डॉ. सुजाता खांडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘बालविवाह म्हणजे काय हेच कळत नव्हते. सातवी झाली की लग्न, अशीच पद्धत होती. आम्हालाही लग्न म्हणजे मोठे झाल्यासारखे वाटायचे. खूशही व्हायचो. नवीन कपडे, नटायचे, खूप पाहुणे मंडळी.. मजा वाटायची,’’ १३ वर्षांची श्रुती धपाटे (आता वय १८) सांगायची. श्रुती बीड जिल्ह्यातल्या, केजतालुक्यामधल्याभाटुंबा गावातली सातवीत शिकणारी मुलगी. तिच्या शाळेत आणि गावात लिंगभाव-समानतेचे कार्यक्रम सुरू झाल्यावर, तिला हळूहळू बालविवाहामागची मेख समजायला लागली. ती कार्यक्रमात मन:पूर्वक सहभागी झाली. CACL (कँपेनअगेन्स्टचाईल्डलेबर) च्या बैठकीसाठी श्रुती दिल्लीला गेली आणि तिच्यासाठी, तिच्या घरच्यांसाठी आणि गावासाठीही मुलींच्या आयुष्याचे नवे दर्शन घडवणारी एक खिडकीच उघडली गेली.
श्रुती सध्या उच्चशिक्षण घेत, शिकवणीवर्ग चालवते. तिचे कुटुंब, मुख्यत: तिच्या शिक्षणासाठी, त्यांच्या खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. ‘‘मुलींच्या प्रगतीसाठी भेदभाव, आरोग्य आणि मानसिक भावभावना हे विषय घेऊन काम व्हायलाच हवे.’’ असे तिला वाटते. तिच्या कामातूनही ते दिसते. श्रुतीसारखीच, मनाली इंगळे, साक्षी जोगदंड, वैष्णवी राऊत, पूजा थोरात, पूजा लांडगे, भक्ती काळे अशा अनेक मुलींची आणि पवन शिंदेसारख्या अनेक मुलांचीही नावे सांगता येतील. लिंगभाव-समानतेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून किशोरवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या हिंसेसंबंधी ते संशोधन करत होते. या हिंसेसंबंधात प्रौढांचा दृष्टिकोन आणि कल्पना या मुला-मुलींपेक्षा वेगळय़ा असतात. म्हणून किशोरवयीन मुलांच्या नजरेतून हिंसेकडे बघण्याचा या संशोधनाचा प्रयत्न होता. त्यांनी मुलाखती घेऊन नुसती माहिती गोळा केली नाही तर ती समजून घेतली. त्यातून या मुला-मुलींच्या स्वत:च्या, इतरांच्या आयुष्याकडे बघण्याच्या कक्षा रुंदावल्या. आत्मविश्वास कमावलेली मुले ‘सर्वेक्षण करताना विचारांसाठी स्पेस निर्माण झाली.’ किंवा ‘यापूर्वी असे काम केले नव्हते. आम्हाला आमदार, सरपंच झाल्यासारखे वाटते,’ असे संशोधनानंतर सांगत होती.
लहानपणापासून स्त्री-पुरुष समानतेविषयी तेच ते ऐकत आणि पाहात आलेल्या मुला-मुलींना तेच आणि तेवढेच खरे आणि बरोबर आहे, असे वाटायला लागते. ते घाटून-घोटून पक्के करण्यासाठी जवळपासची मंडळी असतातच. लिंगभाव-समानतेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मुलांना पर्यायी विचार, विकल्प दिसला, समजला, त्यांनी तो मानला. म्हणजे असा विकल्प दिसणे किंवा त्यांना दाखवणे. तो समजावून सांगणे आणि समजून घेणेही महत्त्वाचे. अर्थात पोहऱ्यात यायला, मुळात आडात ते असायला हवे. आजची गोष्ट आडातही आणि पोहऱ्यातही झालेल्या बदलाची.
