामथ्र्य असतं. तसंच प्रत्येक लहान-मोठय़ा प्रयत्नांत मानवी दु:ख हलकं करण्याची ताकद असते.
-चार्ल्स मॅके, स्कॉटिश कवी व लेखक
तुम्ही काय मिळवलंय, साध्य केलंत याच्या समाधानापेक्षाही तुम्ही प्रयत्न किती केलेत, याचं समाधान मोठं असतं. मन लावून केलेले प्रयत्न हाच पूर्ण विजय असतो.
– महात्मा गांधी
जेवढे प्रयत्न अधिक तेवढी समृद्धीही अधिक!
– युरिपीडीस, जगद्विख्यात ग्रीक नाटककार
अनेक लोक कधीच पूर्ण प्रयत्नांनिशी धाव घेत नाहीत. तुमच्याजवळ जे जे काही आहे, त्या साऱ्याची जोड तुमच्या स्वप्नांना द्यायला हवी. त्या प्रयत्नांतून जी ऊर्जा निर्माण होईल, तिने तुम्हीच नंतर थक्क व्हाल.
– विल्यम जेम्स, प्रसिद्ध तत्त्वज्ञ
जेवढे पैसे मिळतात, फक्त आणि फक्त तेवढंच काम करणाऱ्या व त्याव्यतिरिक्त तसूभरही अधिक प्रयत्न न करणाऱ्या माणसांना ते करत असलेल्या कामापेक्षा अधिक मोबदला कधीच मिळत नाही.
– एल्बर्ट हबर्ड, प्रसिद्ध तत्त्वज्ञ
तुमच्या जीवनातील प्रत्येक कृती इतकी प्रयत्नपूर्वक करा की जणू काही ती तुमची या आयुष्यातली अखेरची कृती आहे.
– मार्कस ऑरेलिअस, रोमन सम्राट
दररोज, रात्रंदिवस केलेल्या छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांची
गोळाबेरीज म्हणजे यश!
– रॉबर्ट कॉलियर, अमेरिकन लेखक
जेव्हा तुम्ही आव्हानांचा, अडचणींचा सामना करता, तेव्हाच प्रयत्न खुलेपणानं पारितोषिकाची माळ तुमच्या गळ्यांत घालतात.
– नेपोलियन हिल, अमेरिकी लेखक
एखाद्या गुणवैशिष्टय़ाची दैवी देणगी तुम्हाला लाभते, तेव्हा तुमच्यावर आपोआप एक बंधन येतं. तुम्हाला मिळालेल्या देणगीसाठी सर्वाधिक प्रयत्न करत, तिचा योग्य तो विनियोग करण्याचं बंधन!
– बार्बरा शेर, प्रसिद्ध करिअर कौन्सिलर व लेखिका
एखाद्या सामान्य गोष्टीला असामान्य प्रयत्नांची जोड द्या आणि अतुलनीय पद्धतीने ती साध्य करत भव्यदिव्य करून दाखवा.
– ऑरिसन स्वीट मार्डन, अध्यात्माविषयक लेखक
दर दिवशी लहान लहान गोष्टी, कृती करत रहा. त्याच तुमचा उद्याचा दिवस अधिक फलदायी करतील.
– डोग फायरबो, मार्केटिंग तज्ज्ञ
सातत्यपूर्ण प्रयत्न, संतुलित इच्छा आणि सशक्त ऊर्जा यांचं सिंचन करत तुमचं ध्येय जोपासा. प्रतीक्षा करणाऱ्यांकडे संधी कधीच येत नाहीत. प्रयत्नपूर्वक सामना करण्याची धमक असलेल्या व्यक्तीच संधी पटकावतात.
– पॉल जे. मेयर, संस्थापक, सक्सेस मोटिव्हेशन इन्स्टिटय़ूट
स्वत:च्या क्षमता मुक्तपणे वापरायची किल्ली म्हणजे ताकद किंवा बुद्धिमत्ता नसते. ती असते सातत्यपूर्ण प्रयत्न!
– विन्स्टन चर्चिल, ग्रेट ब्रिटनचे माजी पंतप्रधान
यशाची मजा आणि अथक प्रयत्न यांमुळे मनात निर्माण होणारी उत्सुकता यातच खरा आनंद असतो.
– फ्रॅंकलीन डी-रुझवेल्ट, अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
यशप्राप्तीसारखं दुसरं मन:शांती देणारं समाधान नाही. आपल्याला जेवढे सर्वोत्तम प्रयत्न करणं शक्य होतं, ते आपण केले, या आत्मिक समाधानाचं ते फलित असतं.
– जॉन वूडन, प्रसिद्ध बास्केटबॉलपटू व प्रशिक्षक
स्वप्नं तर आपण सारेच पाहतो. पण ती स्वप्नं सत्यात उतरवायची असतील तर त्यांना प्रचंड निश्चय, निष्ठा, स्वयंशिस्त आणि मुख्य म्हणजे अथक प्रयत्न यांची जोड द्यायलाच हवी.
– जेस्सी ओवेन्स, प्रसिद्ध अमेरिकन अॅथलीट
सिंहाकडून मानवाने शिकलीच पाहिजे, अशी अप्रतिम गोष्ट म्हणजे, जे काम हाती घेतलंय ते पूर्णपणे झोकून देऊन आणि अपरिमित परिश्रम घेऊनच करायला हवं. – आर्य चाणक्य
जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, शक्य त्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवर उत्तरं सापडतातच. शिवाय अधिक मोठय़ा आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तुमची तयारी होते.
– पॅट रिले, प्रसिद्ध बास्केटबॉलपटू
बुद्धी न वापरता केलेले प्रयत्न ही अगदी नैराश्यजनक गोष्ट आहे हे मान्य! पण प्रयत्नांची जोड न मिळालेली बुद्धिमत्ता ही त्याहून मोठी शोकांतिका आहे.
– माईक डिटका, प्रसिद्ध फुटबॉलपटू व प्रशिक्षक
एखाद्याला उडायला शिकायचं असेल, तर त्याला प्रथम उभं राहायला शिकणं गरजेचं असतं. मग चालणं, त्यानंतर धावणं.. उंचीवर चढणं.. उडय़ा मारणं.. शिकावं लागतं. मनात आलं आणि उडू लागलो, असं कधीच घडत नाही. छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांतूनच अविश्वसनीय गोष्टी घडत असतात.
– फेडरिक नित्शे
जेव्हा मी लहान होतो, तेव्हा मी दहापैकी नऊ वेळा अपयश पचवलं, पण त्यातूनच मी दसपट जास्त काम करायला शिकलो.
– जॉर्ज बर्नार्ड शॉ
अगदी फुटकळ वाटणाऱ्या गोष्टींतही तुमचा आत्मा, मन, बुद्धी आणि हृदय साऱ्या गोष्टी पणाला लावा. यशाचं गुपित हेच आहे.
– स्वामी शिवानंद