पौगंडावस्थेतल्या या मुलींना नवजाणिवा जाणवून दिल्या रामकुंवरखरात, अनिता खंडागळेयांच्यासारख्या प्रौढ मैत्रिणींनी, ज्यांचा स्वत:चा प्रवासही विलक्षण आहे. रामकुंवर या सारणी गावात राहणाऱ्यापदवीधर. त्यांच्या पदवीबद्दल ना सासरी कोणाला अप्रूप ना शेजारी कोणाला माहिती. सासू-सासरे, दारू पिणारा नवरा, पाच दीर,सगळय़ांचे संसार त्यामुळे विचार करायलाही त्यांना फुरसत नव्हती. रामकुंवर सांगतात, ‘‘माहेरी लहान म्हणून कोणी बोलू दिले नाही, सासरी मोठी म्हणून सगळय़ांना सांभाळताना काही बोलले नाही.’’ एकूण कोंडमाऱ्याचं आयुष्य. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यावर त्यांनी ‘माविम’मध्ये (महिला आर्थिक विकास महामंडळ) काम सुरू केले, पण घरकामाच्या तगाद्यामुळे तिथलाही राजीनामा द्यावा लागला.
रामकुंवर त्यांच्या वडिलांबद्दल सांगतात, ‘‘वडील चौथी शिकलेले, कोतवाल होते. आम्ही शिकावे असे त्यांना वाटायचे. गावात चौथीपर्यंतच शाळा. रोज पाच किलोमीटर चालून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर अंबेजोगाईलाबहिणीकडे राहून कॉलेजमध्ये दाखल झाले, पण भावाशिवाय कुठेही जायची बंदी. कॉलेजच्या पहिल्या वर्षांतच माझे लग्न केले गेले.’’ ऐकताना वाटले, वडिलांना मुलीला शिकवायचे होते, पण समाजाचे दडपण रोखतही होते.
लिंगभाव-समानता प्रक्रियेच्या मदतीसाठीच्या शोधमोहिमेतरामकुंवर आम्हाला भेटल्या. पहिल्या प्रशिक्षणात ‘मी अंग चोरू-चोरू बसत होते,’ असे त्या सांगतात. स्वत:च्या आयुष्याशी कामाची असलेली जोड आणि सहकाऱ्यांबरोबर सुरक्षिततेची भावना मूळ धरल्यावर रामकुंवर यांचे ‘चोरू-चोरू बसणे’ सैल झाले. त्या सांगतात, ‘‘माझंच मन मला आधी रोखायचे. मी लग्नानंतर घराबाहेरही पडले नव्हते. मला दोन मुली. त्यांना वाढवण्याची माझी पद्धतही इतरांसारखीच बंधनाची होती.’’ स्त्रियांच्या, मुलींच्या आयुष्याचा चक्रव्यूह त्यांना समजायला लागला आणि त्या घरातूनही आणि स्वत:च्या पूर्वापार जपलेल्या विचारांतूनही बाहेर पडायला लागल्या. मुलींना, बायकांना अधिकार मिळायला हवेत, त्यांना त्यांचे निर्णय घेता यायला हवेत, असे ठामपणे वाटायला लागले. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि कामातही हा ठामपणा झिरपायला लागला. घरातल्या पुरुषांच्या सोबतीशिवाय घराबाहेरही न पडलेल्या रामकुंवरनी एकटीच्या प्रयत्नातून घरकुल योजनेतून घर बांधून घेतले. कामानिमित्ताने लांबलांबच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या स्कूटर चालवायला शिकल्या. या सगळय़ांमुळे त्यांच्यात आलेला आत्मविश्वास त्यांच्या मुलींच्या वागण्यात, त्यातल्या मोकळेपणात दिसतो. ‘त्या एकदम dashing आहेत. त्यांना जेवढं शिकायचं आहे, जे करायचे आहे, ते मी करू देणार,’ असे रामकुंवर सांगतात तेव्हा पुढच्या पिढीबद्दल निश्चिंतता वाटते. आपल्यासारखे भोग इतर मुलींच्या वाटय़ाला नको ही रामकुंवर यांची इच्छाशक्ती प्रखर आहे. गावातल्या मुलींना त्यांचा प्रचंड आधार वाटतो. प्रश्न मुलींच्या शिक्षणाचा, बालविवाहाचा, सायबर किंवा लैंगिक छळाचा असो- रामकुंवर प्रश्न सुटेपर्यंत मुलींबरोबर असतात.
रामकुंवर यांच्याबरोबरच, कळंबच्या अनिता खंडागळेही मुलींचा आधार बनल्या आहेत. अनितासुद्धा पदवीधर आहेत. त्यांचे वडील नगरपालिकेत सफाई कामगार होते. त्यांना वाटायचे अनिताने शिकून आपल्या जागेवर कामाला लागावे. अनितालाही मान्य होते. मात्र शिक्षण अर्धवट असतानाच त्यांचे लग्न करून देण्यात आले. सात वर्षांनंतर संसारात पराकोटीचा तणाव निर्माण झाल्यावर, अनितांनीवडिलांच्या मदतीने शिकणे सुरू केले. अवहेलनेचा अनुभव आणि स्वत:च्या कुवतीबद्दलचा विश्वास, काही वेगळे करण्याच्या आकांक्षेला गावात चाललेल्या लिंगभाव-समानतेच्या कामाने फुंकर घातली आणि अनिता बदलाला सिद्ध झाल्या. आज गावातल्या सगळय़ा मुलींसाठी त्या मन मोकळे करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण आहेत. त्यांनी स्वत:चे घर बांधले, मुलाला घेऊन त्या तेथे स्वतंत्रपणे राहतात. स्त्रियांच्या राजकारणातला सहभाग त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे.
अनिता, रामकुंवर, त्यांचे सहकारी, मित्र-मैत्रिणी बीडमधल्या वीस गावांमध्ये काम करतात. त्याचे पडसाद साऱ्या पंचक्रोशीत उमटतात. गावांमध्ये सर्रास आणि सर्व जाती-धर्मात बालविवाह व्हायचे. बालविवाहाचा विषय इभ्रतीचा,अस्मितेचा, रीतीरिवाजाचा, मुलीचे ओझे उतरवण्याचा, आर्थिक विवंचनेचा आणि कायद्याच्या कचाटय़ातसापडण्याचासुद्धा, म्हणूनच खूप पेचीदा ठरणाराही. अशा कामातली गुंतागुंत, सत्तासंबंध आणि जोखीम समजूनच घ्यायला हवी. म्हणूनच रामकुंवर, अनिता आणि त्यांच्या अनेक पाठीराख्या मैत्रिणी बालविवाहासंबंधी करत असलेल्या कामाचे वेगळे महत्त्व आहे. त्यांच्या प्रयत्नाने मुलींचे बालविवाह करण्यातला बेमुर्वतपणा कमी होत आहे. पण अनेक वेळा सरकारी, राजकारणी मंडळीच बालविवाहाला हजर असतात, हस्तक्षेप करतात. मग दबाव वाढतो. काही वेळा, ठरलेल्या तारखेच्या आधी, दुसऱ्या गावी नेऊन, मध्यरात्री बालविवाह होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोणत्याही किमतीवर, मुलीच्या आयुष्याची धुळधाण करूनसुद्धा तिच्या लग्नाच्या कर्तव्याचे असे काय गारूड आपल्यावर आहे? कळत नाही.
आता बालविवाह होण्याची कुणकुण लागली, की मुली स्वत: किंवा त्यांच्या मैत्रिणी लगेच पोलिसात वर्दी देतात. पालकांशी संवाद साधला जातो. अनिता सांगतात, ‘‘पालकांशी संवाद साधताना आरोग्य आणि कायद्याच्या बाबी उपयोगी पडतात. आरोग्याचे धोके सांगतोच आणि कायदा पाळला नाही तर होणाऱ्या शिक्षेचा धाकही दाखवतो.’’ गेल्या २ वर्षांत या गावांमधले मराठा, माळी, बंजारा, मुस्लीम, पारधी, दलित आणि मातंग समूहातील १३ बालविवाह थांबवले आहेत. बालविवाह थांबवण्याच्या घटनेपेक्षा, ते थांबवल्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहतात. घरातून, समूहातून विरोध असतोच. अशा वेळी काम करणाऱ्या मैत्रिणींचे आत्मबल कमालीचे असावे लागते.
गावांमध्ये सातवीनंतर मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाणही मोठे होते. आजघडीला २५०पेक्षा जास्त मुली गावाबाहेर जाऊन शिक्षण घेत आहेत. काही तालुक्याच्या ठिकाणीच तिघी-चौघीच्या गटाने राहातात. ही बदलाची फक्त सुरुवात आहे. जग बदलण्याचे ओझे केवळ या मुलींवर न टाकता, त्यांना बदल घडवण्यासाठी पाठिंब्याचे पोषक वातावरण गरजेचे आहे. रामकुंवर, अनिता आठ वर्षांपासून सर्वसमावेशक पद्धतीने काम करतात. शाळेतून मुली-मुलांबरोबर, गावात पालक, विशेषत: स्त्रिया, तरुण-तरुणी यांच्याबरोबर संवाद/चर्चा करतात. शाळा-व्यवस्थापन समिती, मुलांच्या हिंसेविरोधी गाव समिती, पंचायत, पोलीस पाटील, अशा यंत्रणांना जोडून काम करतात. मुलींच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका घेऊनही, सर्वाना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांमुळे विरोधाची प्रखरता कमी होते आहे. ग्रामसभा, महिला ग्रामसभा यांच्याप्रमाणे बालग्रामसभांची पद्धत त्या रूढ करत आहेत.
गावागावातून स्त्रियांचा तयार केलेला पाठिंबा हे त्यांच्या कामाचे शक्तिस्थान आहे. महिलांचे गट, त्यांचे हक्क, क्षमताविकास आणि नेतृत्व, यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे स्त्रियांची एक लक्षणीय फळी तयार होत आहे. एका गावात नातीला शाळेतल्या मुलांकडून होणाऱ्यात्रासाविरुद्ध दाद मागण्यासाठी आजी सरसावली. आजी महिला मंडळाची सदस्य होती. संबंधित यंत्रणेने दखल घेतली नाही तेव्हा महिला मंडळाच्या इतर स्त्रियांनी एकत्र येऊन यंत्रणेकडून योग्य कार्यवाही करून घेतली. यामध्ये, नातीने आजीला त्रासाबद्दल सांगणे, आजीने ठामपणे तिची बाजू घेणे आणि आजीच्या पाठीशी महिला मंडळ भक्कम उभे राहणे हे बदलाचे एक आश्वासकप्रारूप दाखवते.
कानडीमाळीगावच्या रेखा राऊत यांना स्त्रियांच्या नेतृत्वविकास प्रशिक्षणाला जाण्यासाठी घरातून परवानगी मिळत नव्हती. त्यांच्या मंडळाच्या सदस्य आणि रेखाच्या नातेवाईक असलेल्या ५५ वर्षांच्या छाया राऊत मदतीसाठी पुढे आल्या. आपल्या वयाचा आणि विश्वासाचा वापर करून, स्वत:च्या सोबतीने त्या रेखांना प्रशिक्षणाला घेऊन गेल्या. केवळ सोबत म्हणून गेलेल्या छाया आता स्वत:ही बिनीच्या शिलेदार आहेत. त्या ठणकावून सांगतात, ‘‘मुलींचे पंख छाटू नका. त्यांच्या इच्छा मारू नका. त्यांना भरारी घेऊ दया. शिक्षण बंद करताय म्हणजे तिचे हातपाय कापल्यासारखेच. अशा वृत्तीने वागू नका.’’
असा स्थानिक आणि भक्कम आधार मिळणे महत्त्वाचे. सात-आठ वर्षे बरोबरीनेराहिलेल्या, आज उच्चशिक्षणघेणाऱ्या मुली या कामातल्या एकमेकींच्या साथीदार आहेत. रामकुंवर-अनिता (वय ३०-४०); छायाची आजी (वय ५५), यांच्यासह भक्ती-श्रुती-पूजा-वैष्णवी (वय १८-२१), सुप्रिया-अनुष्का-आरती (वय १२-१५) यांच्यासारख्यास्त्रिया एकत्र येऊन आपल्या शेकडो मैत्रिणींच्या स्वप्नांचे अवकाश बदलत आहेत. बदल असाच घडणार आहे.
स्त्री-चळवळीतील सिस्टरहूड म्हणजे भगिनीभावाच्या कल्पनेचा हा विस्तारित आविष्कार आहे. इथे जात-धर्माच्या भिंती पार केल्या आहेतच, पण वयाचाही अडसर राहिलेला नाही.
(या लेखासाठी दीपक निकाळजे आणि नितीन कांबळे यांची मदत झाली आहे.)
grassrootfeminism@gmail.com